कारवाई; तीन मोटारसायकल चोर जेरबंद, दोन गुन्ह्यांची उकल
चाळीसगावरोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; तीन मोटारसायकल चोर जेरबंद, दोन गुन्ह्यांची उकल
दोन चोरीच्या मोटारसायकली व २० हजारांची रोकड असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; एक आरोपी फरार
जनसंघर्ष न्यूज
धुळे - चाळीसगावरोड पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या दोन गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावत तीन आरोपींना निष्पन्न केले असून, त्यांच्याकडून दोन चोरीच्या मोटारसायकली व २० हजार रुपयांची रोकड असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील वाहनचोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगावरोड पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे दाखल होते. या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे उमर इरफान मन्सुरी व फरदीन शेख लतीफ या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी मोटारसायकल चोरीची कबुली दिली.
या कारवाईत चोरीच्या दोन मोटारसायकली (एकूण किंमत १ लाख रुपये) तसेच २० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या गुन्ह्यातील हमीद रशीद अन्सारी हा आरोपी अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.
लेबल: क्राईम न्यूज



0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ