गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

धुळे महानगरपालिका: नूतन 'स्थायी समिती सभापती' पदाचा कार्यभार मा. सौ. लताबाई सोनार यांनी स्वीकारला, पदग्रहण सोहळा थाटात संपन्न.

धुळे महानगरपालिका: नूतन 'स्थायी समिती सभापती' पदाचा कार्यभार मा. सौ. लताबाई सोनार यांनी स्वीकारला, पदग्रहण सोहळा थाटात संपन्न

जनसंघर्ष न्यूज

धुळे प्रतिनिधी - सिद्धार्थ मोरे

धुळे :-  महानगरपालिकेच्या नूतन स्थायी समिती सभापती म्हणून मा. सौ. लताबाई यशवंत सोनार (पोतदार) यांनी आपला पदभार अधिकृतरीत्या स्वीकारला आहे. धुळे महानगरपालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आलेला हा पदग्रहण सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या महत्त्वपूर्ण प्रशासकीय सोहळ्याला भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी, नगरसेवक, आणि युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. दिनेश भाऊ पोतदार यांच्यासह शहरातील नागरिक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नूतन स्थायी समिती सभापतींच्या नेतृत्वाखाली शहराच्या प्रलंबित विकासकामांना आणि प्रशासकीय निर्णयांना निश्चितच नवी गती मिळेल, असा विश्वास याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला असून, सौ. लताबाई सोनार यांना त्यांच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी आमदार अनुप अग्रवाल , जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महापौर मायादेवी परदेशी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, कुणाल पाटील, दिनेश पोतदार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

लेबल: , , ,

सोमवार, २७ एप्रिल, २०२६

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ज्येष्ठ नागरिक आघाडीचे निवेदन : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नियमित निवृत्ती वेतन द्या

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ज्येष्ठ नागरिक आघाडीचे निवेदन : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नियमित निवृत्ती वेतन द्या

जनसंघर्ष न्यूज 

धुळे: स्थानिक स्वराज्य संस्था, प्राधिकरण, महापालिका व पाणी पुरवठा विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नियमित निवृत्ती वेतन मिळत नसल्याने त्यांच्या समोर आर्थिक व मानसिक संकट उभे ठाकले आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नागरिक आघाडीच्या वतीने दि.२३ एप्रिल रोजी, धुळे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना दरमहा ३ ते ४ महिन्यांपर्यंत वेतन उशिराने मिळत असून त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. महागाई, मुलांचे शिक्षण, लग्न व घरगुती जबाबदाऱ्या यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे. काही कुटुंबांमध्ये तर रोजगाराचा प्रश्नही गंभीर बनला असून अनेकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने याबाबत स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही संबंधित प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ योग्य ते आदेश देऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नियमित व वेळेवर निवृत्ती वेतन देण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर ज्येष्ठ नागरिक आघाडीचे अध्यक्ष शिवाजी काकडे, उपाध्यक्ष सुनील देवरे, प्रकाश पाटील, राजेंद्र बागुल, तसेच सदस्य संतोष खंडेलवाल, शरद बिरारी, आनंदा चौधरी, सुनील पोतदार, सुभाष सोनवणे, अशोक बारसे, आर. ए. पवार, सुधीर पोतदार, मुजगेनाना आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. तसेच या निवेदनाची प्रत विभागीय आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी (जि. प. धुळे) व आयुक्त (धुळे महापालिका) यांना माहितीस्तव पाठविण्यात आली आहे.

लेबल: ,

रविवार, २६ एप्रिल, २०२६

बेलगाव ग्रामपंचायत मध्ये जिल्हा सहकारी निवडणूकीत बिनविरोध अनिल यादवराव वानखेडे यांची बिनविरोध निवड

 

बेलगाव ग्रामपंचायत येथे जिल्हा सहकारी निवडणूकीत बिनविरोध अनिल यादवराव वानखेडे यांची बिनविरोध निवड

निवडणूक अधिकारी प्रशासक म्हणून बी. डब्ल्यू वानखेडे व सचिव मोरे यांची प्रमुख उपस्थिती 

मेहकर प्रतिनिधी - दिपक देशमुख

बुलढाणा :- मेहकर तालुक्यातील दि बुलढाणा जिल्हा केंद्रिय सहकारी बँक मर्या बुलढाणा या बॅकेच्या सन २०२६ ते २०३१ या पाच वर्षांकरिता सुचक आणि अनुमोदक होण्यासाठी प्रतिनिधी  म्हणून अनिल यादवराव वानखेडे याच्या नावाचा अर्ज दाखल केला त्यामुळे त्यांच्या विरोधात निवडणूक झाली नाही अविरोध म्हणून नाव घोषित करण्यास आले भाजपचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार प्रतिनिधी  म्हणून अनिल यादवराव वानखेडे हे अविरोध म्हणून याची निवड झाली गावातील नागरिक यानी पेडे व फटाके फोडुन आंनद व्यक्त केला.

लेबल: ,

शुक्रवार, २४ एप्रिल, २०२६

शहाद्यात तब्बल २१७ ओके अवैध दारू जप्त; चोरट्या मार्गाने सुरू असलेल्या तस्करीचा ‘एलसीबी’कडून पर्दाफाश २९ लाखांच्या मुद्देमालासह एकाला बेड्या

शहाद्यात तब्बल २१७ ओके अवैध दारू जप्त; चोरट्या मार्गाने सुरू असलेल्या तस्करीचा ‘एलसीबी’कडून पर्दाफाश २९ लाखांच्या मुद्देमालासह एकाला बेड्या

जनसंघर्ष न्यूज 

नंदुरबार 

शहादामार्गे चोरट्या मार्गाने गुजरात चाललेला दारूचा मोठा साठा नंदुरबार जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) जागरूकतेमुळे महाराष्ट्रातच रोखण्यात यश आले आहे. एलसीबीने या तस्करीचा पर्दाफाश करताना अवैध विदंशी दारूच्या बाटल्याने भरलेले तब्बल २१७ खोके जप्त करीत एकाला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या पिकअप व्हॅनमधून (क्र. एमएच १४ जीडी ७४९७) विदेशी दारूने भरलेल्या बाटल्यांचे काही खोके शहादामार्गे गुजरात राज्यात नेले जात असल्याची गुप्त माहिती खबर्‍याकडून एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना शुक्रवारी (दि. २४) भल्या पहाटे खबऱ्याकडून मिळाली होती. पाटील यांनी क्षणाचीही उसंत न घेता तातडीने ही माहिती पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्या कानावर घातली. त्यांनीही तातडीने पाटील व सहकाऱ्यांना कारवाई करण्याच्या आदेश दिले.
यानंतर हेमंत पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या पथकाला या माहितीची खात्री करण्यासाठी पाठवले. पथकाने तातडीने शहादा शहरातील शिरूर चौफुलीजवळ शहादा-प्रकाशा रस्त्याच्या कडेला सापळा रचला. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार संबंधित पिकअप वाहन पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास शहादातून प्रकाशाकडे येताना पथकाला दिसले. पथकाने वाहन चालकाची चौकशी केल्यावर त्याने आपले नाव देवेंद्र खुमाराम मेघवाल (२६, रा. रूपवास धोडीवाडी बास ढाणी सोजत, ता. सोजत, जि. पाली, राजस्थान) असल्याचे सांगितले. तो वाहनातील वस्‍तूंबाबत उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने पथकाचा संशय अधिकच बळावला आणि त्यांनी वाहनाची तपासणी सुरू केली.
यावेळी वाहनात अवैध दारू नाही भरलेल्या बाटल्यांचे तब्बल २१७ खोके आढळल्याने एलसीबीचे पथकही अवाक झाले. पोलिसांनी सदरील दारूच्या बाटल्या आणि संबंधित वाहन असा २८ लाख ८७ हजार ३६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी देवेंद्र खुमाराम मेघवाल याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात शहादा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) व १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली यशस्‍वी कामगिरी
सदरील कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, पोहेकॉ मोहन ढमढेरे, पोना विकास कापुरे, पोकॉ शोएब शेख, भरत उगले, सतीश घुले यांच्या पथकाने केली.

आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध; 'भीम आर्मी' संघटनेचे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने, राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध; 'भीम आर्मी' संघटनेचे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने, राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा


जनसंघर्ष न्यूज 

राज्य शासनाने अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात आता तीव्र असंतोष निर्माण होऊ लागला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ आज 'भीम आर्मी' या संघटनेच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली आणि प्रशासनाला मागण्यांचे अधिकृत निवेदन देण्यात आले.

शासनाचा हा उपवर्गीकरणाचा निर्णय सामाजिक न्याय, समता आणि संविधानाच्या मूलभूत तत्त्वांना हरताळ फासणारा असून, यामुळे समाजात कृत्रिम फूट पडण्याची भीती या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, आरक्षण वर्गीकरणासंदर्भात नेमलेल्या न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल अद्याप सार्वजनिक का केला नाही, असा सवालही आंदोलकांनी उपस्थित केला आहे. पारदर्शकतेचा अभाव असलेला हा निर्णय तात्काळ रद्द करावा आणि बदर समितीचा अहवाल जनतेसमोर ठेवावा, अशी प्रमुख मागणी भीम आर्मीने केली आहे. शासनाने या मागण्यांची गंभीर दखल न घेतल्यास, संपूर्ण महाराष्ट्रभर मोर्चे, रास्ता रोको आणि मंत्रालय घेराव यांसारखी तीव्र आंदोलने छेडण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

लेबल: , , , ,