धुळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न.
धुळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न
जनसंघर्ष न्युज
धुळे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या धुळे शहरातील नवीन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा क्यू माईन क्लब समोर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या उद्घाटनप्रसंगी माजी आमदार तथा मनसे संपर्कप्रमुख प्रकाशजी भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी काळात जनतेच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविण्याबरोबरच पक्षवाढीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या प्रसंगी मनसे प्रमुख रावसाहेब कदम, अजित राजपूत, संदीप जडे, प्राचीता कुलकर्णी, संतोष मिस्तरी, राजेश दुसाने, दीपक बच्छाव, निलेश गुरव, अनिल शिरसाट, अनिल चव्हाण, रामकृष्ण वाघ, गिरधर माळी, संजय सोनवणे, संध्याताई पाटील, प्रतीश पाटील, गौरव गीते, हर्षल परदेशी, शामक दादाभाई, हर्षल पाटील, मोनू मिस्त्री, दिनेश निमोनकर, देवा कोळी, सचिन बैरागी यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
उद्घाटनानंतर उपस्थित मान्यवरांनी नव्या कार्यालयाच्या माध्यमातून धुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला.


0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ