शुक्रवार, ३१ जुलै, २०२६

शिरढाने प्र. डांगरी येथे वीज कोसळून गाय ठार शासनाने मदत द्यावी - शेतकरी समाधान पाटील

 

शिरढाने प्र. डांगरी येथे वीज कोसळून गाय ठार शासनाने मदत द्यावी - शेतकरी समाधान पाटील 

जनसंघर्ष न्यूज 

धुळे | प्रतिनिधी 

धुळे तालुक्यातील शिरढाने प्र. डांगरी येथील शेतकरी समाधान पाटील यांची गाय वीज कोसळून ठार झाली आहे. यासंदर्भात शेतकरी पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळविले आहे. शासनाने लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी केली आहे.

पुढील वृत्त असे कि, धुळे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. सततच्या पावसामुळे नद्या, नाल्याना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शहरासह ग्रामीण भागात देखील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच दि. 31 जुलै शुक्रवार रोजी पहाटे झालेल्या पावसात धुळे तालुक्यातील शिरढाने प्र. डांगरी येथील शेतकरी समाधान पाटील यांच्या शेती परिसरात बांधलेल्या गायीवर वीज कोसळली. या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची शेतकरी पाटील यांनी प्रसासकीय अधिकारी तलाठी यांना माहिती. तरी तलाठी यांनी तत्काळ प्राथमिक अहवाल लिहून घेतला आहे. 

प्रतिक्रिया - 

माझ्या शेतात बांधलेली गायीचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. माझे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने लवकरात लवकर मदत द्यावी. 

समाधान पाटील, शेतकरी ( शिरढाने प्र. डांगरी )

लेबल: ,

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ