उपवर्गीकरणातून आरक्षण संपविण्याचा डाव , आगीशी खेळू नका - पॅंथर सेनेचा केंद्र,राज्य सरकारला इशारा.
जनसंघर्ष न्यूज
धुळे - अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणातून समाजामध्ये फूट पाडण्याचे काम केले जात आहे. आरक्षण संपविण्याचा हा डाव आगीशी खेळू नका.आमच्याकडे गमविण्यासारखे काहीच नाही , असा इशारा ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी दिला आहे. ऑल इंडिया पॅंथर सेनेची आरक्षण बचाव यात्रा धुळ्यात आली आहे. रेस्ट हाऊस येथून ही यात्रा पोलिस अधीक्षक कार्यालयमार्गे डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत आली.तेथे डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.यावेळी माध्यमांशी संवाद साधताना दीपक केदार म्हणाले की भारतीय संविधानाने दिलेले आरक्षण हे सामाजिक न्यायाचे साधन आहे.परंतु सद्या देशात संविधानिक हक्क, सामाजिक हक्क,अनुसुचित जाती,जमातीच्या आरक्षण व्यवस्थेवर विविध प्रकारचे संकट निर्माण होत असल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे.अनुसुचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून अनुसुचित जातींमध्ये फूट पडण्याचा प्रयत्न केला जात आहे.त्यामुळे हे उपवर्गीकरण तात्काळ रद्द करण्यात यावे.शाहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी .त्यासाठी खटला जलदगती न्यायालयामार्फत चालविण्यात यावा.लोकशाही प्रकियेवर जनतेचा विश्वास अधिकदृढ होण्यासाठी ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात. बुद्धगया महाविहाराचा ताबा बौद्ध समाजाकडे देण्यात यावा, अशा मागण्यांसाठी ही यात्रा काढण्यात आल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार म्हणाले , विविध सामाजिक प्रश्नांवर शासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी.अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा त्यांनी दिला. आरक्षण बचाव यात्रेत राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्यासोबत महाराष्ट्राचे अध्यक्ष विनोद भोळे ,धुळे जिल्हाध्यक्ष सागर मोहिते,प्रविण शिंदे,विशाल वाघ, कृष्णा पारधी, सतिष पाटील ,रत्नशील सोनवणे, दीपक वाडीले, गणेश वाघ, निलेश इंदवे , अशोक करंजे,युवराज बाविस्कर ,आबा अमृतसागर ,बंटी मगरे,शुभम समाधीर, दादा सोनवणे , सम्राट देवरे,पूजा चव्हाण ,ललिता जाधव,गौरव गवळी , यशवंत दुसाणे , राहुल वाघ,नितीन म्हसदे , सागर चव्हाण, छोटू बैसाणे, कुणाल बैसाणे, अशपाक शेख, अताऊर रेहमान,वंदना बागुल,अविनाश बागुल,महेंद्र महाले,गौतम पगारे,भाऊसाहेब बळसाने, यांच्यासह मोठ्या संख्येने धुळेकर नागरिक सहभागी झाले होते.
