गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२६

बेरोजगारी, महागाई अन् शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा तापला! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा



 बेरोजगारी, महागाई अन् शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा तापला!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा

जनसंघर्ष न्यूज 

धुळे : युवकांमध्ये वाढत असलेली बेरोजगारी, सर्वसामान्यांना भेडसावणारी महागाई तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा गंभीर प्रश्न याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या धुळे जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या विविध प्रश्नांवर शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करत पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील युवकांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढत असून, महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दुसरीकडे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला असून कर्जमाफीचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. या गंभीर समस्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन ठोस निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे पक्षाने नमूद केले आहे.

शासनाकडून या प्रश्नांवर ठोस निर्णय घेतला गेला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शासनाविरोधात कठोर भूमिका घेत रस्त्यावर उतरून मोठ्या संख्येने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

या वेळी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या करून शासनाने बेरोजगारी, महागाई आणि शेतकरी कर्जमाफीसारख्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली.

दरम्यान, शासन या मागण्यांवर काय निर्णय घेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची भूमिका काय राहते, याकडे धुळेकरांचे लक्ष लागले आहे.

लेबल: , , ,

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ