मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५

नकाणे गावात महानगर पालिकेने दोन वर्षांपूर्वी विस लक्ष किमतीचे बांधलेले सुलभ शौचालये चोरीला

 

नकाणे गावात महानगर पालिकेने दोन वर्षांपूर्वी विस लक्ष किमतीचे बांधलेले सुलभ शौचालये चोरीला

सुलभ शौचालयांचा मलिदा खाणारे महाभाग कोण?

धुळे महानगरपालिकेत भ्रष्टाचाराचा महाकळस, शौचालयांची विष्ठा खाणारे शोधा - शिवसेना उबाठा 

जनसंघर्ष न्यूज 

      धुळे :- धुळे महानगरपालिकेच्या जुन्या प्रभाग क्रमांक सहा मध्ये आदिवासी वस्तीतील चक्क 10 सीट संख्या असलेले सुलभ शौचालय चोरीला गेले असून, सुलभ स्वच्छालय यांची विष्ठा कुणी कुणी मिळून खाल्ली? असा प्रश्न आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महानगरपालिका आयुक्त व तसेच प्रभाग क्रमांक ६ चे भाजपाचे माजी नगरसेवक यांना विचारला आहे. 

      सन 2021-22 मध्ये प्रभाग क्रमांक सहा येथे महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण निधी अंतर्गत नकाने गावातील आदिवासी वस्तीत श्री मगन मातंग यांच्या घराजवळ महिलांसाठी दहा सीट सार्वजनिक शौचालय बांधणे मकामासाठी 19,98,878, रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या सुलभ शौचालयांचे मे .आदर्श कन्स्ट्रक्शन यांनी 09-02-2023  रोजी पूर्ण करून धुळे महानगरपालिकेच्या तिजोरीतून 19लाख 98878 हजार रुपयांचे कामाचे बिल देखील काढून   घेतले आहे, 

      यासंदर्भात शिवसेनेचे विधी व न्याय विभागाचे प्रमुख एड. भूषण उर्फ बंटी पाटील यांनी गेल्या पंचवार्षिक कार्यकाळात नकाने गावात कोणकोणती विकासाची कामे करण्यात आली त्यासंदर्भात महानगरपालिकेकडून माहिती मिळवल्यानंतर कामांची चौकशी केल्यावर सदर प्रकार त्यांनी उघडकिस आणला.

      या संदर्भात आज शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत एड.बंटी पाटील, भरत मोरे, प्रशांत भामरे, कपिल लिंगायत, अनिल शिरसाट, तेजस सपकाळ आदींनी संबंधित ठिकाणी भेट देऊन सुलभ शौचालयां विषयी ती कुठे बांधली आहेत अशी विचारणा आदिवासी वस्तीत जाऊन केल्यावर, या वस्तीतील रहिवाशी व ज्यांच्या नावाने उल्लेख आहे त्या श्री मगन मातंग यांनी सांगितले की गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आलेले नसून आजही आदिवासी वस्तीतील महिला  भगिनी ह्या आपल्या ओप्रात:विधीसाठी उघड्यावर जातात.सुलभ शौचालयांचा हा प्रकार आदिवासी वस्तीतील बांधवांना कळाल्यावर त्यांनी यावेळी अत्यंत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तब्बल वीस लक्ष रुपयांचा हा भ्रष्टाचार धुळे महानगरपालिकेचे आयुक्त, संबंधित प्रभागाचे इंजिनियर व स्थानिक माजी नगरसेवक यांनी संगम मताने केला असून, आतापर्यंत भ्रष्टाचाराचे अनेक किस्से धुळे महानगरपालिकेत होऊन गेले असताना सुलभ शौचालयांमधील विष्टा, विष्टेचा मलिदा खाण्यापर्यंत आता महानगरपालिका प्रशासनाची मजल गेली असून याप्रकरणी लवकरच देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यात सुलभ शौचालय हरवल्याची तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे एड. बंटी पाटील यांनी सांगितले आहे. या संदर्भात शिवसेना उबाठा वतीने महानगरपालिका आयुक्त जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त यांच्यापर्यंत तक्रार करण्यात आली असून धुळे महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचारी कारभाराच्या या प्रकरणा विरोधात शौचालयांची विष्ठा खाणाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा यावेळी शिवसेना पक्षाच्या वतीने देण्यात आला. 


लेबल: , ,

विरोधकांच्या नकारात्मक राजकारणाणे घेतला जीव ; निष्पाप सुधाकर पाटील यांचा अपघाती मृत्यू !

 विरोधकांच्या नकारात्मक राजकारणाणे घेतला जीव ; निष्पाप सुधाकर पाटील यांचा अपघाती मृत्यू !

नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या विरोधकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा 

– भाजप कार्यकर्ते ललित माळी यांची जोरदार मागणी

जनसंघर्ष न्यूज 

धुळे :-  देवपूर दत्तमंदिर परिसरातील वाहतुकीच्या गंभीर समस्येवर आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांनी कायमस्वरूपी तोडगा काढत भाजीपाला विक्रेत्यांना नवरंग पाणी टाकी जवळील २५० पक्की दुकाने देण्याची ऐतिहासिक घोषणा केली होती. मात्र, काही विरोधकांनी जनतेच्या हिताविरुद्ध घृणास्पद राजकारण करत प्रशासनाला अडथळा निर्माण केला.

      दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी एस-मार्ट जवळ झालेल्या भीषण अपघातात वालखेडा येथील सुधाकर पाटील हे निष्पाप नागरिक बसखाली चिरडून ठार झाले. या दुर्दैवी मृत्यूला जबाबदार ठरणारे म्हणजे तेच विरोधक, ज्यांनी भाजीपाला व किरकोळ विक्रेत्यांना रस्त्यावर ढकलून वाहतुकीची कोंडी आणि अपघातांचे वातावरण तयार केले.

     आमदार साहेबांनी विक्रेत्यांना दिलेली जागा ही विकास, सुरक्षितता व स्थैर्याचं प्रतीक होती. पण, विरोधकांना जनतेचा फायदा पचला नाही. त्यांनी केवळ ‘विरोधासाठी विरोध’ करत नागरिकांच्या सुरक्षेला थेट धोका निर्माण केला.

      “देवपूर परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेशी आणि जीवनाशी खेळ करणाऱ्यांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. हा प्रकार फक्त राजकारण नाही, तर जनतेशी केलेला घोर अपराध आहे. जनतेच्या जीवाशी खेळून राजकीय पोळी भाजणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाही!” – असा जळजळीत इशारा भाजप कार्यकर्ते ललित माळी यांनी दिला.

      आज धुळेकर जनतेत प्रचंड संताप असून, “जनतेच्या सुरक्षेला तडा देणारे, निर्दोष नागरिकांचा बळी घेणारे विरोधक” या शब्दांत संताप व्यक्त केला जात आहे.

लेबल: ,

ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

 

ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने 

जनसंघर्ष न्यूज 

        धुळे :- महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा तसेच ओल्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक आर्थिक सहाय्य जाहीर करा अशा मागण्या करीत सत्यशोधक विद्यार्थी संघटनेतर्फे सोमवारी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करण्यात आली. तसेच प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आलं.  निवेदनात म्हटलं आहे की, महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये विशेषता मराठवाड्यासह इतर काही भागात पावसाच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांसह शेतीची सुपीक माती वाहून गेलेली आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला धान्यसाठा घरगुती वापरातील दैनंदिन वस्तू तसेच काही ठिकाणी घरे देखील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहेत. या सर्व परिस्थितीत शेतकऱ्यांचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं आहे. या प्रचंड नुकसानीचा परिणाम फक्त शेतकऱ्यावरच नाही तर त्यांच्या मुलांच्या शिक्षणावरही मोठ्या प्रमाणात होणार आहे. घरांसह शैक्षणिक साहित्य नष्ट झा. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आलं असून शिक्षणाच्या प्रवाहातून मोठ्या संख्येने मुले वगळली जाण्याची शक्यता आहे. शेतकरी एका वेळेच्या जेवणाची सोय करण्यासाठी संघर्ष करीत असताना आपल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करणे त्यांच्यासाठी अशक्यप्राय ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये यासाठी सरकारने तात्काळ उपाययोजना करून ओला दुष्काळ जाहीर करावा व ओल्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक आर्थिक सहाय्य जाहीर करावं अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे राज्य अध्यक्ष सिद्धांत बागुल, केतन निकम, जिल्हा सचिव हर्ष मोरे, धनंजय जगताप, सिद्धार्थ बैसाणे, नीलिमा भामरे, मयुरी जाधव, श्वेता गवळे, दिनेश बैसाणे, विश्वजीत वाघ, शरद वेंदे, संदीप बोरसे, धनराज झाल्टे इत्यादी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

लेबल: ,

अतिवृष्टीचा कहर होताच आमदार अनुप अग्रवाल यांची मदतीसाठी धाव




अतिवृष्टीचा कहर होताच आमदार अनुप अग्रवाल यांची मदतीसाठी धाव

धुळ्यातील साक्री रोड, नकाणे रोड परिसरात पाहणी करत यंत्रणा कामाला

जनसंघर्ष न्यूज 

धुळे, ता. ३० : शहरात शनिवारी व रविवारी झालेल्या जोरदार अतिवृष्टीचा फटका शहरातील साक्री रोड, नकाणे रोडसह देवपूरमधील विविध भागांना बसला. जोरदार पावसामुळे साक्री रोडवरील एकाचे घरही कोसळले. अनेक नागरिकांच्या घरांसह दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. विविध भागांतील रस्त्यांवर तसेच ठिकठिकाणी पाण्याची तळी साचल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले. याची माहिती मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांना सोबत घेत शहराचे संवेदनशील आमदार अनुप अग्रवाल यांनी भर पावसात नागरिकांच्या मदतीसाठी तत्काळ धाव घेतली. तसेच महापालिकेसह विविध विभागांची यंत्रणा तत्काळ कामाला लावत अतिवृष्टीचा फटका बसलेल्या नागरिकांना दिलासा दिला.

शहरात गेल्या शनिवारी तसेच रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे साक्री रोडसह परिसरातील अनेक भागांतील गटारी तुंबल्या होत्या. लहान-मोठ्या नाल्यांना पूर आल्याने ठिकठिकाणी पाणी घुसले. यात अनेकांच्या घरांसह दुकानांमध्येही पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक भागांत पाण्याची तळी साचली होती. याबाबत माहिती मिळताच आमदार अनुप अग्रवाल स्वतः साक्री रोडसह देवपूरमधील विविध भागां जाऊन परिस्थितीची पाहणी केली. इतकेच नव्हे तर महापालिकेसह अन्य विभागांची यंत्रणा तत्काळ पाचारण करत तुंबलेल्या गटारी, नाल्यांची सफाई करून घेतली. विविध भागांत गटारांवर झालेली अतिक्रमणे तत्काळ हटविण्याचे निर्देशही आमदार अग्रवाल यांनी दिले. तसेच साक्री रोडवरील जे. के. ठाकरे यांच्या हॉस्पिटलजवळी गटारांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तेथेच वाहतुकीला अडथळा ठरणारा वीजखांब तत्काळ अन्यत्र हलविण्याचे निर्देशही दिले. यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी नगरसेवक बन्सी जाधव, प्रशांत बागूल, योगेश ईशी, प्रदीप बैरागी, निनाद पाटील, अजय पवार, दीपक कोळी, मनपा अभियंता चंद्रकांत उगले, महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

आवास योजनेतून घर देऊ : मंत्री रावल

दरम्यान, अतिवृष्टीमुळे घर कोसळलेल्या साक्री रोडवरील शनीनगरमधील अहिरे कुटुंबीयांची रविवारी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासोबत आमदार अग्रवाल यांनी भेट घेतली.  यावेळी अहिरे कुटुंबीयांना धीर देत सांगितले, की तुम्ही काळजी करू नका, प्रधानमंत्री आवास योजनेतून तत्काळ घर बांधण्यासाठी मदत उपलब्ध करून देऊ. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांना तसे आदेश दिले. तसेच अहिरे कुटुंबीयांची तात्पुरती निवासाची राहण्याची सोय तात्काळ करून देण्यासही निर्देश दिले.

लेबल: , ,

सामाजिक कार्यकर्त्याला शिविगाळ , दमदाटी करणाऱ्या पोलिसांना मानव अधिकार आयोगाचा दणका




सामाजिक कार्यकर्त्याला शिविगाळ , दमदाटी करणाऱ्या पोलिसांना मानव अधिकार आयोगाचा दणका 

शिवीगाळ, दमदाटी करणाऱ्या दोघा पोलिसांच्या चौकशीचे मानवाधिकार आयोगाचे आदेश - रफिक शाह 

जनसंघर्ष न्यूज 

धुळे :- शहरातील चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनमधील कॉन्स्टेबल स्वप्नील बाबुराव सोनवणे व इंद्रजित ईश्वर बैराट यांनी केलेल्या गैरवर्तनाची तक्रार महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग मुंबई यांच्याकडे करण्यात आली होती. तसेच तक्रारदाराला त्याच्या मानवी हक्कांच्या उल्लंघनासाठी भरपाई म्हणून, आदेश मिळाल्यापासून ८ आठवड्यांच्या आत राज्य सरकारकडून २०,०००/- रुपये दिले जातात. जर ते पूर्ण झाले नाही तर राज्य सरकार रक्कम अंतिमपणे मिळेपर्यंत वार्षिक ७ टक्के दराने साधे व्याज देईल. या दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाची विभागीय चौकशी करण्याचे आणि त्यांच्यावर आवश्यक ती शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश दिले अशी माहिती रफिकशाह गुलाब शाह यांनी पत्रकार परिषदेत दिली. साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या भवनात आयोजित पत्रकार परिषदेत तक्रादार रफिक शाह गुलाब शाह यांनी माहिती देताना सांगितले कि, चाळीसगाव रोड पोलिस स्टेशन येथे दि.२९/१/२०२४ रोजी पोलीस स्टेशनला गेलो असतो शाहरूख शेख या इसमाची अशोक लेलंड गाडी स्क्रॅप ऑईल सोबत सदर पोलीसांनी जमा केलेली होती. २० हजार देतील तरच गाडी सोडू. मी त्यांना सांगीतले पैसे देणार नाही. संबंधितांना मी बिल वगैरे दाखवले. गयावया केली. त्यांनी २० हजार रूपयांची लाचेची मागणी गाडी वाल्याकडे केली. तसेच मला अरेरावीची भाषा करून दमदाटी केली. शिवीगाळ केली. माझ्या विरुध्द अँटासिटीचा गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली. पोलिसांचे सर्व कृत्य व्हिडीओ शुटींगद्वारे उपलब्ध आहे. त्यामुळे गैरवर्तनाची तक्रार महराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग मुंबई यांच्या कडे केली होती. तरी त्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन व्हावे अशी देखील मागणी तक्रारदार याने केली आहे.

लेबल:

रविवार, २८ सप्टेंबर, २०२५

शिंदखेडा तालुक्यात अचानक पावसासह वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान


शिंदखेडा तालुक्यात अचानक पावसासह वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान  

तापी परिसरातील, शेतकरी बांधवांच्या पिकांचे नुकसान

जनसंघर्ष न्यूज 

     शिंदखेडा :- तालुक्यातील कळगाव कुंभारे येथील रावसाहेब विक्रमसिंग गिरासे, व  कुंभारे येथील शेतकरी ज्ञानेश्वर अंबरसिंग गिरासे,गट नंबर 131/1,2. गोविंदसिंह पौलतसिंग गिरासे, ज्ञानेश्वर भास्कर पाटील या शेतकऱ्यांचे केळीचे,नुकसान झाले आहे,कुंभारे,कळगाव लोहगाव वसमाने व इतर तापी परिसरात कापूस,ऊस, मका,पपई,व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच, लोहगावातील शेतकरी चंद्रकांत पाटील यांच्या शेतातील केळी च्या बाग जमिन दोष झाला आहे .वसमाणे ,रंजाने,जसाने रंजाणे अच्छी असे,असे अनेक तापी परिसरातील अनेक गावात शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले,ऊस, पपई, कपाशी,केळी मिरची रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान प्रशासन तात्काळ दखल घेऊन शेतकरी बांधवांच्या पिकांचे नुकसान भरपाई जाहिर करावी असे तापी परिसरातील शेतकरी बांधवांची मागणी आहे.

लेबल: , , ,

धुळे गर्बा महोत्सव २०२५ – पाचव्या व सहाव्या दिवशी महिलांचा जल्लोष, मान्यवरांची गौरवशाली उपस्थिती

 

  धुळे गर्बा महोत्सव २०२५ – पाचव्या व सहाव्या दिवशी महिलांचा जल्लोष, मान्यवरांची गौरवशाली उपस्थिती 

 जनसंघर्ष न्यूज 

धुळे  दि. २८  :-  शहरात सुरू असलेल्या धुळे गर्बा महोत्सव २०२५ ला पाचव्या व सहाव्या दिवशीही महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भव्य सोहळा अविस्मरणीय केला.


या दोन दिवसांच्या महोत्सवाला मा. जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. धरतीताई देवरे,मा.सभापती मनपा धुळे शितल भाऊ नवले,तरुणांचे आकर्षण विक्की बाबा परदेशी,युवा नेते ॲड.रोहित चांदवडे,विश्व हिंदू परिषद अध्यक्ष निलेशजी रूणवाल,सेवानिवृत्त पोलिस अधिकारी कमलाकर नाना पाटील,देवपूर मंडळ अध्यक्ष प्रथमेश भाऊ गांधी,प्रसिद्ध उद्योगपती योगीराज जी मराठे, विश्व हिंदू परिषदेचे चंदन सोमानी आदी मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.


✨ पाचवा दिवस – मोबाईल टॉर्च थीम

या दिवशी सर्व लाईट्स बंद करून हजारो महिलांनी एकाच वेळी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात नृत्य सादर केले. मैदानावर उभा राहिलेला हा अद्वितीय देखावा थरारक आणि मनमोहक ठरला. महिलांच्या हातातील प्रकाशाने एक वेगळीच ऊर्जा आणि ऐक्याचा संदेश दिला.


✨ सहावा दिवस – समाजसुधारकांच्या वेशभूषेत गर्बा

सहाव्या दिवशी महिलांनी माँ साहेब जीजाऊ, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, माँ रमाई, ताराबाई यांसह थोर समाजसुधारक व महापुरुषांच्या वेशभूषा परिधान करून गर्बा सादर केला. हजारो महिलांनी एकाच वेळी साकारलेल्या या भूमिकांमुळे प्रेक्षकांसमोर नारीशक्तीचे अभूतपूर्व योगदान जिवंत झाले.


🌺 मान्यवरांचे गौरवोद्गार

• मा. धरतीताई देवरे यांनी उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजक ललित दादा माळी यांचे अभिनंदन केले.

• शितल भाऊ नवले यांनी हा उत्सव मुंबई–पुण्यासारख्या महानगरांप्रमाणे भव्यतेने साजरा होत असल्याचे गौरवले.

• युवा नेते ॲड. रोहित चांदवडे यांनी धर्मयोद्धा अनुप भैय्या अग्रवाल तसेच जिल्हाध्यक्ष गजेंद्र जी अंपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ललित दादांनी धुळ्यासाठी केलेल्या भव्य आयोजनाचे कौतुक केले.

• या कार्यक्रमाची संकल्पना प्रियंका ताई माने (मोटीवेशनल स्पिकर) यांची असून, त्यांच्या उत्कृष्ट संकल्पनेबद्दल मान्यवरांनी विशेष कौतुक केले.


🌟 आगामी जागतिक विक्रम प्रयत्न

देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त सुरू सेवा पंधरवड्याचा भाग म्हणून, दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी सेलिब्रिटी आश्विनी महांगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक विक्रम नोंदविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

या दिवशी धुळेकर महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन धुळ्याचे नाव जागतिक स्तरावर नेण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक ललित दादा माळी यांनी केले आहे.


👉 धुळे गर्बा महोत्सव २०२५ च्या या रंगीबेरंगी पर्वात महिलांच्या उत्साहाबरोबरच नारीशक्तीचा सन्मान आणि सामाजिक भानाचा संदेश दिला जात असल्याने धुळेकरांचा अभिमान वाढला आहे.

लेबल: ,

शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५

नक्षलवादविरोधी जनसुरक्षा विधेयकाच्या समर्थनार्थ विविध संघटनांची धुळ्यात सभा

धुळे : नक्षलविरोधी जनसुरक्षा विधेयक समर्थन समितीतर्फे पारोळा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ झालेल्या सभेवेळी विधेयकाच्या समर्थनार्थ  विविध घोषणा देताना विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी.

नक्षलवादविरोधी जनसुरक्षा विधेयकाच्या
समर्थनार्थ विविध संघटनांची धुळ्यात सभा

जनसंघर्ष न्यूज 

धुळे, ता. २७ : नक्षलवादी आणि माओवादी विचारसरणीच्या विध्वंसक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने विधिमंडळात मंजूर केलेल्या महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक २०२४ च्या समर्थनार्थ धुळे शहरातील विविध संघटनांचतर्फे समर्थन सभा नुकतीच झाली. नक्षलविरोधी जनसुरक्षा विधेयक समर्थन समितीतर्फे झालेल्या या सभेत सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, कामगार, विविध संघटनांचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

विवेक विचार मंचचे राज्य संयोजक सागर शिंदे यांनी सभेला संबोधित करताना म्हटले, की शहरी नक्षलवादी चळवळी या संविधानविरोधी असून, लोकशाही व्यवस्थेच्या विरोधात सातत्याने जहाल विचार पेरण्याचे काम करत आल्या आहेत. या फुटीरतावादी संघटनांना कायमस्वरूपी प्रभावी प्रतिबंध करण्यासाठी जनसुरक्षा कायद्याची आवश्यकता आहे. हा कायदा संविधानिक असूनही कम्युनिस्ट संघटना यास विरोध करत समाजामध्ये गैरसमज पसरवत आहेत. 

अखिल भारतीय वाल्मीकी महासभेचे प्रदेशाध्यक्ष नागेज कंडारे यांनी प्रास्ताविक केले. समर्थन सभेला विवेक विचार मंचचे विभाग संयोजक जयेश चौधरी, उमेश चौधरी, भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ज्येष्ठ नेते विजय पाच्छापूरकर, हिरामण गवळी, माजी महापौर प्रदीप कर्पे, प्रतिभा चौधरी, महेश मिस्तरी, भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय पवार, शिवाजी काकडे, भाजपचे कमलाकर पाटील, उमेश चौधरी, रोहित चांदोडे, अमित पवार, पप्पू डापसे, जयेश मगर, जयंत वानखेडकर, अनिल थोरात, रूपाली पाटील, सुचेता शिनकर, राजेश वाणी, महेंद्र विसपुते, काशिनाथ लोहरे, प्रेमचंद गोयल, धनराज पिवाल, सुरेश बिसनारिया आदी मान्यवर उपस्थित होते.

सभेत विवेक विचार मंच, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्व हिंदू परिषद, भारत विकास परिषद, समरसता मंच, वनवासी कल्याण आश्रम, भटके विमुक्त विकास परिषद, अखिल भारतीय वाल्मीकी महासभा, अण्णा भाऊ साठे विचार मंच, हिंदू जागरण मंच आदी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला.

लेबल: ,

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यंग भोर्डे आळी मित्र मंडळाचे नाना पेठ येथे देवीची आरती



 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यंग भोर्डे आळी मित्र मंडळाचे नाना पेठ येथे देवीची आरती

जनसंघर्ष न्यूज 

पुणे प्रतिनिधी - शंकर जोग

         नाना पेठ येथील यंग भोर्डे आळी मित्र मंडळ सार्वजनिक नवरात्र महोत्सवानिमित्त काल सायंकाळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंडळाला सदिच्छा भेट देऊन त्यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली, यावेळी यंग भोर्डे आळी मित्र मंडळ सार्वजनिक नवरात्र महोत्सवाचे अध्यक्ष माजी नगरसेवक व शिवसेना पुणे शहर सहसंपर्क प्रमुख अजय भोसले यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, सन 1988 पासून अखंड सुरू असलेला नवरात्र सोहळा पुण्याच्या पूर्व भागातील सर्व नागरिकांच्या श्रद्धेचा विषय बनलेला आहे, मंडळ यंदाचे वर्ष 38 वे वर्ष साजरी करत आहे, या नवरात्र मध्ये नऊ दिवस भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम, श्री सूक्तपठाण, महाआरती, माता की चौकी, कालीचरण महाराज यांची उपस्थिती असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे, माजी नगरसेवक अजय बाप्पू भोसले हे सलग तीस वर्ष मंडळाचे अध्यक्ष पद भूषवत आपली सेवा मातेच्या चरणी अर्पण करीत आहे, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दुपारी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येतो व सायंकाळी ढोल ताशेने देवीची भव्य मिरवणूक नाना पेठ येथून काढण्यात येते, अशी माहिती यंग भोर्डे आळी मित्र मंडळाचे अध्यक्ष व पुणे शहर शिवसेना सह संपर्कप्रमुख अजय बापू भोसले यांनी दिली,

बालाजी रथोत्सवात भक्तांची काळजी घेण्यासाठी एबी फाउंडेशन तर्फे रुग्णवाहिकेची सज्ज




आमदार अनुप अग्रवाल यांचे एबी फाउंडेशन घेणार श्री भगवान बालाजी भक्तांची काळजी

रथोत्सवातील मिरवणुकीत डॉक्टरांसह रुग्णवाहिकेची सज्जता 

      धुळे, ता. २७ : घटस्थापनेपासून प्रारंभ झालेल्या येथील श्री बालाजी रथोत्सवांतर्गत गेल्या सहा दिवसांपासून शहरातील विविध भागांतून भगवान श्री बालाजींचे वहन निघत आहे. तब्बल १५० वर्षांची परंपरा असलेल्या या बालाजी रथोत्सवाची विजयदशमीनंतर पाशांकुशा एकादशीला (ता. ३) भव्य मिरवणुकीद्वारे सांगता होईल. या रथोत्सवाच्या मिरवणुकीत श्री बालाजी भक्तांची काळजी घेण्यासाठी शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतील एबी फाउंडेशन सज्ज झाले असून, भक्तांसाठी डॉक्टरांच्या पथकासह रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार आहे.

       एबी फाउंडेशनतर्फे गेल्या वर्षभरापासून विविध गंभीर आजाराच्या रुग्णांना विविध स्तरांवर वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जात आहे. यामध्ये दुर्धर आजारांचा सामना करणाऱ्या रुग्णांसह अन्य रुग्णांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासह त्यांच्यावर तातडीने उपचार, शस्त्रक्रिया व्हाव्यात म्हणून सर्व प्रकारची मदत दिली जात आहे. तसेच शहरासह परिसरात विविध शिबिरे भरवून रुग्णांना आरोग्य सेवेचा मोफत लाभ दिला जात आहे. यामुळे वर्षभरातच आरोग्याच्या सेवेत एबी फाउंडेशनने शहरवासीयांचा विश्वास संपादन केला आहे. सध्या सर्वत्र नवरात्रोस्वाची धूम सुरू असून, ठिकठिकाणी विविध संस्था, मंडळांतर्फे गरबा, दांडिया खेळण्यासाठी भक्तांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय शहरातील प्रख्यात श्री बालाजी संस्थानतर्फे घटस्थापनेपासून शहरातील विविध मार्गांवरून श्री भगवान बालाजींच्या वहनांची मिरवणूक काढण्यात येत आहे. या बालाजी रथोत्सवाची दसऱ्यानंतर येणाऱ्या पाशांकुशा एकादशीला शहरातील मुख्य मार्गांवरून निघणाऱ्या मिरवणुकीने सांगता होते. या मिरवणुकीत शहरासह परिसरातील विविध गावांतील श्री बालाजी भक्त सहभागी होत असतात. ही रथोत्सवाची मिरवणूक म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा भव्य आध्यात्मिक उत्सव असतो. या रथोत्सवातील मिरवणुकीत दुर्दैवाने काही दुर्घटना घडली तर आमदार अग्रवाल यांच्या संकल्पनेतील एबी फाउंडेशनतर्फे डॉक्टरांचे पथक तसेच रुग्णवाहिका सज्ज ठेवली जाणार आहे. जेणेकरून संबंधितांना तत्काळ योग्य ते प्राथमिक उपचार मिळण्यास मदत होईल. गरज भासल्यास संबंधितांना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले जाईल. 

आजपासून गरबाप्रेमींसाठीही रुग्णवाहिका

सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाची धूम सुरू असून, शहरातील विविध भागांतील संस्था, संघटना, मंडळांतर्फे गरबा, दांडिया खेळला जात आहे. यामध्ये त्या-त्या भागातील आबालवृद्ध सहभागी होत आहेत. यामध्ये अनेकदा सतत दांडिया, गरबा खेळल्यामुळे अशक्तपणा जाणवणे, अस्वस्थ वाटणे, ड्रिहायड्रेशन आदी त्रास होत आहे. कधी-कधी हृदयविकाराचा त्रासही जाणवतो आहे. अशांसाठी एबी फाउंडेशनतर्फे आजपासून रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली आहे. ज्यांना काहीही त्रास जाणवला, तर गरबा मंडळांनी अथवा संबंधितांनी एबी फाउंडेशनचे समन्वयक तथा आरोग्यदूत कमलेश देवरे (मोबाईल-80555 56990) यांच्याशी तत्काळ संपर्क साधावा. संपर्कानंतर अवघ्या १० मिनिटांत संबंधित ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाईल व संबंधितांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले जाईल. नागरिकांनी एबी फाउंडेशनच्या या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. देवरे यांनी केले.

लेबल: ,

प्रभाग क्र.7 मधील गुलमोहर हौ.सोसायटीच्या रस्त्यांची समस्या सोडवा अन्यथा महानगरपालिकेला कुलूप लावू - समाधान बैसाणे


 प्रभाग क्र.7 मधील गुलमोहर हौ.सोसायटीच्या रस्त्यांची समस्या सोडवा अन्यथा महानगरपालिकेला कुलूप लावू - समाधान बैसाणे 

गुलमोहर सोसायटीचे नागरिक आक्रमक आयुक्तांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा 

जनसंघर्ष न्यूज 

    धुळे :- शहरातील प्रभाग क्र.7 मधील गुलमोहर सोसायटी परिसरात  पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पाईपलाईनचे काम सुरू होते. या कामामुळे कॉलनी थोडेफार रस्ते होते त्या रस्त्याची खूप वाईट अवस्था झाली असून गुलमोहर कॉलनी परिसरात अजून पर्यंत रस्त्याचे काम झालेले नाही यामुळे परिसरातील नागरिकांची खूप हाल सहन करावे लागत आहे. तरी देखील महापालिका प्रशासनाला वेळोवेळी सांगून देखील महापालिका आयुक्त व प्रशासक याकडे दुर्लक्ष करीत आहे. 

        या परिसरात रस्ते नसल्याने रोज अपघात घडत असतात, दोन ते तीन दिवसापूर्वी सकाळी शाळेतील विद्यार्थ्यांची गाडी सुद्धा रस्त्यात फसल्यामुळे खराब झाली होती अशा अनेक समस्यांना रोज सामोरे जावे लागत आहे. 

        मागील वर्षी देखील पावसाळ्यात स्वतः खासदार आमदार महापालिकेच्या आयुक्त यांनी गुलमोहर हाऊसिंग सोसायटीला भेट देऊन रस्त्यांची पाहणी केली होती. तेव्हा देखील त्यांना स्वतःला रस्त्याने चालताना त्रास सहन करत कॉलनीची पाहणी करावी लागली होती व त्यांनी तेव्हा कॉलनीच्या नागरिकांना आश्वासन दिले होते की लवकरात लवकर तुमच्या रस्त्यांची कामे करून देऊ परंतु अजून देखील पाहणी करून एक वर्ष होऊन देखील काहीही काम होत नाही गुलमोहर कॉलनी परिसराकडे स्थानिक नगरसेवकांचे व प्रशासनाचे दुर्लक्ष केले जात आहे. 

        गुलमोहर कॉलनी परिसरातील काही ठिकाणी दोन-तीन महिने आधी काँक्रिटीकरण रस्ते झाले आहेत ते देखील दुसऱ्याच पावसात खराब होण्यास सुरुवात झाली असून काँक्रिटीकरण निघत चालले आहे असे निकृष्ट दर्जाचे काम नगरपालिकेचे कंत्राटदार करीत असतात तरी देखील आयुक्त गप्प बसतात कसे काय त्यांच्यावर कारवाई का होत नाही असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

          रिपब्लिकन सेना व गुलमोहर हाऊसिंग सोसायटी कॉलनी परिसरातील नागरिकांकडून आयुक्तांना निवेदन देऊन नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवून रस्त्यांची कामे 8 दिवसात नाही सोडवली तर रिपब्लिकन सेनेच्या वतीने गुलमोहर हाउसिंग सोसायटी कॉलनी परिसरातील नागरींकासह मनपाच्या गटाला कुलूप लावून तीव्र स्वरूपाचे ओळख केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

         यावेळी रिपब्लिकन सेनेचे धुळे जिल्हाध्यक्ष समाधान बैसाणे , पै. मुकेश खरात, महिला जिल्हाध्यक्ष कविता पाटील, महिला जिल्हाध्यक्ष संजना अहिरे , महिला शहराध्यक्ष अश्विनी गवळी, चेतन भदाणे, नरेंद्र बिलाडे, कुलदीप सोनवणे, क्रिष्णा मोरे , शुभम पाटील, नम्रता अहिरराव, नीता मोरे, उर्मिला भदाणे , वंदना भदाणे , प्रतिभा सोनवणे , योगिता पाटील, मीना पाटील, प्रियंका पाटील, अल्का भदाणे, मंगला पाटील, कुसुंबा महाले, श्वेता नेरकर, सविता देवरे, जयश्री सूर्यवंशी इत्यादी उपस्थित होते.

लेबल: , ,

शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क सरसकट माफ करावे- अभाविप

 

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क सरसकट माफ करावे- अभाविप

जनसंघर्ष न्यूज 

       धुळे :- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धुळे शाखेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यां मार्फत मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क सरसकट माफ करावे, यासह आठ मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

        राज्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने घरे, शाळा, महाविद्यालये, शेती आणि जीवनावश्यक वस्तूंचा नाश झाला आहे.

        या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत अभाविपच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले असून, त्यामध्ये पुढील महत्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.

1. पूरग्रस्त शाळा-महाविद्यालयांचे नुकसान भरून काढण्यात यावे. विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तके विनामूल्य द्यावीत.

2. अतिवृष्टीग्रस्त क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क संपूर्ण माफ करण्यात यावे.

3. परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांसाठी फेर परीक्षा घेण्यात याव्यात.

4. पूरग्रस्त भागांतील स्पर्धा परीक्षा फॉर्म शुल्क माफ करून सरसकट फॉर्म भरण्याची सुविधा द्यावी.

5. "कमवा व शिका" योजनेचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा.

6. नष्ट झालेली शैक्षणिक कागदपत्रे विनाशुल्क पुन्हा उपलब्ध करून द्यावीत.

7. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून योग्य आर्थिक मदत देण्यात यावी.

8. पूरग्रस्त भागांमध्ये आरोग्य सुविधा, स्वच्छता मोहीम आणि औषधोपचार त्वरीत उपलब्ध करून द्यावेत. 

         विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच पुरग्रस्त कुटुंबांना योग्य आर्थिक मदत व्हावी यासाठी शासनाने मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने मदत करत दिलासा देण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी अभाविप धुळे शहर मंत्री मयुरी जाधव यांनी केली आहे.

          यावेळी धुळे जिल्हा संयोजक लहानु कोळेकर,  सहमंत्री कृष्णा वाघ, हर्षल शिरसाठ, जयेश पाटील उपस्थित होते.

लेबल: ,

धुळे जिल्ह्यात पहिल्यांदाच MD ड्रग्जची तस्करी उघड ; धुळे LCB ची दमदार कारवाई



धुळे जिल्ह्यात पहिल्यांदाच MD ड्रग्जची तस्करी उघड ; धुळे LCB ची दमदार कारवाई 

 17 लाख 51 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा, धुळे कडुन जप्त

जनसंघर्ष न्यूज 

      धुळे :- दि. 25 सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांना गोपनीय बातमी मिळाली होती की, धुळे शहरात इसम नामे सैय्यद आतिक सैय्यद रफीक रा. मालेगांव, जिल्हा नाशिक हा त्याच्या साथीदारासह कार क्रमांक GJ 16 DS 0314 मध्ये मानवी मेंदुवर विपरीत परिणाम घडवुन आणणारा गुंगीकारक अंमली पदार्थ Methedrone (MD पावडर) घेवून जळगांव कडून धुळे कडे येत आहे. NDPS अॅक्ट मधील सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन छापा कारवाईसाठी पोलीस अधीक्षक, धुळे श्री. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांचे पथक तयार करण्यात आले. गोपनीय बातमीच्या अनुषंगाने मोहाडी शिवारातील हॉटेल रेसिडन्सी पार्क जवळील नवीन नागपूर सुरत महामार्गावर कार क्रमांक GJ 16 DS 0314 हे थांबविण्यात आले असता वाहनातील दोन संशयित इसमांनी वाहनातून उतरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने शिताफीने पकडले. नमुद वाहनातील संशयित इसम 1) सैय्यद आतिक सैय्यद रफीक, वय 37 वर्ष रा. ओल्ड आग्रा रोड न्यु फरहान हॉस्पीटल मालेगांव जिल्हा नाशिक व 2) मजहर खान युसूफ खान, वय 33 वर्षे, रा बासवाडा, तहसील पत्रीगंज खिडकी, जि बासवाडा, राज्य राजस्थान यांची अंगझडती घेतली असता संशयित सैय्यद आतिक सैय्यद रफीक याचे ताब्यात 104 ग्रॅम वजनाची सफेद पावडरची पुडी मिळून आल्याने त्यास विचारपुस केली असता त्याने सदरचा माल हा MD पावडर असल्याची कबुली दिली. घटनास्थळी हजर असलेल्या फॉरेन्सिक व्हॅन टीम कडून मिळून आलेल्या MD पावडरची प्राथमिक तपासणी करून 10,40,000/- रुपये किंमतीची सफेद रंगाची Methedrone (MD) पावडर, 7,00,000/- रुपये किंमतीची पांढऱ्या रंगाची गुंडाई कंपनीची कार क्र GJ 16 DS 0314, 11,000/- रुपये किंमतीचे 03 मोबाईल फोन असा एकूण 17,51,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल कारवाई दरम्यान जप्त करण्यात आला आहे.

      सदर आरोपी  1) सैय्यद आतिक सैय्यद रफीक, वय 37 वर्ष रा. ओल्ड आग्रा रोड न्यु फरहान हॉस्पीटल मालेगांव जिल्हा नाशिक व 2) मजहर खान युसूफ खान, वय 33 वर्षे, रा बासवाडा, तहसील पत्रीगंज खिडकी, जि बासवाडा, राज्य राजस्थान हे वरील वर्णनाचा व किंमतीचा अंमली पदार्थ Methedrone (MD) पावडर विक्री करण्याच्या उददेशाने ताब्यात बाळगतांना मिळून आले म्हणून त्यांच्या विरुध्द मोहाडीनगर पोलीस ठाणे गु.र.नं. 258/2025, NDPS कायदा सन 1985 कलम 8(क), 21(क), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना  गुन्ह्याचा तपास कामी अटक करण्यात आली आहे.

      अटक आरोपींनी यापूर्वी अनेकवेळा धुळे शहरात येऊन MD ड्रग्जची विक्री केली असलेबाबत प्राथमिक माहिती दिली आहे. सदर ड्रग्जचा वापर हा विशेषतः उच्चभ्रु लोकांचे पार्टी मध्ये केला जातो. तरी MD ड्रग्ज धुळे शहरातील व जिल्ह्यातील कोणाकडे विक्रीसाठी जात होता व या ड्रग्जचे खरेदीदार कोण आहेत याचा तपास सुरु आहे.

      सदर कामगिरी श्री. श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक धुळे, श्री. अजय देवरे, अपर पोलीस अधीक्षक धुळे यांचे मार्गदर्शनाखाली श्रीराम पवार, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धुळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि श्रीकृष्ण पारधी, पोलीस उपनिरीक्षक श्री. चेतन मुंढे, संजय पाटील, पोलीस अंमलदार राहुल सानप, पवन गवळी, आरीफ पठाण, देवेंद्र ठाकुर, प्रकाश सोनार, जगदीश सुर्यवंशी, अमोल जाधव यांनी केली आहे.

लेबल: ,

गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५

शिरूड येथील सामाजिक कार्यकर्त्यांचा शिवसेना उबाठात प्रवेश

 

शिरूड येथील सामाजिक कार्यकर्त्यांचा शिवसेना उबाठात प्रवेश  

जनसंघर्ष न्यूज 

धुळे - धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघातील शिरूड जिल्हा परिषद. गटातील सामाजिक कार्यकर्ते यांनी बुधवार दि. 24 रोजी शिवसेना उपनेते शुभांगी पाटील व जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे प्रवेश केला.  शिरूड येथील  किशोर भाऊ पवार यांच्यासह सुनील हुजरे , राजेंद्र पवार, दिलीप जावळे, जितेंद्र सपकाळ, बाबाजी जावळे, समाधान पवार, शामकांत शेजवळ, विनोद शिंदे, अण्णा रटके, जिगर पटेल, ईश्वर पवार आदींनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी प्रथम महापौर भगवान बापूजी करणकाळ . उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील, तालुकाप्रमुख बाबाजी पाटील ,तालुका संघटक भैय्यासाहेब हेमराज पाटील.. तालुका समन्वयक सरपंच प्रकाश वाघ महिला आघाडीच्या संगीता जोशी,जयश्री वानखेडे,सुनिता शिरसाठ, अरुणा मोरे आदींसह शिरूड  येथील शिवसैनिक शिवसैनिक उपस्थित होते.


लेबल:

विनोद सोळंकी यांची अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी नियुक्ती



विनोद सोळंकी यांची अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी नियुक्ती

जनसंघर्ष न्यूज 

पुणे प्रतिनिधी - शंकर जोग

विनोद सोळंकी यांची अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे हे नियुक्तीपत्र अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते देण्यात आले, यावेळी ऑल इंडिया जैन मॅनॉरिटी फेडरेशनचे राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी, राष्ट्रीय सदस्य जिनेन्द्र कावेडिया, महाराष्ट्र महामंत्री विकास अच्छा, मयूर सरनो त, श्रीमल वेदमूथा, अभिजीत शहा, आदि यावेळी उपस्थित, विनोद सोळंकी हे अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करतात जात धर्म न पाहता अनेकांच्या समस्या सोडवण्यामध्ये ते पुढाकार घेतात त्याची दखल घेत अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी त्यांना या पदावर नियुक्ती केली विनोद सोळंके यांच्या नियुक्तीने जैन समाजामध्ये आनंदाचा वातावरण आहे आणि शुभेच्छा चा वर्षाव करीत आहे,

नवरात्र निमित्त कॉन्व्हेंट स्ट्रीट मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने शालेय विद्यार्थिनींना बूट वाटप

 


 नवरात्र निमित्त कॉन्व्हेंट स्ट्रीट मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने शालेय विद्यार्थिनींना बूट वाटप

जनसंघर्ष न्यूज 

पुणे प्रतिनिधी - शंकर जोग

       नवरात्र महोत्सव निमित्त पुणे कॅम्प येथील कॉन्व्हेंट स्ट्रीट मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने कॅम्प एज्युकेशन सोसायटी कन्या विभाग या शाळेतील गरजू विद्यार्थिनींच्या  गरजा लक्षात घेत शाळेचे बूट वाटप करण्यात आले.

 यावेळी आयोजक कॉन्व्हेंट स्ट्रीट मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विशाल मोरे यांनी माध्यमांशी सांगितले की कॉन्व्हेंट स्ट्रीट मंडळ नेहमी सामाजिक बांधिलकी जपत गोरगरिबांना मदत करण्याचे काम करत असते व यापुढे देखील करत राहणार. 

       यावेळी विनायक राठोड, सुरज ठोकळ, प्रदीप शिंदे, राजू शेट्टी, तसेच शाळेतील शिक्षिका मीना साळुंखे, व सपकाळे मॅडम उपस्थित होते, दरवर्षी विविध ठिकाणी ट्रस्टच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे प्रयत्न केले जात आहे अशी माहिती कॉन्व्हेंट स्ट्रीट मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विशाल मोरे यांनी सांगितले


लेबल: ,

" कुर्ला टू वेंगुर्ला " मराठी चित्रपट 3 ऑक्टोंबर रोजी धुळ्यात प्रदर्शित होणार ; बल्हाणे गावाचे सुपुत्र किरण जाधव दिग्दर्शन टीममध्ये झळकणार

 

" कुर्ला टू वेंगुर्ला " मराठी चित्रपट 3 ऑक्टोंबर रोजी धुळ्यात प्रदर्शित होणार 

 बल्हाणे गावाचे सुपुत्र किरण जाधव  दिग्दर्शक टीममध्ये झळकणार

ग्रामीण भागातील रखडणाऱ्या लग्नाचा संवेदनशील विषय हलक्याफुलक्या शैलीत

जनसंघर्ष न्यूज    

       नुकताच १९ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेल्या "कुर्ला टू वेंगुर्ला" या चित्रपट महाराष्ट्रभर गाजत असून प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गावातील तरुणांच्या न होणाऱ्या लग्नाचा विषय हलक्याफुलक्या पद्धतीने चित्रपटात मांडण्यात आला असून, उत्तमोत्तम कलाकार असलेल्या या चित्रपटात मालवणी बोलीचाही तडका आहे.  

     या चित्रपटात संदर्भात माहिती देण्यासाठी धुळे शहरातील साक्रीरोड येथील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केलेले होते, या पत्रकार परिषदेत अमरजीत आमले, किरण जाधव जगदीश देवपूरकर आधी उपस्थित होते. 

       यावेळी अमरजीत आमले यांनी चित्रपटाबद्दल माहिती देताना सांगितले की , या चित्रपटाच्या दिग्दर्शन टीममध्ये धुळे तालुक्यातील बल्हाणे गावाचे सुपुत्र किरण जाधव यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केल्याने स्थानिक तरुणांचा सन्मान वाढविला आहे. नाती आणि माती जोडणारा प्रत्येक कुटुंबा ची गोष्ट सांगणारा हा चित्रपट धुळे जिल्ह्यात 3 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे त्याच धुळेकर प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद द्यावा असे आवाहन चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लेखक अमरजीत आमले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

        सध्या राज्यभरातील ग्रामीण भागात मुलांची लग्न जमणे ही समस्या झाली आहे. गावातल्या मुलींना शहराचे आकर्षण असते, त्यांच्याही आयुष्याबद्दल काही इच्छा-आकांक्षा असतात. परिणामी शहर आणि ग्रामीण भाग अशी एक दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांच्या रखडणाऱ्या लग्नाचा संवेदनशील विषय, त्याच्याशी जोडलेले सामाजिक मुद्दे. परस्पर नातेसंबंध अशा विषयाची मांडणी कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटात करण्यात आली आहे. गंभीर विषयाची अत्यंत मनोरंजक पद्धतीने हाताळणी या चित्रपटात करण्यात आली आहे. त्यामुळे सहकुटुंब चित्रपटगृहात अनुभवावा असा हा चित्रपट आहे.

         सिने कथा कीर्तन, चंद्रभागा स्टुडिओज आणि एम व्ही शरतचंद्र यांनी "कुर्ला टू वेंगुर्ला" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अमरजीत आमले, विजय कलमकर, चारुदत्त सोमण, नयना सोनावणे, अविनाश सोनावणे, एम. व्ही. शरतचंद्र हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लेखन अमरजीत आमले यांनी. तर दिग्दर्शन विजय कलमकर यांनी केलं आहे. अभिनेते वीणा जामकर, प्रल्हाद कुडतरकर, वैभव मांगले, सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर, साईंकित कामत अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे. यासोबतच अमेय परब, शेखर बेटकर आणि अनघा राणे या नवोदित कलाकारांचा अभिनयही आपल्याला पाहायला मिळणार आहे. रंगनाथ बाबू गोगीनेनी यांनी छायांकन, विजय कलमकर यांनी संकलन, अविनाश सोनावणे यांनी ध्वनिआरेखन, चंचल काळे, अमरजित आमले यांनी गीतलेखन, अक्षय खोत यांनी संगीत दिग्दर्शन, पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे. तर वितरक म्हणून पिकल एंटरटेनमेंट काम पाहणार आहे.

       माती आणि नाती जोडणारा, प्रत्येक कुटुंबाची गोष्ट सांगणारा "कुर्ला टू वेंगुर्ला" ह्या चित्रपटाला सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे, दिग्दर्शक राजेश मापुस्कर, अभिनेते सचिन खेडेकर, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, सविता मालपेकर, ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे आदी मान्यवरांची देखील पसंतीची पावती या चित्रपटाला मिळाली आहे.

      अशा या उत्तम सिनेमाच्या दिग्दर्शन टीम मध्ये आपल्या धुळे तालुक्यातील बल्हाणे या गावातला किरण विनायक जाधव हा देखील आहे. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने या सिनेमाच्या दिग्दर्शन टीम मध्ये जबाबदारी सांभाळली आहे. लवकरच धुळ्यातील सिनेमागृहात कुर्ला टू वेंगुर्ला हा सिनेमा बघायला मिळणार आहे तर धुळेकर प्रेक्षकांनी या सिनेमाला भरघोस प्रतिसाद द्यावा असे आवाहन या सिनेमाच्या टीम कडून करण्यात आले आहे.

लेबल:

बुधवार, २४ सप्टेंबर, २०२५

आदिवासी आरक्षण बचाव समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा


आदिवासी आरक्षण बचाव समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा 

बंजारा समाजाच्या आरक्षण मागणीला आदिवासी समाजाचा विरोध

जनसंघर्ष न्यूज 

      धुळे :- बंजारा समाजाने केलेल्या आदिवासी आरक्षण मागणीविरोधात आज आदिवासी आरक्षण बचाव समितीच्या के नेतृत्वाखाली सकल आदिवासी समाज बांधवांनी हजारोंच्या गी संख्येने एकत्र येत महामोर्चातून आक्रोश व्यक्त केला. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाच, जंगल जमिन जल आमचा हक्क आरक्षण पक्क, आरक्षण बचाव संविधान बचाव, हक्कासाठी लढू अन्याय कधीही सहन करणार नाही, आदिवासी उठला रे हक्क वाचवायला सज्ज झाले रे, अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मोर्चा क्युमाईन क्लबजवळ धडकल्यानंतर शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.

     या जन आक्रोश मोर्चाला शहरातील फाशीपुलापासून सुरूवात झाली. मोर्चेकऱ्यांनी हातात महारूपुषांच्या प्रतिमा, , संविधान, ध्वज व विविध घोषणांचे फलक हाती घेतले होते. बारापत्थर, तहसील कार्यालय, नविन महापलिकेमार्गे मोर्चा क्युमाईन क्लबजवळ दाखल झाला. या ठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. त्यात समाजाच्या नेत्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्हा प्रशासनास मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

        निवेदनात म्हटले आहे की, भारताच्या घटनेनुसार अनुसूचित जमातींना शिक्षण, नोकरी व राजकीय क्षेत्रात आरक्षणाचा घटनात्मक हक्क आहे महाराष्ट्र शासनाने ४७ जमातींना अनुसूचित जमाती म्हणून मान्यता दिलेली आहे. तथापि, काही गैर-आदिवासी समाज जाती अनुसूचित जमातीत समाविष्ट होण्याचा प्रयत्न करीत असून त्यामुळे खऱ्या आदिवासी बांधवांचा हक्क हिरावला जात आहे. त्यामुळे कोळी (सामान्य), धनगर (सर्वसाधारण), वंजारा / बंजारा व ठाकूर (गैर-आदिवासी) समाजांना अनुसूचित जमातीत समाविष्ट करू नये. नंदुरबार येथील जय वळवी, मोरदड ता. धुळे येथील जगदीश ठाकरे व पाडळदे ता. मालेगाव येथील समाधान माळी यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करून पीडितांना न्याय द्यावा.

     शबरी घरकुल व प्रधानमंत्री आवास योजनेत आदिवासींना अधिक घरकुल मंजूर करावे. पिढ्यानपिढ्या राहत असलेल्या आदिवासींच्या घर व जमिनींचे सर्वेक्षण करून सीटी सर्व्हे, ७/१२ उतारे द्यावेत. आदिवासी विभागाचा निधी इतर ठिकाणी वळवु नये म्हणून राज्यात आदिवासी बजेट कायदा राज्यात लागू करावा. येणारी जनगणना जातनिहाय करून आदिवासींचे स्वतंत्र आदिवासी धर्मकोड नमूद करण्यास मंजुरी द्यावी. शहरी व ग्रामीण भागातील आदिवासी दफनभूमीचे संरक्षण व सर्वेक्षण करून जागा आरक्षित करून ७/१२ नोंद करावी. पिढचानपिढ्या कसत असलेल्याा शेतजमिनीची स्थळ पाहणी प्रशासनाने करून तत्काळ ७/१२ उतारे देण्याची तरतुद करावी. या मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

        या मोर्चात अशोक भाई धुलकर, रंगनाथ ठाकरे, संदिप मोरे, महेंद्र माळी, अॅड. राजेंद्र वाघ, लक्ष्मण पवार, दावल अहिरे, उमेश मोरे, अॅड. प्रविण मोरे, गोविंद अहिरे, बंटी वाघ, गणेश धुलकर, मनोज मालचे, गोकुळ बोरसे, रवि बोरसे, रावसाहेब ठाकरे, पवन वाघ, किशोर गायकवाड, बाबा पवार आदींसह समाजबांधव हजारोंच्या संख्येने होते. सहभागी झाले.

लेबल:

प्लास्टिकच्या कप-चाळणीं विक्रीवर बंदी करा ; प्रदीप नन्नवरे यांचे तहसीलदारांना निवेदन

 



प्लास्टिकच्या कप-चाळणीं विक्रीवर बंदी करा ; प्रदीप नन्नवरे यांचे तहसीलदारांना निवेदन

जनसंघर्ष न्यूज 

पूर्णा (प्रतिनिधी) :-

       परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचे कप व चहा चाळणीचा वापर होत असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा मुद्दा सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नन्नवरे यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे या वापरावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, प्लास्टिकवर गरम पाणी किंवा चहा आल्यास त्यातून रासायनिक घटक बाहेर पडून थेट मानवाच्या शरीरात जातात. परिणामी कॅन्सरसारखे जीवघेणे आजार होण्याचा धोका वाढतो. “आज गोरगरिबांना साध्या चहाच्या कपातूनही जहर मिळत आहे, ही गंभीर बाब प्रशासनाने तातडीने लक्षात घेणे आवश्यक आहे,” असे नन्नवरे यांनी म्हटले आहे.

याप्रसंगी त्यांनी तीन ठोस मागण्या केल्या –

1. प्लास्टिकचे कप व चहा चाळणी विक्री व वापरास बंदी घालावी.

2. बाजारपेठ व हॉटेलांमध्ये तपासणी मोहीम राबवून दोषींवर कारवाई करावी.

3. पर्यावरणपूरक व आरोग्यदायी पर्यायांचा वापर प्रोत्साहित करावा.

हे निवेदन तहसीलदारांना देतानाच,

नगर परिषद पूर्णा व पोलीस स्टेशन पूर्णा यांनाही प्रत पाठविण्यात आली आहे

लेबल:

एसटी कामगारांचा आपल्या प्रलंबित मागण्यासाठी कृतिसमितीचा पुन्हा एकदा एल्गार

 




एसटी कामगारांचा आपल्या प्रलंबित मागण्यासाठी कृतिसमितीचा पुन्हा एकदा एल्गार

 प्रलंबित मागण्या तात्काळ सोडवा अन्यथा 13 ऑक्टोंबर पासून बेमुदत धरणे आंदोलन

जनसंघर्ष न्यूज 

   आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र कामगार संयुक्त कृती समितीची मुंबईमध्ये बैठक झाली. आज दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी रा.प. कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांची सोडवणूक होत नसल्यामुळे दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ पासून एसटी कामगारांनी पुन्हा एकदा एल्गार करण्याबाबत आज कृती समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. एसटी महामंडळातील बहुसंख्य संघटना या कृती समितीमध्ये एकत्र आल्या असून आपल्या आर्थिक मागण्यासाठी त्यांनी आज मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, परिवहन मंत्री महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना नोटीस बजावलेली आहे.

 १) प्रामुख्याने दि. ०४/०९/ २०२५ रोजी माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी जाहीर केलेल्या साडेसहा हजार रुपयांच्या वाढीच्या फरकाची थकबाकी तातडीने एसटी कामगारांना लागू करावी तसेच सन २०१८ पासून ची महागाई भत्तेची थकबाकी प्रलंबित आहे. माननीय न्यायालयाने ही थकबाकी फरकासह देण्याचे आदेश देऊनही अद्याप ती थकबाकी दिलेली नाही. ही तातडीने देण्यात यावी तसेच एक टक्का वेतन वाढीचा दर २०१६ पासून देण्यात यावा तसेच कामगार करायचे तरतुदीनुसार देय होणारा महागाई भत्ता ५३% भरून ५५% करण्यात यावा तसेच घरभाडे होते हा १०,२०,३० % फरकांसह देण्यात यावा.

 २) तसेच एसटी कामगारांना दिवाळीनिमित्त पंधरा हजार रुपये दिवाळी भेट देण्यात यावी. तसेच एसटी कामगारांना कामगार करण्याच्या तरतुदीनुसार १२५००/- ची सण उचल देण्यात यावी. 

 ३) नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनाने एसटी महामंडळामध्ये २५००० कायम कर्मचाऱ्यांची भरती करणार असे जाहीर केलेले असताना, आता ३६००० कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतल्यामुळे, एसटी महामंडळाचे खाजगीकरण होणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत. त्यामुळे राज्यभरात एसटी कामगारांमध्ये संतापाची लाट निर्माण झालेली आहे. तेव्हा कंत्राटी भरती ऐवजी कायम कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी. 

 ४) पीपीपी तत्त्वावरती महामंडळाच्या जागांचे विकसन करण्याऐवजी महामंडळाने सदर जागा स्वतः विकसित करणे आवश्यक आहे. 

 ५)  भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रॉनिक विकल्स गाड्यांनी देखील महामंडळाचा प्रचंड तोटा होत आहे. ते धोरण बंद करून स्वमालकीच्या ईव्ही गाड्या घेण्यात याव्यात. 

 ६)  एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावी अशी सर्व संघटनांनी वारंवार मागणी करूनही अद्याप त्याबाबत निर्णय घेतलेला नाही. तो घेण्यात यावा.

 ७) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे थकीत आर्थिक देणे एक रक्कमी देण्यात यावी.

 ८) सेवानिवृत्त व विद्यमान कर्मचाऱ्यांना एक वर्षाचा मोफत पास सर्व गाड्यामध्ये चालणारा देण्यात यावा. इत्यादी मागण्यासाठी नोटीस आज शासन आणि प्रशासनाला बजावलेली आहे. या नोटीसी वरती १३ तारखेपासून आंदोलन चालू होणार असून जर तातडीने निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. आजच्या कृती समितीमध्ये महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, कास्ट्राईब कर्मचारी संघटना, शिव परिवहन वाहतूक सेना, महाराष्ट्र मोटर कामगार फेडरेशन, महाराष्ट्र एसटी कामगार काँग्रेस (इंटक), बहुजन राज्य परिवहन कर्मचारी संघटना, महाराष्ट्र परिवहन मजदूर युनियन, राष्ट्रीय कामगार काँग्रेस (इंटक), बहुजन परिवहन अधिकारी - कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ आणि राष्ट्रीय मुलनिवासी कर्मचारी संघ इ. संघटना सहभागी झालेल्या आहेत.

लेबल:

रविवार, २१ सप्टेंबर, २०२५

त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ तर्फे जाहीर निषेध



 

त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ तर्फे जाहीर निषेध 

जनसंघर्ष न्यूज 

धुळे :- नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकनासाठी जात असलेल्या पत्रकारांना स्वामी समर्थ केंद्र जवळ असलेल्या पार्किंगवरील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांकडून नाशिक येथील इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींना बेदम मारहाण करून दिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. 

         सदर हल्ल्यात ज्येष्ठ पत्रकार योगेश खरे, अभिजीत सोनवणे, किरण ताजणे हे गंभीर जखमी झाले असून त्यातील पत्रकार किरण ताजणे यांचे प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

         माननीय मुख्यमंत्री साहेबांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मारहाण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या हल्लेखोरांचे रेकॉर्ड चेक करून त्यांच्यावर मोक्कासह पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडे करत धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाने निषेध व्यक्त केला आहे.

      यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे , उपाध्यक्ष अतुल पाटील, सचिव सचिन बागुल, कोषाध्यक्ष तुषार बाफना, मुंबई प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाठ, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र सोनार, मिलिंद बैसाणे दै. महाराष्ट्र शोधयात्रा, चंद्रशेखर पाटील मी महाराष्ट्र न्यूज चैनल, सुनील पाटील दै.आपलं नवराज्य , प्रशांत परदेशी झी २४ तास, रवी नगराळे श्रीराम टीव्ही, मनीष मासुळे TV9,  पंकज पाटील दै. स्वतंत्र भारत, दीपक वाघ राज्यकारभार न्यूज , वीरेंद्र मोरे, साहेबराव बंण्डल, पंकज पाटील महाराष्ट्र टाइम्स, संदीप त्रिभुवन, देवेंद्र पाटील दै. स्वराज्य लक्ष्य, जीवन आबा शेंडगे, पुरुषोत्तम पाटील, संजय पाटील, गोरख गर्दे ,दीपक बोरसे, सय्यद मुदत शेख अली, रूपक बिरारी , निलेश भंडारी ,कमलेश पाठक, सय्यद सानिल दै. महाराष्ट्र निरीक्षण, संदेश अहिरे, आनीस खाटीक, पारित अन्सारी, दिपक शिंदे , आकाश सोनवणे, निलेश परदेशी, गणेश सूर्यवंशी , जमील शाह, सुभाष वाघ आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

लेबल: , , ,

शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५

श्री छत्रपती अग्रसेन महाराजांच्या जयंतीनिमित्त सोमवारी पुतळा पूजन, बाइक रॅली, शोभायात्रा




श्री छत्रपती अग्रसेन महाराजांच्या जयंतीनिमित्त सोमवारी पुतळा पूजन, बाइक रॅली, शोभायात्रा

अग्रवाल समाजातर्फे रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रम

जनसंघर्ष न्यूज 

धुळे, ता. २० : सूर्यवंशी अग्रवंश शिरोमणी श्री छत्रपती अग्रसेन महाराजांच्या जयंती उत्सवानिमित्त शहरातील अग्रवाल समाजातर्फे समाजबांधवांसाठी १३ सप्टेंबरपासून विविध कार्यक्रम, उपक्रम होत आहेत. याअंतर्गत सोमवारी (ता. २२) श्री छत्रपती अग्रसेन महाराजांच्या जयंतीचा मुख्य कार्यक्रम होईल. यात अग्रसेन चौकात पुतळा पूजन, बाइक रॅली, शोभायात्रा, रक्तदान शिबिर, पारितोषिक वितरण आदींचा समावेशआहे.

श्री छत्रपती अग्रसेन महाराज जयंती उत्सवानिमित्त शहरातील अग्रवाल समाजातर्फे दर वर्षी विविध कार्यक्रम होतात. यावर्षीही समाजातर्फे अग्रवाल महिला व युवती मंडळ, अग्रवाल युवक मंडळातर्फे १३ सप्टेंबरपासून समाजबांधवांसाठी विविध वयोगटांत क्रीडा स्पर्धा, हस्तकौशल्य, पाककला, सांस्कृतिक आदी कार्यक्रम, उपक्रम झाले. श्री छत्रपती अग्रसेन महाराज जयंतीचा सोमवारी (ता. २२) मुख्य कार्यक्रम होईल. शहराचे आमदार अनुप अग्रवाल प्रमुख पाहुणे असतील. युवा उद्योजक अजय अग्रवाल अध्यक्षस्थानी असतील. सोमवारी सकाळी नऊला मालेगाव रोडवरील अग्रसेन चौकात अग्रसेन महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून ध्वजवंदन होईल. यानंतर समाजबांधवांच्या उपस्थितीत बाइक रॅली काढण्यात येईल. सकाळी अकराला अग्रवाल विश्राम भवनात रक्तदान शिबिर होईल. दुपारी चारला अग्रसेन चौकातील अग्रसेन महाराज स्मारकापासून भव्य शोभायात्रा काढण्यात येईल. सायंकाळी सातला विविध स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण व सुरूची भोजनाचा कार्यक्रम होईल.

या सर्व कार्यक्रमांत समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समाजाचे अध्यक्ष डॉ. जगदीश गिंदोडिया, अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश अग्रवाल, विनोद अग्रवाल, शशिकांत अग्रवाल, उपाध्यक्ष अजय अग्रवाल, सचिव सुनील अग्रवाल, गणेश अग्रवाल, सुनील सिंघानिया, सहसचिव संजय गिंदोडिया, भवन निरीक्षक कैलास अग्रवाल, खजिनदार अनिल अग्रवाल, महिला मंडळाच्या अध्यक्षा भारती सिंघानिया, युवक मंडळाचे अध्यक्ष सौरभ गिंदोडिया, युवती मंडळाच्या अध्यक्षा श्रेया अग्रवाल, अग्रवाल सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष कैलास अग्रवाल, समाजाचे वैद्यकीय सेलचे अध्यक्ष डॉ. दिनेश अग्रवाल यांनी केले. युवक मंडळाचे अध्यक्ष सौरभ गिंदोडिया आदींनी केले.

लेबल:

जीएसटी दरकपात हा सर्वसामान्य माणसांना दिलासा देणारा :- भाजपा प्रवक्ते अजित चव्हाण यांची पत्रकार परिषदेत माहिती

 

जीएसटी दरकपात हा सर्वसामान्य माणसांना दिलासा देणारा 

मोदी सरकार हे विकासाचे राजकारण करणारे सरकार :- भाजपा चे प्रदेश सह-मुख्य प्रवक्ते श्री. अजित माधवराव चव्हाण 

जनसंघर्ष न्यूज 

      धुळे :- भारताच्या अमृतकाळात सामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा करांच्या दराची पुनर्रचना व अधिक सुसूत्रीकरण करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलेला संकल्प आता प्रत्यक्षात आला असून जीएसटीच्या नव्या कररचनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच जनतेच्या जीवनशैलीला देखील नवी चालना मिळेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे सह-मुख्य प्रवक्ते श्री. अजित चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

      केंद्र सरकारने वस्तू व सेवा कराच्या रचनेमध्ये केलेली ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी व सर्वांना लाभ मिळवून देणारी सुधारणा अंमलात येईल तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, व्यापार क्षेत्राला मोठा लाभ होईल. मागणी व उत्पादन वाढणार असल्याने रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन कुटुंबांच्या आर्थिक संपन्नतेची नवी सुरुवात होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सामान्य माणसाचे जीवनमान सुलभ करणे आणि अर्थव्यवस्थेला अधिक मजबुती देणे हा जीएसटी करप्रणालीच्या नव्या रचनेचा हेतू असेल, असे पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून जाहीर केले होते. केंद्र आणि राज्य सरकारांचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेने जीएसटी सुधारणांचा नवा प्रस्ताव एकमताने संमत करून पंतप्रधानांच्या संकल्पास बळ दिले आहे, अशा शब्दांत श्री अजित चव्हाण यांनी या बदलाचे स्वागत केले.

      सामान्य माणूस, शेतकरी, मध्यम व लघु उद्योगक्षेत्र, मध्यमवर्गीय समाजघटक, महिला आणि युवावर्गास या सुधारणांमुळे होणाऱ्या नव्या अर्थनीतीचा लाभ होईल आणि व्यावसायिकांना व्यवसाय सुलभतेचा अपूर्व आनंद उपभोगता येईल. देशातील जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून नवी जीएसटी कररचना तयार करण्यात आल्याने देशात नागरिक केंद्रीत उत्क्रांतीची सुरुवात झाली असून समाजाच्या अखेरच्या स्तरापर्यंतच्या प्रत्येक नागरिकाचे जीवनमान यामुळे उंचावणार आहे. सध्याच्या चार स्तरीय कर रचनेचे सुसूत्रीकरण करून केवळ १८ टक्के आणि पाच टक्के एवढ्या दोन स्तरांत नवी जीएसटी करआकारणी होणार असल्याने अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील कराचा बोजा हलका किंवा नाहीसा होणार आहे, असे ते म्हणाले.

     देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पुढे तब्बल ६७ वर्षे, म्हणजे २०१४ पर्यंत देशाच्या आर्थिक वाटचालीचा वेग संथ राहिला होता. या काळात देशाचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न केवळ २.०४ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचले होते. धोरण लकवा, भ्रष्टाचार आणि महागाई गगनाला भिडली होती. कर संकलनाची प्रक्रिया क्लिष्ट होती, अर्थकारणात पारदर्शकताही नव्हती. त्यामुळे आर्थिक सुधारणांचा वेग वाढविणे ही देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाची गरज होती. मोदी सरकारने हे ओळखून सुधारणांना बळ देणाऱ्या योजना आखल्या व त्यांच्या अंमलबजावणीवरही लक्ष केंद्रीत केले. एक मजबूत अर्थव्यवस्था असलेला आत्मनिर्भर भारत उभा करण्याचे उद्दिष्ट या सुधारणांमुळे शक्य झाले आहे. जीएसटी करआकारणीचा पहिला टप्पा १ जुलै २०१७ रोजी सुरू झाला, आणि त्याआधी तब्बल १७ वर्षे देशाला अशा कररचनेची केवळ प्रतीक्षा होती. २०१७मध्ये ती संपुष्टात आली आणि आर्थिक सुधारणांचा वेग झपाट्‌याने वाढला. त्यामुळेच आज देशातील २५ कोटी लोकसंख्या दारिद्र्यरेषेखालून बाहेर आली असून देशाची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. ही वाटचाल अधिक वेगवान झाली असून आता जागतिक पातळीवरील आर्थिक अस्थिरतेच्या काळातही भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार असल्याचा निर्वाळा जागतिक वित्तसंस्थांनी दिला आहे, असे ते म्हणाले.

मोदी सरकार विकासाचे राजकारण करणार

राज्यात सरकार कोणाचेही असले तरी जीएसटी दर कपातीमुळे प्रत्येक राज्यातील जनतेला, प्रत्येक कुटुंबाला, गरिबांना आणि मध्यमवर्गीयांना, लहानमोठ्या उद्योजकांना, प्रत्येक व्यापाऱ्याला आणि व्यावसायिकांना मोठा फायदा होणार आहे. प्रत्येक मुद्याला राजकीय रंग देण्याची घाणेरडी सवय काँग्रेसला लागली आहे. त्यांचे हीन दर्जाचे राजकारण त्यांना लखलाभ होवो, मोदी सरकार मात्र सर्व वर्गातील जनतेचे भले करण्यासाठी विकासाचे राजकारण करत रहाणार असा विश्वासही श्री अजित चव्हाण यांनी व्यक्त केला.

       यावेळी भाजप जिल्हाद्यक्ष गजेंद्र अंपळकर, मा. आ.राजवर्धन कदमबांडे,उपाध्यक्ष जितेंद्रजी चोवटीया , हिरामण आप्पा गवळी, मा. महापौर प्रतिभाताई चौधरी ,महादेव परदेशी ,डॉ.सुशील महाजन, भिकन आप्पा वराडे, आकाश परदेशी , पवन जाजू आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते.

लेबल: ,

धुळ्यात राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध ; गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमेला काळे फासून जोडे मारो आंदोलन

 धुळ्यात राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध ;
गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमाला काळे फासून जोडे मारो आंदोलन 

जनसंघर्ष न्यूज 

           धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या मार्फत शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आज भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला चप्पल मारून काळे पासून निषेध व्यक्त करण्यात आला. 

           भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अतिशय खालच्या दर्जाचे वक्तव्य केले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील साहेब व त्यांचे वडील स्वर्गीय राजारामबापू यांच्या विषयी अश्लील व घाण भाषांमध्ये उल्लेख केला. आमदार पडळकर सारखा कुत्रा दररोज भुकत असतो. याच्यासारख्या मुळे महाराष्ट्राच्या चांगल्या परंपरेला तळा जात आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये संस्कृतपणे राजकारण केले जाते. परंतु चांगल्या राजकारणाला काळीमा  फासण्याचं काम आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. वेळेवर गोपीचंद पडळकर यांना आवरावे. असे आव्हान कार्यकर्त्यांनी केले. गोपीचंद पडळकर धुळे जिल्ह्याच्या दौऱ्या आल्यावर त्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा या वेळेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला काळे फासून, प्रतिमा जाळून निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून गोपीचंद पडळकर यांचे आमदारकी रद्द करावी व त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली. 

          या आंदोलनाला रणजीत राजे भोसले, जगन टाकते, भिका नेरकर, जितू पाटील, दीपक देवरे, मंगलदास वाघ, वाल्मीक मराठे, अशोक धुळकर, अमित शेख, भोला सैंदाणे,युसुफ शेख,रामेश्वर साबरे, राजू चौधरी,वैभव पाटील, गोलू नागमाल, मनोहर निकम, शेख हूजेर, डी. डी. पाटील, हेमंत पाटील, विश्वजीत देसले तसेच असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

लेबल: ,

हैद्राबाद गॅजेटच्या आधारे धनगर व बंजारा समाजास अनुसूचित जमाती आरक्षण देण्याचा भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य संघटनेच्या विरोध

 ‌‌


   हैद्राबाद गॅजेटच्या आधारे धनगर व बंजारा समाजास अनुसूचित जमाती आरक्षण देण्याचा भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य संघटनेच्या विरोध 

जनसंघर्ष न्यूज 

      एरंडोल :-  दि १९ सप्टेंबर २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत १)राष्ट्रपती २) राज्यपाल ३ ) अनुसूचित जमाती आयोग अध्यक्ष नवी दिल्ली ४) मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदिवासी विकास मंत्री यांना निवेदन देण्यात आले 

     महाराष्ट्रतील आदिवासी समाज आपल्या मुलभूत अधिकारांसाठी गेल्या अनेक दशकांपासून संघर्ष करत आहे.अनुसुचित जमातीचे आरक्षण हे भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसुची प्रमाणे तसेच १९५० च्या राष्ट्रपती आदेशानुसार ठरविण्यात आलेले असुन त्यात स्पष्टपणे कोनत्या जमाती आदिवासी ( Scheduled tribels )  म्हणून मान्य आहेत यांच्या उल्लेख आहे परंतु अलीकडच्या काळात काही समाज ( उदा . धनगर व बंजारा ) हैद्राबाद गॅजेटच्या आधारे अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळविण्याच्या प्रयत्न करत आहेत.

 या संदर्भात संविधानिक मुद्दे पुढिलप्रमाणे :-

१) अनुसूचित जमातीची यादी बदलण्याच्या अधिकार फक्त भारताचे राष्ट्रपती यांना असुन तो संसदेच्या अधिनियमानेच बदलू शकतो. राज्य सरकार किंवा गॅझेट संदर्भ वापरून कोणत्याही समाजाच्या अनुसूचित जमातींमध्ये सामावून घेणे संविधानाविरोधी आहे.


२) हैद्राबाद गॅजेट ही तत्कालीन संस्थानिक पातळीवरील एक प्रशासकीय नोंद आहे . भारतीय राज्यघटनेच्या १९५० नंतरच्या राष्ट्रपती आदेशानुसारच अनुसूचित जमातीची अधिकृत यादी ठरते.त्यामुळे हैद्राबाद गॅजेट ला कोणतेही कायदेशीर किंवा संविधानिक बळ नाही.

३) धनगर बंजारा व इतर समाज हे ऐतिहासिकदृष्ट्या भटक्या आणि इतर मागासवर्गीय ( VJNT .OBC ) म्हणून मान्य आहेत.हे समाज स्वतः चा वेगळा इतिहास संस्कृती भाषा व परंपरा बाळगतात.त्यांचा आदिवासी समाजाशी कुठलाही ऐतिहासिक वा सांस्कृतिक संबंध नाही . त्यामुळे त्यांना अनुसूचित जमातीचा यादीत समावेश करणे म्हणजे आदिवासींवर अन्याय आहे.

४) आदिवासी समाजाला दिलेलं आरक्षण हे त्यांच्या ऐतिहासिक सामाजिक व भौगोलिक वंचितेवर आधारीत आहे.जर धनगर व बंजारा समाजास अनुधितपणे आरक्षण दिले गेले .तर आदिवासी समाजाच्या शैक्षणिक सामाजिक व रोजगार क्षेत्रातील हक्कांवर थेट आघात होईल.

५) the lambadas/sugalis ( other names of the banjaras ) were not originally tnbes as per authoritalivo anthropological studies it is well recognised they belonged to the kshatriya community and were businessmen हे एका सर्वेंच्च न्यायालयीन मागणीत उल्लेखीत आहे ज्यात न्यायाधिशांनी ( justice B Chandra Kumar ) यांच्या कडुन याच क्षेत्रातील अपील दिली होती. या उदधरणातुन स्पष्ट होते की बंजारा समाज आदिवासी नसुन पारंपारिक रित्या क्षत्रिय समाजाशी संबंधित आहे आणि व्यापारी वर्गात मोडतो.

६) आमदार बबनराव लोणीकर आपल्या पत्रात स्वतः च संदर्भ देऊन बंजारा समाज हा wandening tribe असल्याच्या पुरावा सादर करतात.पण दुर्दैवाने त्यांना त्यांच्या मराठी अर्थ त्यांना समजू नये हे फारच भयानक आहे.निव्वळ मतदार म्हणून भुमिका घेऊन ते न्यायाची संकल्पनाच मोडीत काढत आहेत.त्यांचा या निवेदनाच्या गांभीर्याने विचार करत बंजारा समाजाला भटक्या गटातच ठेवण्यात यावे.

     हैद्राबाद गॅजेटच्या आधारे अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याचा कोनताही प्रयत्न तात्काळ थांबवावा.अनुसुचित जमातींच्या यादीत कुठल्याही नव्या समाजाच्या समावेश करण्याआधी संविधानिक प्रक्रिया.न्यायालयीन दृष्टिकोन व आदिवासी समाजाचा अभिप्राय घेणे बंधनकारक करावे धनगर व बंजारा तसेच इतरही समाजांचा या मागणीस संविधानिकदृष्टा अमान्य ठरवून. त्यावर शासनाने अधिकृत भुमिका घ्यावी.तसेच बंजारा समाजाच्या उत्पत्ती व स्थलांतराबाबत अभ्यासासाठी समिती नेमून सदर अहवाल जनतेसमोर मांडण्यात यावा.

     आम्ही महाराष्ट्रतील आदिवासी समाजाचा वतीने ठामपणे सांगू इच्छितो की. अनुसूचित जमातीच्या आरक्षणात घुसखोरी आम्ही सहन करणार नाही.संविधानिक तरतुदी व न्यायालयीन निर्णयाचा आधार घेत आम्ही हा विरोध पुढेही नोंदवत राहु . तसेच कोणतीही अक्कल नसतांना संविधानिक अभ्यास न करता कोणत्याही जातीला आदिवासी समावेशासाठी पत्र देनार्या सर्व पक्षीय आमदारांचा जाहिर निषेध करण्यात आले ..

      या वेळी जळगाव जिल्हाध्यक्ष दिपक अहिरे,सोशल मीडिया जिल्हाप्रमुख सागर वाघ, तालुकाध्यक्ष भैय्यासाहेब मोरे,युवा तालुकाध्यक्ष निहाल सोनवणे, लश्मण जावळे,सागर सोनवणे,दिपक सुर्यवंशी चांगदेव सोनवणे,लखन मोरे,मनोज मालचे, रोहीदास भिल,अभय मोरे,बादल ठाकरे, भोला अहिरे,आकाश वसावे,मगन वळवी,विनोद पाडवी,गणेश वळवी,अमित तडवी, रोहीत भिल,योगेश ठाकरे,भोलेराज सोनवणे,सागर खैरनार,भोला भिल आनंद, सोनवणे, घनश्याम पारधी आदी समाज बांधव आदी उपस्थित होते.

लेबल: , ,

गुरुवार, १८ सप्टेंबर, २०२५

कासोदा येथील भारती माध्यमिक विद्यालयाचे कुस्तीपटूंचे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

 कासोदा येथील भारती माध्यमिक विद्यालयाचे कुस्तीपटूंचे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

   जनसंघर्ष न्यूज 

         एरंडोल (प्रतिनिधी ) :- जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय,   तसेच पंचायत समिती एरंडोल यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल येथील गुरु हनुमान कुस्तीगीर संस्था तसेच छत्रपती क्रीडा मंडळ एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमानाने दि.१७/९/२०२५ रोजी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत कासोदा येथील भारती माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थीचे कुस्ती स्पर्धेत  पूर्वेश गजानन खैरनार  फ्रीस्टाइल ४५ वजन किलो वय १४ वर्ष गटात व प्रथमेश समाधान खैरनार ५१ किलो वजन वय १७ वर्ष गटात तसेच ग्रीको वजन  ४५किलो  वय १७ वर्ष वयोगटात सत्यजित प्रविण बाविस्कर या तीन कुस्तीपटूची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्ध साठी निवड करण्यात आली आहे.

           यावेळी एरंडोल तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत उपस्थित मान्यवर तालुका क्रिडा समन्वय श्री.प्रा.मनोजभाऊ पाटील, श्री.एस.एच.पाटील सर, वस्ताद भानुदास आरखे, भारती माध्यमिक विद्यालयाचे क्रिडा शिक्षक श्री. भैय्या मराठे सर, तसेच शिवनेरी व्यायाम शाळेचे वस्ताद श्री. हनुमानभाऊ पाटील, प्रवीण बाविस्कर,शुभम पैलवान, मुख्तार पैलवान,सोनू पैलवान,शाकीर पैलवान, समाधान पैलवान,  एरंडोल तालुक्यातील कुस्तीपटू उपस्थित होते.

        या विजयी कुस्तीपटूंचे शाळेचे चेअरमन, मुख्याध्यापक, शिक्षक व पालक तसेच ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन केले पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

लेबल: , ,

बुधवार, १७ सप्टेंबर, २०२५

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा - महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे



राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा - महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे 

जनसंघर्ष न्यूज 

       नाशिक - (प्रतिनिधी),  दि. 17  सप्टेंबर रोजी भिमटोला सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक विभागाचे महसूल उपायुक्त श्री. लोखंडे यांची भेट घेऊन वरील विषयाचे निवेदन देण्यात आले.

      निवेदनाचा आशय असा आहे की ह्यावर्षी राज्यात तसेच देशात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे..

      पिके जमीन दोस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे सरकारने त्वरित राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे कर्ज माफ करावे तसेच पावसामुळे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अन्यथा जन आंदोलन छेडण्यात येईल.

      याप्रसंगी भिमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, भारतीय बहुजन सेनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांतजी घोडेराव, एडवोकेट उमेशजी भाबड, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर बहाळकर, शहराध्यक्ष मुकुंदजी काळे, रिपाई जिल्हा नेते भास्करजी साळवे, शिवसेना नेते सागरभाऊ मोरे, तालुका नेते संजय नाना गांगुर्डे, मधुसूदन धोंगडे, युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..!

लेबल:

धुळे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची निवडणुकीसाठी जोरदार तयारी - एकजुटीच्या बळावर विजयी होण्याचा निर्धार..!

 धुळे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची निवडणुकीसाठी जोरदार तयारी - एकजुटीच्या बळावर विजयी होण्याचा निर्धार..!

जनसंघर्ष न्यूज 

धुळे :-  दि. १८ सप्टेंबर रोजी धुळे जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने संघटन बळकट करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. या निवडणुकांत काँग्रेस पक्ष जनतेच्या विश्वासावर आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीच्या बळावर निश्चितच विजयी होईल असा विश्वास काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी काल कॉंग्रेस भवन येथे झालेल्या बैठकीत व्यक्त केला आहे. धुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. हे निरीक्षक निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाचे निर्णय घेतील, इच्छुकांची माहिती गोळा करतील, संभाव्य उमेदवारांची यादी तयार करतील आणि स्थानिक प्रश्नांचा अभ्यास करून त्यावर पक्षाची भूमिका निश्चित करतील. त्यात प्रामुख्याने नियुक्त निरीक्षकांची नावे साक्री विधानसभा श्री. भरत टाकेकर, धुळे ग्रामीण श्री. राजाराम पानगव्हाणे, धुळे शहर श्री. जावेद फारुकी, शिंदखेडा श्री. धनंजय चौधरी, शिरपूर श्री. रमेश कहानडोळे हे प्रमुख राज्याचे पदाधिकारी विधानसभा निरीक्षक म्हणून काम पाहतील. या नियुक्त्यांमुळे जिल्ह्यातील संघटन अधिक सक्षम व रणनीतीशील होईल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला.


• भव्य कार्यकर्ता मेळावा आणि मार्गदर्शन सभा..!

काँग्रेस भवन, धुळे येथे काल आयोजित बैठकीत जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रांतील ब्लॉक अध्यक्ष, विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत आगामी निवडणुकांच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आणि वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.


• खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा निर्धार..!

"पक्षासाठी प्रामाणिकपणे मेहनत घेणाऱ्यांनाच संधी दिली जाईल. काँग्रेसचे पूर्वीचे वैभव पुन्हा मिळवायचे असल्यास, निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांनाच उमेदवारी दिली जाईल. सर्वांनी एकत्रित काम करावे," असे आवाहन खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी केले.


• जिल्हा प्रभारी पानगव्हाणेंचा विश्वास..!

"काँग्रेसचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये निष्ठावान आणि मेहनती कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्यात येईल," असे प्रतिपादन जिल्हा प्रभारी राजाराम पानगव्हाणे यांनी केले.


• एकजुटीचा नवा अध्याय..!

ही बैठक म्हणजे काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीची सुरुवात असून, आगामी निवडणुकांत काँग्रेस पक्ष एकदिलाने, कार्यक्षम आणि विजयी लढा देईल, असा निर्धार यावेळी दिसून आला. काँग्रेस पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी सज्ज आहे!


• महत्त्वपूर्ण उपस्थिती आणि ठोस मागण्या..!

या बैठकीस डॉ. शोभा बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रभारी पानगव्हाणे, शहर निरीक्षक जावेद फारुकी, शिंदखेडा निरीक्षक धनंजय चौधरी, शिरपूर निरीक्षक रमेश कहानडोळे, साक्री निरीक्षक भरत टाकेकर, जिल्हाध्यक्ष प्रविण चौरे, शहराध्यक्ष साबीर शेख, प्रदेश उपाध्यक्ष भा.ई. नगराळे, महिला अध्यक्षा गायत्री जयस्वाल आणि इतर अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. दरबारसिंग गिरासे यांनी शहर व जिल्हा कार्यकारिणी आठ दिवसात घोषित करण्याची मागणी केली तसेच काँग्रेसने आगामी निवडणूक स्वबळावर लढवावी, अशी ठाम भूमिका मांडली. यावेळी खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्यासह माजी खासदार बापू चौरे, जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे, शहराध्यक्ष हाजी साबीर शेठ, प्रदेश सरचिटणीस युवराज करणकाळ, डॉ.दरबार सिंग गिरासे, रमेश अण्णा श्रीखंडे, भाई नगराळे, पितांबर महाले, भानुदास गांगुडे, सुधीर जाधव, प्रमोद सिसोदे, गुलाब कोतेकर, नेर सरपंच गायत्री जयस्वाल, बानू बाई शिरसाट यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

लेबल:

मंगळवार, १६ सप्टेंबर, २०२५

मुस्लिम समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट यांच्या वतीने पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

 


मुस्लिम समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट यांच्या वतीने पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

जनसंघर्ष न्यूज 

पुणे प्रतिनिधी - शंकर जोग

       महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम समाज सामाजिक आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत मागासलेला आहे सच्चर समिती व रंगनाथ मिश्रा समितीने मुस्लिम समाजाच्या मागासलेपणाचा सविस्तर अभ्यास करून त्यांना आरक्षण देण्याची शिफारस केली आहे, हैदराबाद गॅझेट मध्ये ऐतिहासिकदृष्ट्या मुस्लिम समाजाच्या स्थितीबाबत उल्लेख असून, त्यावर आधारित आरक्षणाची तरतूद पूर्वी अस्तित्वात होती हे सिद्ध होते, म्हणून महाराष्ट्र राज्यात मुस्लिम समाजाला शैक्षणिक व नोकरी मध्ये आरक्षण देण्यात यावे.

       या अनुषंगाने महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नदीम शफी मुजावर यांच्या शिष्टमंडळांनी पुणे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना या संदर्भाचे निवेदन दिले यावेळी महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटचे सल्लागार हाजी नदाफ, अकबर हुसेन खान साहेब, असलम खान, मुस्ताक जिकरे, हमीद काझी, नाहिद मुजावर, आदि यावेळी उपस्थित होते,

लेबल:

धुळे शहराची स्वच्छता कशी राखणार ? सर्व 19 प्रभागांची सीमारेषा निश्चित करण्यासंदर्भात शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील यांची एकमेव हरकत

 

धुळे शहराची स्वच्छता कशी राखणार ? सर्व 19 प्रभागांची सीमारेषा निश्चित करण्यासंदर्भात  शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील यांची एकमेव हरकत  

जनसंघर्ष न्यूज 

     धुळे :- सर्व 19 प्रभागातील चतु :सीमेला जोडणाऱ्या लगतच्या प्रभागाच्या प्रमुख रस्ते, स्थळे यांची हद्द सीमा रेषा एकाच प्रभागत समाविष्ट करणे  बाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी एकमेव हरकत धुळे शहराच्या सार्वजनिक स्वच्छतेबाबत नोंदवलेली आहे. त्यांनी आपल्या या हरकतीत संपूर्ण 19 प्रभागांच्या सीमारेषेवरील रस्त्यांच्या बाबत अभ्यासपूर्ण मांडणी केली असून, प्रभागांच्या सीमारेषे जवळील रस्ते यांची आगामी काळात स्वच्छता कोण करणार हा मोठा प्रश्न या माध्यमातून त्यांनी उपस्थित केला आहे,  त्यांनी नोंदवलेल्या हरकतीत म्हटले आहे की महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक प्रभाग रचनेवरती हरकत नोंदवताना आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, धुळे महानगरपालिकेची निवडणूक ही स्थापनेपासून प्रभाग वार पद्धतीने घेण्यात येत आहे, याआधी व आत्ताही येणाऱ्या निवडणुकीत आपण सर्व  प्रभागांची त्यातील स्थळे ,महत्त्वाची संकुले, शाळा, महाविद्यालये , प्रभागातील महत्त्वाची प्रतिष्ठाने यांना लागून सर्व प्रभागांची चतु: सीमा निश्चित  गुगल मॅप चा वापर करून केली आहे.

       गेल्या निवडणुकीत देखील अशाच प्रकारे चतु: सीमा ही ठरविण्यात आली होती. पण बऱ्याच प्रभागा प्रभागाला लागून सीमा रेषे जवळ रस्ते, व इतर सर्व सांकेतिक स्थळे ही त्या प्रभागात समाविष्ट न करता  त्यांना सिमेरेषेवरच ठेवण्यात आल्याने अनेक प्रभागातील प्रमुख रस्ते व महत्त्वाची प्रतिष्ठाने हि प्रभागातील नागरिकांनी जनतेने राजकीय पक्षांनी वारंवार सूचित करून देखील विकासापासून दुर्लक्षित राहिली. याचा एक छोटासा उदाहरण द्यायचं म्हटलं अनेक भागातील रस्ते प्रभागाला लागून असल्यामुळे त्या त्या प्रभागातील स्वच्छता निरीक्षक यांनी हा रस्ता आमच्या प्रभागात लगत नसून याची स्वच्छता आम्ही करू शकत नाही, त्यामुळे हे रस्ते महानगरपालिका स्वच्छता विभागाकडून  स्वच्छ करण्यास स्वच्छता विभागाच्या निरीक्षकांनी हद्दीचा अहवाला देऊन वेळोवेळी असमर्थता दर्शवलेली आहे हा प्रकार महानगरपालिकेच्या स्थापनेपासून सुरू आहे याची ज्वलंत उदाहरण म्हणजे धुळे शहरातून जाणाऱ्या पांझरा नदीवरील   सहा महत्वपूर्ण पुल, हे पूल नेमके कोणत्या प्रभागात येतात हे स्थापनेपासून आजपर्यंत झालेल्या प्रभाग रचनेत त कधीही जाहीर झालेले नाहीत त्यामुळे या पुलांची स्वच्छता करण्यास त्या त्या प्रभागातील स्वच्छता निरीक्षकांनी टाळाटाळ केती आहे,  हीच बाब शहरातील महत्त्वाची प्रतिष्ठाने मंदिरे व्यापारी संकुल यांच्याबाबत देखील धुळेकरांना व राजकीय पक्षांना अनुभवायला आलेली आहे, याच अजून एक ज्वलंत उदाहरण म्हणजे संतोषी माता मंदिराकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडे जाणारा एसपी ऑफिस लगतचा रस्ता अशी अनेक उदाहरणे वांनगी दाखल आपल्याला दिलेली असून, धुळे शहराचा संपूर्ण प्रभागांचा विचार केल्यास त्यांच्या सीमारेषा  पाहिल्यास अनेक महत्वपूर्ण रस्ते, प्रतिष्ठाने ,मंदिरे, रुग्णालये यांचा समावेश हा सीमारेषेवरील रस्त्यावर न ठेवता त्या त्या प्रभागामध्ये त्यांचा समावेश करण्यात यावा जेणेकरून आगामी काळात या संपूर्ण रस्ते असो वा प्रतिष्ठाने यांची साफसफाई संबंधित स्वच्छता विभागाकडून वेळोवेळी करण्यास मदत होईल. 

       महोदय आपल्याला हा मुद्दा जरी छोटा वाटत असला तरी आपण या संदर्भात स्वच्छता निरीक्षकांशी चर्चा करावी व त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घ्याव्या जेणेकरून येणाऱ्या काळात धुळे महानगरपालिकेकडून संपूर्ण धुळे शहराची  व्यवस्थित साफसफाई होऊ शकेल. याबाबत माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांना दिनांक 18 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष हरकतीच्या सुनावणी वेळी उपस्थित  राहावे असे सुचित केले आहे. सर्व भावी नगरसेवकांना निवडणूक लढवायची असल्याने त्यांनी प्रभागानबाबत हरकती नोंदवलेल्या असताना धुळे शहराच्या स्वच्छतेच्या संदर्भात एकमेव हरकत शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी दाखल केल्याने शहराच्या स्वच्छते संदर्भात त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे. 

लेबल: ,