१०० टक्के शाळा बंद ठेवून शिक्षकांचा विराट मोर्चा ; प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
जनसंघर्ष न्यूज
महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ९ जुलै रोजी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी शाळा बंद सामूहिक रजा आंदोलनाला धुळे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.जिल्हा परिषद खासगी प्राथमिक व महानगरपालिका शाळांतील शिक्षकांनी शंभर टक्के शाळा बंद ठेवून सामूहिक रजा घेत आंदोलनात सहभाग नोंदविला.यानंतर कर्मचारी कल्याण भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आला.शिक्षक संघटनाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा .अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल , असा इशारा देण्यात आला. निवेदनात टीईटी परीक्षा सी रद्द करणे, १५ मार्च २०२४ चा संचमान्यता शासन निर्णय रद्द अथवा सुधारित करणे. बीएलओची कामे शिक्षकांऐवजी इतर शासकीय कर्मचाऱ्यांकडे सोपिवणे, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करणे तसेच टीईटी संदर्भांत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणे आदी प्रमुख मागण्यांचा समावेश होता.या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक , खासगी प्राथमिक व महानगरपालिका शिक्षक संघटनांनी सहभाग घेतला. क्यूमाईन क्लब येथे धरणे आंदोलनानंतर मोर्चा काढण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश धात्रक, सरचिटणीस चंद्रकांत सत्तेसा, कार्याध्यक्ष रविंद्र पाटील, शिवानंद बैसाणे, बाळासाहेब बोरसे,शरद सूर्यवंशी,विजय खैरनार, संजय पोतदार,भूपेश वाघ, राजेंद्र नांद्रे, संजय शिंदे, विनोद पाटील, प्रवीण भदाणे, रवींद्र बोरसे,बापू पारधी, मुरलीधर शिंदे, नवीनचंद्र भदाणे, राजेंद्र भामरे, मिलिंद वसावे, जगदीश बडगुजर, ज्ञानेश्वर पवार, विजय ढोबळे, शरद पवार, विजयकुमार देसले, कमलाकर बच्छाव, रुपेश जैन, ज्ञानेश्वर कक्कर, गमन पाटील, माझे मिर्झा,गोकुळ सोनार,मनोज निकम ,छोटू राजपूत,संदीप पवार, शामकांत अहिरराव,पंडित पाटील, विश्वनाथ सोमवंशी ,प्रभाकर मेटेकर,सुरेंद्र पिंगळे ,शरद पाटील,ऋषिकेश कापडे,गिरीश बागुल ,संदीप मराठे,संदीप नेरे,अनिल तोरवणे,ईश्वर ठाकरे, तुकाराम बहिरम , गजानन जाधव , दत्तात्रय पाटील,नितीन सासके , अशोक बडगुजर,संतोष जाधव,अविनाश काकुळदे ,भूषण सूर्यवंशी, ज्ञानेश्वर बाविस्कर,विलास पाटील, राकेश केदार,धर्मसिंग पावरा,विशाल परदेशी ,रविंद्र पवार ,भास्कर परदेशी,वंदना सावंत,तृप्ती राजपूतकर,ज्योती वराडे, रेखमा पाटील,रुपाली सोनवणे , ज्योत्स्ना सनेर , छाया परदेशी ,पल्लवी मांडोळे, दीपाली पवार,प्रतिमा वाघ,दीपा मोरे,चेतना परदेशी ,यांच्यासह विविध संघटनाचे पदाधिकारी व शेकडो शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लेबल: शासकीय, शैक्षणिक, समस्या