मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२६

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना भरती प्रक्रियेत प्राधान्य देण्याची मागणी.

 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना भरती प्रक्रियेत प्राधान्य देण्याची मागणी.






जनसंघर्ष न्यूज 

धुळे – मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना विविध निमशासकीय, शासकीय कार्यालये तसेच आउटसोर्सिंग (कंत्राटी) भरती प्रक्रियेत प्राधान्य द्यावे, या मागणीसाठी श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना, महाराष्ट्र राज्य व युवा प्रशिक्षणार्थी संघटना, साक्री तालुका यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात सांगण्यात आले आहे की, राज्यातील सांगली, जालना, रायगड व जळगाव जिल्ह्यांप्रमाणे धुळे जिल्ह्यातही प्रशिक्षणार्थींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक आदेश काढावेत. शासनाच्या ९ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित उद्योग व आस्थापनांमध्ये संधी देण्याची तरतूद असून त्याची प्रभावी अंमलबजावणी धुळे जिल्ह्यातही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
यासंदर्भात लवकर निर्णय न घेतल्यास १४ ऑगस्ट २०२६ रोजी मानव मित्र संघटनेच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षणार्थी आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी भरत पवार, सुरज गावित, गणेश भामरे, सविता अहिरे, विजय माळी, धर्मा पिपळे, मुकेश कोळी, भास्कर पगारे, चेतन पाटील, आनंद पवार, सोनाली ठाकूर, अनिता कुंवर, सुप्रिया भामरे आदी प्रशिक्षणार्थी उपस्थित होते

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ