सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२६

₹3 हजारांची लाच मागितली, ₹2 हजार घेताना अडकला; लाचखोर लोकसेवकाला न्यायालयाचा दणका!


₹3 हजारांची लाच मागितली, ₹2 हजार घेताना अडकला; लाचखोर लोकसेवकाला न्यायालयाचा दणका!

शासकीय वैद्यकीय बिलासाठी लाच मागणाऱ्या कर्मचाऱ्याला कारावासाची शिक्षा

जनसंघर्ष न्यूज 

नाशिक : शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, सातपूर नाशिक येथील लोकसेवकावर न्यायालयाने दोष सिद्ध ठरवत कारावासाची शिक्षा सुनावली आहे. रामचंद्र नरसू माकरे, वरिष्ठ सहाय्यक, वर्ग-३ असे आरोपीचे नाव आहे.

तक्रारदार यांचे शासनाकडील मंजूर वैद्यकीय बिलाची रक्कम बँक खात्यात जमा करण्याच्या कामासाठी आरोपी रामचंद्र माकरे यांनी ₹3,000 लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर ₹2,000 लाचेची रक्कम स्वीकारताना त्याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी सातपूर पोलीस ठाणे, नाशिक शहर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 306/2024 अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले.

नाशिक येथील मा. जिल्हा व सत्र न्यायालयात विशेष केस क्रमांक 19/2025 मध्ये सुनावणी झाली. न्यायालयाने आरोपी रामचंद्र नरसू माकरे यांना दोषी ठरवत भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 अंतर्गत 6 महिने कारावास व ₹1,000 दंड, तसेच कलम 13(2) अंतर्गत 1 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच सरकारी अभियोक्त्यांनी काम पाहिले. नागरिकांना कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून लाचेची मागणी होत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


लेबल: , ,

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ