महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेची गुन्हेगारांवर करडी नजर
विशेष मोहिम दरम्यान देशी गावठी कट्टा बाळगणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखा, धुळे ने घेतले ताब्यात
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- मा. पोलीस अधीक्षक धुळे श्री. श्रीकांत धिवरे यांनी धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने विशेष मोहिम राबवुन अवैध धंदयांसह अवैध शस्त्रांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्याअनुषंगाने दि.10/01/2026 रोजी पोलीस निरीक्षक, श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांना प्राप्त गोपनिय माहितीचे आधारे धुळे शहरातील वरखेडी रोडवरील डंपींग ग्राऊंड जवळ इसम अरबाज महम्मंद शरीफ अन्सारी, वय-22 वर्ष, रा.मौलावी गंज, धुळे यास विना परवाना देशी गावठी कट्टा (पिस्टल) दहशत माजविण्याच्या उद्देशाने देशी गावठी कट्टा (पिस्टल) कब्जात बाळगतांना अग्निशस्त्रसह ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचे ताब्यात मिळुन आलेल्या मुद्देमाल आढळून आला आहे यामध्ये एक देशी गावठी कट्टा (पिस्टल) मॅग्झीन व स्ट्रायकर पिनसह असा एकूण 40 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अशाप्रकारे आरोपी अरबाज महम्मंद शरीफ अन्सारी, वय-22 वर्ष, रा. मौलावी गंज, धुळे याचे कब्जातुन 40,000/- रु.किं.चा देशी गावठी कट्टा हस्तगत करुन, आझादनगर पोलीस ठाणे येथे भारतीय शस्त्र अधिनियम सन 1959 चे कलम 3/25 सह मपोकाक. 37 (1) (3)/135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
आरोपी अरबाज महम्मंद शरीफ अन्सारी, वय-22 वर्ष, रा. मौलावी गंज, धुळे याच्या विरुध्द यापुर्वी देखील आझादनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं.149/2024 भादंवि क. 143, 144, 147, 188, 186, 336 सह मपोकाक.37 (1) (3)/135 गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, धुळे श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सपोनि. श्रीकृष्ण पारधी, सपोनि. नामदेव सहारे, पोलीस अंमलदार शशिकांत देवरे, मुकेश वाघ, धर्मेंद्र मोहिते, सुशिल शेंडे व आशिषकुमार वानखेडे यांनी केली आहे.

