सोमवार, १० ऑगस्ट, २०२६

मानधनाच्या वाढीसाठी आशा स्वयंसेविकांचे जेलभरो आंदोलन....आयटक चा पुढाकार, शेकडो आशा सेविका सहभागी.

मानधनाच्या वाढीसाठी आशा स्वयंसेविकांचे जेलभरो आंदोलन....

आयटक चा पुढाकार, शेकडो आशा सेविका सहभागी....



जनसंघर्ष न्युज 

धुळे - मानधनाच्या वाढीसह विविध प्रलंबित मागण्यासाठी आयटकच्या वतीने आशा सेविकांसाठी जेल रोड येथे जेलभरो आंदोलन करण्यात आल आहे. आंदोलनात शेकडो आशासेविका सहभागी झाल्या होत्या. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात आशा सेविकांनी घोषणाबाजी देखील दिल्या आहे. यावेळी आंदोलनकर्त्या आशा सेविकांना पोलिसांनी ताब्यात घेत नंतर सुटका केली. 

कामगार विरोधी चारही कायदे रद्द करा, आठ तासांचा कामाचा दिवस ठेवा, किमान वेतन व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करा, गटप्रवर्तक व आशा सेविका यांच्या मानधनात तात्काळ वाढ करा, गटप्रवर्तक व अशा सेविकांचं सेवानिवृत्ती वय 65 करा, आशा सेविकांना शासकीय सेवेत सामावून घ्या यांसह विविध प्रकारच्या मागण्यासाठी आशा सेविकांनी आयटकच्या नेतृत्वात जेलभरो आंदोलन केले आहे. 

यावेळी कॉम्रेड वसंत पाटील, कॉम्रेड एल आर राव, यांच्यासह गटप्रवर्तक व आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ