धुळ्यात भुमाफियांचा हौदोस बेकायदेशीर खरेदी करून जमीन हडप करण्याचे प्रयत्न - जयेश आबा बागुल
एकाच प्लॉटची दोन वेळा विक्री मालकी हक्क वादाला नवे वळण ; बेकायदेशीर व्यवहाराचा झाल्याचा संशय
जयेश आबा बागुल यांचे पत्रकार परिषदेत गंभीर आरोप
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- देवपूर येथील प्लॉट मालकी हक्क व कथित बेकायदेशीर खरेदी-विक्री प्रकरणी धुळे जिल्हा मराठी पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जयेश आबा बागुल यांनी संबंधित प्रकरणाची सविस्तर माहिती देत न्याय मिळवून देण्याची मागणी प्रशासनाकडे केली.
पत्रकार परिषदेत बोलताना जयेश बागुल यांनी सांगितले की, देवपूर येथील सिटी सर्व्हे क्रमांक २०६५ असलेला प्लॉट त्यांच्या आई स्व. भारती आबा बागुल यांनी १९८९ मध्ये कायदेशीररीत्या खरेदी केला होता. त्यानंतर फेरफार नोंदीनुसार त्यांच्या आईचे नाव अभिलेखात दाखल झाले होते. आईच्या निधनानंतर कायदेशीर वारस म्हणून त्यांचे नाव सिटी सर्व्हे नोंदीत समाविष्ट करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.मात्र, कोणतीही पूर्वसूचना अथवा नोटीस न देता संबंधित मिळकतीवर इतर व्यक्तींची नावे नोंदविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवूनही ती देण्यात आली नसल्याचा दावा करत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
तसेच, संबंधित प्लॉटची बेकायदेशीररीत्या खरेदी-विक्री करण्यात आल्याचा आरोप करत या व्यवहाराविरोधात जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडे अपील दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना प्रशांत लोटन सनेर व रणजितसिंग साहेबराव राजपुत व प्लॉटवर येऊन धमकी देत सामान हटविण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप त्यांनी केला. यासंदर्भात देवपूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच आपल्या कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी जयेश बागुल यांनी पत्रकार परिषदेतून केली.
सदर प्लॉटवर प्रशांत सनेर व रणजीत सिंग साहेबराव राजपूत येऊन धमकी देत सामान आठवण्याचा प्रयत्न करताना आम्ही पोलिसांना 112 नंबर वर फोन करून गाडी बनवली असल्यास तेथे पोलिसांना देखील गम करण्यात आलं की बॉबी येत आहे तुम्ही आत्ताच्या आत्ता निघून जा नाहीतर तुमचं काही खरं नाही असे धमकविले असल्याचे जयेश बागुल यांच्या मावशीने पत्रकार परिषद आरोप केले आहे.
आम्ही अनेक वेळा भूमी अभिलेख येथे आमच्या प्लॉटचे नोंदी व कागदपत्र काढण्यासाठी गेलो असता तिथे आम्हाला उडवा उडवीचे उत्तर देत सांगितले जाते की आपल्या प्लॉटचे आमच्या कार्यालयात एकही कागदपत्र नाही कागदपत्र गहाळ झाले आहेत व बाकी कागदपत्र कुजलेल्या अवस्थेत आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला कागदपत्र देऊ शकत नाही असे सांगून धुडकावून लावले जाते असे पत्रकार परिषदेत जयेश बागुल यांनी सांगितले.

