मंगळवार, २८ जुलै, २०२६

पाटचारीचे काम पूर्ण करण्यासह सोनवद प्रकल्पासाठी पाणी सोडा, अन्यथा आंदोलन ; कापडणेतील शेतकऱ्यांचा इशारा.

पाटचारीचे काम पूर्ण करण्यासह सोनवद प्रकल्पासाठी पाणी सोडा, अन्यथा आंदोलन  ; कापडणेतील शेतकऱ्यांचा इशारा.









जनसंघर्ष न्यूज 

तालुक्यातील कापडणे व परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी सोनवद प्रकल्पासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या पांझरा नदीवरील पाटचारीचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करून प्रकल्पासाठी पाणी सोडण्याची मागणी करत जिल्हा प्रशासन आणि सिंचन ( पाटबंधारे) विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. मागण्यांवर त्वरित कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने  तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की रेल्वे प्रशासनाच्या कारणामुळे पाटचारीचे खोदकाम करण्यात आले असून संरक्षक भिंतीही तोडण्यात आल्या आहेत.मात्र संबंधित काम अद्याप पूर्ण झालेले नाही.यामुळे सोनवद प्रकल्प भरण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .प्रकल्प भरला नाही तर कापडणे व परिसरातील हजारो नागरिकांच्या पुढील आठ महिन्यांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता भिती व्यक्त करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पाटचारीची तत्काळ संयुक्त पाहणी करावी. संरक्षक भिंत व पाटचारीचे काम तातडीने पूर्ण करावे. सोनवद प्रकल्पासाठी पाणी सोडण्याची हमी देणे , संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीची चौकशी करून आवश्यक कारवाई करणे तसेच कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रकल्प वेळेत भरण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्याची मागणी केली आहे.मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाची जबाबदारी संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांची राहील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनावर शरद पाटील, दिलीप पाटील,योगेश पाटील,कल्पेश पाटील,नवल पाटील,भगवान पाटील, भिका पाटील,उत्तम माळी , प्रकाश चौधरी,कल्पेश पाटील, जयवंत पाटील , प्रभाकर पाटील ,प्रकाश पाटील,प्रल्हाद पाटील,चिंधू लोहार,प्रकाश माळी,प्रशांत पाटील,आबा पाटील,विलास पाटील,संजय जैन ,मनोहर माळी, दीपक पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ