गुरुवार, ३१ जुलै, २०२५

दोंडाईचा पोलीस स्टेशनच्या अवैद्य धंद्यांवर धडक कारवाई

 


दोंडाईचा पोलीस स्टेशनच्या अवैद्य धंद्यांवर धडक कारवाई 

जन संघर्ष न्यूज 

     दोंडाईचा :- धुळे जिल्ह्यातील वाढत्या अवैद्य धंद्यांना आळा घालण्यासाठी मा. पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी अवैध धंद्यांची माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्याबाबत दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांना आदेश दिले असता. 

      त्या अनुषंगाने 31 जुलै रोजी पोलीस निरीक्षक यांना मिळालेल्या खात्रीशीर बातमी च्या आधारे अवैध धंद्यांवर छापे मारण्यासाठी चार पथके नेमण्यात आले.

       या चारही पथकाने दोंडाईचा शहरात विविध ठिकाणी अचानक शहरातील अवैध धंदयावर छापा टाकुन कारवाई केली. त्यात जुगार मटका खेळणा-या व खेळण्यास अपप्रेरणा देणा-या आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांचे कडील मोबाईल रोख रक्कम व मोटार सायकल हस्तगत करण्यात आले आहे.

      या कारवाईत एकुण-१९ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडुन खेळात वापरलेले रक्कम रुपये-९,०९०/- जप्त केली. आरोपीतांकडुन ०५ मोबाईल (किमत रुपये ३९,०००/-) जप्त केले. ०८ मोटार सायकल (किमत रुपये ३,६०,०००/-) जप्त करण्यात आल्या आहेत असे एकुण मुददेमाल रुपये ४,०८,०९०/- ताब्यात घेण्यात आला आहे.

       सदर चार छापा कारवाई पूर्ण करुन संबधीत इसमावर दोंडाईचा पोलीस स्टेशन अंतर्गत जुगार कायदा-१८८७ कलम १२ अ, ४,५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

        सदर कामगीरी मा.श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक धुळे, मा. अजय देवरे, अपर पोलीस अधीक्षक धुळे यांचे मार्गदर्शना खाली दिनेश सोनवणे, पोलीस निरिक्षक, दोंडाईचा पोलीस ठाणे, सपोनि/श्रीकृष्ण पारधी, सपोनि/डिंगबरशिंपी, पोउनि/दहिफळे, असई/दुसाणे, पोहेकॉ/महाजन, अविनाश पाटील, गिरासे, पोकॉ/सुर्यवंशी, निलेश हालोरे, राकेश रोकडे, भटु पाटील, अक्षय शिंदे, राकेश पाटील, सौरभ बागुल, निलेश धनगर, सागर कोळी, ललित काळे, हर्षद बागुल, मपोकों/शिल्पा गुंजेकर, पुजा अहिरे अश्यांनी केली आहे.

लेबल: ,

रस्त्यावर व्यवसाय करणारे 70 टक्के व्यावसायिक हिंदू , अतिक्रमणाच्या नावाखाली अन्याय सहन केला जाणार नाही- शिवसेना उबाठाचे आयुक्तांना निवेदन


 रस्त्यावर व्यवसाय करणारे 70 टक्के व्यावसायिक हिंदू , अतिक्रमणाच्या नावाखाली अन्याय सहन केला जाणार नाही....

 शिवसेना उबाठाचे आयुक्तांना निवेदन 

जनसंघर्ष न्यूज 

धुळे - महानगरपालिका क्षेत्रात धुळे शहराची आठ वर्षांपूर्वी हद्दवाढ झाली. यात  अकरा गावांचा समावेश झाला. शासकीय नोंदीनुसार हद्दवाढीपूर्वी शहराची लोकसंख्या सरासरी अडीच ते तीन लाख होती. हद्दवाढीमुळे संबंधित गावांची सरासरी ८५ ते ९५ हजार लोकसंख्या धुळे शहराला जोडली गेली. त्यामुळे शहराची एकूण लोकसंख्या पावणेचार लाखांवर पोचली. ती सरासरी आता सुमारे साडेचार लाखांपर्यंत आहे. तसेच हद्दवाढीपूर्वी शहराचा परिघ सरासरी ४६.४६ चौरस मीटर होता, तो आता सरासरी १०१.०८ चौरस मीटर आहे. स्वाभाविकपणे शहराचे क्षेत्र वाढल्याने भविष्यातील वेध घेऊन वाहतुकीसह अनेक प्रश्न सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, अधिकारी, राजकीय व सामाजिक पक्ष, संघटनांना हाताळावी लागणार आहे. त्यातील दुर्लक्षाची चूक महागात पडू शकते याच्या अगोदर धुळे शहरात छोट्या मोठ्या कारणांमुळे अगोदरच मोठ्या मोठ्या जातीय दंगली व कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती सतत बिघडत राहतील व येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने अदृश्य शक्तींची कायदा सुव्यवस्था बाधित करण्यासंबंधी गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे शहराचा वातावरण दूषित होत आहे. धुळे शहरात रस्त्यावर व्यवसाय करणारे फेरीवाले भाजीवाले फळ वाले हे 70 टक्के हिंदू असून यात 30 टक्के मुस्लिम बांधव आहेत, अतिक्रमणाच्या नावाखाली वाहतूक व्यवस्थेच्या आड होणार हिंदू फेरीवाल्यांवरील अन्याय सहन करण्यापलीकडचे असून गेल्या चार दिवसात हिंदू व्यवसायिकांना हजारो रुपयांचा तोटा झालेला आहे,याची जाणीव ठेऊन नियोजनावर भर देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. जुना मुंबई- आग्रा महामार्गा लगत चाळीसगाव रोड चौफुली, बारापत्थर, गल्ली क्रमांक चार, तहसील कार्यालय, जेल रोड, आग्रा रोड, नेहरू चौक, पंचवटी परिसर, दत्तमंदिर चौक, साक्री रोड, शिवतीर्थ, अंजनशाह दाता दर्गा, गांधी पुतळा, नगरपट्टी पारोळा रोड मार्केट यार्ड परिसर, गुरुद्वारा, शंभर फुटी डी मार्ट परिसरया ठिकाणी वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे.धुळे महानगरपालिका क्षेत्रातील शहरातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी  अनेक वर्षापासून मागणी होत आहे.विविध राजकीय संघटना व सामाजिक सतत मागणी त्यात विविध उपाययोजना सुचविल्या अनेक वर्षांपासून धूळखात पडून आहे.या उपाययोजनांची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. त्यावरून धुळे शहराचा वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी किती गांभीर्याने उपायय योजना होतात हे सिद्ध होते. शहरात पार्किंग, हॉकर्स व नो हॉकर्स झोनसह रहदारीच्या प्रश्न जटिल होत आहे. 

ज्या रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे ते त्वरित काढणे, रस्त्यांवर बांधकामाचे साहित्य न ठेवणे, अवजड वाहनांचा शहरात प्रवेश व बेकायदेशीर पार्किंग, मोकळ्या जागांवर हॉकर्स झोन ठरवणे, आरटीओ, वाहतूक शाखा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेच्या अधिका-यांनी संयुक्त पाहणी करून नव्याने रिक्षा थांबे निश्चित करणे, हातगाडीवर व्यवसाय करणा-यांना रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही, अशी कायमस्वरूपी जागा देणे आदी उपाययोजनांचा धुळे महानगरपालिकेने फेर आढावा घेऊन 

,अगोदर फेरीवाल्यांचे पर्यायी जागावर जाण्यासाठी संधी उपलब्ध करून द्या मग त्यानंतर कायमस्वरूपी सोय महानगरपालिका क्षेत्रातील त्यांना कोण कोणते रस्ते फेरीवाला मुक्त करण्यासंदर्भात कायमस्वरूपी धोरण निर्माण करावे, धुळे शहराचा केंद्रबिंदू असलेल्या पाच कंदील परिसर असो की शहरातील इतर परिसर कायमस्वरूपी फेरीवाला आणि जेवढे ही मोठे अतिक्रमण असतील हे त्वरित काढा याला आमचा संपूर्णपणे पाठिंबा आहेच, पण अगोदर फेरीवाल्यांचे शंभर टक्के पुनर्वसन किंवा पर्यायी जागा द्या त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं छोट्या व्यवसाय करणाऱ्या धुळेकर नागरिकांचा आर्थिक मानसिक शारीरिक नुकसान होणार नाही व चुकीच्या मार्गात करून गुन्हेगारी मार्गात जाणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेण्याची गरज आहे. यासाठी धुळे शहराच्या गंभीर होत असलेल्या कायदा सुव्यवस्था वा अतिक्रमण व फेरीवाल्यांच्या ज्वलंत प्रश्नासाठी तातडीची पोलीस विभाग , महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागाने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व  फेरीवाला संघटनेची बैठक आयोजित करण्यात यावी,व या कामी दिरंगाई न करता उपाययोजना करण्यास प्राधान्य द्यावे, हिंदू वरील अन्याय शिवसेना उभा टाकावी सहन करणार नाही अशा आशयाचे  निवेदन जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, भगवान करणकाळ उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील भरत मोरे, प्रशांत भदाने, संदीप सूर्यवंशी, निंबा मराठे सुनील पाटील, आण्णा फुलपगारे, आनंद जावडेकर, कपिल लिंगायत, शिवाजी शिरसाळे, अजय चौधरी, संदीप चौधरी, निलेश कांजरेकर, सागर निकम, अनिल शिरसाट, विष्णू जावडेकर, अरुण पाटील,तेजस सपकाळ आदींनी दिले.

लेबल:

बुधवार, ३० जुलै, २०२५

अवैध वाळू ,मुरूम माफीया यांचा हैदोस महसुलातील अधिकारी व नागरिकांचे प्राण धोक्यात - शिवसेना उबाठा

 

अवैध वाळू ,मुरूम माफीया यांचा हैदोस  महसुलातील अधिकारी व नागरिकांचे प्राण धोक्यात - शिवसेना उबाठा 

जनसंघर्ष न्यूज 

        धुळे -  शहरालगत लळिंग पासून चितोड - रावेर - जुन्नेर - नकाणे - हरण्यामाळ - सांजोरी  वगैरे हा संपूर्ण परिसर मोठ्या प्रमाणावर गौण खनिज माफियांच्या लूटमारीचा अड्डा बनला आहे. महसूल विभागाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे या पट्टयातून निघणार्‍या कोट्यवधिंच्या मुरुम - माती - डबर सारख्या गौण खनिजांची शासकीय रॉयल्टी बुडत आहे. टेकड्या साफ होत आहेत व पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे. कोट्यवधिंच्या या चोरी महोत्सवात काही ग्राउंड लेव्हलची मंडळी लाखोंच्या चिंधीचोरीत  गुंग आहेत. या सर्व गौण खनिज लूट महोत्सवा बाबत  महसूल प्रशासन व धुळे तहसीलदार, अनभिज्ञ असल्याचा देखावा करीत आहे. 

       परवा संभाजीनगरला जाताना  दस्तरखुद्द जिल्हाधिकारी महोदयांनी गरताड गावाजवळ एक अवैधरित्या वाहतूक करणारा हायवा पकडला, जिल्हाधिकाऱ्यांशी देखील मुजोरी करण्यास त्या वाहन चालकांनी मागे पुढे पाहिले नाही, रात्री अपरात्री होणारी ही वाहतूक आता महसूल कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांच्या देखील जीवावर उठली आहे कारण धुळे शहराच्या चहुबाजूला राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने जाणारे हायवा आता नागरिकांच्या जीवावर देखील उठले आहे त्यामुळे रात्री प्रवास करणे देखील धोक्याचे बनले आहे.

       मागील काही महिन्यात, नकाणे तलावाच्या वरच्या बाजुस हरण्यामाळ तलावाकडे जाताना लागणार्‍या अनेक टेकड्यांपैकी एका टेकडीची खोदाई करून प्रचंड गौण खनिज वाहून नेण्यात आले. इतके की काही दिवसांनी त्या टेकडीचे अस्तित्वच संपून टाकले आहे, काही ठेकेदार हे गौण खनिज राष्ट्रीय महामार्ग साठी नेत असल्याचा बनाव निर्माण करतात, लळींग - एमआयडीसी तलाव - हिरे मेडिकल  -मोती नाला- रावेर गावाची वरची सीमा -नंदा भवानी - नकाणे व हरण्यामाळ परिसराची स्वतःची एक इको सिस्टीम आहे. हा निसर्गरम्य परिसर आहे. या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर परदेशी पक्षी येत असतात. पर्यावरणप्रेमीही या ठिकाणी पक्षी निरिक्षणासाठी येत असतात. या पर्यावरणास आता विविध मानवी हस्तक्षेपांमुळे हानी पोहोचू लागली आहे.पर्यावरणीय जलस्रोत परिसरात सतत वाढता मानवी हस्तक्षेप ही चिंतेची बाब बनली आहे. आता हायवेच्‍या भराव कामास व विविध ले - आउट च्या भराव कामासाठी बाहेरून टेकड्याच्या टेकड्या साफ करण्याचा  सपाटा सुरु झाला आहे. साक्री रोड डायव्हर्शनने चक्कर मारली तरी अशा टेकड्या दहा दहा पोकलॅन्ड लावून सफाटच केल्याचा शांतुषा  प्रकार सहज लक्षात येतो. हायवे भराव व ले आउट  भराव साठी टेकड्या संपविण्याच्या या धुळ्यात मात्र वर्षानुवर्ष बिल्डर - प्लॉट धंदेवाल्यांनी चक्कर बर्डी ची शे-पन्नास एकर जमीन खंडर बनवून टाकली आहे. आता थेट लळिंग डोंगरापासून - नकाणे - हरण्यामाळ - रावेर - जुन्नेर - दह्याने - बह्याने - सांजोरी व संपूर्ण  डोंगराळ - बरड पट्टयात गौण खनिज चोरीवाले धुम सुटले आहेत.  या भागात रात्रीच्या वेळी शेकडो हायवा मुरूम उत्खनन करून पहाटेपर्यंत माल पोचहुन रिकामे होतात, ना. गडकरींनी हायवेच्या भरावासाठी नदी नाले तलाव - धरणे यांच्या खोलीकरणासाठी व पाणी साठा वाढी साठी तेथील गाळ काढण्याचे धोरण आणले होते. चांगले धोरण आहे. प्रशासनाकडून असा ' गाळ  काढण्याचा परवाना घ्यावयाचा आणि चक्क टेकड्या खणावयाच्या '  असा प्रकार सर्रास सुरु आहे. शहरात नवीन ले - आउट वालेही  अशी प्रचंड अवैध  गौण खनिज वाहतूक करून नेतात. लगतच्या खड्डे, नदी,  नाले यात भराव करून नवीन जमीन निर्माण करतात. व कोट्यवधींची  उलाढाल करतात. धुळे शहरातील संबंधित तहसीलदार  तलाठी - सर्कल यांना हा सर्व प्रकार माहित  असून फक्त कागदावर कारवाई केली जात आहे, स्वतःहून त्यांनी अद्याप पर्यंत किती ठिकाणी  रिपोर्ट  केले हा संशोधनाचा भाग आहे ,एखाद्या प्रकरणात तक्रार आलीच तर कसा अहवाल सादर करतात? या गोष्टीही बघण्या सारख्या आहेत. धुळे तहसीलदार सर्कल तलाठी व गरिब महसूलवाल्यांनी कुठल्या कारणांमुळे डोळेझाक केली आहे? या प्रश्नाचे उत्तर सर्वजण जाणतात.  या गौण खनिज ठेकेदारांच्या अवैध उत्खननामुळे राष्ट्रीय महामार्ग तसेच ग्रामीण भागात चालणाऱ्या यांच्या हायवा मुळे आता तर हायवेला  वाहन चालवणे देखील आम जनतेस कठीण होऊन बसले असून, अत्यंत भरधाव वेगाने जीवाची पर्वा न करता हे वाहतूक करणारे वाहन चालक खाजगी वाहन चालकांच्या अंगावर गाड्या घालत असून अनेक ठिकाणी अपघात देखील होत आहेत, अनेक ठिकाणी इतर कारवाईला गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांवरती देखील यांनी आपली वाहने जीवे ठार मारण्याचे उद्देशाने त्यांच्या अंगावर घातले आहेत,

      या सर्व पट्ट्यात होणारी गौण खनिज वाहतुकी संदर्भात शिवसेना उबाठा कडे महत्वपूर्ण रेकॉर्डिंग असून, यात कोणा कोणाची ठेकेदारी आहे महसूल मधील कोणते अधिकारी यांना पाठबळ देत आहेत, तसेच धुळे शहरात गेल्या दोन महिन्यात कुठे कुठे यांनी मालाचे डेपो बनवलेले आहेत याची सर्व माहिती आमच्याकडे असून, ती नासिक विभागीय महसूल आयुक्तांकडे आपण योग्य ती कार्यवाही न केल्यास सुपूर्त केली जाणार आहे, आपणास विनंती आहे की येत्या आठ दिवसात धुळे शहरालगत होणारी ही गौण खनिज वाहतूक व अवैध उत्खनन लवकरात लवकर बंद झाले पाहिजे, धुळे शहरालगत अवैद्य  वाळू ,मुरूम, डबर, खडी गौण खनिज बेकायदेशीर कोट्यावधी रुपयांच्या शासनाचा महसूल बुडवून अधिकाऱ्यांच्या संरक्षणात मुजोर झालेले असुन ते कोण आहेत हे धुळे करा समावेश तुम्हाला देखील माहित असून  त्यांच्यावर कारवाई  न झाल्यास शिवसेना उबाठा आपल्या कार्यालयासमोर जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण करेल, याची आपण नोंद घ्यावी. अशा आशयाचे निवेदन आज शिवसेना उपनेते शुभांगी पाटील जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, माजी महापौर भगवान करणकाळ उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील,भरत मोरे, प्रशांत भदाने,निंबा मराठे सुनील पाटील,आण्णा फुलपगारे, आनंद जावडेकर, महिला आघाडीच्या ज्योती चौधरी, महादू गवळी, शिवाजी शिरसाळे, कपिल लिंगायत, आबा हरळ , अजय चौधरी, सागर निकम,ईशतियाक अंसारी, विष्णू जावडेकर, गोकुळ बडगुजर, प्रदिप बडगुजर , योगेश पाटील आदी उपस्थित होते.


लेबल: , ,

महार वतन जमिनी परत मिळवण्यासाठी शशिकांत दारोळे यांचे 6 ऑगस्ट पासून आझाद मैदानात आमरण उपोषण

 

महार वतन जमिनी परत मिळवण्यासाठी शशिकांत दारोळे यांचे 6 ऑगस्ट पासून आझाद मैदानात आमरण उपोषण

 जनसंघर्ष न्यूज 

       मुंबई: महाराष्ट्रातील हजारो एकर महार वतन जमिनींवरील अनधिकृत व्यवहार रद्द करून त्या मूळ वतनदारांना परत मिळाव्यात, या प्रमुख मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) आंबेडकर पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आणि महार वतन हक्क सेवाभावी प्रतिष्ठान, महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे यांनी दिनांक ६ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण सुरू करणार आहेत.

      दारोळे गेली चार-पाच वर्षांपासून महार वतन जमिनींच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उचलत आहेत. यापूर्वी त्यांनी मुंबई, नाशिक, पुणे आणि सातारा येथेही या मागणीसाठी आमरण उपोषणे केली आहेत, परंतु अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

शशिकांत दारोळे यांच्या प्रमुख मागण्या:

 * महाराष्ट्रातील सर्व महार वतन जमिनींवरील अनधिकृत खरेदी-विक्रीचे व्यवहार रद्द करा.

 * अनधिकृतपणे नोंदणी झालेले साठेखत आणि कुलमुखत्यारपत्रे तात्काळ रद्द करा.

 * महार वतन जमिनींवरील सर्व अनधिकृत अतिक्रमणे हटवा.

 * जमिनीवर असलेले कुळ हटवून जमीन वतनदारांना हस्तांतरित करा.

 * या जमिनींवर झालेले अनधिकृत व्यवहार रद्द करून जमिनी मूळ महार वतनदारांना परत द्या (रिस्टोर करा).

वतन जमिनींच्या गैरव्यवहारांचा आरोप

       दारोळे यांच्या मते, प्रशासनाच्या संगनमताने आणि राजकीय पुढार्‍यांच्या वर्चस्वामुळे महार वतन जमिनी सवर्ण वर्ग आणि सावकारांनी धाकदडपशाही करून कवडीमोल भावाने बळकावल्या आहेत. ५० किंवा १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सह्या घेऊन हे व्यवहार झाल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते. पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक अशा जिल्ह्यांमध्ये हजारो एकर महार वतन जमिनींवर मोठ्या कंपन्या, भूमाफियांचे बांधकाम प्रकल्प, राजकीय नेत्यांचे कारखाने, कार्यालये आणि पेट्रोल पंप उभे आहेत. यामुळे गरीब वतनदार कुटुंबांची उपजीविका चालवणेही अशक्य झाले आहे.

      जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात अनेक तक्रारी दाखल केल्या असल्या तरी कोणतीही कायदेशीर कारवाई होत नसल्याचा आरोप दारोळे यांनी केला आहे. इनाम जमीन आणि महार वतन जमिनींचे हस्तांतरण जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय अनधिकृत ठरते, तरीही अनेक व्यवहार परवानगीशिवाय होत आहेत. दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये सर्रासपणे साठेखत आणि कुलमुखत्यारपत्राद्वारे जमिनीची विक्री, गुंठेवारी आणि प्लॉटिंग केले जात आहे. दारोळे यांचा दावा आहे की, जिल्हाधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.

वतनदारांची फसवणूक आणि न्यायव्यवस्थेतील विलंब

     अनेक प्रकरणांमध्ये, लाखो-करोडो रुपयांच्या जमिनींसाठी वतनदारांना केवळ ५ ते १० लाख रुपये देऊन साठेखत आणि कुलमुखत्यारपत्र करून घेतले जाते. यामुळे जमिनीचे विक्रीचे अधिकार, हस्तांतरण आणि कायदेशीर दावे दाखल करण्याचे अधिकारही जमीन घेणाऱ्यांच्या हातात जातात. अशा प्रकारच्या फसवणुकीनंतर वतनदारांना न्यायालयात धाव घ्यावी लागते, परंतु अनेक प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडे हजारो तक्रारी प्रलंबित असूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा दारोळे यांचा आरोप आहे.

     महार वतन जमिनी या वतनदारांच्या पूर्वजांनी केलेल्या कष्टाचे फळ असून, त्या संरक्षित (Protected) जमिनी आहेत. प्रशासकीय अधिकारी, राजकीय पुढारी आणि भूमाफिया यांच्या संगनमताने वतनदारांना त्यांच्या वडिलोपार्जित जमिनींपासून वंचित ठेवण्याचा कट रचला जात असल्याचे दारोळे यांनी म्हटले आहे. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, आयुक्त कार्यालय आणि मंत्रालयातही तक्रारी केल्या आहेत, परंतु प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

     शशिकांत दारोळे यांनी सर्व महार वतनदार बांधवांना, ज्यांच्या जमिनींवर अनधिकृतपणे अतिक्रमण झाले आहे किंवा ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी आझाद मैदान, मुंबई येथे उपोषणात सहभागी होऊन आपले समर्थन द्यावे आणि तक्रार अर्ज सादर करावेत असे आवाहन केले आहे.

लेबल: ,

मंगळवार, २९ जुलै, २०२५

तिरमले समाज फाऊंडेशन संस्था यांच्या तर्फे शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

 

तिरमले समाज फाऊंडेशन संस्था यांच्या तर्फे शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

जनसंघर्ष न्यूज 

शिंदखेडा प्रतिनिधी :- तिरमले समाज फाऊंडेशन संचालिका अध्यक्ष.ताईसौ.प्रियंका रविराज फुल माळी ( तिरमले ) व त्यांच्या सासरे प्राध्यापक, युवराज रामदास तिरमले.व समस्त तिरमले तिरमले समाज फाऊंडेशन पदाधिकारी.रविंद्र उखडु तिरमले, श्री राजश युवराज फुल माळी साहेबराव तिरमले योगेश तिरमले चेतन तिरमले हितेश अजय तिरमले समाधान उत्तम तिरमले ‌शुभम तिरमले शालिक तिरमले 

विध्यार्थी बालमित्र यांना शालेय साहित्य वाटप करण्यासाठी विशेष  करणारे. आण्णासाहेब भारत गॅस प्रमुख..नितेश पाटील, अबोली पाटील कीष्णा भैय्या पाटील गौरक्षक शिरपूर, चेतन पांडुरंग मराठे,कपिल कुवर ,व गौरक्षक  ग्रुप चे अनमोल सहकार्य लाभले,  तिरमल समाज बांधव .वास्तव्य ज्या गावात व शहारात आहे तिथे साहित्य वाटप करण्यात आले शालेय विद्यार्थ्यांना,धुळे जिल्ह्यातील शिरपूर.दोंडाईचा.,विखुर्ले.धमाणे.महाळपुर  बोराडी,जातोळे तराळ कसबे अर्थ ,बाळदे,वाडी,.व जळगाव जिल्ह्यातील.चाळीसगाव.चिंचखेड.

शिरसंगाव ,पिंगवाडी ,उबंरखेड ,    पळासनेर,वरखेडा,व शहादा शहर विविध गावांमध्ये तिरमले समाजातील मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

लेबल: ,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर 88 वर्षांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेशभूमी येथे 31 जुलैला संदेश मेळावा


डॉ.बाबासाहेब आंबेडकर 88 वर्षांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेशभूमी येथे 31 जुलैला संदेश मेळावा

गगन मलिक फाउंडेशन तर्फे तथागत गौतम बुद्धांच्या शंभर मुर्त्यांचे होणार वाटप

जनसंघर्ष न्यूज 

      धुळे :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धुळे भेटीस यंदा 88 वर्ष पूर्ण होत आहेत. 31 जुलै 1937 रोजी त्यांनी वाघाडी (शिरपूर) येथील बैलपोळा प्रकरणासंदर्भात धुळे व शिरपूरमध्ये दौरा केला होता. त्यावेळी धुळे शहरात त्यांच्या भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. याच अनुषंगाने संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संदेश भूमी बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि.31 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता ‘संदेशभूमी’ (ट्रॅव्हलर्स बंगलो) येथे संदेश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती कृती समिती प्रमुख आनंद सैंदाणे यांनी पत्र परिषदेत दिली.

     धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात ही पत्रकार परिषद झाली. यावेळी सैंदाणे यांनी कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली.  कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या हस्ते होणार असून, विशेष प्रमुख पाहुणे म्हणून धम्मदूत गगन मलिक हे उपस्थित राहणार आहेत. त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करून बुद्ध तत्त्वज्ञानाचा प्रसार सुरू केला असून, ‘तथागत बुद्ध’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. या मेळाव्याप्रसंगी गगन मलिक फाउंडेशनतर्फे तथागत बुद्धांच्या 84 हजार मूर्तींचे देशभर वाटप होणार आहे. मूर्ती मोफत असून, केवळ वाहतूक व शुल्क संबंधित खर्च भरावा लागेल. यासाठी संदेश भूमी येथे संपर्क साधावा, असेही आवाहन यावेळी सैंदाणे यांनी केले. ट्रॅव्हलर्स बंगलो (संदेशभूमी) या वास्तूचा समावेश ऐतिहासिक स्थळात व्हावा यासाठी संदेशभूमी संरक्षण कृती समितीने शासन दरबारी पाठपुरावा सुरू ठेवला असून, अद्याप शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

     मेळाव्याला पूज्य भंते आनंद थेरो, भिक्कुनी आर्या शीलरक्षिता, आर्या वैशाली, भंते बोधिपाल, भंते धम्मानंद, भंते विनयप्रिय, भंते नागसेन, भिक्कुनी आया सुप्रिया या धम्मगुरूंचे आशीर्वाद लाभले असून विशेष अतिथी म्हणून ना.जयकुमार रावल, आ.अनिल पाटील, आ.अनुप अग्रवाल, आ.मंजुळा गावित, पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, प्रा.बाबा हातेकर, सिध्दार्थ बनसोडे व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

    कार्यक्रमात कवी भास्कर अमृतसागर, घनश्याम थोरात, शाहीर सुनिल थोरात यांच्या भीमगीतांचा कार्यक्रमही होणार आहे. सर्व प्रबुद्ध नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संदेशभूमी संरक्षण समितीचे प्रमुख आनंद सैंदाणे व आयोजकांनी केले आहे.

लेबल: , ,

कापडणे गावाला शुद्ध पाणी मिळावे म्हणून ग्रामस्थांचे थाळी नाद आंदोलन

 


कापडणे गावाला शुद्ध पाणी मिळावे म्हणून ग्रामस्थांचे थाळी नाद आंदोलन

 ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासन जागे व्हा कापडणे कर जनतेचे समस्या सोडवा

जनसंघर्ष न्यूज 

     कापडणे प्रतिनिधी :-  आज दिनांक 29 रोजी कापडणे गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कापडणे कर गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी सर्व कापडणे कर जनतेने थाळी नाद आंदोलन केले. 

    गेल्या पंधरा दिवसांपूर्वी कापडणे गावात शुद्ध पाणी संदर्भात सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्राम्हणे यांनी तक्रारी अर्ज केला होता. नंतर त्याचे पडसाद म्हणून गावातील लोकांनी जल कुंभा वरती चढून शोले स्टाईल पाण्या साठी आंदोलन केले. ग्रामपंचायतीच्या सांगण्यावरून दोन ग्रामसभा देखील झाल्या पण शुद्ध पिण्याच्या पाण्याबाबत योग्य असा निर्णय किंवा खुलासा आंदोलकांना व ग्रामस्थांना ग्रामपंचायतीमार्फत मिळाला नाही. म्हणून त्यांना परत गावातील पाणी प्रश्नाच्या तीव्रतेची जाणीव करून देण्यासाठी आज कापडणे कर जनतेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा जवळ जोरदार थाळीनाद आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनाप्रसंगी भूषण ब्राह्मणे ,आत्माराम पाटील, बालू नाना पाटील, जितेंद्र पाटील, भटू आबा पाटील, ललित बोरसे आदी ग्रामस्थांनी आपली मतं व्यक्त केली. त्यात त्यांनी सांगितले की, गावाला शुद्ध पाणी पाजण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची आहे. पण सामान्य जनता आंदोलन करीत असून देखील ग्रामपंचायत काहीच बोलायला तयार नाही. किंवा कुठला खुलासा देण्यास तयार नाही. सोबत 17 लाखाचा आरो फिल्टर प्लॅन पंधरा दिवसात कार्यरत करणार होते त्याचे देखील कुठल्याही प्रकारचा स्पष्टीकरण ग्रामपंचायत द्यायला तयार नाही. तो फिल्टर प्लॅन आता सुरू होणार किंवा नाही याच्यात मोठा समभ्रम निर्माण झाला आहे. कारण त्या साहित्याची अवस्था पाहिली तर अत्यंत खराब आहे व काही साहित्य गहाळ देखील झालेले आहे. सदर आंदोलकांमध्ये ललित बोरसे यांनी सदर आंदोलनाचा काय फायदा झाला याविषयी बोलताना सांगितले की ज्यावेळेस पहिली ग्रामसभा झाली त्यात जलजीवन मिशनचे पवार साहेब यांनी उत्तर देताना असे सांगितले की, देवभाणे धरणातील पाणी तेथील ग्रामपंचायत घेऊ देत नाही. म्हणून आम्ही सोनगीर येथून पाणी आणण्यासाठीचा प्रस्ताव तयार करीत आहोत. पण जर तुम्ही देवभाने धरणावरून पाणी गावासाठी आणले तर एका कुटुंबास 900 रुपये पाणीपट्टीचा खर्च होऊ शकतो पण तेच पाणी सोनगीर हून आणले तर तो खर्च 3500 इतका होईल. म्हणून त्या ग्रामसभेत आंदोलकांनी सांगितले की आम्हाला एवढा पैसा खर्च करणे शक्य होणार नाही. आपण गावाला देवभाने धरणातून पाणी पाजावे. म्हणजे सदर आंदोलनातून एका कुटुंबाचे किमान 2600 रुपये वाचवण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत. व आंदोलकांच्या माध्यमातून असे देखील सांगण्यात आले की येणाऱ्या काळात जर पाणी मिळाले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शुद्ध पाणी मिळाल्याशिवाय गावातील आंदोलन थांबणार नाही असे यावेळेस ग्रामस्थांनी सांगितले. सदर आंदोलना प्रसंगी नवल अण्णा पाटील, अरुण दादा पाटील, उज्वल बोरसे, मिलिंद सरदार, भटू वाणी, राजू माळी, प्रेम राज गोसावी, रमेश माळी, छोटू माळी, दत्तात्रय माळी, भाऊसाहेब माळी, प्रणव बच्छाव, ज्ञानेश्वर पाटील, अमोल पाटील, भूषण सैंदाणे, सुनील पवार, मनोहर पाटील, दीपक भामरे, सचिन मोरे, विनोद भामरे, दुर्गेश पाटील, अशोक पाटील, पत्रकार जिजाबराव माळी, जगन्नाथ पाटील, विठोबा माळी, विशाल शिंदे, भाऊसाहेब माळी, प्रकाश माळी व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेबल: ,

सोमवार, २८ जुलै, २०२५

31 जुलै रोजी लांडोर बंगला येथे अभिवादनासाठी सुजात आंबेडकर उपस्थित राहणार



31 जुलै रोजी लांडोर बंगला येथे अभिवादनासाठी सुजात आंबेडकर उपस्थित राहणार

      शहरातील बस स्थानकाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून मोटारसायकल रॅलीचेही आयोजन

जनसंघर्ष न्यूज 

      धुळे :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक धुळे मुक्कामाच्या 88 वर्षानंतर त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी यंदा दि. 31 जुलै रोजी लांडोर बंगला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतु सुजात आंबेडकर हे येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत अभिवादनासह मोटारसायकल रॅली, भिमगितांच्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम यांनी पत्रकार परिषदेत दिली.  

      शहरातील साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात ही पत्रपरिषद झाली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम यांच्यासह रविकांत वाघ, शंकर खरात, आकाश बागुल, चंद्रमणी वाघ, योगेश पगारे, सागर चव्हाण आदी उपस्थित होते. 31 जुलै 1937 साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे कोर्टाच्या कामासाठी धुळे येथे आले असता त्यांनी लळींगजवळील लांडोर बंगला येथे मुक्काम केला होता. त्या स्मृती जागवण्यासाठी दरवर्षी 31 जुलै रोजी आंबेडकरी अनुयायी या स्थळी मोठ्या संख्येने जमून अभिवादन करतात.  यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतु सुजात आंबेडकर हे उपस्थित राहुन अभिवादन करणार आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोटारसायकल रॅलीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता धुळे बसस्थानक येथील आंबेडकर स्मारकापासून मोटारसायकल रॅली निघणार आहे. रॅली विविध मार्गांनी लांडोर बंगला येथे पोहोचणार असून तेथे समता सैनिक दल आणि सुजात आंबेडकर यांच्या हस्ते बाबासाहेबांना सलामी देवून अभिवादन केले जाईल. त्यानंतर अभिवादन सभा होणार असून सुजात आंबेडकर हे उपस्थित जनतेला संबोधित करतील. तसेच पं. घनश्याम थोरात यांचे भिमगीतांचे प्रबोधनपर सादरीकरण होणार असल्याचेही जिल्हाध्यक्ष निकम यांनी सांगितले.

लेबल: ,

रविवार, २७ जुलै, २०२५

पुना कॉलेजमध्ये सीईओ डॉ. सैय्यद वकील यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक व सामाजिक उपक्रम

 

पुना कॉलेजमध्ये सीईओ डॉ. सैय्यद वकील यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक व सामाजिक उपक्रम

जनसंघर्ष न्यूज 

       पुणे (प्रतिनिधी) :- पुण्यातील ए. के. इन्स्टिट्यूटच्या पुना कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्समध्ये कॉलेज एक्झामिनेशन ऑफिसर (सीईओ) आणि संशोधन मार्गदर्शक डॉ. सैय्यद वकील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

       कार्यक्रमात FYBCOM अभ्यासक्रमासाठी ‘फंडामेंटल्स ऑफ मार्केटिंग’ या पुस्तकाचे प्राचार्य डॉ. इक्बाल शेख यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याशिवाय, करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकासासाठी डॉ. वकील यांच्या जागतिक ब्लॉगचे उद्घाटन झाले, ज्याचा ८५ हून अधिक देशांतील वाचक लाभ घेत आहेत. इंग्रजी भाषेतील आत्मविश्वास वाढवण्यासाठी ‘डॉ. वकील इंग्लिश क्लब’ या व्हॉट्सअ‍ॅप कम्युनिटीची सुरुवात करण्यात आली.

      यावेळी डॉ. वकील यांनी वाय अँड एम एकेआय ट्रस्ट, मुंबईमार्फत एका अनाथ मुलाचे पालकत्व स्वीकारून सामाजिक बांधिलकी जपली.

      कार्यक्रमाला प्रभारी रजिस्ट्रार ॲडव्होकेट इस्माईल सय्यद, आयक्यूएसी समन्वयक डॉ. शिरीन शेख, कॉमर्स विभाग प्रमुख डॉ. नसरीन खान आणि अन्य प्राध्यापक उपस्थित होते. शेवटी प्राचार्य डॉ. इक्बाल शेख यांनी सर्वांचे आभार मानले आणि राबवलेल्या उपक्रमांचे विद्यार्थ्यांना व समाजाला मोठे योगदान ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

लेबल: ,

शुक्रवार, २५ जुलै, २०२५

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रमांचे शैक्षणिक सत्र जुलै-२०२५ करिता प्रवेश सुरु


डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रमांचे शैक्षणिक सत्र जुलै-२०२५ करिता प्रवेश सुरु

जनसंघर्ष न्यूज 

    धुळे :-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे (प्र.ल.) ता. जि.धुळे येथिल यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत अभ्यासकेंद्र सन २०१२-१३ पासून सुरु असून सदर अभ्यासकेंद्रात 'मानव्यविद्या व सामाजिक विद्याशाखा' अंतर्गतचे मानवी हक्क प्रमाणपत्र शिक्षणक्रम आणि संमंत्रक प्रशिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रम  हे अभ्यासक्रम सुरु आहेत तर शै. वर्षे- २०२५-२६ पासून 'शिक्षणशास्त्र विद्याशाखा' अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह मुलभूत प्रमाणपत्र हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे.

      हे अभ्यासक्रम सुरु करण्याचा 'समता शिक्षण संस्था, पुणे' चा मुख्य उद्देश म्हणजे समाजातील गरीब,वंचित घटकांना काम करता करता शिक्षण, नोकरी व्यवसाय करता शिक्षण घेता येईल आणि समाजाच्या तळागाळातील सर्वांपर्यंत गरजेनुसार शिक्षण पोहचविणे  म्हणजेच 'ज्ञानगंगा घरोघरी'  हे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे ब्रीदवाक्य  ही सफल होईल आणि राष्ट्राच्या व राज्याच्या विकास आराखड्यांशी समन्वय साधून, आपल्या विकासविषयक गरजांना अनुरूप विविध शिक्षणक्रम उपलब्ध करून देणे हे संस्थेचे ध्येय आहे.

      या  तिन्ही अभ्यासक्रमाचे उपयुक्तता -प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी, अंगणवाडी सेविका, महिला बचतगट, आरोग्य सेविका ,बालसंगोपन व गैरसरकारी संस्थांमधील स्वयंसेवी कार्यकर्त्यांना हे शिक्षणक्रम अत्यंत उपयुक्त आहेत. तसेच विविध दैनिके ,नियतकालिकांमध्ये काम करणारे पत्रकार व पत्रकारितेच्या विद्यार्थांना हे शिक्षणक्रम महत्वाचे  आहेत.

     सदर अभ्यासक्रमांचे शैक्षणिक सत्र जुलै-२०२५ करिता प्रवेश देणे सुरु झाले आहे, प्रवेश क्षमता मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर परिसरातील विद्यार्थांनी  प्रवेश घ्यावा असे आव्हान अभ्यासकेंद्राचे केंद्र प्रमुख डॉ. जालिंदर अडसुळे यांनी केले आहे. प्रवेश सबंधित विद्यार्थांना काही अडचणी असतील तर अभ्यासकेंद्राचे सहाय्यक श्री सुभाष बागुल, श्री गणेश उफाडे, यांच्याशी अभ्यासकेंद्रात संपर्क करावा असे सांगितले.

लेबल:

दिवंगत कालकथित भैय्यासाहेब दिगंबर केशव वाघ यांच्या पाचव्या स्मृतीदिन निमित्त "एक हात रुग्णांच्या मदतीसाठी " कार्यक्रम राबवून अभिवादन

 

दिवंगत कालकथित भैय्यासाहेब दिगंबर केशव वाघ यांच्या पाचव्या स्मृतीदिन निमित्त "एक हात रुग्णांच्या मदतीसाठी " कार्यक्रम राबवून अभिवादन 

जनसंघर्ष न्यूज 

      धुळे :- 25 जुलै रोजी दिवंगत कालकथित भैय्यासाहेब दिगंबर केशव वाघ यांच्या पाचव्या स्मृतीदिन निमित्त " एक हात रुग्णांच्या मदतीसाठी " उपक्रम राबवून श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे येथे रुग्णांना अन्नदान फळ वाटप आणि वाटप करून अभिवादन करण्यात आले. 

      यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मा. चारुदत्त व्यवहारे साहेब , मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा. रावसाहेबजी गिरासे, मा. नगरसेवक जितु भाऊ शिरसाठ , मा. नगरसेवक योगेश भाऊ उशी, बालरोगतज्ञ डॉ. खलील जी अन्सारी, पै. सनी भाऊ वाघ, केतन साळवे ,बॉबी नागमल ,अतुल शिंदे, संतोष सिंघानिया, रोहित म्हसदे, पै. आकाश वाघ आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      यावेळी ॲड. ऋतुराज दिगंबर वाघ व संपूर्ण परिवार यांनी वडिलांच्या स्मृतीदिनानिमित्त "एक हात रुग्णांच्या मदतीसाठी.....! " ही संकल्पना डोळ्यासमोर तुम्ही भैय्यासाहेब दिगंबर केशव वाघ यांना अभिवादन केले. 

     सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲड. ऋतुराज दिगंबर वाघ मित्र परिवार, गणेश कॉलनी, महसूल कॉलनी, शितल कॉलनी व शहरातील मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले.

लेबल: ,

विधानमंडळात रमी खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे याच्या धुळे दौऱ्याला निषेध निदर्शनांचे ग्रहण :- शिवसेना उबाठाने घोषणाबाजी करून केला निषेध


 विधानमंडळात रमी खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे याच्या धुळे दौऱ्याला निषेध निदर्शनांचे ग्रहण

शिवसेना उबाठाने घोषणाबाजी करून केला निषेध

जनसंघर्ष न्यूज 

       धुळे :- महाराष्ट्र राज्याचे कृषी कॅबिनेट मंत्री माणिकराव कोकाटे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे एका पेट्रोल पंपाच्या उद्घाटनानिमित्त आले असताना, धुळे शहरातील पंचतारांकित असलेल्या हॉटेल टॉप लाईन येथे मुक्कामाला होते आज सकाळी महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळणारे, कृषिमंत्री असून वारंवार शेतकरी विरोधात भूमिका घेणारे , महाराष्ट्र राज्य सरकारच्या विरोधात टिका करणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जोरदार निषेध करून चले जाव चले जाव माणिक कोकाटे चले जाओ, महाराष्ट्र राज्याच्या पवित्र विधिमंडळात मंदिरात जुगार खेळणाऱ्या  कृषिमंत्र्यांची हकालपट्टी करा, अशा जोरदार घोषणा देत शिवसेना पक्षाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले, याप्रसंगी शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत कृषी मंत्र्यांच्या धुळे जिल्ह्या दौऱ्याला प्रचंड विरोध केला, धुळे जिल्ह्यामध्ये महिनाभरापासून समाधानकारक पाऊस नसताना, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असताना, तसेच धुळे जिल्ह्यातील कांदा व कापूस उत्पादक शेतकरी संकटात असताना त्यांच्या बांधावर न जाता खाजगी पेट्रोल पंपाच्या उद्घाटनासाठी कृषिमंत्र्यांना वेळ मिळतो अशी भूमिका मांडत शिवसेनेच्या वतीने हॉटेल टॉप लाईन येते कृषीमंत्र्यांच्या विरोधात जोरदार निदर्शने व आंदोलन करण्यात आली, शेतकऱ्यांच्या विरोधात वारंवार अपमान जनक वक्तव्य करणारे मंत्र्यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी करत सुमारे दोन तास भर शिवसैनिकांनी कृषीमंत्र्यांना हॉटेल टॉप लाईन बाहेर पडुच दिले नाही, यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, प्रशांत भदाणे, निंबा मराठे, तालुका प्रमुख बाबाजी पाटील, हेमराज पाटील, गजेंद्र पाटील, अण्णा फुलपगारे, आनंद जावडेकर, कपिल लिंगायत ,शिवाजी शिरसाळे, विकास शिंगाडे, पंकज भारस्कर, सागर निकम, पिंटू ठाकूर,  नितीन देशमुख ,अनिल शिरसाट, विष्णू जावडेकर, गोकुळ बडगुजर, वैभव पाटील, केतन भामरे, गुलाब देवरे, मनोज पाटील कुंडाणे, अमोल पाटील , विजय चौधरी, शांताराम माळी, ईश्वर मराठे, सावता माळी महादेव उपस्थित होते. 

लेबल:

पक्षाच्या शिलेदारांसह धुळेकर दात्यांमुळेच महारक्तदान शिबिराचा महाविक्रम !



पक्षाच्या शिलेदारांसह धुळेकर दात्यांमुळेच महारक्तदान शिबिराचा महाविक्रम !

आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते आयोजकांचा आमदार कार्यालयात सत्कार

जनसंघर्ष न्यूज 

         धुळे, ता. २५ : राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात झालेल्या महारक्तदान शिबिरांतर्गत धुळे शहराने विक्रमी चार हजार ३१३ बॉटल रक्तसंकलन करून महाविक्रम केला. एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात रक्तसंकलनात पक्षाच्या शहरातील ३१ केंद्रांवरील आयोजकांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भूमिका जितकी मोलाची, महत्त्वाची ठरली, तितकेच उल्लेखनीय योगदान हे सर्वसामान्य धुळेकर नागरिकांचे आहे. त्यांनी आपल्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन प्रत्येक केंद्रावर सकाळपासूनच रांगा लावून रक्तदान केले. त्यामुळे आपण हा उच्चांक गाठू शकलो. यामुळे आयोजकांबरोबरच मी धुळेकर नागरिकांना शतशः नमन करून त्यांचे आभार मानतो, असे प्रतिपादन आमदार अनुप अग्रवाल यांनी केले.

येथील आमदार जनसंपर्क कार्यालयात काल (ता. २४) सायंकाळी पक्षातर्फे झालेल्या महारक्तदान शिबिरात अमूल योगदान देणाऱ्या ३१ केंद्रांवरील आयोजकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला, त्यावेळी आमदार अग्रवाल बोलत होते. यावेळी माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ज्येष्ठ नेते विजय पाच्छापूरकर, हिरामण गवळी, महादेव परदेशी, बेटी बचाव अभियानाच्या संयोजिका अल्पा अग्रवाल, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, वैशाली शिरसाट, पक्षाचे सरचिटणीस जितेंद्र शहा, यशवंत येवलेकर, नंदू  सोनार, चेतन मंडोरे, आकाश परदेशी, भिकन वराडे, वंदना भामरे, योगिता बागूल, कपिल शर्मा, दिनेश पारिख, पवन जाजू आदी व्यासपीठावर होते. 

पुढच्या वेळी आपणच आपला विक्रम मोडू

आमदार अग्रवाल म्हणाले, की महारक्तदान शिबिराचा उपक्रम यशस्वी करण्यात पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याची आणि ३१ केंद्रांवरील आयोजकांची  भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण ठरली. टीममधील प्रत्येकाने शहरात रक्तदान उपक्रमाबाबत जनजागृती करत, घरोघरी भेटी देऊन नागरिकांना रक्तदानासाठी प्रवृत्त केले, यामुळेच हा उपक्रम यशस्वी ठरला. या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. आपण एकाच दिवशी चार हजार ३१३ बॉटल रक्तसंकलन करून जो उच्चांक प्रस्थापित केला ज्यामुळे हजारो रुग्णांना जीवदान मिळणार आहे. शहरात हा विक्रम कधीच कोणी मोडू शकणार नसले, तरी आपणच पुढच्या वेळी आपला हा विक्रम मागे टाकून नवीन उच्चांक स्थापन करू. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हाडाचा कार्यकर्ता आहे. त्याने ठरवले तो कुठलीही गोष्ट यशस्वी करू शकतो याची प्रचिती दाखवून दिली आहे. न भूतो न भविष्यती अशा या उपक्रमात भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांचे कुशल नेतृत्व महत्त्वाचे ठरले. त्यांना पदाधिकारी ओमप्रकाश खंडेलवाल, शेखर कुलकर्णी, पृथ्वीराज पाटील, पवन जाजू, सुनील कपिल, राम अग्रवाल, यशवंत येवलेकर आदी नियोजन समिती सदस्यांची मोलाची साथ लाभली. या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. 

मुख्यमंत्र्यांप्रती दाखविलेले प्रेम अभूतपूर्व

डॉ. भामरे म्हणाले, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात आमदार अनुप अग्रवाल, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या मार्गदर्शनात झालेल्या रक्तदानाच्या महायज्ञात शहरातील पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हिरिरीने सहभागी होत या उपक्रम यशस्वीच करून दाखविला नाही, तर राज्यात सर्वाधिक रक्ताच्या बॉटल संकलन करून विक्रम नोंदविला. याबद्दल पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, आयोजकांचे मनापासून अभिनंदन करतो. आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रती आपण दाखविलेले प्रेम अभूतपूर्व ठरले. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीस करत आहेत. भाजप सरकारच्या कार्यकाळात गेल्या १० वर्षांत शहरात अनेक विकासकामे झाली. त्यात निधी देण्यात सिंहाचा वाटा मुख्यमंत्र्यांचा राहिला. यामुळेच धुळेकरांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत हा उपक्रम यशस्वी करून दाखविला.

आयोजकांचा सत्कार सन्मान वाढविणारा

हिरामण गवळी म्हणाले, की मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलैला झालेला महारक्तदान शिबिरांतर्गत धुळे शहराने चार हजार ३१३ बॉटल रक्तसंकलन करून केलेली कामगिरी राज्यात उच्चांकी ठरली. हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. या उपक्रमात शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जी अपार मेहनत घेतली त्यासाठी आपणा सर्वांचे शतशः आभार मानतो व अभिनंदन करतो. ही अपार मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा म्हणून आज आमदार अनुप अग्रवाल, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर व अल्पा अग्रवाल यांनी जो सत्काराचा उपक्रम घेतला तो प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान वाढविणारा आहे. 

कार्यकर्त्यांमुळेच प्रत्येक उपक्रम यशस्वी

श्री. अंपळकर म्हणाले, की लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहरात रेकॉर्डब्रेक रक्तसंकलनाचा उपक्रम झाला. यापूर्वी शहरात एकाच दिवशी चार हजारांहून अधिक बॉटल रक्तसंकलन कुणालाच जमले नाही, यापुढेही कोणाला जमणार नाही ते भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करून दाखविले. हा क्षण प्रत्येक धुळेकराचा सन्मान वाढविणारा आहे. शहरातील ३१ केंद्रांवर ज्या आयोजकांनी हा उपक्रम यशस्वी करून दाखविला त्यांचा सन्मान करण्याची कल्पना अल्पा अग्रवाल यांनी मांडली आणि आज हा सत्कार घडून येत आहे. या रक्तदानाच्या नियोजनात कल्पेश शर्मा यांचे विशेष योगदान राहिले. त्यांच्या नियोजनातूनच हा उपक्रम आपण इतक्या मोठ्या प्रमाणात यशस्वी करू शकलो, त्यामुळे त्यांचे विशेष आभार मानतो. पक्षाने राज्यस्तरावरून दिलेला प्रत्येक कार्यक्रम-उपक्रम यशस्वी करण्यात आपण नेहमीच पहिल्या १० क्रमांकांमध्ये राहिलो आहोत आणि ते फक्त कार्यकर्त्यांच्या जिवावर. महारक्तदान शिबिराचा उपक्रमही आपण सर्वांनी यशस्वी करून दाखविल्याने आपणा सर्वांचे आभार मानतो.  

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार शिलेदारांचा गौरव

शहरात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या रक्तदान शिबिराचा उपक्रम यशस्वी करण्यात सर्व ३१ केंद्रांवरील आयोजकांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यांच्यामुळेच आपण राज्यात सर्वाधिक चार हजार ३१३ बॉटल रक्तसंकलन करू शकलो. यामुळे या सर्व शिलेदारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्याची कल्पना महानगर जिल्हाध्यक्ष अंपळकर यांनी मांडली. त्यावर आमदार अग्रवाल यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून व त्यांचा वेळ निश्चित करून नक्कीच हा गौरव केला जाईल, अशी ग्वाही दिली.

लेबल: , ,

गुरुवार, २४ जुलै, २०२५

आमदार अग्रवाल यांच्या पाठपुराव्याने `त्या’ कामगारांना घरभाडे भत्ता लागू !



आमदार अग्रवाल यांच्या पाठपुराव्याने `त्या’ कामगारांना घरभाडे भत्ता लागू!

महापालिका आयुक्तांच्या आदेशाने 36 खोल्यांतील कामगारांना मिळणार लाभ

जनसंघर्ष न्यूज 

      धुळे, ता. 24 :- शहरातील मच्छीबाजार भागातील म्युनिसिपल कॉलनीमधील (रामदेवबाबा नगर) 36 खोल्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या महापालिकेच्या सफाई कामगारांना अटी-शर्तींच्या अधीन राहून घरभाडे भत्ता लागू करण्याचा आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी दिला आहे. यामुळे या कामगारांना दिलासा मिळाला आहे. याबाबत आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार भाजपच्या कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय पवार यांनी सातत्याने महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. 

      येथील महापालिकेने 21 जून 2013 ला मनपा मालकीचे एकूण 114 घरे सफाई कामगारांच्या नावे करण्याचा ठराव मंजूर केला होता. महापालिकेमार्फत शासन नियमानुसार खरेदीखत केल्यानंतर ही घरे त्याच्या नावांवर होतील, असे नमूद आहे.

विजय पवार यांचा सातत्याने पाठपुरावा

      दरम्यान, आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय पवार यांनी वेळोवेळी निवेदने देऊन रामदेवबाबा नगरमधील 36 खोल्यांमध्ये गेल्या 25 वर्षांपासून राहणाऱ्या सफाई कामगारांना ते राहत असलेली घरे नावावर करण्याबाबत महापालिकेकडे विनंती केली होती. तथापि, नगररचना विभागाकडील अहवालानुसार ही जागा वक्फ मंडळाची असल्याने सदर खोल्यांची सफाई कामगारांना खरेदी करण्यास अडचणी येत असल्याने तूर्त रामदेवबाबानगर येथील 36 खोल्यांचे खरेदीखत करता येत नाही. या सफाई कामगारांना घरभाडे भत्ता त्यांच्या वेतनात देण्यात येत नाही. सद्यःस्थितीत कामगारांचे दुसरे व तिसरे वारस लागलेले आहेत. त्यांनादेखील घरभाडे भत्ता देण्यात येत नाही. या पार्श्वभूमीवर या कामगारांना त्यांच्या वेतनात घरभाडे भत्ता लागू करावा, अशी विनंती श्री. पवार यांनी आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांच्याकडे केली होती.

नगररचना विभागा यांचा अभिप्राय

      नगररचना विभागाच्या अहवालानुसार सदर जागा मनपा मालकीची असून बी-फॉर्ममध्ये नगरपालिकेकडे त्रुटी नाव दिसून येत आहे. सदर प्रकरणी सीटीएस कार्यालयाकडे मनपाचे नाव लावण्याबाबत अपिलाची कार्यवाही सुरू आहे. यास अधीन राहून पुढील कार्यवाही करण्यास हरकत नाही, असा अभिप्राय दिला आहे. हा अभिप्राय विचारात घेऊन मनपा मालकीच्या रामदेवबाबानगरमधील 36 खोल्यांमध्ये जे सफाई कामगार 25 वर्षापासून राहत आहेत, त्या सफाई व त्यांच्या वारसांना अटी व शर्तींस अधीन राहून त्यांच्या वेतनात (जुलै-2025 पेड-इन ऑगस्ट-2025) सुधारित नियमानुसार घरभाडे भत्ता लागू करण्यास मंजुरी देण्यात येत आहे, असा आदेश आयुक्त श्रीमती दगडे-पाटील यांनी दिला आहे.

       दरम्यान, महापालिका प्रशासनाने रामदेवबाबा नगरमधील 36 खोल्यांमध्ये गेल्या 25 वर्षांपासून राहणाऱ्या सफाई कामगारांना घरभाडे भत्ता लागू करण्याचा निर्णय घेतल्याने यासाठी पाठपुरावा करणाऱ्या आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह भाजपच्या कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय पवार यांचे सफाई कामगारांनी आभार मानले आहेत.

अटी-शर्ती नक्की वाचा व‌ समजून घ्या.

      उक्त जागेला मनपा मालकीचे नाव लागल्यानंतर व खरेदी- विक्री अडचण येत नसल्यास सदरची घरे शासन नियमानुसार मनपा मालकीच्या खोल्यांचे खरेदी करण्याची जबाबदारी सफाई कामगार व त्यांच्या वारसांची राहील. त्यासाठी महापालिकेकडून कोणताही खर्च दिला जाणार नाही. तसेच सदर आदेशाबाबत लेखाआक्षेपामध्ये वसुली निघाल्यास सदर रक्‍कम त्यांच्या वारसांच्या वेतनातून कपात करून वसूल करण्यात येईल व सदर रक्‍कम भरून द्यावयाची संपूर्ण जबाबदारी सफाई कामगार व त्यांच्या वारसांची राहील. सदर आदेशाची नोंद त्यांच्या सेवापुस्तकात घेण्यात यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

लेबल: , ,

मालमत्ता कर, शासनास जमा होणाऱ्या उपकरांची टक्केवारी रद्द करा - शिवसेना उबाठाचे घंटानाद आंदोलन

 


मालमत्ता कर, शासनास जमा होणाऱ्या उपकरांची टक्केवारी रद्द करा -  

 शिवसेना उबाठाचे घंटानाद आंदोलन 

 जनसंघर्ष न्यूज 

      धुळे :-  धुळे महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने यंदाच्या वर्षी धुळेकरांना मालमत्ता करामध्ये 26 टक्के वरून 36 टक्के वाढ केल्याने अवाच्या सव्वा बीले आलेली आहेत, धुळे शहराच्या विद्यमान आमदार अनुप अग्रवाल यांनी  मागणी केल्यानुसार महानगरपालिका आयुक्त यांनी 36 टक्के वरून 30 टक्के आकारणी करण्याचे जाहीर केले, धुळे महानगरपालिकेने मालमत्ता मोजणी संदर्भात ठेका दिलेल्या स्थापत्य कन्सल्टंट अमरावती या कंपनीने मालमत्ता मोजताना वाढीव मालमत्ता मोजल्याचे निदर्शनास आल्याने , लोकप्रतिनिधींनी मागणी केल्याने राज्य विकास मंत्री माधुरी मिसाळ यांनी धुळे करांच्या मालमत्तांचे पुर्णरमोजणी करून नव्याने मालमत्ता करांची बिले सादर करावीत आदेश धुळे महानगरपालिकेला दिले आहेत,

     संबंधित ठेकेदाराकडून मालमत्ता या जास्तीच्या मोजल्या गेलेल्या आहेतच पण या मालमत्तांवर मालमत्ता कर आकारताना इतर  विविध प्रकारचे सोळा कर देखील आकारले जात असून यात महाराष्ट्र राज्य शासनाच्या काही कर असून या करांचा मोबदला थेट राज्य शासनाच्या खात्यात जमा होतो.

       यात प्रामुख्याने महाराष्ट्र शिक्षण कर, रोजगार हमीकर, मोठ्या निवासी जागा कर यांचा समावेश असून धुळेकरांना आलेल्या मालमत्ता कराच्या वाढीव-बिलांमध्ये या करांचा जास्त पैसा आकारण्यात आलेला आहे. 

       यामध्ये  एकूण मालमत्ता  कराच्या 6,% निवासी, 12% कमर्शियल असा महाराष्ट्र शिक्षण कर  लावण्यात आलेला असून रोजगार हमी कर 3% , मोठ्या निवासी जागेवरील कर 10% इतका आकारण्यात आल्यामुळे ही सर्वच्या सर्व बिले अव्वाच्या सव्वा स्वरूपात आकारलेली दिसून येत आहेत, ‌ त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाच्या खात्यात जमा होणाऱ्या या करांच्या टक्केवारीचे प्रमाण कमी करण्यात यावे, त्यातच धुळे महानगरपालिकेने सन 1992- 93 पासून मालमत्ता करांमध्ये वेळोवेळी रिर्व्हिजन न केल्याने एकाच वेळी सर्व सुधारणा करून हा मालमत्ता कर आकारलेला आहे. त्यामुळे मालमत्ताकारांचे बिल धुळेकरांना त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्तीचे आलेले आहेत. धुळे महानगरपालिकेचा  समावेश ड वर्ग महानगरपालिकांमध्ये होत असून, दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांमध्ये धुळे जिल्ह्याचा शेवटून दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळे येथील मालमत्ता धारकांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असून धुळे शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात चाळीस टक्के दारिद्र्यरेषेखालील 30% मध्यमवर्गीय 40 टक्के उच्च वर्गीय 20 टक्के असून मालमत्ता करांमध्ये महाराष्ट्र राज्य शासना कडे जमा होणारे  करांची टक्केवारी आपण स्वतः माननीय नगरसचिव यांची भेट घेऊन कमी करण्यास सहकार्य करून सर्व ड वर्ग महानगरपालिकांना व त्या महानगरपालिकेतील मालमत्ता धारकांना दिलासा द्यावा  यासाठी शिवसेना उबाठा वतीने आज महानगरपालिका आवारात  घंटानाद आंदोलन करत मनपा प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

       याप्रसंगी शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, भगवान करणकाळ, नरेंद्र परदेशी धीरज पाटील, भरत मोरे , प्रशांत भदाणे, संदीप सूर्यवंशी, सुनील पाटील, निंबा मराठे ,महिला आघाडीच्या ज्योती चौधरी, अण्णा फुलपगारे, डॉ. अनिल पाटील, सुनील चौधरी,शिवाजी शिरसाळे विकास शिंगाडे महादु गवळी, पंकज भारस्कर, विवेक सूर्यवंशी, कपिल लिंगायत, सुभाष मराठे मुन्ना पठाण, सागर निकम, अजय चौधरी, नितीन देशमुख  राजू दहातोंडे, पिंटू ठाकूर, गोकुळ बडगुजर, अमोल ठाकूर अनिल शिरसाट ,शुभम रणधीर, दिनेश गुरव,सागर साळवे, वैभव पाटील, हर्षल वाणी, विष्णू जावडेकर, आशुतोष कोळी, काशिनाथ गवळी आदी उपस्थित होते.

लेबल: , ,

न्हावरे ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा तीव्र आंदोलन करणार

 

न्हावरे ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा तीव्र आंदोलन करणार 

  आरपीआय पुणे जिल्हाध्यक्ष सचिन खरात प्रशासनाला इशारा 

जनसंघर्ष न्यूज 

    पुणे :-  9 जुलै 2025 रोजी न्हावरे शिरूर येथील सुहास कदम या युवकाची जागा बळकवून जातिवाचक शिवीगाळ केले प्रकरणी बाळासाहेब जांबळकर उषा जांभळकर ओकार जांभळकर यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पण आज 14 दिवस उलटून गेले तरीही या लँडमाफिया जातीयवादी आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर या बाळासाहेब जांभळकर यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी याने ज्या ज्या लोकांवर अन्याय केलेला आहे, ज्या लोकांच्या जमिनी बळकवलेले आहेत ते सर्व लोक शिरूर डीवायएसपी प्रशांत ढोले यांच्याकडे तक्रार देण्यास पुढे आलेले आहेत.

        तरी देखील सुहास कदम यांना या आरोपींनी जातीय द्वेष भावनेतून त्याची जमीन बळकवून त्याला जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केली होती तरी त्या आरोपींना अटक करावे व सुहास कदम व संबंधित पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, दलित समाजावर अत्याचार पाहता या जातीवादीना आळा बसवणे अत्यंत गरजेचे आहे, पण शोकांतिका अशी आहे की या जातीवाद्यांना जरब बसवण्यामध्ये पोलीस यंत्रणा धीम्या गतीने कार्य करत असलेचे निदर्शनास येत आहे, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) च्या वतीने पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण ऑफिस येथे कायद्याच्या सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ खरात यांनी दिलेला आहे 

      यावेळी आरपीआय चे जिल्हा संघटक दिनेश कदम, विद्यार्थी अध्यक्ष आनंद ओव्हाळ, तुषार निमगिरे, संतोष शिंदे, प्रतीक आढाव, राजू गायकवाड, व आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

लेबल: , ,

बुधवार, २३ जुलै, २०२५

वाढदिवसाच्या औचित्य साधून एक " पेड मॉं के नाम " उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना 40 आंब्याच्या झाडांचे वाटप



वाढदिवसाच्या औचित्य साधून एक " पेड मॉं के नाम " उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना 40 आंब्याच्या झाडांचे वाटप

नेहा ज्वेलर्स चे संचालक मनोज वर्मा यांच्या मुलीचा वाढदिवस समाजाला आदर्श देणारा

जनसंघर्ष न्यूज 

नेर :- धुळ्यात तालुक्यातील नेर गावातील प्रसिद्ध उद्योजक स्नेहा ज्वेलर्सचे संचालक श्री.मनोज वर्मा व सौ. नितू वर्मा यांच्या कन्या खुशी वर्मा च्या वाढदिवसानिमित्त एक अनोखा उपक्रम राबवून कौतुकास्पद कामगिरी करत केली आहे. 

           स्नेहा ज्वेलर्सचे संचालक श्री मनोज वर्मा व सौ नितू वर्मा यांनी आपल्या लाडक्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरणाचा समतोल व‌ हरित भविष्य राखण्यासाठी शासनाच्या एक पेड मॉं के नाम या उपक्रमांतर्गत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गावातील शेतकऱ्यांना सात ते आठ फुटांचे चाळीस आंब्याच्या झाडांची रोपे वाटप करून वाढदिवस साजरा करत गावाला एक आदर्श दिला आहे. 

         खुशी वर्मा यांनी बोलताना सांगितले की प्रत्येकाने वाढदिवस असेच साजरे करून दरवर्षी एक तरी झाड लावावे व संगोपन करावे. जेणेकरून आपण पर्यावरणाचे रक्षण करून आपल्या देशातील होणारे प्रदूषण रोखू शकतो व प्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम रोखू शकतो. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे.

लेबल: ,

शिवसेना धुळे लोकसभा सोशल मिडिया प्रमुखपदी ॲड.प्रसाद सुवर्णा कन्हैयालाल महाले यांची फेरनियुक्ती

 

शिवसेना धुळे लोकसभा सोशल मिडिया प्रमुखपदी ॲड.प्रसाद सुवर्णा कन्हैयालाल महाले यांची फेरनियुक्ती

जनसंघर्ष न्यूज 

      धुळे :- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर गुरुवर्य आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्यनेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब व संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या आदेशान्वये, शिवसेना सोशल मीडिया राज्यप्रमुख मा.राहुलजी कनाल व सोशल मीडिया उपराज्यप्रमुख मा.प्रतिकजी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.प्रसाद सुवर्णा कन्हैयालाल महाले यांची "शिवसेना सोशल मीडिया धुळे लोकसभा प्रमुखपदी" पुन्हा एकदा फेरनिवड करण्यात आली.

      दिनांक १९/०७/२०२५ रोजी सदर नियुक्ती शिवसेनेच्या अधिकृत पत्राद्वारे जाहीर करण्यात आली.सदर नियुक्तीबद्दल ॲड.प्रसाद महाले यांनी शिवसेना धुळे जिल्हाप्रमुख तात्यासाहेब सतिषजी महाले व शिवसेना उत्तर महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख मयुरजी मगर यांचे विशेष आभार मानले आहेत.

       ॲड.प्रसाद महाले हे शिवसेना जिल्हाप्रमुख सतिष तात्या महाले यांचे पुतणे असून तात्यांसोबत ते नेहमी शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमात,आंदोलनात तसेच नियोजनात सक्रीयरित्या सहभागी असतात उत्तम वक्तृत्व व संघटनकौशल्यच्या जोरावर पुन्हा एकदा ॲड.प्रसाद महाले यांची नियुक्ती झाली असून निश्चितच आता शिवसेना पक्ष सोशल मीडियाच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी ते कटिबद्ध राहतील असा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे.

लेबल:

मंगळवार, २२ जुलै, २०२५

मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त ए बी फाउंडेशन तर्फे 4150 बाटल्या रक्तसंकलन

 



मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त ए बी फाउंडेशन तर्फे 4150 बाटल्या रक्तसंकलन

भाजप-एबी फाउंडेशनच्या रक्तदान महायज्ञाचा कुंभ काठोकाठ!


मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त 4150 बाटल्या रक्तसंकलन


धुळ्यात सर्व 30 केंद्रांवर तरुणाईसह प्रौढ महिला-पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जनसंघर्ष न्यूज 

धुळे, ता. 22 : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतील एबी फाउंडेशन व भारतीय जनता पक्षातर्फे शहरातील विविध भागांतील 30 ठिकाणी आज महारक्तदान शिबिराचा उपक्रम झाला. रक्तदानाच्या या महायज्ञाचा कुंभ काठोकाठ भरला. शहरातील विविध भागांतील तरुणाईसह प्रौढ महिला-पुरुषांनी सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील सर्वच केंद्रांवर युवक-युवती-महिला-पुरुष दात्यांच्या रक्तदानासाठी अक्षरशः रांगा लागल्याचे चित्र होते. यात आज सायंकाळपर्यंत तब्बल 4150 बाटल्या रक्तसंकलन झाले.

दरम्यान, शहरातील चाळीसगाव रोडवरील मारुतीनगरमधील भाजपच्या नूतन कार्यालयात झालेल्या शिबिरात 25 ते 30 तृतीयपंथीयांनीही सहभागी होत रक्तदान केले. राज्याचे लाडके मुख्यमंत्री व आमचे लाडके देवाभाऊ यांना वाढदिवसाच्या आमच्याकडून या अनोख्या शुभेच्छा असल्याची भावना तृतीयपंथीयांनी व्यक्त केली. आमदार अनुप अग्रवाल यांच्या पत्नी तथा भाजपच्या बेटी बचाव-बेटी पढावच्या संयोजिका अल्पा अग्रवाल यांनीही शहरातील अग्रसेन चौकातील केंद्रावर जाऊन रक्तदान केले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिराचा उपक्रम झाला. धुळे शहरातही जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल, भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे, आमदार अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अनुप अग्रवाल, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या नेतृत्वात आमदार अनुप अग्रवाल यांच्या संपर्क कार्यालयासह शहरातील विविध भागांतील 30 ठिकाणी महारक्तदान शिबिराचा उपक्रम झाला. या सर्व 30 ठिकाणी झालेल्या शिबिराची भाजपच्या विविध आघाड्यांच्या प्रमुख 30 पदाधिकाऱ्यांसह त्यांच्या सहकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली होती. यात केंद्रनिहाय रक्तसंकलन बाटल्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. सर्वच केंद्रांवर उद्दिष्टापेक्षा जास्त बाटल्या रक्तसंकलन करून धुळेकरांनी सक्रिय सहभागातून हा उपक्रम यशस्वी केला.

मालेगाव रोडवरील आमदार कार्यालय व आग्रा रोडवरील खंडेराव मंदिर परिसरात एबी फाउंडेशन, कामगार आघाडीतर्फे झालेल्या शिबिराचे उद्घाटन माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, बेटी बचाव अभियानाच्या प्रदेश संयोजिका अल्पा अग्रवाल यांच्या हस्ते झाले. यावेळी विजय पाच्छापूरकर, मनोज गर्दे, महादेव परदेशी, मायादेवी परदेशी, शशी मोगलाईकर, अजय अग्रवाल, संयोजक आकाश साखला, कमलेश देवरे, भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय पवार, विकी परदेशी, धीरज परदेशी, ॲड. रोहित चांदोडे, अमोल सूर्यवंशी, ॲड. किशोर जाधव, दिनेश बागूल, सुनीता सोनार, देवा मिस्तरी, कैलास कासार, सागर कोडगे, करण चांगरे, अंकुश बडगुजर, प्रीती चव्हाण, माधुरी भावसार, अमित भोसले, स्वामी कुटे, किरण अहिरे, मोहन टाकले, संतोष परदेशी, जयेश वावदे, भटू गवते, सागर जोशी, सुमित माईनकर आदी उपस्थित होते. दरम्यान, अन्य सर्व केंद्रांवर पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिबिराचे उद्घाटन केले.

रक्तदान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान असल्याचे मानत शहरातील 30 केंद्रांवर झालेल्या या शिबिरात शहरातील युवक-युवती, महिला-पुरुषांनी तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांनी रक्तदानात सक्रिय सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रक्तदान करणाऱ्या दात्यांना भेटवस्तू म्हणून पाण्याचा जार व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, प्रदेश सरचिटणीस डॉ. सुशील महाजन, जितेंद्र शहा, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, माजी महापौर प्रतिभा चौधरी, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, ओमप्रकाश खंडेलवाल, स्थायी समितीचे माजी सभापती शीतलकुमार नवले, यशवंत येवलेकर, वैशाली शिरसाट, आकाश परदेशी, अमोल मासुळे, प्रथमेश गांधी, पंकज धात्रक, ज्ञानेश्वर पाटील, विजय पवार, कमलाकर पाटील, पृथ्वीराज पाटील, राम अग्रवाल, भागवत चितळकर, माजी नगरसेविका सुरेखा उगले, मोहिनी गौड, पवन जाजू, अमोल मराठे, वंदना भामरे, मोहित देसले, ईश्वर पाटील, हिरालाल मोरे, सुहास अंपळकर, मनीषा ठाकूर, राकेश कुलेवार, भगवान देवरे, शिवाजी साळुंखे, अभिजित सूर्यवंशी, निलेश राजपूत, छोटू थोरात, योगेश भोकरे, किशोर चौधरी, ललित आरुजा, तुषार भागवत, प्रशांत नवले, चेतन गवळी, सिद्धांत मंगळे, विजय देवरे, रजनीश निंबाळकर, प्रशांत बागूल, दीपक कोळी, निनाद पाटील यांच्यासह भाजपचे सर्व माजी नगरसेवक, पक्षाचे विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संयोजन केले.

तृतीयपंथीयांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

या महारक्तदान शिबिराच्या माध्यमातून शहरातून सुमारे चार हजार बाटल्या रक्तसंकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत शहरातील सर्व 30 केंद्रांवर सुमारे 4150 धुळेकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून रक्तदानासारख्या श्रेष्ठ कर्तव्यात योगदान दिले. सर्वच केंद्रांवर रक्तदानासाठी सकाळपासून युवक-युवतींसह नागरिकांची गर्दी होती. यामध्ये तृतीयपंथीयांनीही सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला. शहरातील चाळीसगाव रोडवरील मारुतीनगरमधील भाजप कार्यालयात झालेल्या शिबिरात प्रेरणा बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या पार्वती जोगी, निलू जोगी, स्वरा जोगी, अलका जोगी, किरण जोगी, शुभांगी जोगी, विशाखा जोगी, राधा जोगी, मुस्कान जोगी, मैना जोगी यांच्यासह २५ ते ३० तृतीयपंथीयांनी रक्तदान करत राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या. 

आमदार कार्यालयात रक्त तपासणी

दरम्यान रक्तदान शिबिरात आमदार अग्रवाल यांच्या संपर्क कार्यालयात एबी फाउंडेशन व कामगार मोर्चातर्फे कामगारांसह रक्तदात्यांची विविध 36 प्रकारची रक्त तपासणी करण्यात आली. तपासणी झालेल्या सर्व दात्यांना तपासणीचे रिपोर्ट देण्यात आले.

55 किलोंचा केक कापून मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस

शहरातील गल्ली क्रमांक पाचमधील मनपाच्या शाळा क्रमांक 9 जवळील हिंदू एकता चौकात शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, अल्पा अग्रवाल, महादेव परदेशी, मायादेवी परदेशी, गजेंद्र अंपळकर यांच्या हस्ते 55 किलोंचा केक कापण्यात आला. विकी परदेशी, चेतन मंडोरे, तुषार भागवत यांनी संयोजन केले.


या केंद्रांवर झाले रक्तसंकलन

1) अग्रसेन चौक 2) अभय महाविद्यालय 3) दत्तमंदिर चौक 4) छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, पारोळा रोड 5) जिल्हा क्रीडा संकुल चौक 6) त्रिकोणी गार्डन (प्रभाग 11) 7) पंचवटी चौक, देवपूर 8) नगावबारी चौफुली 9) क्रांती चौक 10) मारुतीनगर, चाळीसगाव चौफुली 11) वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक 12) शनीनगर चौक 13) संत गाडगेबाबा भुवन (मोगलाई) 14) मारुती मंदिर (वर्षावाडी), मोहाडी 15) मतिमंद शाळा, मोराणे 16) कुंभार खुंट, जुने धुळे 17) विघ्नहर्ता गणपती मंदिर, इंदिरा गार्डन 18) प्रसन्न हनुमान मंदिर (प्रभाग 11) 19) आमदार अनुप अग्रवाल जनसंपर्क कार्यालय, 20) खंडेराव मंदिर, आग्रा रोड 21) अयोध्यानगर, साक्री रोड 22) नेहरू चौक 23) बहावलपुरी पंचायत, साक्री रोड 24) जलारामबाप्पा मंदिर (नटराज चित्रपटगृह) 25) मनपा शाळा क्र. 9, हिंदू एकता चौक 26) स्वराज जिम, मिल परिसर 27) मरिमाता चौक, गल्ली क्र. 4 28) सरकारी आपला दवाखाना, वलवाडी 29) विठ्ठल-रखुमाई मंदिर, वाखारकरनगर 30) डॉ. शकील देशमुख क्लिनिक, खेमजी अजबेनगर, साक्री रोड 

लेबल: , ,

सोमवार, २१ जुलै, २०२५

धुळे महानगरपालिकेत कोट्यावधींचा मालमत्ता कर घोटाळा -



धुळे महानगरपालिकेत कोट्यावधींचा मालमत्ता कर घोटाळा 

मालमत्ता करांच्या आकारणीमध्ये सावळा गोंधळ

वाढिव बिलांची होळी करत शिवसेना उबाठा वतीने आयुक्तांना घेराव 

जनसंघर्ष न्यूज 

      धुळे :-  धुळे महानगरात मालमत्ता करांच्या अवाढव्य बिलांमुळे पुन्हा एकदा असंतोष उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धुळे ही ड वर्ग महानगर पालिका आहे. मात्र मालमत्ता कर हा अ वर्ग महानगर पालिकेपेक्षा अधिक आकारला जातो. हा सार्वत्रिक आरोप होत आहे. मनपाचा पूर्वीचा दर हा 26 टक्के होता. तो भयानक पणे वाढवून 36 टक्के करण्यात आला होता. त्यावर प्रचंड वादळ उठले. त्यानंतर तो 36 वरून 30 टक्के करण्यात आला. जर नवीवाढ चार टक्के आहे तर ही चार टक्के वाढ व जुन्या प्रॉपर्ट्यांचा घसारा वजा जाता नवीन बिले पूर्वी इतकी किंवा किंचित वाढीची यायला हवी होती. मात्र काहींना चक्क दुप्पट-तिप्पट बिले कशी काय येत आहेत?

       एप्रिल 2025 मध्ये 25-26 या वर्षाकरीता मालमत्ताकराची बिले धुळे मनपाच्या वतीने नागरिकांना देण्यात आली. त्यानंतर महापालिकेच्या प्रशासनाच्या डोक्यात परत भ्रष्टाचाराचा किडा वळवळला आणि जून 2025 मध्ये परत नव्याने मालमत्ता कराची बिले धुळेकरांना आकारण्यात आली. एप्रिल व जूनच्या बिलामध्ये प्रचंड तफावत असून अव्वाच्या सव्वा बिले या ठिकाणी लावण्यात आलेली असून प्रॉपर्टी मोजमापाच्या आधारे इतर 14-15 करांच्या आकारणीची टक्केवारी ठरत असतांना ही बिले कोणत्या आधारे आकारण्यात आली हा प्रश्‍न धुळेकरांना पडला आहे.  नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून धुळे शहरातील मालमत्तांच्या फेरमोजणीच्या आदेश प्राप्त करुन घेतले. या आधी विधानसभेच्या निवडणूकांपूर्वी  तत्काल

तत्कालीन नगर सचिव गोविंद राजन यांच्याकडून या वाढीव मालमत्ता कराला स्थगिती देण्यासंदर्भात आदेश पारीत करुन घेतले होते. या आदेशाला धुळे मनपाच्या प्रशासनाने केराची टोपली दाखवत मनमानी पध्दतीने आकारणी व वसुली सुरुच ठेवली आहे.

धुळे महानगरपालिकेने मालमत्तांच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सर्वेक्षण पून: मुल्यांकनाचे काम स्थापत्य कन्सल्टंट प्रा.लि. अमरावती यांना कोट्यावधी रु. देऊन दिले. सदर कंपनीने डिजीटल तंत्रज्ञान वापरुन अव्वाच्या सव्वा मालमत्तेची मोजणी केली. या कंपनीकडून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार संपूर्ण मालमत्तांचे जीआयएस आधारीत प्रत्यक्ष सहसर्वेक्षण करुन युनिक प्रॉपर्टी ऑथोरीटी कोड नोंदणीवही तयार करणे, मुल्यांकनासाठी तांत्रिक सर्वेक्षण, अद्यावत संगणकीकृत नकाशे काढणे वार्डनिहाय मालमत्ताचे डिजीटल फोटो काढणे, संगणकीकृत नकाशे फोटो डेटावरुन जोडणे, झोन प्रमाणे नकाशा तयार करुन ऑनलाईन मालमत्ता कर भरणा प्रणाली द्वारा सुधारीत मुल्यांकन करुन घेणे गरजेचे होते. पण संबंधीत कंपनीने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करुन अवाजवी पध्दतीने मोजमाप करुन घेतले. गेल्या वर्षी मालमत्ता करामध्ये वाढ केल्यानंतर धुळे शहरातील वाढीव गावांमधील मालमत्ता धारकांना नोटीसा बजावण्यात आल्यानंतर शहरातील भागांना  टप्प्याटप्याने कर आकारणीच्या  नोटीसा बजावण्यात आल्या. या करांमध्ये तफावत आढळल्याने नागरिकांच्या हरकती मागवून मनपा वतीने सुनावणी करण्यात येऊन देखील नागरिकांना कुठलाही दिलासा मिळाला नाही.

एकत्रित मालमत्ता कराचा विचार केल्यास पनवेल, अहमदनगर, जळगांव, अमरावती, छ.संभाजी नगर, अकोला, मालेगांव या शहरात धुळ्यापेक्षा  कमी एकत्रित मालमत्ता कर आकारला जातो. एकत्रित  मालमत्ता करावर जे विविध कर विशेष शिक्षण, वृक्ष संवर्धन, अग्निशमन, जललाभ, दिवाबत्ती, मलनिस्सरण, पथकर, साफसफाई, घनकचरा  सेवा, मनपा  शिक्षण उपक्रम, सिव्हरेज कर, लावले जातात. या करांमध्ये  इतर  महानगरपालिकांमध्ये कुठे एक तर कुठे अर्धा टक्का अशी आकारणी केल्यामुळे इतर महानगरपालिकांचा कर हा धुळे मनपाच्या करापेक्षा कमी येतो. धुळे महानगरपालिकेत 2008 साली जळीत कांड झाल्यानंतर  सर्व मालमत्ता धारकांचे रेकॉर्ड जाळण्यात आले. तद्नंतर धुळे महानगरपालिका मालमत्ता कराची वसुली ही कुठल्याही नियमांची अंमलबजावणी न करता होत राहिली. अनेक मालमत्ता करांचे रेकॉर्ड उपलब्ध नसतांना सुध्दा ही आकारणी मालमत्ता कर विभाग करीत राहिला.  नवीन सर्वेक्षणाच्या आधारे धुळे महानगरपालिकेत जवळपास 40 ते 50 हजार मालमत्ता धारक नव्याने अचानक आढळून आले. या 40-50 हजार मालमत्ता गेल्या 15 ते 20 वर्षांपासून तयार झाल्या असून या मालमत्ता धुळे महानगरपालिका प्रशासनाच्या नजरेस का आल्या नाहीत. या मालमत्तांना इतके वर्ष अभय राजकारण्यांनी दिले की, महानगरपालिका प्रशासनातील वसुली विभागातील अधिकार्‍यांनी हा मोठा प्रश्‍न असून या आधी आकारण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये वसुली विभागातील प्रशासनाने प्रचंड भ्रष्टाचार केलेला असून त्याचे व्यवस्थित खोदकाम केल्यास हा आकडा कोट्यावधींमध्ये जाऊ शकतो.

मोजमाप ठेकेदाराने चुकीच्या पध्दतीने मालमत्तेचे मोजमाप केल्याची कबुली मनपा अधिकार्‍यांनी याआधीच दिली असून अमरावतीतील  या ठेकेदारावर मनपामधील कुणाकुणाचे नियंत्रण होते ? त्यांनी काय कर्तव्य बजावले ? या प्रश्‍नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे.

या ठेकेदाराला चुकीच्या पध्दतीने वसुली विभागातील अधिकार्‍यांनी चुकीचा डेटा देखील जाणून बुजून देण्यात आल्याने या ठेकेदांराची कार्यपध्दती बदलविण्यामागे वसुली विभागातील अधिकार्‍यांचा मोठा हात असल्याचे दिसून येत आहे.

धुळे मनपाने एप्रिल ते जून या कालावधीत नागरिकांकडून 2025-26 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कर 21 हजार  मालमत्ता धारकांकडून भरण्यात आला. त्या मालमत्ता धारकांच्या बिलांमधील तफावत कशी कमी करणार ? व त्यांनी भरलेला अधिकचा मालमत्ता कर कसा परत करणार हा देखील महत्वाचा प्रश्‍न असून नगरविकास राज्यमंत्र्यांकडून आलेल्या आदेशानुसार सन 2025-26 साठी धुळे मनपाने बनविलेली व  वाटलेली मालमत्ता करावी सर्व 100% बिले आधी रद्द करण्याची घोषणा धुळे मनपा  प्रशासनाने करावी व त्यानंतरच सर्व मालमत्तांचे पुन:मोजणी करावी.  धुळे महानगरपालिकेने सद्यस्थितीत जुन्या पध्दतीने म्हणजेच 26% देखील मालमत्ता कराची आकारणी केल्यास धुळे महानगरपालिकेच्या उत्पन्नात चांगल्या पध्दतीची वाढ होऊ शकते. पण धुळे महानगरपालिका वाढीव मालमत्ता कराच्या टक्केवारी मागे लागल्याने नागरिकांमध्ये असंतोष तर आहेच, पण धुळेकरांची मानसिकता पाहता येणार्‍या काही वर्षांत धुळेकर नागरिक हा कर भरणारच नाहीत हे देखील मनपा प्रशासनाने लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे  धुळे मनपाने एप्रिल व जून महिन्यात नागरिकांना दिलेली सर्व वाढीव मालमत्ता कराची बिले रद्द करण्याची घोषणा करावी व त्यानंतर संपूर्ण धुळे शहरातील मालमत्ता करांचे प्रभागनिहाय किंवा झोन निहाय पुन:मोजणी करुन त्यांचे अद्यावत रेकॉर्ड तयार करुन मगच इतर उपकरांची टक्केवारी आकारुन नागरिकांना मालमत्ताकरामध्ये दिलासा द्यावा , अशी मागणी करत शिवसेना वतीने आयुक्तांना घेराव टाकून महानगरपालिकेने जून महिन्यात दिलेल्या वाढीव मालमत्ता कराच्या मुलांची महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारा जवळ होळी करण्यात आली याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, भगवान करणकाळ,उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, संदीप सूर्यवंशी,निंबा मराठे, सुनील पाटील, आनंद जावडेकर, कपिल लिंगायत, पंकज भारस्कर, दिनेश पाटील, विकास शिंगाडे, , संदीप चौधरी, संजय पाटील, नितीन देशमुख, सागर निकम ,सागर साळवे, नासिर पिंजारी, वैभव पाटील, हर्षल वाणी, राजू पाटील, चांद मिस्तरी,  रविंद्र गावडे, जगदीश शिंदे, अमोल ठाकूर , अक्षय पाटील आदी उपस्थित होते.

लेबल: , ,

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहरात महान रक्तदान शिबिर



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहरात महान रक्तदान शिबिर

महारक्तदान शिबिरात उद्या ३००० हजार बाटल्या रक्तसंकलनाचे उद्दिष्ट

आमदार अग्रवाल : मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात ३१ ठिकाणी उपक्रम

जनसंघर्ष न्यूज 

        धुळे, ता. २१ : राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २२ जुलैला असलेल्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे मंगळवारी (ता. २२) शहरातील विविध भागांतील ३१ ठिकाणी महारक्तदान शिबिर होत आहे. या शिबिराच्या माध्यमातून शहरातून सुमारे ३००० ते ४००० बाटल्या रक्तसंकलनाचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे. यासाठी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज असून, या शिबिरात धुळेकर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून रक्तदानासारख्या श्रेष्ठ कर्तव्यात योगदान द्यावे, असे आवाहन शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी आज केले.

        मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी होत असलेल्या रक्तदान महाशिबिराच्या उपक्रमाची माहिती देण्यासाठी आज सकाळी मालेगाव रोडवरील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद झाली, तीत आमदार अग्रवाल बोलत होते. यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, प्रदेश सरचिटणीस डॉ. सुशील महाजन, जितेंद्र शहा, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, माजी नगरसेविका भारती माळी, मायादेवी परदेशी, महादेव परदेशी, ओमप्रकाश खंडेलवाल, यशवंत येवलेकर, पवन जाजू, वैशाली शिरसाट, आकाश परदेशी, पृथ्वीराज पाटील, मोहिनी गौड आदी उपस्थित होते.

       आमदार अग्रवाल म्हणाले, की पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यात उद्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिराचा उपक्रम होत आहे. त्यानुसार धुळे शहरातही विविध भागांतील ३१ ठिकाणी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे, आमदार अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली मी व भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या नेतृत्वात महारक्तदान शिबिर होईल. रक्तदान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान असून, शिबिरात रक्तदान करणाऱ्या दात्यांना खास गिफ्टही देण्यात येणार आहे. या शिबिरात शहरातील तरुणाईसह धुळेकरांनी तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांनी रक्तदान करून सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही आमदार अग्रवाल यांनी केले. 

       श्री. अंपळकर म्हणाले, की मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या होत असलेल्या महारक्तदान शिबिरात जास्तीत जास्त दात्यांना सहभागी करून घेण्यात येत आहे. यातून सुमारे तीन हजार बॉटल रक्तसंकलनाचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. राज्यात सर्वाधिक बाटल्या रक्तसंकलन करून लोकसंख्येच्या मानानुसार धुळे शहर पहिल्या क्रमांकावर कसे राहील यासाठी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते पूर्ण ताकदीने हा उपक्रम यशस्वी करतील. 

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली मदत

या पत्रकार परिषदेत आमदार अग्रवाल यांनी शहरातील दात्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी स्वतः एक लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याची घोषणा केली. भाजपचे पदाधिकारी जितेंद्र शहा यांनीही पत्रकार परिषदेतच दोन लाख रुपयांचा धनादेश आमदार अग्रवाल यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द केला. पत्रकार बांधवांतर्फे व्यंगनगरीचे संपादक तथा ज्येष्ठ छायाचित्रकार राजेंद्र सोनार यांनीही मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आमदार अग्रवाल यांच्याकडे दोन हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

 मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दोन हजार रुपयांचा धनादेश आमदार अनुप अग्रवाल यांना देताना व्यंगनगरीचे संपादक राजेंद्र सोनार. शेजारी गजेंद्र अंपळकर, मनोज गर्दे, जितेंद्र शहा, प्रदीप कर्पे, ओमप्रकाश खंडेलवाल, डॉ. सुशील महाजन.

लेबल: ,

रविवार, २० जुलै, २०२५

सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे एक दिवसीय शिबिर संपन्न



सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे एक दिवसीय शिबिर संपन्न

 विद्रोहाचा एल्गार पेटवून सर्वंकष शोषणाच्या विरोधातील आवाज  विद्यार्थ्यांनी बुलंद करावा - ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते एस. यु.तायडे

जनसंघर्ष न्यूज 

       धुळे :- सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे एकदिवशीय जिल्हा शिबिर देवपूरातील संत रविदास भवन येथे संपन्न झाले.शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते एस. यु.तायडे यांनी केले यावेळी मंचावर तुषार सूर्यवंशी, कॉ. एल.आर.राव, कॉ.दत्ता थोरात,ज्वाला मोरे व सिद्धार्थ जगदेव उपस्थित होते.उद्घाटकीय भाषणात ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते एस. यु.तायडे यांनी सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य करीत सरकार नवीन शैक्षणिक धोरण लादून दलित कष्टकरीवर्गाला शिक्षण क्षेत्राचतून हद्दपार करण्याचा कारस्थान करीतआहे.म्हणून विद्यार्थी वर्गाने सम्यक ज्ञान आत्मसात करून सर्वंकष शोषणाच्या विरोधातील आवाज  विद्यार्थ्यांनी बुलंद करावा असे मार्गदर्शन करण्यात आले.

      तसेच दुसऱ्या सत्रात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे सचिव तुषार सुर्यवंशी यांनी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेची भूमिका विषद केली तर विजय वाघ यांनी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे लढे यावर प्रकाश टाकला.राकेश अहिरे आणि प्रा.सतिष निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.भोजन अवकाशानंतर शंकर यशोद दिग्दर्शित "अ" ही शॉर्ट फिल्म दाखवून चर्चा करण्यात आली.समारोप सत्र सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सिद्धांत बागुल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.या सत्रात सिद्धार्थ जगदेव यांनी विद्यार्थी संघटना आणि मैत्रीभाव या विषयावर विचार मांडले.यावेळी प्रा.तथागत सुरवाडे उपस्थित होते.शिबिर यशस्वी करण्यासाठी सिद्धांत बागुल,हर्ष मोरे,विजय वाघ,केतन निकम,निलिमा भामरे,भूषण ब्राह्मणे,धनंजय जगताप,सिद्धार्थ बैसाने,सिद्धार्थ बागुल यांनी प्रयत्न केले.

लेबल:

शनिवार, १९ जुलै, २०२५

पोटच्या मुलानी वडिलांना घराबाहेर काढलं…पण समाजसेवक प्रदिप नन्नवरे यांनी दिला वृद्ध आजोबांना आधार

 

मुलाने घराबाहेर काढले… पण एका अनोळखी व्यक्तीने दिला जीवनाला आधार !

पोटच्या मुलानी वडिलांना घराबाहेर काढलं…पण समाजसेवक प्रदिप नन्नवरे यांनी दिला वृद्ध आजोबांना आधार

जनसंघर्ष न्यूज 

      परभणी :- जिल्ह्यातील पूर्णा शहरात  हिंगोली जिल्ह्यातील देवठाणा फाळेगाव येथील बाबुराव निवृत्ती मोरे हे वृद्ध आजोबा पूर्णा शहरातील शेख समी यांच्या घराजवळ एकटे, उपाशीपोटी बसलेले आढळून आले.

      शेख समी यांनी माणुसकी दाखवत त्यांना अन्न दिले व वृद्ध आजोबांना त्यांची सविस्तर माहिती विचारले असता. यावेळी आजोबांनी दुःखद कथन केले की, "माझ्या मुलाने – देवानंद मोरे (महिंद्रा कंपनी, सातपूर नाशिक येथे कार्यरत) – मला घरातून बाहेर हाकलून दिलं." हे ऐकून शेख समी यांनी तात्काळ सदैव गोर गरीब जनतेचा सेवेत असणारे समाजसेवक प्रदिप नन्नवरे यांनी आज पर्यंत बेघर लोकांची अंत्यविधी, व त्यांच्या घरी सुखरूप पाठवले तर काहींना आश्रम मध्ये सोडले असून यांना बोलावून घेतले. प्रदिप नन्नवरे यांनी क्षणाचाही विलंब न करता आजोबांना ग्रामीण रुग्णालय, पूर्णा येथे उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर त्यांनी आजोबांना परभणी येथील 'सावली बेघर निवारा केंद्रात' सुरक्षित ठिकाणी पोहचवले.

या अजोबांच्या मुलाला चांगला धडा सामाजिक कार्यकर्त्यांनी शिकवला पाहिजे जेणेकरून असे प्रकरण कमी होतील समाजसेवक प्रदिप नन्नवरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी युवराज गव्हाणे (संस्थापक अध्यक्ष), शेख समी, युवराज सूर्यतळ,वैभव गायकवाड आणि जाबाज खान यांनी सक्रिय सहभाग घेऊन मोलचे सहकार्य केले.

    आजोबांची व्यथा ऐकून अनेकांचे डोळे पाणावले, पण समाजातील संवेदनशील व्यक्तींनी दाखवलेली माणुसकी हीच या घटनेतील खरी प्रेरणा ठरली. प्रदिप नन्नवरे यांनी दाखवलेले माणुसकीचे चित्र म्हणजेच आजच्या समाजातील खरा प्रकाशदूत!

लेबल:

आजाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे व किरण गायकवाड यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश


आजाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे व किरण गायकवाड यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

जनसंघर्ष न्यूज 

       उत्तर प्रदेशचे खासदार ऍडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आनंद साहेबराव लोंढे आणि समता समाज संघाचे जिल्हाध्यक्ष किरण गायकवाड यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा दिनांक 19 जुलै रोजी मुंबईत पार पडला. हा प्रवेश सोहळा शिवसेना धुळे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांच्या पुढाकारातून संपन्न झाला. या जाहीर प्रवेश सोहळ्यासाठी आनंद लोंढे व किरण गायकवाड हे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन वाहनांच्या मोठ्या ताफ्याद्वारे मुंबईत दाखल झाले होते. लोंढे यांनी वडिल साहेबराव लोंढे यांचे आशीर्वाद घेऊन या प्रवेश सोहळ्याचा प्रवास सुरू केला. वाहनांचा मोठा ता फा लक्ष वेधून घेत होता. मुंबईत दाखल झाल्यावर आनंद लोंढे व गायकवाड यांच्यातर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भला मोठा गुलाब पुष्पांचा हार घालण्यात आला. जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी आनंद लोंढे आणि किरण गायकवाड यांचा सविस्तर परिचय ना. एकनाथ शिंदे यांना करून दिला. आनंद लोंढे यांच्या प्रवेशाने धुळे जिल्हा शिवसेनेची ताकद प्रचंड वाढणार आहे असेही महाले यांनी मुख्यमंत्र्यांच्या मनावर ठसविले. आनंद लोंढे यांनी धुळ्यातील विनोद वाईन शॉप हटविण्यासह त्यांच्या विविध प्रखर आंदोलनांविषयी देखील महाले यांनी शिंदे यांना माहिती दिली. एकनाथ शिंदे यांनी आनंद लोंढे यांच्या आजवरच्या कामगिरीची प्रशंसा केली. तसेच शिवसेनेत आपले पुढचे भविष्य उज्ज्वल असेल असे आश्वस्त केले. याप्रसंगी शिवसेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष नूतन गवांदे, धुळे महिला जिल्हाध्यक्ष ज्योती रावत, भैय्या वाघ, शहर अध्यक्ष, रोहित सोनवणे, आबा निकुंबे, किरण भालेराव, स्वप्निल ढोडरे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आनंद लोंढे आणि किरण गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता.

लेबल: ,

रि.पा.ई ( आठवले ) नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांचे नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलन



रि.पा.ई ( आठवले ) गटाचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांचे नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलन


जनसंघर्ष न्यूज 

        चांदवड :- शहरात बाजारतळातील पेटीशॉपचे गाळे मिळण्याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने दि 18 जुलै 2025, शुक्रवार रोजी नगरपरिषदेसमोर ठिय्या  आंदोलन करण्यात आले व नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

        चांदवड शहरातील बाजारतळातील अतिक्रमणाच्या जागेत असलेले दुकाने काढण्यात आलेले होते. हे दुकाने काढल्यानंतर हे दुकानदार बेरोजगार झालेले आहेत. मागील 15 ते 20 वर्षांपासून यांची दुकाने बाजारतळात आहेत. नगरपरिषदेने सांगितल्याप्रमाणे या दुकानदारांनी स्वत:हुन त्यांची दुकाने काढून घेतले. या दुकान‌दारांवर उपासमारिची वेळ आलेली आहे. 'आपली व आपल्या कुटुंबाची उपजीविका कशी चालवायची?', असा प्रश्न या दुकानदारांना पडलेला आहे. यामुळे बाजारतळात जे पेटीशॉपचे गाळे बांधण्यात येत आहेत ते गाळे शासनाने या टपरीधारकांना तुटपुंज्या मानधनावर देण्यात यावे. तसेच शहरातील विधवा, अपंग व निराधार महिलांना देखील हे गाळे देण्यात यावे.

       नगरपरिषदेने बाजारतळातील टपऱ्या काढल्या यामुळे या टपरीधारकांवर फार मोठा अन्याय झालेला आहे. कालांतराने बाजारतळात जे सिमेंट कॉन्क्रिटचे गाळे व कॉम्प्लेक्स बांधण्यात येईल तेव्हा या सर्व लोकांना हे गाळे देण्यात यावे. या टपरी धारकांची गैरसोय होऊ नये, म्हणुन लवकरात - लवकर या दुकानदारांची पेटीशॉप गाळयांमधे सोय करण्यात यावी. पेटीशॉपच्या गाळयांचा लिलाव नगरपरिषद अधिकाऱ्यांनी संगनमताच्या लोकांना देऊ नये. गाळयांच्या बदल्यात जास्त पैशांच्या वसुलीसाठी दुकानदारांची छळवणूक व पिळवणूक करू नये. नगरपरिषद अधिकाऱ्यांनी या गोर-गरिब व कष्टकरी गाळा धारकांवर जाचक अटी व शर्ती लादू नयेत.

       चांदवड तालुका ग्रामीण असल्याने येथे रोजगार नाही. यामुळे ज्या लोकांनी बाजारतळातील गाळे मिळण्यासाठी नगरपरिषदेला अर्ज दिलेले आहेत, त्या सर्व लोकांना वार्षिक तुटपुंज्या मानधनावर पेटीशॉपचे गाळे देण्यात यावे. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया  ( आठवले ), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने आमरण उपोषण व तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात  येईल. यानंतर कायदा सुव्यवस्थतेचा प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या परिस्थितीस आपण सर्वस्वी जबाबदार रहाल, याची नोंद शासनाने घ्यावी, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी सर्व महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.

लेबल: , ,

धुळेकरांच्या मालमत्तांची फेरमोजणी करून सुधारित बिले द्या :-

धुळेकरांच्या मालमत्तांची फेरमोजणी करून सुधारित बिले मिळणार

नगरविकास विभागाचे महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे निर्देश


आमदार अनुप अग्रवाल यांच्या पाठपुराव्यामुळे मिळणार दिलासा

जनसंघर्ष न्यूज

धुळे, ता. १९ :-  येथील महापालिका हद्दीतील मालमत्ताधारकांना मालमत्ता कर भरण्यासंदर्भात शास्तीपासून सूट द्यावी, सक्तीची वसुली टाळावी तसेच संपूर्ण मालमत्तांची फेरमोजणी करून मालमत्ताधारकांना सुधारित बिले देण्याचे निर्देश राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने येथील महापालिका आयुक्तांना दिले आहेत. या संदर्भात शुक्रवारी (ता. १८ जुलै) नगरविकास विभागाने महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील यांना पत्र दिले आहे.

दरम्यान, याबाबत शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. तसेच नुकत्याच झालेल्या नगरविकास राज्यमंत्री मिसाळ यांच्याकडे झालेल्या बैठकीतही हा मुद्दा निदर्शनास आणून दिला होता. तसेच त्यासाठी पत्रही दिले होते. या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

वाढीव घरपट्टी देयकांवरून संताप

येथील महापालिकेतर्फे शहरातील अनेक मालमत्ताधारकांना अव्वाच्या सव्वा मालमत्ता कराची बिले वाटप करण्यात आली आहेत. यात ज्याला पूर्वी तीन हजार घरपट्टी होती त्याला ६० हजारांचे बिल मिळाले आहे. शहरातील अनेक नागरिक या वाढीव बिलांमुळे त्रस्त झाले असून, ही बिले कमी करण्यासाठी महापालिकेत चकरा मारत आहेत. याबाबत हजारो नागरिकांनी आमदार अग्रवाल यांच्याकडे तक्रारी दिल्या होत्या. या  पार्श्वभूमीवर आमदार अग्रवाल यांनी गेल्या सहा जूनला महापालिकेत आढावा बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने संपूर्ण मालमत्ताधारकांची वाढीव बिले तपासून ती रिवाइज करावीत, अशी सूचना केली होती. यावर अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने मोजमाप केल्याचे सांगितले. यावर संबंधित ठेकेदाराला बैठकीतूनच दूरध्वनी करत त्वरित नव्याने मोजमाप करत सर्व मालमत्ताधारकांना सुधारित बिले देण्याची सूचनाही आमदार अग्रवाल यांनी केली होती. 

मंत्री मिसाळांकडे विविध मुद्द्यांची मांडणी

      यानंतर आमदार अग्रवाल यांनी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे शहरातील विविध विकासकामांप्रश्नी नुकत्याच झालेल्या बैठकीत धुळ्यातील मालमत्ताधारकांना देण्यात आलेल्या वाढीव बिलांचा मुद्दाही उपस्थित करत शहरवासीयांकडून याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. तसेच या प्रक्रियेत अनेक गंभीर त्रुटी आढळल्या असून, यामध्ये काही ठिकाणी घसारा विचारात घेतलेला नाही, तसेच काही प्रकरणांमध्ये बाह्य भिंतींच्या  बाहेरून क्षेत्रफळ मोजणी करणे, बाथरूम, जिना, गॅलरी, पॅसेज, आदींचे क्षेत्रफळ वजा न करता वाढीव रकमेची बिले देण्यात आल्याचे सांगितले होते. याबरोबरच नोंदणी व प्रत्यक्ष उपयोग यातील विसंगतीमुळे नागरिकांवर अन्यायकारक कर लादण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. यामुळे सद्यःस्थितीत कोणत्याही प्रकरणात शास्ती लावू नये, कर भरण्याची सक्ती करू नये, मालमत्तांचे योग्य व तांत्रिकदृष्ट्या बरोबर फेरमोजणी करावी, ज्यामध्ये फक्त वापरयोग्य आतील क्षेत्र विचारात घ्यावे, बाथरूम, जिना, पॅसेज, गॅलरी आदी घटक मोजणीतून वगळावेत, बांधकामांची जुनी अवस्था लक्षात घेऊन त्यानुसार घसाऱ्याचा योग्य लाभ द्यावा, वरील दुरुस्तीनंतरच मालमत्ताधारकांना सुधारित मालमत्ता कराची बिले द्यावीत, अशी मागणीही आमदार अग्रवाल यांनी मंत्री मिसाळ यांच्याकडे केली होती.

      शहरातील बहुतांश मालमत्ताधारकांना महापालिकेतर्फे वाढीव रकमेची बिले देण्यात आली होती. याबाबत हजारो नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांना १८ जुलैला पत्र देत मालमत्ताधारकांना शास्तीत सूट द्यावी, सक्तीची वसुली टाळावी, तसेच मालमत्तांची फेरमोजणी करून मालमत्ताधारकांना सुधारित बिले देण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे शहरातील मालमत्ताधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

लेबल: , ,