स्वातंत्र्य दिनी मानवसेवेचा महाकुंभ ; तेराव्या वर्षी रक्तदानाचा विक्रम !
कोरोनाच्या संकटातही खंड न पडलेली रक्तदानाची परंपरा; ललित माळी आणि हरीश माळी यांच्या पुढाकाराला हजारो रक्तदात्यांची साथ
जनसंघर्ष न्यूज
धुळे : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी, महानगर, ए. बी. फाउंडेशन धुळे आणि लायन्स क्लब धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला तेराव्या वर्षाचा रक्तदान महाकुंभ उत्साहपूर्ण, भावनिक आणि सेवाभावी वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाला.
पहिल्या वर्षी अवघ्या १७ रक्तदात्यांपासून सुरू झालेल्या या सेवायज्ञाने आज तेराव्या वर्षात पदार्पण केले असून, गेल्या बारा वर्षांपासून दरवर्षी ६०० पेक्षा अधिक रक्तपिशव्यांचा टप्पा गाठण्याची परंपरा कायम ठेवली आहे. विशेष म्हणजे, कोरोनासारख्या अत्यंत कठीण काळातही या सेवाकार्यात एक वर्षाचाही खंड पडू दिला गेला नाही.
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचा सन्मान म्हणून पहिल्या वर्षापासून पेनड्राईव्ह भेट देण्याची परंपरा जपली जात आहे. मात्र, रक्तदात्यांनी दिलेल्या रक्ताची किंमत कोणत्याही भेटवस्तूपेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे. कारण हे रक्त एखाद्या अपघातग्रस्ताचा जीव वाचवू शकते, प्रसूतीदरम्यान संकटात सापडलेल्या मातेला आधार देऊ शकते किंवा गंभीर आजाराशी झुंजणाऱ्या रुग्णाला नवजीवन देऊ शकते.
आपण केलेले रक्तदान कधी, कुठे आणि कोणाच्या आयुष्यात आशेचा किरण बनेल, हे आपल्याला माहीत नसते; मात्र ते एखाद्याचे प्राण वाचवण्याचे अमूल्य कार्य नक्कीच करू शकते.
तेरा वर्षांचा सेवायज्ञ… दोन भावांची अविरत साथ!
या रक्तदान चळवळीच्या सातत्यामागे नगरसेवक ललित गंगाधर माळी आणि हरीश गंगाधर माळी यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न, अचूक नियोजन आणि निस्वार्थ सेवाभाव राहिला आहे.
अवघ्या १७ रक्तदात्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आज हजारो रक्तदात्यांना जोडणाऱ्या व्यापक सेवायज्ञात रूपांतरित झाला आहे. अनेक अडचणी आल्या, कोरोनासारखे संकट आले; मात्र “रक्ताची गरज असलेल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत रक्त पोहोचले पाहिजे” हा संकल्प कधीही डळमळला नाही.
या उपक्रमाला डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था, प्रतिष्ठित नागरिक आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रक्तदात्यांचे निस्वार्थ सहकार्य लाभले. त्यामुळेच हा सेवायज्ञ तेराव्या वर्षीही त्याच उत्साहाने आणि त्याच सेवाभावाने सुरू आहे.
ललित गंगाधर माळी आणि हरीश गंगाधर माळी यांच्या या अविरत सेवाभावी प्रयत्नांना मनःपूर्वक सलाम!
रक्तदान महाकुंभाला मान्यवरांची उपस्थिती
आजच्या या सेवायज्ञाला उपस्थित राहून शुभेच्छा देणारे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल, आमदार अनुप भैय्या अग्रवाल, धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा भदाणे, माजी आमदार कुणाल बाबा पाटील, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुभाष भामरे, भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर, धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रामकृष्ण बापू खलाणे आणि महापौर मायादेवी परदेशी यांचे मनःपूर्वक आभार.
तसेच व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष नितीनजी बंग, माजी उपनगराध्यक्ष हनुमंत आप्पा वाडीले, माजी महापौर चंद्रकांतजी सोनार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गंगाधर माळी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागीय कार्यवाहक राजेशजी पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महादेव परदेशी, उपमहापौर ज्योत्स्नाताई पाटील, नगरसेविका निशाताई महाजन, डॉ. सुशील महाजन, नगरसेवक धीरज भैय्या परदेशी, नगरसेवक ललित भाऊ आहुजा, नगरसेविका योगिताताई कुठे, नगरसेविका कविताताई कोळी, नंदू भाऊ सोनार, रणजीत राजे भोसले, नगरसेवक सनी भाऊ चौधरी, नगरसेवक रोहित भाऊ चांदवडे आणि धीरज भाऊ जगताप यांचेही मनःपूर्वक आभार.
तसेच भाजपा सरचिटणीस सुनीलजी कपिल, मंडळाध्यक्ष प्रथमेश गांधी, संजयजी बोरसे, युवराजजी बोरसे, अमोल भाऊ मराठे, प्रवीणजी पाटील, आर. एन. पाटील सर, अॅड. प्रशांत चौधरी, अॅड. राकेश चौधरी, अॅड. विजय रवंदळे, अॅड. मुकुंद माळी, अॅड. प्रभावती माळी, अॅड. विनोद सोनवणे, प्रा. तुषार करांकेसर, युवराज दादा सोनवणे, महेश माळी तसेच सर्व डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.
यशस्वी आयोजनासाठी कार्यकर्त्यांचे योगदान
या रक्तदान महाकुंभाच्या यशस्वी आयोजनासाठी लायन्स क्लबचे अध्यक्ष तुषारजी आढावे, मयुरजी जैन, महाराष्ट्र माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अॅड. जगदीश सूर्यवंशी, रोहित अमृतकर, सिद्धेश नाशिककर, मोहित वाघ, कृष्णा मांडे, विशाल चव्हाण, स्वप्निल बोरसे, अॅड. सतीश मुसळे, अॅड. संदीप खैरनार, दिलीप पवार, जयेश फुलपगारे, शुभम फुलपगारे तसेच असंख्य कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाबद्दल मनःपूर्वक आभार.
या महाकुंभाचे खरे नायक — रक्तदाते!
या संपूर्ण उपक्रमाचे खरे नायक म्हणजे रक्तदाते.
तुमच्या एका रक्तदानामुळे एखाद्या कुटुंबाचा आधार वाचू शकतो…
एखाद्या आईची माया वाचू शकते…
एखाद्या मुलाचे भविष्य वाचू शकते…
आणि एखाद्या व्यक्तीला जीवनाची नवी संधी मिळू शकते.
१७ रक्तदात्यांपासून सुरू झालेला हा सेवायज्ञ यापुढेही असाच अविरत सुरू ठेवण्याचा संकल्प करूया.
रक्तदान हेच जीवनदान!
स्वातंत्र्य दिनाची यापेक्षा मोठी मानवसेवा कोणती?
लेबल: सामाजिक