बुधवार, २२ जुलै, २०२६

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा मनसेतर्फे तीव्र निषेध

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा मनसेतर्फे तीव्र निषेध.




.





जनसंघर्ष न्यूज 


दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यावर आणि पालकांवर करण्यात आलेला निर्दयी लाठीहल्ला हा जालीनवाला बाग हत्याकांडाची आठवण करून देणारा ठरला आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेना या हल्ल्याच्या तीव्र निषेध करीत असून देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तत्काळ घ्यावा,अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यात तीव्र आंदोलन सुरू करेल. असा इशारा देत आज धुळ्यात मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.यावेळी मनसेचे जिल्हा सरचिटणीस अजितसिंग राजपुत यांनी केंद्र सरकारच्या कारवाईचा तीव्र शब्दात विरोध नोंदवला.
येथील क्यूमाईन क्लब समोर मनसेच्या  पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत दिल्लीतील लाठीमार आणि विरोधकांवरील पोलीस कारवाईचा निषेध केला.यावेळी मनसेच्या नेत्या प्राची कुलकर्णी, राज्य उपाध्यक्ष रावसाहेब कदम ,जिल्हा सरचिटणीस अजितसिंग राजपुत,संदीप जडे,तालुका अध्यक्ष संतोष मिस्तरी, राजेश दुसाणे, दीपक बच्छाव, रामकृष्ण वाघ,योगेश पाटील, मनविसेचे गौरव गिते,विजय मिस्तरी,हर्षल यादव , देवा कोळी ,नितीन कोळी,सचिन खोपडे,मोहन राजे शिंदे,ईश्वर वाघ,सतीश पाटील,बापू जगन्नाथ ठाकूर,अमोल जगन्नाथ ठाकूर,योगेश सैंदाणे, शामक दादाभाई, उज्वला कोतवाल ,आदी आंदोलनात सहभागी झाले.

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ