सोमवार, ३० जून, २०२५

धुळ्यात राजकीय भूकंप माजी आमदार कुणाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेस उध्वस्त होण्याच्या मार्गावर

धुळ्यात राजकीय भूकंप माजी आमदार कुणाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेस उध्वस्त होण्याच्या मार्गावर

 १ जुलै रोजी मुंबई येथे कुणाल बाबा हजारो कार्यकर्त्यांसह भाजपयी होणार 


जनसंघर्ष न्यूज 

धुळे  :- शहरात दिनांक एक जुलै रोजी माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या भाजपात प्रवेशाने शहरात मोठा राजकीय भूकंप होणार असून या भूकंपात काँग्रेस उध्वस्त होणार असल्याचे चित्र तयार झाले आहे. 

           गेल्या अनेक वर्षापासून वडिलोपार्जित धुळे ग्रामीण मध्ये काँग्रेस चा बालेकिल्ला उभा करणारे कालकथित माजी मंत्री रोहिदास दाजी पाटील यांचे चिरंजीव माजी आमदार कुणाल बाबा पाटील हे मोदी लाटेत सुद्धा हार न मानता माझा हात काँग्रेसच्या हातात अशी भूमिका घेत काँग्रेस पक्षाकडून दोन वेळा आमदार म्हणून निवडून काँग्रेसचा बालेकिल्ला सांभाळणारे व्यक्तिमत्व कुणाल बाबा यांचा 2024 च्या विधानसभा निवडणुकीत धक्कादायक पराभव झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या भाजपा प्रवेशाचे चर्चांना उधाण आले होते. कुणाल बाबा यांनी सत्तेच्या परिघात रहावे असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला असता त्या अनुषंगाने कुणाल बाबा यांनी दोन दिवसापूर्वी देवपुरातील त्यांच्या निवासस्थानासमोरील सभागृहात कार्यकर्त्यांची बैठक बोलावली व या बैठकीत कार्यकर्त्यांच्या भावना आमदार कुणाल बाबांनी जाणून घेतल्या होत्या.

        यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देत कुणाल बाबा हाच आमचा पक्ष त्यामुळे बाबा जिथे तिथे आम्ही अशी भूमिका समस्त कार्यकर्त्यांनी घेतली. सर कुणाल बाबांनी भाजपातच प्रवेश घ्यावा अशी आग्रही भूमिका देखील काही कार्यकर्त्यांनी मांडली असता कार्यकर्त्यांच्या म्हणणे ऐकून घेतल्यानंतर कुणाल बाबा यांनी कार्यकर्त्यांचा मान राखत कार्यकर्त्यांना विचार करण्यासाठी वेळ मागून मी अंतर्मनाचा आवाज ऐकूनच निर्णय घेणार असे सांगत कार्यकर्त्यांना भाजप प्रवेशाबाबत संस्पेन्स कायम ठेवला होता.        

         पण आज कुणाल बाबा यांनी भाजपा प्रवेश बाबत तारीख जाहीर केल्यानंतर कुणाल बाबाच्या समर्थनार्थ शेकडो वाहनांनी कार्यकर्त्यांनी मुंबईकडे रवाना झाले आहेत. उद्या देखील अजून शेकडो कार्यकर्ते मुंबईला जाणार असून उद्या देखील असेच परिस्थिती राहणार आहे प्रचंड शक्ती प्रदर्शन करत माजी आमदार कुणाल बाबा हे भाजपा प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाल्याने धुळे जिल्ह्यात काँग्रेस उध्वस्त होऊन, धुळे ग्रामीण मध्ये भाजपाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार हे निश्चित झाले आहे. 

           धुळे ग्रामीण मध्ये पाणीदार आमदार म्हणून माजी आमदार कुणाल बाबा ची ताकद मोठ्या प्रमाणात असून कुणाल बाबा यांची धुळे शहर जिल्हा व तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्ती स्थळे आहेत या शक्ती स्थळांमुळे भाजपाला जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका निवडणुकांमध्ये नक्कीच लाभ पहायला मिळेल.

लेबल: , ,

गावठी पिस्तूल तस्करी करणारा धुळे तालुका पोलिसांच्या ताब्यात

 

गावठी पिस्तूल तस्करी करणारा धुळे तालुका पोलिसांच्या ताब्यात 

जनसंघर्ष न्यूज 

       धुळे :- 28 जून रोजी मध्यरात्री धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. धनंजय पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, निळया रंगाचा टी शर्ट व काळया रंगाची ट्रॅक पॅन्ट परिधान केलेला इसम नामे आतिक रफिक शेख हा बेकायदेशिररित्या विना परवाना देशी बनावटीची एक पिस्तूल बाळगुन आर्वी गावाकडून मालेगांवकडे जाणार असल्याची माहिती मिळाली त्यावरुन पोलीस निरीक्षक श्री. धनंजय पाटील यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारावर आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षांत घेवून मा.पोलीस अधीक्षक, धुळे श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे, उप-विभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय बंबाळे यांना घटनेची माहिती दिली व त्यांच्या मार्गदर्शनपर सुचनेप्रमाणे अधिनस्त असलेले रात्रगस्तीचे पोलीस उप-निरीक्षक, कृष्णा पाटील आणि आर्वी दुरक्षेत्र येथे कर्तव्यार्थ असलेले पोहवा-चेतन कंखरे, पोहवा-सुमित ठाकुर, पोकॉ सुरेन्द्र खांडेकर, पोकॉ-कुणाल शिंगाणे, पोकों-रविंद्र सोनवणे, पोकॉ-महेन्द्रसिंग गिरासे, पोकों-कांतीलाल शिरसाठ, अशांचे स्वतंत्र पथक तयार करुन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-03 वर आर्वी गावाचे पुढे मालेगांवकडे जाणा-या रोडवर पुलाचे पुढे भारत पेट्रोलपंप जवळ नाकाबंदी करीत असतांनाच एक अनोळखी इसम रस्त्याच्या कडेकडेने जात असतांना दिसला म्हणून त्यांस पोलीस पथकाने आडवले असता तो पळून जाण्याच्या तयारीत असतांनाच पोलीस पथकाने त्यास 23.20 वाजेच्या सुमारास जागीच पकडून त्याला त्याचे नांव गाव विचारता त्याने त्याचे नांव आतिक रफिक शेख वय-27 रा.इंदीरा नगर, नवगजी पार्क, वैजापुर जि.संभाजीनगर असे कळविले त्यावरुन बातमीची खात्री झाल्याने त्याच्या कब्जातील बॅगेची झडती घेतली असता त्यात त्याचे कब्जात 35000/-रुपये किंमतीची एक गावठी बनावटीची पिस्तोल आणि 2000/-रुपये किंमतीचे दोन काडतूस असे एकुण 37000/-रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन या प्रकरणी पोकॉ-1754 रविंद्र भिमराव सोनवणे यांच्या तक्रारीवरुन धुळे तालुका पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक-405/2025 शस्त्र अधिनियम वर्ष-1959 चे 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन नमुद गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलीस उप-निरीक्षक छाया पाटील धुळे तालुका पोलीस ठाणे हे करीत आहेत.

लेबल: ,

रविवार, २९ जून, २०२५

धुळे शहरातील शिक्षण व्यवस्थेची दुर्दशा :- याला जबाबदार कोण ? महापालिकेच्या एकूण 42 शाळांपैकी फक्त 18 शाळा सुरू

 

धुळे शहरातील शिक्षण व्यवस्थेची दुर्दशा : याला जबाबदार कोण ?

महापालिकेच्या एकूण 42 शाळांपैकी फक्त 18 शाळा सुरू 

सुरू असलेल्या 18 पैकी फक्त 2 मराठी शाळा उर्वरित 16 उर्दू माध्यमांच्या शाळा

 मराठी भाषेसाठी जसे लढत आहोत तसेच मराठी शाळेसाठी लढण्याची गरज

आयुक्त मॅडम पाच कोटी रुपये निधी गेला कुठे :- ललित माळी यांचा सवाल

जनसंघर्ष न्यूज 

        धुळे :- शहरात दिवसेंदिवस शिक्षण व्यवस्थेची अत्यंत दूर्दशा होत असून याला जबाबदार कोण ? असे प्रश्न आता सामान्य जनता करू लागले आहे. धुळे शहर हे एकेकाळी उत्तर महाराष्ट्राची शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखलं जातं होते. पुण्यानंतर दुसरं नाव धुळ्याचं घेतलं जायचं. पण आज धुळे शहरातील शिक्षण व्यवस्था अक्षरशः रसातळाला गेली आहे.

          महानगरपालिकेच्या शाळा बंद पडत आहेत, उरलेल्या शाळांची अवस्था बिकट आहे, अनेक शाळांच्या जागांवर व्यापारी संकुलं उभी राहत आहेत… आणि महानगरपालिका डोळेझाक करत आहे! 

धुळे शहरातील धक्कादायक वास्तव…

✔️ महानगरपालिकेच्या एकूण ४२ शाळा, त्यापैकी फक्त १८ शाळा सुरू, बाकी बंद किंवा व्यापारी संकुलात रूपांतर!

✔️ सुरू असलेल्या १८ पैकी फक्त २ मराठी शाळा, तब्बल १६ उर्दू शाळा सुरू!

✔️ महापालिकेच्या मोक्याच्या जागांवर असलेल्या अनेक शाळांच्या जागा व्यापारी हितसंबंधासाठी वापरण्यात आल्या!

✔️ उरलेल्या शाळांमध्ये पाणी नाही, स्वच्छतागृहे नाहीत, योग्य बेंच नाहीत… विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची मोठी फरपट!

✔️ खाजगी शाळांमध्ये लाखो रुपयांची फी… सर्वसामान्य पालकांची आर्थिक कोंडी!


निकालाचा धक्का – धुळे महानगरपालिकेच्या शाळांचा दहावीचा निकाल…

धुळे शहरातील महापालिका शाळांचा दहावीचा निकाल अत्यंत लाजीरवाणा आहे:

▪️ एका शाळेत फक्त २६ विद्यार्थी दहावीसाठी बसले, त्यापैकी:

➡️ १४ विद्यार्थी नापास,

➡️ १२ विद्यार्थी काठावर पास,

▪️ शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता, विद्यार्थी संख्या नगण्य…

▪️ वर्गात फक्त २ बेंच… विद्यार्थ्यांना बसायची व्यवस्था नाही…

हे शिक्षणाचा दर्जा आहे की व्यवस्थेचा अपमान?

शाळांमध्ये केवळ खिचडी खायला जाणाऱ्या मुलांना पुढचं भविष्य काय मिळणार? धुळे शहर घडणार कसं?

५ कोटी रुपये मंजूर… पण काम शून्य!

महापालिकेच्या आयुक्त मॅडम यांनी चार महिन्यांपूर्वी ५ कोटी रुपयांचा निधी शाळा दुरुस्ती व रंगरंगोटी साठी मंजूर केला होता,

पण आजतागायत त्या पैशाचा उपयोग कुठे झाला, याचा पत्ता नाही!

शाळांची अवस्था पूर्वीपेक्षा वाईट… पालक आणि विद्यार्थ्यांचे हाल मात्र वाढले!


बीओटी तत्त्व लागू करा – शाळा वाचवा, शिक्षण वाचवा!


महापालिकेला शाळा चालवता येत नसतील, तर त्या शाळा बीओटी (Build-Operate-Transfer) तत्त्वावर सामाजिक संस्था किंवा शिक्षण क्षेत्रातील सक्षम व्यक्तींना दिल्या पाहिजेत.

▪️ परंतु त्या शाळांमध्ये गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश आणि शिक्षणावर कमी शुल्काचे बंधन असावे.

▪️ महापालिकेच्या जागांचा वापर केवळ शिक्षणासाठी व्हावा, व्यवसायासाठी नव्हे.

▪️ ज्या शाळांच्या जागा व्यापारी संकुलं झाल्या आहेत, त्यांची चौकशी करून त्या जागा परत मिळवाव्यात.



खाजगी शाळांमधील लुट थांबवा!

खाजगी शाळा म्हणजे आज फक्त पैसा वसुलीचं केंद्र बनल्या आहेत. लाखो रुपयांची फी… सर्वसामान्य नागरिकांची गळचेपी!

महापालिका आणि शासनाने या मनमानीवर तातडीने कारवाई करावी, ही आमची ठाम मागणी आहे.

टीकेच्या पलीकडे कृती हवी!

▪️ मुंबईत मराठी शाळा बंद झाल्याच्या नावाने टीका करणारे नेते धुळ्यातल्या शिक्षण व्यवस्थेच्या अधःपतनाकडे कधी पाहणार?

▪️ मराठी अस्मिता, भाषाभिमान या घोषणा निवडणुकीपुरत्याच हवेत का?

▪️ धुळे शहराचा शिक्षणाचा दर्जा आणि मराठी शाळांचा सन्मान वाचवण्यासाठी ठोस पावलं उचलली जातील का?

▪️ शाळांच्या जागांचा गैरवापर थांबवून त्या जागांवर पुन्हा शिक्षण फुलवणार का?



ललित माळी यांच्या प्रमुख मागण्या –

महापालिका शाळांचे तातडीने डांबरीकरण, रंगरंगोटी, सुविधा सुधारणा

✅ बंद पडलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी ठोस पावलं

✅ व्यापारी संकुल झालेल्या शाळांच्या जागा शिक्षणासाठी परत मिळवणे

✅ शाळा बीओटी तत्त्वावर सामाजिक संस्थांना देऊन शिक्षण सुरू ठेवणे

✅ खाजगी शाळांच्या मनमानीवर लगाम

✅ मराठी शाळांसाठी विशेष योजना

✅ शिक्षणाच्या नावाखाली होणारी लूट थांबवणे


          शाळा म्हणजे फक्त इमारती नाहीत त्या शहराच्या पुढच्या पिढीचं भविष्य घडवतात!

महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे धुळेकरांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेतला जाणार नाही.

शाळा वाचवा, शिक्षण वाचवा… धुळ्याचा भविष्य वाचवा!


धुळेकरांचा आवाज बुलंद करा… शिक्षणासाठी लढा सुरू ठेवा!

लेबल: , , ,

माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांचा अपघात नसून घातपातच

 

माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांचा अपघात नसून घातपातच 

संशयित आरोपींना पोलिसांनी केली अटक

जनसंघर्ष न्यूज 

एरंडोल :- येथील माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे पदाधिकारी दशरथ महाजन यांचा 12 जून रोजी  पोल्ट्री फार्मच्या बांधकामाच्या ठिकाणी जात असताना भीषण  अपघात झाला होता या भीषण अपघातात दशरथ महाजन हे गंभीर जखमी होऊन त्यांना दोन्ही बाजूच्या बरगड्या व दोघं पायांना मोठ्या प्रमाणात फ्रॅक्चर झालेले होते त्यांची प्रकृती तेव्हा चिंताजनक होती पण दशरथ महाजन हे सामाजिक व राजकारणात सक्रिय असल्यामुळे त्यांच्यावर घातपात झाल्याचा संशय त्यांच्या परिवारांनी व्यक्त करत एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

             या अनुषंगाने  पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. स्थानिक गुन्हे शाखेने तपासाचे चक्र फिरवत झालेल्या घटनेच्या ठिकाणी पंचनामा करून आजूबाजूच्या पेट्रोल पंपावरील तब्बल आठ तासाचे सीसीटीव्ही फुटेज वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रवीण मांडवे व राहुल कोळी यांनी तपासून त्यातील आरोपींची ओळख करून त्यांना पकडण्यासाठी पथके रवाना केले असता आरोपींचा शोध घेऊन जेरबंद करण्यात आले आहे. आरोपींना पोलिसांनी विचारले असता मुख्य आरोपी उमेश सुतार उर्फ बदक यांनी आपले साथीदार शुभम कैलास महाजन , पवन कैलास महाजन सह पूर्व वैमनस्यातून दशरथ महाजन यांना जीवे ठार मारण्यासाठी हा हल्ला केला असल्याची कबुली दिली आहे.

लेबल:

हिंदी भाषा सक्ती बाबतचे परिपत्रक जाळून शिवसेना उबाठाच्या वतीने होळी करून निदर्शने

 

हिंदी भाषा सक्ती बाबतचे परिपत्रक जाळून शिवसेना उबाठाच्या वतीने होळी करून निदर्शने

संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी शिवशिवसेनेचेदोलन करत हिंदी भाषा सक्तीला विरोध

जनसंघर्ष न्यूज 

धुळे :- महाराष्ट्र राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने नुकताच एक आदेश काढला असून त्यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या शाळांमध्ये मराठी आणि इंग्रजी माध्यमांसोबत हिंदीला तिसरी भाषा म्हणून सक्तीने शिकविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यासंबंधीचे परिपत्रक राज्य शासनाने काढले असून या परिपत्रकास महाराष्ट्रातील तमाम मराठी पालकांसह विद्यार्थी व राजकीय पक्ष यांनी विरोध केला आहे. महाराष्ट्रातील जनतेचा विरोध पाहता राज्य शासनाच्या वतीने या परिपत्रकाचे पुनश्च शुद्धिपत्रक शिक्षण विभागा कडून काढण्यात आले, पूर्वीच्या परिपत्रकामधील अनिवार्य हा शब्द काढून सर्व साधारण हा शब्द वापरून शब्दांचा खेळ या ठिकाणी सुरू केला आहे. राज्य शासनाने हिंदी सक्तीचा निर्णय मागे न घेता अनिवार्य या शब्दाचा वापर केल्यामुळे हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवली जाणार हे आता स्पष्ट आहे. 

भारतीय राज्यघटनेत बहुभाषिकतेला मान्यता असून मातृभाषेत शिक्षण घेण्याचा हक्क सर्व मुलांना आहे ,मात्र केंद्र व भाजपा प्रणीत राज्य सरकारे शैक्षणिक धोरणांच्या नावाखाली हिंदी भाषा सर्वत्र लागू करण्याचे प्रयत्न करत आहे. त्यामुळे सरकारकडून मातृभाषेचा अपमान होत असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असताना मराठी भाषे बाबत महाराष्ट्रातील अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आधीच आडमुठे धोरण आहे या इंग्रजी माध्यमाच्या शाळा मराठी भाषा टाळण्याचा जाणून-बुजून प्रयत्न आधीच करत आलेल्या आहेत. 

हा विषय फक्त मराठी भाषेचा विषय नसून महाराष्ट्राची संस्कृती ओळख आणि राज्य भिमानाचा मुद्दा आहे. शिक्षणाच्या नावाखाली मातृभाषेची गळचेपी, महाराष्ट्रातील जनता कदापीही सहन करणार नाही ,गुजरात मध्ये हिंदी सक्तीची नाही मग तिची सक्ती महाराष्ट्रातच का?

महाराष्ट्र राज्य शासनाने आधी मराठी शाळा वाचवण्याचे धोरण अंमलात आणले पाहिजे. 

मराठी भाषा ही महाराष्ट्रीय प्राकृत भाषेची आधुनिक रूप असून ही भाषा संस्कृत मधून विकसित झालेली आहे ,दहाव्या शतकात श्रावण बेळगोळ येथील शिलालेखांमध्ये मराठी भाषेचा  लिखित पुरावा मिळतो. मराठी भाषा मूळ आर्यांची भाषा असून या भाषेला पंधराशे ते 2000  वर्ष जुना इतिहास आहे. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहन राजवंशात गाथा सप्तशती हा मराठी ग्रंथ लिहिला गेला.सन 1110 मध्ये कभी मुकुंद राजांनी 

रचलेला विवेक सिंधू हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ असून मराठी साहित्याचा आरंभ संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाने सोळाव्या शतकात झाला आहे.

 सन 1965 मध्ये मराठी भाषेला राज्य भाषेचा दर्जा मिळाला व त्याची अंमलबजावणी 1966 पासून महाराष्ट्रात झाली. सन 2024 मध्ये भारतातील इतर भाषांप्रमाणे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मराठी ही बोलीभाषा सध्या वीस प्रकारात महाराष्ट्रात बोलली जाते, हे सर्व असताना केंद्र शासनाचे धोरण म्हणून हिंदीला स्वीकारणे हा महाराष्ट्रातील तमाम मराठी भाषिकांवर अन्याय असून उलट महाराष्ट्र राज्याने इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठीची दुसरी भाषा म्हणून सक्ती करण्याच्या निर्णयाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये राज्य शासनाच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली, धुळे शहरात जुन्या महानगरपालिका चौकात या परिपत्रकांची होळी करण्यात आली,  यावेळी राज्य शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करून, महाराष्ट्रात  कुठल्याही भाषेची बळजबरी चालणार नाही असे ठणकावत उबाठा वतीने शिवसेना उपनेते शुभांगी पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे,  युवा सेनेचे पंकज गोरे , सुनील पाटील संदीप सूर्यवंशी, महिला आघाडीचा संगिता जोशी,  ज्योती चौधरी, राजु ढवळे, शेखर वाघ, शिवाजी शिरसाळे,, अण्णा फुलपगारे , सुभाष मराठे, मुन्ना पठाण, कपील लिंगायत, महादु गवळी, डॉ.अनिल पाटील,  तालुका संघटक भैय्या पाटील सुकवद ,विवेक सूर्यवंशी, विश्वनाथ सोनवणे, डॉ. सोमनाथ चौधरी, गजेंद्र पाटील ,शांताराम माळी विजय चौधरी, ईश्वर मराठे विनोद पाटील, सुभाष मराठे,मुन्ना पठाण, पंकज भारस्कर, दिनेश पाटील, संदीप चौधरी, संजू मामा पाटील, पीनु सुर्यवंशी,   अजय चौधरी, पिंटू ठाकूर, सलीम शेख,  शुभम मतकर , विष्णू जावडेकर,सागर निकम, सुरज भावसार,  सागर साळवे,  बंटी अहिरे, भैय्या बच्छाव,  योगेश पाटील ,अनिल शिरसाट ,अमोल ठाकूर , अनिल चौधरी, इस्तियाक आंसरी, युवराज मराठे, केतन भामरे, वैभव पाटील, गुलाब धोबी, प्रदीप भोला भाऊ पाटील तेजस सपकाळ , प्रवीण राणा आदी उपस्थित होते. 

       

लेबल: ,

हिंदी भाषा सक्तीविरोधात ; सत्यशोधक विद्यार्थी संघटना मैदानात


हिंदी भाषा सक्तीविरोधात ; सत्यशोधक विद्यार्थी संघटना मैदानात

 सत्यशोधक विद्यार्थी संघटनेची जिल्हास्तरीय बैठक संपन्न 

जनसंघर्ष न्यूज 

         धुळे :-  शहरातील देवपुरातील चंदन नगर येथील बुद्ध विहारात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेची जिल्हास्तरीय बैठक रविवार दिनांक 29 जून रोजी पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य अध्यक्ष सिद्धांत बागुल हे होते. बैठकीत उपस्थित सीनियर कार्यकर्ते सचिन बागुल, रोहिणी जगदेव, शरद वेंदे अमोल शिरसाट यांनी मनोगत व्यक्त करताना संघटनेच्या आजवरच्या प्रवासाचा लेखाजोखा मांडत तत्कालीन संघटनात्मक आठवणींना उजाळा दिला. राज्य अध्यक्ष सिद्धांत बागुल, सचिव तुषार सूर्यवंशी, माजी सचिव राकेश अहिरे, मनोज नगराळे, हर्ष मोरे यांनी संघटनेच्या ध्येय आणि धोरणात्मक बाबींवर विस्तृत मांडणी केली. बैठकीत संघटनात्मक वाढीविषयी चर्चा करण्यात आली. 

         यावेळी बैठकीस उपस्थित असलेले संघटनेचे नवीन सदस्य केतन निकम धनंजय जगताप सिद्धार्थ बैसाणे अनिल वाघ नीलिमा भामरे इत्यादींची देखील मते जाणून घेण्यात आली. या बैठकीत राज्य सरकार लागू करत असलेल्या हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाचा निषेध करीत त्याबाबतचे पत्रक प्रकाशित करण्यात आले. तसेच येत्या 20 जुलै रोजी धुळे जिल्हास्तरीय कार्यकर्ता शिबिर आयोजनाविषयी चर्चा करून निर्णय घेण्यात आले. बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांनी डफाच्या साथीने विविध जागरगीते सादर केली. हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात सोमवार दिनांक 30 जून रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याचे बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले.

लेबल: , ,

आदिवासी विकास विभागाचा गजब कारभार ; रजिस्टर वर विद्यार्थी भरमसाठ शाळेत मात्र शुकशुकाट

 

 

आदिवासी विकास विभागाचा गजब कारभार ; रजिस्टर वर विद्यार्थी भरमसाठ शाळेत मात्र शुकशुकाट

आदिवासी बचाव अभियानचे गणेश गावित यांनी केला पर्दाफाश 

जन संघर्ष न्यूज

        धुळे :- दिनांक 16/06/2025 रोजी संपुर्ण महाराष्ट्रात आदिवासी विकास विभागामार्फत चालविल्या जाणा-या शासकीय आश्रम शाळा व अनुदानित आश्रम शाळा मध्ये गाजावाजा करत प्रवेश महोत्सव साजरी करण्यात आला. एक दिवसाच्या कार्यक्रमासाठी शाळा पातळीवर आटापिटा केल्या निवासी आश्रम शाळेत अजुन ही विद्यार्थी आले नाही. काही अनुदानित आश्रम शाळा बंद अवस्थेत आहेत. महिनाभर ही विद्यार्थी आले नाही तरी अनुदान कमी होणार नाही. शासकीय आश्रम शाळेत काही वर्गात शिक्षकच नाही तर विद्यार्थी शिक्षणाचे धडे कधी शिकतील. शासन म्हणत आम्हांला गुणवंत शिक्षक भरायचे आहेत तो पर्यंत आमच्या मुलांनी वर्गात बसुन दिवस मोजायचे का ❓आश्रम शाळेत कोण किती कसा काम करतो हे सगळ्यांना माहीत आहे. 100℅ निकाल लागल्यावर ही  मंत्री महोदय म्हणतात. आमच्या मुलांची गुणवत्ता दिसुन येत नाही. मग आदिवासी मुलांच्या शिक्षणावर विशेष लक्ष देणारे आदिवासी आश्रम शाळा व नामांकित शाळा जिथे आदिवासी विद्यार्थी शिकतात तिथे शाळा प्रवेश उत्सव साजरे करणारे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य तत्पर आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांनी नगर जिल्ह्यातील नामांकित शाळा संत ज्ञानेश्वर इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा  दहाव्या वर्गाचा 2025 चा निकाल राजूरच्या प्रकल्प अधिकाऱ्याने माननीय मंत्री महोदयांना कळवला नाही, असे वाटते..!  

         या नेवासा तालुक्यातील भानस हिवरे या गावातल्या या नामांकित शाळेत दहाव्या वर्गाच्या परीक्षेत प्रविष्ट झालेल्या व तेथेच शिक्षण घेतलेल्या 117 आदिवासी विद्यार्थ्यांपैकी 114 विद्यार्थी 2025 च्या परीक्षेत  नापास झाल्याची बातमी नापास झाल्याची माहिती मिळाली. 

         यावर आदिवासी विकास मंत्री महोदय  काही कार्यवाही करणार  का ? शासकीय आश्रम शाळेची गुणवत्ता ढासाळलेली  दिसते मग नामांकित शाळेची गुणवत्ता का दिसत नाही. असे अनेक समस्या असतांना आदिवासी विद्यार्थ्यांचा शोषण  करणारे मंत्री पासुन अधिकारी ते कर्मचारी करत आहेत. प्रवेश महोत्सव खुप उत्सवात साजरी केला. आज शाळा सुरू होऊन 10/11 दिवस झाले.काही वर्गात शिक्षक विना विद्यार्थ्यांना वर्गात बसावे लागत आहे. एक ही लोक प्रतिनिधी अथवा पालक जाब विचारायला तयार नाहीत. ही खुप मोठी शोकांतिका आहे. मंत्री महोदयांना विद्यार्थ्यांची काळजी असती तर पहिल्या दिवसापासून शिक्षक रोजंदारी का होईना हजर केले असते. होणा-या विद्यार्थ्यांच्या नुकसानास जबाबदार कोण आदिवासी विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळा-या आदिवासी विकास विभागाचा व मंत्र्यांच्या निष्काळजीपणामुळे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे अंतर्गत चालविल्या जाणा-या शासकीय आश्रम शाळा व अनुदानित आश्रम शाळेत 16/17 दिवस शाळा सुरु  झाले तरी विद्यार्थी शाळेत निवासी राहायला आले नाही.प्रकल्प कार्यालय व आदिवासी विकास विभागातील अधिकारी शांत बसुन आदिवासी विद्यार्थ्यांचे नुकसान करत आहेत. 


लेबल: , ,

शनिवार, २८ जून, २०२५

गुलमोहर रेस्ट हाऊस रोकड प्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करा ; धुळे न्यायालयाचे पोलिसांना आदेश मा. आमदार अनिल गोटे यांच्या प्रयत्नांना यश

गुलमोहर रेस्ट हाऊस रोकड प्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करा ; धुळे न्यायालयाचे पोलिसांना आदेश 

     मा. आमदार अनिल गोटे यांच्या प्रयत्नांना यश

जनसंघर्ष न्यूज 

      धुळे :- दिनांक 21 मे रोजी महाराष्ट्र हदरवणारी  घटना धुळे शहरात मध्यरात्री घडली होती. शहरातील शासकीय गुलमोहर विश्रामगृह येथे खोली क्रमांक 102 मध्ये 1 कोटी 84 लाख 84 हजार 200 रुपयांची बेहिशोबी रोकड सापडली होती. ही घटना माजी आमदार अनिल गोटे यांनी उघडकीस आणून सदर रक्कम आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली विधीमंडळाच्या अंदाज समितीला लाच म्हणून देण्याकरिता शासकीय अधिकाऱ्यांकडून एकूण 15 कोटी रुपये गोळा करण्यासाठी त्यांचे कथित स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांना पाठवण्यात आलेले होते.

          यासाठी अर्जुन खोतकर यांच्या सांगण्यावरून कथित स्वीय सहाय्यक, किशोर काशिनाथ पाटील हे विनांक १५ मे पासूनच धुळे येथील  गुलमोहर शासकीय विश्रामगृहात मुक्कामी येऊन बसले होते, ते पैसे गोळा करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी शेलार यांच्या कार्यालयात बसून, जिल्हाभरातील सर्व अधिकाऱ्यांना फोन लावून, धमकावून, तुमच्यावर कारवाई करू, अन्यथा तुम्ही एवढे, एवढे पैसे धुळ्यात किशोर पाटील यांच्याकडे जमा करा, अशा उघड उघड धमक्या देऊन त्यांच्या कडून खंडणी गोळा केली जात होती. 

        सदर माहिती अनिल अण्णा गोटे यांना दिनांक २० मे रोजी, महसूल विभागाच्या एका शिपायाने फोन करून सांगितले की, आर.डी.सी. साहेबांच्या कार्यालयात प्रचंड पैसे गोळा केले जात आहे. अर्जुन खोतकर यांचे पी.ए. १५ तारखेपासून येथे ठाण मांडून बसले आहेत. सदर पैशाचे वाटप उद्या दिनांक २१ मे रोजी केले जाणार आहे. श्री. अनिल अण्णा गोटे यांनी आपल्या एका कार्यकर्त्याला, दिनांक २१ रोजी सकाळी आठ वाजेपासून रेस्टहाऊसवर बसायला सांगितले. सदर कार्यकर्त्याने दुपारी चार बाजता फोन करून, येथे पाच साडेपाच कोटी रुपये गोळा झाले असे सांगितले. त्यानंतर अनिल अण्णा गोटे यांनी पत्रकारांना फोन करून बोलावून घेतले व सगळ्या पत्रकारांना घेऊन रेस्ट हाऊस च्या १०२ नंबरच्या कक्षाजवळ, जेथे खंडणी गोळा केली होती, त्या ठिकाणी गेले असता, सदर रेस्ट हाऊसला खाजगी कुलूप लावून, किशोर पाटील फरार झाले होते. श्री. अनिल अण्णा गोटे यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना; या ठिकाणी पाच ते साडेपाच कोटी रुपये गोळा करण्यात आले असे सांगितल्यावर, पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी दहा मिनिटात येतो सांगितले. परंतु सकाळी पाच वाजेपर्यंत आलेच नाही. अखेर रात्री ११ वाजून २० मिनिटांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. काळे आल्यावर, त्यांनी १ कोटी, ८४ लाख, ८४ हजार, २०० रुपये ताब्यात घेतले, मात्र तत्पूर्वी बंद कुलुपाचा पंचनामा करणे, हाताचे ठसे घेणे, वगैरे काही पूर्तता केली नाही. याचा अर्थ स्वच्छ आहे की, पोलीस आधीच आरोपींना फितूर झाले होते, अखेर पोलिसांनी तब्बल १२ दिवसानंतर, बॉम्बे पोलीस ॲक्ट च्या कलम १८४ खाली अदखलपात्र गुन्हा दाखल करून आपल्या मदतीची प्रदक्षिणा पूर्ण केली. माध्यमांमध्ये याबद्दल बरीच आरडा ओरड झाली. माध्यमांनी सदर प्रकरण लावूनपण धरले, परंतु निगरगट्ट सरकारने अजिबात वाव दिली नाही. अखेर अनिल अण्णा गोटे व त्यांचे शिवसेनेचे सहकारी नरेंद्र परदेशी, तत्कालीन विरोधी पक्षनेते, महानगरपालिका व उपजिल्हाप्रमुख शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांनी माननीय मुख्य न्यायदंडाधिकारी साी. श्री चौगुले साहेब यांच्या न्यायालयात दाद मागितली असता, माननीय न्यायालयाने आज दि. २७ रोजी सदर प्रकरणी, भारतीय नागरीक सुरक्षा संहितेच्या कलम १७४, १७३, २१० ब ब १७५ (३) कलमाखाली तातडीने गुन्हा दाखल करून, एफ. आय. आर. नोंदवण्याचे सुस्पष्ट आदेश दिलेले आहेत.

लेबल: , ,

शुक्रवार, २७ जून, २०२५

छत्रपती शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त गरताड गावात रक्तदान शिबिर संपन्न

छत्रपती शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त गरताड गावात रक्तदान शिबिर संपन्न 

जन संघर्ष न्यूज

       धुळे :- तालुक्यातील गरताड गावात दिनांक 26 जून रोजी आरक्षणाचे जनक बहुजनांचे कैवारी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंतीचे निमित्त सामाजिक कार्यकर्ते शरद अहिरे , आनंद देवरे यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील नागरिकांनी उस्फूर्तपणे मोठ्या संख्येने रक्तदान करून छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन केले. 

            यावेळी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त गरताड गावात अभिवादन व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी समाज रक्षक वाडी भोकर चे नगरसेवक रंगनाथ दादा ठाकरे व नर्व्हाळ गावाचे सरपंच हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज व क्रांतिवीर तंट्याबिल त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून गावकऱ्यांनी देखील अभिवादन केले व रक्तदान शिबिराचे उद्घाटन करून रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात रक्तदान करून महामानवास अभिवादन कसे करावे याचा आदर्श गरताड येथील गावकऱ्यांनी दाखवून दिला. 

        या कार्यक्रमात गरताड गावातील उपसरपंच दावल अहिरे, संस्थापक अध्यक्ष क्रांतिवीर तंट्या बिल बहुद्देशीय संस्था चे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी लक्ष्मण पवार यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले व कार्यक्रमाचे आयोजक आनंद देवरे यांनी देखील सगळ्या उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

लेबल: ,

सामाजिक न्याय विभागाचा निधी अन्य विभागाकडे वर्ग करण्याचे धंदे बंद करा ; अन्यथा परिणाम भोगावे लागतील आर पी आय आंबेडकर गटाचा इशारा


 सामाजिक न्याय विभागाचा निधी अन्य विभागाकडे वर्ग करण्याचे धंदे बंद करा ; अन्यथा परिणाम भोगावे लागतील

आर पी आय आंबेडकर गटाचा इशारा 

जनसंघर्ष न्यूज 

मुंबई :- राज्यात महायुतीची सत्ता आल्यापासून सरकारने अनेक योजना सुरू केल्या असून त्या योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकांच्या विकासासाठी असलेला हक्क सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा निधीचा अनधिकृतपणे वर्ग केला जात असुन मागासवर्गीय समाजावर नाही केला जात आहे. महायुती सरकारच्या या मनमानी कारभारामुळे अनुसूचित जाती , जमाती व इतर मागासवर्गीय ( ओबीसी ) समाजातही मोठ्या प्रमाणात असंतोषाची भावना निर्माण झाली असून बहुजन समाजातील जनतेत या मनमानी कारभार कदापि सहन करणार नाही.       

       राज्य सरकारच्या सदर निधी "पळवापळवी" धोरणांमुळे अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय (ओबीसी)समाजावरही अन्याय होत असून करोडो विकास वंचित बहुजन समाजातील जनता याविरोधात असून त्याची गंभीर नोंद घ्यावी व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा इतर खात्यांकडे वर्ग  करोडो रुपयांचा निधी तातडीने पुन्हा मूळ विभागास अदा करुन तत्परतेने कार्यवाही करावी व करोडो मागासवर्गीय जनतेचा  विकासमार्ग निर्विघ्न ठेवावा. 

       मागासवर्गीय जनतेच्या निधीवर हा एकप्रकारे सरकारी दरोडाच आहे!अशी आमची भूमिका असून  यासंदर्भात सरकारने तातडीने निधी परत पाठवणीचा निर्णय न केल्यास आपल्या सरकारच्या विरोधात महाराष्ट्र राज्यातील तमाम मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय जनतेच्या न्याय हक्कासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पक्षाच्या वतीने  तीव्र आंदोलन करण्यात येईल. असे मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष  मा. बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी मुंबई यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.

           यावेळी  मा. कैलास जोगदंड - संघटक महाराष्ट्र प्रदेश, मा.अशोक ससाने  सचिव महाराष्ट्र प्रदेश, मा. तानाजी मिसळे  रिपाई नेते, मा. मोहन मल्हार  महासचिव मुंबई प्रदेश, मा. नितीन जाधव  - संघटक मुंबई, मा. दिलीप कदम  उपाध्यक्ष मुंबई, मा. चंद्रशेखर सपकाळे  सचिव मुंबई, माननीय प्रदीप सोनवणे  अध्यक्ष दक्षिण मध्य मुंबई, मा. राजेश कटारनवरे  अध्यक्ष उत्तर मध्य मुंबई, मा. संजय कांबळे अध्यक्ष अनुशक्ती नगर विधानसभा, मा.आकाश घोडके  अध्यक्ष चेंबूर मा. दिनेश जाधव सह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

लेबल: ,

गुरुवार, २६ जून, २०२५

मुख्यमंत्री साहेब वयोवृद्ध बहिणीं लाडक्या नाहीत का ?




मुख्यमंत्री साहेब वयोवृद्ध बहिणीं लाडक्या नाहीत का ? 

विविध योजनांचा लाभ मिळत नसल्याने वयोवृद्ध महिलांवर उपासमारीची वेळ

जनसंघर्ष न्यूज 

      राज्य सरकार एकीकडे लाडकी बहिण योजना राबवत असून योजनेचे पैसे वेळोवेळी महिलांच्या बँक खात्यात टाकत असताना दुसरीकडे मात्र राज्य सरकारकडून यापूर्वीपासूनच सुरू असलेल्या श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना अश्या अनेक योजनांकडे मात्र राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप धुळे तालुक्यातील बाळापुर गावातील वयोवृद्ध महिला पुरुषांनी केला आहे. 

           धुळे तालुक्यातील बाळापुर उपनगर येथील शेकडो वयोवृध्द महिला व पुरुषांचे संजय निराधार योजना व श्रावण बाळ योजनेचे पैसे नऊ ते दहा महिन्यापासून मिळत नसल्याने त्यांना उतरत्या वयात तहसील कार्यालय व बँकेत चपला जिजाऊ लागत आहेत. तेथे जाऊन देखील तहसील कार्यालयातील व बँकेतील कर्मचारी त्यांना योग्य मार्गदर्शन न करता हाकलावून लावत असतात.

          विविध योजनातील लाभार्थ्यांना लाभ मिळत नसल्यामुळे तालुक्यातील बाळापूर उपनगर येथील समस्त लाभार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकार सुरू असलेल्या योजनांपैकी आता सध्या फक्त लाडके बहिण योजनेकडेच लक्ष देत असून आमच्यासारख्या गरजू वयोवृद्ध, विधवा बहिणींकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप तारीख नागरिकांनी केला आहे. ज्याप्रमाणे लाडके बहिण योजनेचे पैसे वेळेवर मिळतात, त्याचप्रमाणे इतर योजनांचा लाभ लाभार्थ्यांना वेळेवर मिळून गेल्या अनेक महिन्यापासून आमच्या इतर योजनांचा मानधन आम्हाला मिळावे अशी मागणी पीडित लाभार्थ्यांनी केली आहे. 

लेबल: ,

बुधवार, २५ जून, २०२५

आमदार अनुप भैय्यांनी २० हजार रहिवाशांना दिला हक्काचा `सात-बारा’ :- अमोल मासुळे

 

आमदार अनुप भैय्यांनी २० हजार रहिवाशांना दिला हक्काचा `सात-बारा’ :- अमोल मासुळे 

 मिल परिसरातील नागरिकांतर्फे आमदारांचा नागरी सत्कार

जनसंघर्ष न्यूज 

           धुळे, ता. २५ :- शहरातील मिल परिसरातील जनतेला हक्काचा सातबारा मिळावा यासाठी मी गेल्या सहा वर्षांपासून प्रयत्न करत होतो. माझा पाठपुरावा निश्चित होता. परंतु विषय तडीस नेण्यासाठी मोठ्या पाठबळाची गरज होती. ते पाठबळ शहराचे कार्यसम्राट आमदार अनुपभय्यांनी दिले. त्यांच्यामुळेच आज मिल परिसरातील २० हजार रहिवाशांना हक्काचा सातबारा मिळणार आहे, असे म्हणत माजी नगरसेवक तथा भाजपाचे पूर्व मंडलाध्यक्ष अमोल मासुळे यांनी परिसरातील जनतेतर्फे आमदार अनुप अग्रवाल यंचे आभार मानत त्यांना धन्यवाद दिले.

शहरातील मिल परिसरातील गट क्रमांक 529 मधील 5.15 हेक्टर जागेवरील 102 प्लॉटधारकांनी सातबारा व लेआउट मंजुरीसाठी विनंती केली होती. मात्र, या जागेवरील आरक्षणामुळे प्रक्रियेत अडथळे येत होते. याप्रश्नी आमदार अनुप अग्रवाल यांनी सातत्याने हे आरक्षण रद्द करण्याची मागणी करत शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. गेल्या आठवड्यात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे झालेल्या बैठकीत हे आरक्षण रद्द करत प्लॉटधारकांना सातबारा उतारे देण्यास त्यांनी मंजुरी दिली. यामुळे मिल परिसरातील रासकरनगर, गुरुकृपानगर, तुळसाबाई मळा, ईखेनगर, श्रीरामनगर, कोरेनगर, सीताराम माळी चाळ, लीलाबाई चाळ, अयोध्यानगर  (पिंजारी चाळ), धनगरवाडा, राऊळवाडी आदी भागांतील रहिवाशांना त्यांचा हक्काचा सातबारा मिळणार आहे. यानिमित्त मिल परिसरातील रहिवाशांतर्फे अमोल मासुळेंच्या नेतृत्वात आमदार अग्रवाल यांचा आमदार कार्यालयात भव्य नागरी सत्कार झाला. यावेळी शेकडो प्लॉटधारक महिला-पुरुष उपस्थित होते.

मासुळे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा 

आमदार अग्रवाल म्हणाले, की मिल परिसरातील सुमारे 20 हजार रहिवाशांना हक्काचा सातबारा मिळावा यासाठी अमोल मासुळेंनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. महापालिकेत ठराव करण्यापासून ते नाशिक,पुणे मुंबईपर्यंत कागदपत्रांचा प्रवास त्यांनीच घडवून आणला. मी केवळ मंत्रालयातून मंजुरी आणली. मासुळे हे तुमच्या प्रभागातील हक्काचे लोकप्रतिनिधी आहेत. तुमच्या घरांना सातबारा मिळण्याचे पक्के झाल्याने जेवढा आनंद तुम्हाला झाला तितकाच आनंद मलाही झाला आहे. कारण मी मिल परिसरातून लहानाचा मोठा झालो आहे. येथील जनतेच्या सुख-दुःखाची जाणीव आहे. त्यांना हक्काचा सातबारा मिळणे किती आवश्यक आहे, याची मला जाण होती. त्यातूनच हा प्रश्न मार्गी लागला. 

माझी कामाची शैली वेगळी

आमदार अग्रवाल म्हणाले, की यापूर्वी नगावबारी परिसरातील 650, तर गवळीवाड्यातील 300 जणांना हक्काचा सातबारा दिला. आता मिल परिसरातील 2500 घरधारकांना लवकरच सातबारा मिळेल. कुठलेही काम करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज असते. आधीच्या आमदारांनी त्यांच्यापरीने प्रयत्न केले असतील. परंतु माझी काम करण्याची शैली वेगळी असून, चांगले काम करतच राहणार. रावेर एमआयडीसीसाठी 2 हजार एकर जागा लवकरच मिळणार असून, तेथे साडेआठ हजार कोटींचे उद्योग येतील. त्यातून मिल परिसरासह धुळ्यातील बेरोजगारांना काम मिळेल. चितोड रोडवरील 28 नंबर शाळेचा कायापालट होणार आहे. तेथे क्रीडा संकुल, व्यापारी संकुल आणि सुसज्ज शाळा उभारली जाणार आहे. या मागची संकल्पना बंटी मासुळेंचीच आहे. 

योजनांची पुस्तिका घरोघरी पोहोचविणार : आ. अग्रवाल

आजपर्यंत आपण 10 हजार कामगांराना भांडीवाटप केली. सरकार गरिबांसाठी योजना तयार करते. मात्र, त्या जनतेपर्यंत पोहोचत नव्हत्या. यामुळे लवकरच सरकारी योजनांची पुस्तिका घरोघरी पोहोचविणार आहे. एबी फाउंडेशनच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीत अमोल मासुळेंसह भाजपच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहनही आमदार अग्रवाल यांनी केले. यावेळी सुनील पाटील, गणेश गायकवाड, शाहीर गंभीर महाराज बोरसे, वाल्मीक जाधव, भगवान कुंभार यांनी मनोगत व्यक्त करत आमदार अग्रवाल, श्री. मासुळेंचे आभार मानले.

लेबल: ,

मंगळवार, २४ जून, २०२५

दहिवेल मध्यवर्ती कार्यालयात नवीन डाग घर द्या. खासदारांना निवेदन !


दहिवेल मध्यवर्ती कार्यालयात नवीन डाग घर द्या खासदारांना निवेदन!

जनसंघर्ष न्यूज 

दहिवेल :- दहिवेल साक्री जिल्हा धुळे येथे राष्ट्रीयकृत एकच बँक शाखा असल्यामुळे दहिवेल व दहिवेल परिसरातील नागरिकांना शेतकरी बांधवांना व व्यावसायिकांना आर्थिक देवाण-घेवांच्या समस्या तसेच शासन स्तरावरून येत असलेल्या योजनांचा लाभ घेताना बँकेत पासून तास उभे राहावे लागत त्याच्यातच बँकेचे सर्वर डाऊन वर खातेदारांचे वेळोवेळी काम न झाल्यामुळे तसेच वेळोवेळी बँकेत खातेदारांचे पैसे घेणे असून देखील बँकेकडून खातेदारांना पैसे वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे दहिवेलसह परिसरातील नागरिकांनी नंदुरबार लोकसभेचे खासदार यांच्याकडे दहिवेल गावाचे उपसरपंच नंदकिशोर महाले तसेच पंचायत समिती दहिवेल गटातील पंचायत समिती सदस्य संगीता गणेश गावित तसेच सामाजिक कार्यकर्ते गणेश गावित तसेच सातरपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.अनिल पवार व दहिवेल येथील सामाजिक कार्यकर्ते कन्हैयालाल माळी यांनी संयुक्तिक ही बाब नंदुरबार लोकसभेचे लोकप्रिय खासदार अँड श्री गोवाल दादा पाडवी यांच्या निदर्शनास आणून दिली व लेखी निवेदन दिले खासदार साहेबांनी याची तात्काळ दखल घेत धुळे येथील कार्यालयाशी संपर्क साधत दहिवेलला नवीन मध्यवर्ती डाक घर निर्मित करून तिथं आर्थिक नागरिकांचा आर्थिक व्यवहार सुरळीत होण्यासाठी उपलब्धता होईल मोठ्या प्रमाणात दहिवेल येथील डाग घरातील खातेधारक यांना देखील वेळोवेळी साक्रीला जावे लागते ही होणारी दैनंदिन धावपळ लक्षात घेता दहिवेल येथे मध्यवर्ती कार्यालय सुरू करण्याबाबत खासदार साहेबांनी धुळे येथील व्यवस्थापकांना पत्र लिहिलं व पत्र दिल्यावर त्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला त्याबाबत डाग विभागाचे चौधरी यांनी दहिवेल‌ येथील उपसरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांच्याशी संपर्क साधून लवकरच मध्यवर्ती कार्यालयाची निर्मिती होऊन दहिवेल येथील नागरिकांची व दहिवेल परिसरातील नागरिकांची गैरसोय लवकरच दूर होणार आहे.

लेबल:

धुळे शहरातील बोगस मतदान कार्ड घोटाळ्याची चौकशी करा - शिवसेनेचे ललित माळी आरोप

 

धुळे शहरातील बोगस मतदान कार्ड घोटाळ्याची चौकशी करा 

शिवसेना उ बा ठा  चे ललित माळी यांची मागणी 

जनसंघर्ष न्यूज 

धुळे :- प्रतिनिधी -  शहरातील निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. मागील काही महिन्यांत शहरात मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान कार्ड तयार करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे विधानसभा संघटक ललित गंगाधर माळी यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची त्यांनी जोरदार मागणी केली आहे.

शहरालगतच्या गावांतील आधार कार्डांची गैरवापर…

ललित माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे शहरालगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांची आधार कार्डे जमा केली जात आहेत. त्यानंतर, शहरातील लाईट बिलाचा आधार घेत बनावट पत्त्यावर मतदान कार्ड मिळवून दिली जात आहेत. यामुळे अशा व्यक्ती बेकायदेशीरपणे शहरातील मतदार यादीत नोंदवले जात असून, निवडणुकीत अपप्रकार घडण्याचा धोका वाढत आहे.


राजकीय फायद्यासाठी मतदारांचा ताळमेळ बिघडवण्याचा डाव?

शहरातील काही राजकीय मंडळी, त्यांच्या समर्थक, नातेवाईक आणि मित्रपरिवाराला ज्या प्रभागात हवं त्या प्रभागात मतदान कार्ड मिळवून देण्यासाठी दबाव आणत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे प्रभागाचं जनतेचं प्रतिनिधित्व बिघडत आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची खरी लोकशाही धोक्यात येत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातच गडबड?

याप्रकरणी सर्वात गंभीर बाब म्हणजे, जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेमध्ये कार्यरत असलेल्या काही कंत्राटी कर्मचार्‍यांच्या माध्यमातूनच हे अनैतिक कृत्य सुरू असल्याचा आरोप ललित माळी यांनी केला आहे. जर यामागे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा किंवा संगनमत असेल, तर हा प्रकार धुळेकरांच्या भविष्याशी थट्टा करण्यासारखा आहे, असेही माळी यांनी ठणकावून सांगितले.

लोकशाहीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न हाणून पाडा – माळी यांची मागणी

"धुळे शहरात मतदान हे जनतेच्या हक्काचे आहे, त्यात अशा प्रकारे बोगस नागरिकांना घुसवून, मतदार यादीतील प्रामाणिकतेवर गदा आणली जात आहे. जर वेळेत हे थांबवलं नाही तर लोकशाहीची थट्टा होईल. आम्ही याला थांबवण्यासाठी तातडीने उच्चस्तरीय चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता यासाठी आवाज उठवत आहोत," असे ललित माळी यांनी स्पष्ट केले.

ललित माळी यांच्या मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे:

1) मागील वर्षभरात तयार झालेल्या सर्व नव्या मतदान कार्डांची सखोल तपासणी

2) लाईट बिलाच्या आधारावर तयार झालेल्या मतदान कार्डांची बारकाईने छाननी

3) जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचार्‍यांची सखोल चौकशी

4) दोषींना तत्काळ निलंबित करून योग्य ती कायदेशीर कारवाई

5) भविष्यात असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून कडक उपाययोजना आणि सिस्टममध्ये सुधारणा

निवडणूक प्रक्रियेवर जनतेचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि दोषींना पाठीशी घालणाऱ्यांना उघड करून कारवाई करावी, अशी ठाम मागणी ललित माळी यांनी केली आहे.

लेबल: ,

मंगणी ( पसंती) कार्यक्रमातच सर्व चालीरीतींना बाजूला करत मुस्लीम समाजातील आदर्श विवाह






मंगणी ( पसंती) कार्यक्रमातच सर्व चालीरीतींना बाजूला करत मुस्लीम समाजातील आदर्श विवाह

  जनसंघर्ष न्यूज 

        चोपडा :-  येथे दि. २३ जुन २०२५ रोजी  दोंडाईचा शहराचे अरबाज शेख सलीमुद्दीन यांच्या छोटे खानी साखरपुडा ( मंगणी) चा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यात

हजरत अल्हाज हम्माद रज़ा कादरी साहाब बरेली शरीफ, हजरत मुफ्ति सैयद आसिफ ईकबाल साहेब नाशिक, यांच्याशी मोबाईल फोन वरून चर्चा केली असता,  हजरत फारुक चिश्ती साहेब धुळे  हे साखरपुडा (मंगणी) साठी आले अण लग्न (निकाह )लाऊन दिले

ईस्लाम धर्मात लग्न हे कमी खर्चात साध्या पध्दीत केला पाहिजे असे प्रेषित हजरत मुहम्मद सल्लल्लाहो अलैहवस्स्लम यांनी संदेश दिला आहे या महागाई च्या काळात त्या संदेशाची अंमलबजावणी झाली पाहिजे म्हणून धर्मगुरू हजरत मौलाना फारुक चिश्ती साहेबांनी  वधु वर या दोन्ही बाजुच्या प़्रमुखानां बोलवुन सांगितले कि या महागाई च्या काळात प्रेषित हजरत मोहम्मद सल्ललाहो अलैहवस्स्लम यांनी दिलेल्या संदेशाची अंमलबजावणी केली तर मुस्लिम समाजा मध्ये चांगला संदेश जाईल ,

व मुस्लिम समाजातील तरूण लग्न साध्या पध्दीत करतील यात शंका नाही ,या वाढत्या महागाईच्या काळात लग्न संभारभ मध्ये दिवसेदिवस अधिक खर्च होतो त्यामुळे   लोक कर्ज करून विवाह करतात अशा रूढी परंपरांना फाटा देत 

 आज साखरपुड्याच्या ( मंगणी)  कार्यक्रमात  लग्न ( निकाह) झाले तर एक आदर्श विवाह होईल असे प्रस्ताव वधु वर च्या जेष्ठ मंडळी समोर धर्मगुरू हजरत फारुक चिश्ति साहेबांनी दिले 

वधु वर यांच्या जेष्ठ मंडळीनी वर (दुल्हा) अरबाज सलिमोद्दीन शेख व वधु (दुल्हन) अज़िजुन्निसा बी शेख शहाबोद्दीन यांच्या समोर हा प्रस्ताव सादर करण्यात आले कि आज या छोटे खानी साखरपुड्या (मंगणी) या कार्यक्रमात लग्न (निकाह) लाऊन घेऊ असे सांगितले वर व वधु यांनी  आमचे जेष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हास मान्य राहिलअसे सांगितले .

   हा विवाह सोहळा चोपडा येथिल डॉ. ए. पि. जे .अब्दुल कलाम कम्युनिटी हॉल मध्ये साध्या पध्दीत अनोखा पार पडला. दोन्ही बाजूकडील मंडळीची आर्थिक स्थिती  चांगली असताना देखील त्यांनी साध्या पद्धतीने जो विवाह लावला तो इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.

 वर अरबाज शेख यांचे वडिल सलिम बशीरोद्दीन शेख हे दोंडाईचा नगरपरिषदेत रिटायर्ड प्रॉपर्टी विभागात विभागप्रमुख होते काका हाजी सिराजुद्दीन बशीरुद्दीन शेख ,  नंदुरबार येथे रेल्वे विभागात नोकरीत होते , शेख  नाजीम बशीरोद्दीन मा.शिक्षण सभापती , तथा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे धुळे जिल्हाध्यक्ष यांचे ते पुतणे आहेत तर 

 चोपडा येथील वधु  अज़िजुन्निसा यांचे वडील शेख शहाबोद्दीन नज़मोद्दीन हे व्यावसायिक आहे. या ऐतिहासिक निर्णयातडॉ रफिक अय्युब शेख व सैफुल्ला शेख सिराजुद्दीन, शेख आबिद मुसा मलिक, जंहागिर मेंबर अडावद वाले , अजिम शेख, शेख असदुल्लाह सिराजुद्दीन, यांचा  सिंहाचा वाटा आहे. 

या आदर्श विवाह साठी चोपडा येथिल हाफिज नसिब खान साहाब, हाजी सिराजुद्दीन, वर चे वडिल सलिमोद्दीन शेख,  नाजीम शेख, सैयद जाकीर उस्मान ,मोहसिन शेख सिराजुद्दीन, अजहर शेख , वधु कडुन वधु चे वडिल  शहाबोद्दीन नज़मोद्दीन शेख, डॉ रफिक शेख अय्युब,सैफउल्ला शेख सिराजुद्दीन,यांनी पुढाकार घेतला. 

 तसेच गयासोद्दीन नुरोद्दीन शेख, बेटावद येथिल अय्युब पठाण, सुरत येथिल अजिज भाई लकडावाला,चोपडा येथिल आबिद मुसा मलिक, अडावद चे जंहागिर मेंबर, अजिम शेख,, मालेगाव येथिल आसिफ हबीब शेख, सादीक हबीब शेख,दोंडाईचा जामा मस्जिद चे चेअरमन हाजी  सुलतान पिंजारी, नाशिक चे मुज्जमिल मंसुरी , चोपडा चे नुर शेख , जलगाव चे रिटायर्ड पोलीस हवालदार अलिम शेख, बेटावद चे शाकिर खान अय्युब खान, सैयद समशोद्दीन, सैय्यद शेरू भाई, सलीम भैय्या ड्रायव्हर, अमर मराठे महेमुद साबिर ,सैयद साजीद गुड्डु भाई , सैयद मसुद उस्मान, जलगाव चे सद्दाम शेख, अक्रम पिंजारी, आवेस शेख,मोईन शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी एकच ब्रिद वाक्याची घोषणा दिली. खर्चिक लग्न टाळा लग्नाला सोप्प करा ...

लेबल:

बनावट कागदपत्राचा वापर करून स्वस्तिक चित्रपटाची जागा हडप :- रेखा शाह


बनावट कागदपत्राचा वापर करून स्वस्तिक चित्रपटाची जागा हडप :- रेखा शाह 

सिटीसर्वेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

जनसंघर्ष न्यूज 

      धुळे :-  शहरातील सिटी सर्व्हे नं. 1466/4 व 1466/5 या जागेतील स्वस्तिक चित्रपट गृहाची जागा बेकायदेशीरपणे हडप करण्यासाठी बनावट कागदपत्रांची साखळी उभी करण्यात आली. खरेदीखत दि.31 मार्च रोजी तयार करण्यात आले असून त्यात संलग्न असलेली सर्वच कागदपत्रे ही बनावट आहेत. ही कागदपत्रे खरेदीदारांनी सिटी सर्व्हे कार्यालय व महापालिकेच्या कर्मचार्‍यांशी संगनमत करीत मोठा आर्थिक व्यवहार करून तयार केल्याचा आरोप रेखा योगेश शाह व संजय मुंदडायांनी आज पत्रकार परिषदेत केला. प्रसंगी त्यांनी बनावट असलेली व खरी कागदपत्रे सादर केली. तसेच संबंधीतांची चौकशी करून बनावट कागदपत्रे बनविणार्‍या खरेदीदारांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.

        साक्री रोडवरील जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला रेखा शाह व संजय मुंदडा हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी सांगितले की, खरेदीखतात सिटी सर्व्हे नं. 1466/1 चे दोन उतारे जोडण्यात आले असून त्यातील पृष्ठ क्र. 47 व 49 वरील संगणकीय नोंदी व स्वाक्षर्‍यांमधील विसंगती स्पष्टपणे बनावटगिरी दर्शवते, असेही शहा त्यांनी आहे. विशेष म्हणजे खरेदीखताच्या 40 दिवसानंतर म्हणजेच दि.8 मे 2025 रोजीच वारसांची नावे अधिकृत उतार्‍यात नोंदवण्यात आली आहेत. शहा यांनी सिटी सर्व्हे कार्यालय व जिल्हा भू अभिलेख कार्यालयाला वेळोवेळी लेखी तक्रारी करूनही खरेदीदारांची नावे बेकायदेशीररीत्या लावण्यात आल्याचा आरोप केला आहे. वास्तविक 1466/1 या मिळकत पत्रिकेवर कोणतीच जागा शिल्लक नसतांना दुसर्‍या मिळकतींचे जागेेचे वर्णन लिहुन बेकायदेशीर खरेदीखत तयार करण्यात आले होते. तरी यामध्ये सहकार्य करणार्‍या सीटी सर्व्हेतील अधिकारी व कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शाह यांनी केली आहे. प्रदीप शाह हा मुख्य संशयीत आरोपी असून त्याने दोघाकडच्यांना फसवले आहे. याप्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशी आमची मागणी असल्याचे यावेळी रेखा शाह व संजय मुंदडा यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

लेबल: , ,

प्राथमिक शाळांमधील हिंदी सक्तीला शिवसेना उबाठाचा विरोध ; उबाठा जिल्ह्यातील तीन हजार शाळांमध्ये जनजागृती करणार



प्राथमिक शाळांमधील हिंदी सक्तीला शिवसेना उबाठाचा विरोध

उबाठा जिल्ह्यातील तीन हजार शाळांमध्ये जनजागृती करणार 

जनसंघर्ष न्यूज 

    धुळे :- महाराष्ट्र राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने नुकताच एक आदेश काढला असून त्यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या शाळांमध्ये मराठी आणि इंग्रजी माध्यमांसोबत हिंदीला तिसरी भाषा म्हणून सक्तीने शिकविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यासंबंधीचे परिपत्रक राज्य शासनाने काढले असून या परिपत्रकास महाराष्ट्रातील तमाम मराठी पालकांसह विद्यार्थी व राजकीय पक्ष यांनी विरोध केला आहे. महाराष्ट्रातील जनतेचा विरोध पाहता राज्य शासनाच्या वतीने या परिपत्रकाचे पुनश्च शुद्धिपत्रक शिक्षण विभागा कडून काढण्यात आले, पूर्वीच्या परिपत्रकामधील अनिवार्य हा शब्द काढून सर्व साधारण हा शब्द वापरून शब्दांचा खेळ या ठिकाणी सुरू केला आहे. राज्य शासनाने हिंदी सक्तीचा निर्णय मागे न घेता अनिवार्य या शब्दाचा वापर केल्यामुळे हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवली जाणार हे आता स्पष्ट आहे. 

भारतीय राज्यघटनेत बहुभाषिकतेला मान्यता असून मातृभाषेत शिक्षण घेण्याचा हक्क सर्व मुलांना आहे ,मात्र केंद्र व भाजपा प्रणीत राज्य सरकारे शैक्षणिक धोरणांच्या नावाखाली हिंदी भाषा सर्वत्र लागू करण्याचे प्रयत्न करत आहे. त्यामुळे सरकारकडून मातृभाषेचा अपमान होत असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असताना मराठी भाषे बाबत महाराष्ट्रातील अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आधीच आडमुठे धोरण आहे या इंग्रजी माध्यमाच्या शाळा मराठी भाषा टाळण्याचा जाणून-बुजून प्रयत्न आधीच करत आलेल्या आहेत. 

हा विषय फक्त मराठी भाषेचा विषय नसून महाराष्ट्राची संस्कृती ओळख आणि राज्य भिमानाचा मुद्दा आहे. शिक्षणाच्या नावाखाली मातृभाषेची गळचेपी, महाराष्ट्रातील जनता कदापीही सहन करणार नाही ,गुजरात मध्ये हिंदी सक्तीची नाही मग तिची सक्ती महाराष्ट्रातच का?

महाराष्ट्र राज्य शासनाने आधी मराठी शाळा वाचवण्याचे धोरण अंमलात आणले पाहिजे. 

मराठी भाषा ही महाराष्ट्रीय प्राकृत भाषेची आधुनिक रूप असून ही भाषा संस्कृत मधून विकसित झालेली आहे ,दहाव्या शतकात श्रावण बेळगोळ येथील शिलालेखांमध्ये मराठी भाषेचा  लिखित पुरावा मिळतो. मराठी भाषा मूळ आर्यांची भाषा असून या भाषेला पंधराशे ते 2000  वर्ष जुना इतिहास आहे. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहन राजवंशात गाथा सप्तशती हा मराठी ग्रंथ लिहिला गेला.सन 1110 मध्ये कभी मुकुंद राजांनी 

रचलेला विवेक सिंधू हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ असून मराठी साहित्याचा आरंभ संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाने सोळाव्या शतकात झाला आहे.

 सन 1965 मध्ये मराठी भाषेला राज्य भाषेचा दर्जा मिळाला व त्याची अंमलबजावणी 1966 पासून महाराष्ट्रात झाली. सन 2024 मध्ये भारतातील इतर भाषांप्रमाणे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मराठी ही बोलीभाषा सध्या वीस प्रकारात महाराष्ट्रात बोलली जाते.

भारतीय संविधानात कुठेही असं नमूद नाही की हिंदी भाषा शिकणं किंवा बोलणं भारतातील नागरिकांसाठी बंधनकारक (अनिवार्य) आहे. कुठल्याही कायद्यानुसार प्रत्येक नागरिकाला हिंदी यायलाच हवी, असा कोणताही नियम नाही.भारतीय संविधानातील संबंधित तरतुदी: 1. अनुच्छेद 343 (Article 343):

केंद्र सरकारचे कार्य हिंदी भाषेत (देवनागरी लिपीत) होईल असं सांगितलं आहे.

मात्र, इंग्रजी भाषेचाही सह भाषा म्हणून वापर केला जाईल, असंही यात स्पष्ट केलं आहे.

2)अनुच्छेद35(Article 351):

केंद्र सरकारने हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करावा, असा निर्देश आहे.

पण नागरिकांसाठी ही भाषा शिकणं किंवा वापरणं बंधनकारक नाही

3) अनुच्छेद 19(1)(a):- प्रत्येक नागरिकाला स्वतंत्रपणे बोलण्याचा, लिहिण्याचा आणि अभिव्यक्त होण्याचा अधिकार आहे.

म्हणजेच नागरिक कोणतीही भाषा वापरू शकतो.

4)तीन भाषांचा फॉर्म्युला (Three Language Formula):

ही एक शैक्षणिक धोरण आहे, कायदा नाही.

शाळांमध्ये हिंदी, इंग्रजी व एक प्रादेशिक भाषा शिकवण्याची ही एक शैक्षणिक योजना आहे, ती संविधानाचा भाग नाही.

हिंदी बोलणं कायद्यानं अनिवार्य आहे का?

नाही.

भारतीय दंड संहिता (IPC) मध्ये नाही,कोणत्याही केंद्र सरकारच्या कायद्यात नाही, संविधानातही नाही.

हिंदी ही सर्वसामान्य नागरिकांसाठी अनिवार्य भाषा नाही.

 निष्कर्ष: मुद्दा उत्तर

हिंदी भारताची राजभाषा आहे का?  होय (अनुच्छेद 343)

हिंदी बोलणं प्रत्येक नागरिकासाठी गरजेचं आहे का?  नाही

कोणता कायदा नागरिकांना हिंदी शिकायला भाग पाडतो का?  नाही

आपण कोणत्याही भाषेत बोलू शकतो का?  होय, अनुच्छेद 19(1)(a) नुसार , राज्य शासनाच्या या संबंधित निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विरोध असून धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण 1105, तसेच नगरपालिका, महानगरपालिका ,खाजगी प्राथमिक ,खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा 2011 म्हणजेच संपूर्ण धुळे जिल्ह्यातील एकूण 3116 शाळांमध्ये मराठी भाषा हीच आपली बोलीभाषा म्हणून शिकवली जावी, या संदर्भात शिवसेना पक्षाच्या वतीने संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवले जाणार असून, तेच पत्र इंग्रजी माध्यमाच्या शाळांना देखील पाठविण्यात येणार आहे. आगामी काळात महाराष्ट्र राज्य शासनाने हा निर्णय मागे न घेतल्यास संपूर्ण जिल्हाभरातील पालक व विद्यार्थ्यांनी मध्ये जनजागृती करून मोठे जना आंदोलन राज्य शासनाच्या विरोधात चिडले जाईल याची आपण नोंद घ्यावी. अशा आशयाचे निवेदन आज शिवसेना उबाठा वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, प्रशांत भदाणे, निंबा मराठे, महिला आघाडीचा संगिता जोशी, जयश्री वानखेडे,  सोनी सोनार, राजु ढवळे, शिवाजी शिरसाळे, संदीप सूर्यवंशी,कपील लिंगायत, महादु गवळी, सुभाष मराठे,मुन्ना पठाण, पंकज भारस्कर,पीनु सुर्यवंशी, अजय चौधरी, विष्णू जावडेकर,सागर निकम, सागर साळवे, ईशतियाक अंसारी , योगेश पाटील , सचिन रुंणवाल,आशुतोष कोळी आदी उपस्थित होते.     



लेबल:

सोमवार, २३ जून, २०२५

आमदार अग्रवाल यांचा रुग्णांना मदतीचा हात

 

आमदार अनुप अग्रवाल यांचा रुग्णांना मदतीचा हात

एबी फाउंडेशनच्या पुढाकाराने ; राहुल भोई यांना लाखाचा मुख्यमंत्री सहाय्यता निधी

जनसंघर्ष न्यूज 

        धुळे, ता. २३ :- येथील राहुल भोई यांच्यावर हिप जॉइंट शस्रक्रिया आवश्यक होती. मात्र, तेवढी आर्थिक क्षमता नसल्याने त्यांनी आमदार अनुप अग्रवाल व एबी फाउंडेशनकडे मदतीची मागणी केली होती. त्यानुसार आमदार अग्रवाल व एबी फाउंडेशनने जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाद्वारे पाठपुरावा करत भोई यांना एक लाखाचा निधी मिळवून दिला. निधी मंजुरीचे पत्र नुकतेच आमदार अग्रवाल यांच्या हस्ते रुग्ण भोई यांना प्रदान करण्यात आले.

       धुळे येथील रुग्ण राहुल गोपीनाथ भोई यांच्यावर हिप जॉइंट शस्रक्रिया आवश्यक होती. त्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज होती. याबाबत त्यांनी आमदार अनुप अग्रवाल यांची भेट घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीची मदतीची विनंती केली. आमदार अग्रवाल यांच्या सूचनेनुसार एबी फउंडेशनने येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडे भोई यांचा अर्ज, आवश्यक कागदपत्रे देत ती मुख्यमंत्री कार्यालयाकडे ऑनलाइन पाठविण्यात आली. यानंतर आमदार अग्रवाल यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे पाठपुरावा करत निधी मंजुरीची विनंती केली. त्यानुसार राहुल भोई यांचा अर्ज मंजूर होऊन त्यांच्या शस्रक्रियेसाठी एक लाख रुपयांचा निधी मंजूर झाला.  निधी मंजुरीचे पत्र नुकतेच आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते राहुल भोई यांच्या नातेवाइकांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी रुग्ण राहुल भोई व त्यांच्या परिवाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार अग्रवाल, मुख्यमंत्री सचिवालयाचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक, राज्याचे वैद्यकीय समन्वयक (वर्ग 1) डॉ. स्वानंद सोनार, राज्य समन्वयक डॉ. रितेश पाटील, जिल्हा समन्वयक डॉ. मनोज विसपुते यांचे आभार मानले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश पाटील, प्रमोद बागूल, कपिल पिवाल,  एबी फाउंडेशनचे कमलेश देवरे यांनी निधी प्राप्तीसाठी सहकार्य केले.

लेबल:

रविवार, २२ जून, २०२५

गुलमोहर मधील 1कोटी 84 लाखच्या घबाड प्रकरणी शिवसेना उबाठाचे धरणे आंदोलन

 


गुलमोहर मधील 1कोटी 84 लाखच्या घबाड प्रकरणी शिवसेना उबाठाचे धरणे आंदोलन

दूध का दूध .... पानी का पानी, करण्यासाठी मुख्यमंत्री यांनी नेमलेल्या एसआयटीचा प्रमुख कोण ?


1.84 कोटी सापडूनही ईडी, मनी लॉड्रींग, अन्टीकरप्शन, बीएनएस कायद्यान्वये गुन्हे का दाखल होत नाही ?


महाराष्ट्राची इभ्रत व मान खाली घालणाच्या नि किळस आणणारे खंडणी प्रकरण दडपायचे आहे का ? जर दडपायचे आहे तर हम सब चोर है ही घोषणा केव्हा करणार  ?

       जनसंघर्ष न्यूज 

        धुळे :- महाराष्ट्र विधीमंडळाच्या  गौरवशाली परंपरेला काळीमा फासणारे, महाराष्ट्राच्या यच्चयावत नागरिकांची मान शरमेने जाईल ! इतके भयंकर... संत, राष्ट्रपुरुष, नरवीरांची खान असलेल्या महाराष्ट्र ... जो राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्रांतीचे वेळोवेळी देशाचे नेतृत्व करतो. हाच  महाराष्ट्र भ्रष्टाचाराचे, किंबहुना पैसे कसे खावे ! याचा परिपाठ अर्जुन खोतकर या अलीबाबा नि त्याच्या 40 चोरांनी घालून द्यावा, यापेक्षा दुर्दैव ते कोणते ?

धुळ्याच्या गुलमोहर रेस्ट हाऊस मधील खोली क्र. 102 येथे 21 मे रोजी तब्बल 1.84 कोटी रु. ची बिनहिशोबी, खंडणीवसुल केलेली रक्कम सापडली. माजी आमदार अनिल गोटे यांच्या   नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी धरणे देत ओरडून ओरडून सांगितले. या खोलीत तब्बल 5 ते साडेपाच कोटी रु. सर्व प्रमुख शासकीय विभागाच्या अधिकार्‍यांमार्फत वसुल केलेली खंडणीची रोकड आहे. खोलीला आ.अर्जुन खोतकरांचा तथाकथित स्वीय सहाय्यक किशोर पाटील याने खाजगी कुलूप लावून 3-5 कोटी घेवून पोबारा केला आहे. अनिल गोटे यांनी तब्बल 25-30 अधिकार्‍यांना याची माहिती दिली. त्यात नासिकचे आय.जी. आयुक्त, एसीबीचे आयुक्त, राज्य शासनाचे संबंधीत सचिव, जिल्हाधिकारी, एसपी. आरडीसी अशा सर्वांनाच माहिती देवून पोलीस पाठवा व रक्कम ताब्यात घेवून कारवाई करा असा तब्बल 6 तास घोषा लावला. यंत्रणा जागची हलत नव्हती. वृत्तवाहिन्यांवर ब्रेकींग न्युज सुरु झाल्या, त्यातच शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी ट्वीट केले नि महाराष्ट्रात खळबळ उडाली. 6 तासांनी पोलीस घटनास्थळी आले. सोबत स्टील कटर, नोटा मोजण्याचे मशीन घेवूनच आले. आणि अनिल गोटे यांचा आरेाप खरा ठरला. त्याखोलीत 1,84,84,200 रु. वेगवेगळ्या पिशव्यांमधून आढळून आले.

महाराष्ट्रात महाआघाडीचे सरकार असतांना एका पोलीस अधिकार्‍याने गृहमंत्र्यावर आरोप  करीत 100 कोटी रु.वसुलीचा आरोप केला नि त्यांना तुरुंगात डांबले. शिवसेना नेते खा.संजय राऊत यांच्या घरी 10 लाख रु. सापडले.  असा आरोप करुन हिशोब देवूनही त्यांना तुरुंगात धाडले. मात्र येथे 1.84 कोटी रु. सापडूनही अदखलपात्र गुन्हा तो ही तब्बल 10 दिवसांनी दाखल केला. स्वीय सहाय्यक म्हणून ज्याची नेमणूक नाही त्या किशोर पाटलाने तब्बल 10-15 कोटी रु. वसुल केल्याची चर्चा होत आहे.

तरी या घटनेचे गांभीर्य मुख्यमंत्र्यांना नाही. त्यांनी एसआयटी घोषणा करुन ङ्कदुध  का दुध  पानी का पानी करुङ्ख अशा राणा भिमदेवी थाटात घोषणा केल्या. त्या एसआयटीचा पत्ताच नाही, एवढी प्रचंड रक्कम सापडून देखील बीएनएस, आय.टी, अन्टी करप्शन, मनी लाँड्रींग, ईडी अंतर्गत कायद्यान्वये गुन्हा का दाखल झाले नाही ? अर्जुन खोतकरांना सरकारने ही खंडणी गोळा  करायला सांगितली होती का ? त्या खंडणीचा वाटा शासनाला पण जाणार होता का ? शासनाला महाराष्ट्राची इभ्रत व विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारा भ्रष्टाचार दडपायचा आहे का ? जर नाही, तर या गुन्ह्याचा तपास सुयोग्य पध्दतीने का करत नाही ? किशोर पाटलाला खंडणी गोळा करायला कोणी सांगितले. वसुलीचे कारण काय ? पैसे कोणी व का आणुन दिले ? याचा तपास होणार आहे का नाही ! किशोर पाटील, अर्जुन खोतकर, आरडीसी शेलार यांचे मोबाईल फोनचे सीडीआर का लपासत नाही ? या सर्वांची लायडिटेक्टर, नार्को टेस्ट का घेत नाही ? त्याशिवाय का दुध का दुध... पानी का पानी होईल ? नसता पोकळ वल्गना करुन महाराष्ट्राची दिशाभूल करणे थांबवावे.

या भ्रष्टाचाराची व्याप्ती फार मोठी आहे. हा भ्रष्टाचार तळागाळाच्या घटकापर्यंत पोहोचला  आहे. कारण आरडीसी कार्यालयातून जिल्ह्यातील हजारो रेशन दुकानदारांना फोन गेले. ङ्कअंदाजसमिती आली आहे. प्रत्येकी 10 हजार पाठवा. अन्यथा धाड घालण्यात येईल.ङ्ख इतक्या खालच्या थरापर्यंत जावून वसुली झाल्याने महाराष्ट्र या भ्रष्टाचारात आकंठ बुडाला याचे उत्तम उदाहरण होय.

जोपर्यंत या भ्रष्टाचारात सामिल असलेल्या एकूण एक म्हणजे अलीबाबा 40 चोर आणि खंडणी जमा करणारे पैसे देणार्‍यांविरुध्द गुन्हे दाखल  करावे यासाठी शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने आज राणा प्रताप चौकात धरणे आंदोलन करण्यात आले, याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली, याप्रसंगी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, मा.महपौर  भगवान करणकाळ, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, प्रशांत भदाणे,  शेखर वाघ,आण्णा फुलपगारे, महीला आघाडी संगीता जोशी, ज्योती चौधरी, मयुरी सोनवणे ,कपिल लिंगायत, पंकज भारस्कर, मनिष थोरात, ज् दिनेश पाटील,पिंटू ठाकूर, सलिम लंबु, संदीप चौधरी, आबा हरळ, अजय चौधरी,  भोला गोसावी,दिपक वाघ, हिमांशू परदेशी, योगेश पाटील, वैभव पाटील, केतन भामरे,ईशतियाक अंसारी, शुभम रणधीर, संजय पिंगळे, राहुल दोडे , अनिल चौधरी, चेतन शिंदे आदी उपस्थित होते.

लेबल: ,

शनिवार, २१ जून, २०२५

विरोधकांनी कितीही घाणेरडे राजकारण केले तरी माझा विकासाचा रथ सुरूच ठेवणार : आमदार अग्रवाल


छत्रपतींच्या स्मारकाबाबतची उबाठा शिवसेनेची याचिका न्यायालयाने फेटाळली

भाजपतर्फे स्मारकाजवळ फटाक्यांची आतषबाजी करत झाला जोरदार जल्लोष

जनसंघर्ष न्यूज 

        धुळे, ता. २० :-  मी आमदार झाल्यापासून शहरात सुरू असलेल्या विकासकामांना विरोध करण्याचे,  खास करून छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला विरोधाचे कारस्थान करत उबाठा शिवसेनेच्या नेत्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, मेहेरबान न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्याने त्यांना सणसणीत चपराक बसली आहे. यामुळे आता रयतेचे राजे असलेल्या छत्रपतींचे स्मारक मोठ्या उत्साहाने, दिमाखदारपणे भव्य स्वरूपात पूर्ण होईल. उबाठाच्या नेत्यांनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यांना आता जनताच उत्तर देईल. विरोधकांना आणखी कुठे जायचे असेल तर खुशाल जावे, असे आव्हान आमदार अनुप अग्रवाल यांनी आज दिले.

       शहरातील मनोहर चित्रपटगृहाजवळ सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला उबाठा शिवसेनेच्या नेत्यांनी विरोध करत न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत खासगी जागेवर हे काम होत असल्याचे व ही जागा स्मारकाच्या नावाखाली हडप करण्याचे कारस्थान केले जात असल्याचा आरोपही करण्यात आला होता. या याचिकेवर दोन दिवसांपूर्वी सुनावणी होऊन आज न्यायालयाने निर्णय देताना ही याचिका फेटाळून लावली. अखेर सत्याचा विजय झाला असे म्हणत भारतीय जनता पक्षातर्फे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. यानंतर आमदार अग्रवाल संबोधित करताना बोलत होते.

       यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ज्येष्ठ नेते विजय पाच्छापूरकर, सुनील बैसाणे, भिकन वराडे, शशी मोगलाईकर, आकाश परदेशी, वैशाली शिरसाट, मोहिनी धात्रक, किशोर चौधरी, सुबोध पाटील, कमलाकर पाटील, पंकज धात्रक, ज्ञानेश्वर पाटील, हर्ष रेलन, भगवान गवळी, पप्पू डापसे, जयेश मगर, बंटी धात्रक, रमेश करनकाळ, विनोद खेमनार, पृथ्वीराज पाटील, सचिन पाटील, पवन जाजू, सुरेश बहाळकर, प्रकाश उबाळे, अनिल सोनार, पंकज विंचू, राकेश कुलेवार, ॲड. किशोर जाधव, जीवन शेंडगे, राजेश शहा, सागर कोडगीर, शरद बिरारी, शिवाजीराव काकडे, कैलास कासार, विकी परदेशी, रोहित चांदोडे, सुनील देवरे, सुहास अंपळकर, भीमा शर्मा, शीला भडागे, मीनल जगताप, अशोक माळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       आमदार अग्रवाल म्हणाले, की उबाठा सेनेचे नेते स्मारकाच्या विरोधात कोर्टात गेले होते. या याचिकेत विविध आरोप करण्यात आले. विशेषतः मी या स्मारकाच्या ठिकाणी कार्यालय सुरू करणार असल्याचे सांगितले गेले. वास्तविक, माझी स्वतःची तीन-चार कार्यालये असताना मला आणखी कार्यलायाची काय गरज? मी आजपर्यंत आमदार म्हणून नव्हे तर सालदार म्हणून काम करताना साधे शासनाच्या विश्रामगृहातही गेलो नाही. तेथे बैठका घेतल्या नाहीत. मग मी छत्रपतींच्या स्मारकाच्या नावाने इतरांसारखे माझे कार्यालय बांधण्याचे नीच कृत्य कसे करीन? स्मारकाची जागा खासगी असल्याचाही आरोप झाला. मात्र, यातही त्यांनी खोटे बोलून जनतेची दिशाभूल केली. खरे तर शहरात विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची अनेक अतिक्रमणे आहेत. याबाबत यांनी कधीच आवाज काढला नाही. मात्र, जे कायदेशीर पद्धतीने छत्रपतींचे स्मारक उभारले जात आहे, त्याला विरोध करण्याचे नीच कृत्य केले गेले. स्मारकाचे काम पूर्ण झाल्यानंतर खालून पूर्णतः मोकळा रस्ता असणार आहे, ज्यामुळे वाहतुकीला कुठलाही अडथळा येणार नाही आणि अपघातही होणार नाहीत. 

 विरोधकांनी कितीही घाणेरडे राजकारण केले तरी माझा विकासाचा रथ सुरूच ठेवणार : आमदार अग्रवाल

       उबाठाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदा घेत स्मारकाला विरोध करताना वैयक्तिक माझ्यावरही अनेक आरोप करत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मी त्यावर कुठलीच प्रतिक्रिया न देता माझे काम सुरूच ठेवले आहे. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात त्यांना आणखी कुठे जायचे असेल तर खुशाल जावे. विकासकामांना विरोध करावा. त्यांना आता जनताच उत्तर देईल. यापूर्वीही टॉवर गार्डनचे काम थांबविले असता त्यांना जनतेने उत्तर दिले. आताही जनताच त्यांना उत्तर देईल. माझ्या विरोधकांवर कुठलाच रोष नसून, मी शहराच्या विकासासाठी जे-जे करायचे ते काम करतच राहणार, असेही आमदार अग्रवाल म्हणाले.

लेबल:

मिलिंद सोसायटी येथे रस्त्याची दुरावस्था; पाणी गळतीमुळे खड्ड्याचे साम्राज्य

मिलिंद सोसायटी येथे रस्त्याची दुरावस्था; पाणी गळतीमुळे खड्ड्याचे साम्राज्य

जनसंघर्ष न्यूज 

           धुळे - शहरातील साक्री रोड भागातील विद्यावर्धिनी कॉलेज समोरील नकाणे रोड येथे जाणाऱ्या रस्त्याला पाईपलाईन जीर्ण झाल्यामुळे खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असून मिलिंद सोसायटी येथे रस्त्याची दुरावस्था झाली असून जीव घेणे खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे. 

           या ठिकाणी महानगरपालिकेतील पाणी प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी आत्तापर्यंत 10 ते 12 वेळेस खड्डे खोदून पाईपलाईन दुरुस्तीचे काम केले पण पाणी प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून पाईपलाईन दुरुस्ती व्यवस्थित होत नसल्याने वारंवार वेगवेगळ्या ठिकाणांहून पाणी गळती होत आहे पालिका प्रशासनाकडे चांगले अनुभवी कर्मचारी नाहीत का असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. 

         यामुळे नळाला पाणी येते तेव्हा हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहत असते व या पाणी गळतीमुळे चांगल्या रस्त्याची दुरावस्था होत असून मोठमोठे खड्डे तयार होत आहेत या खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे तेथे रोज अपघात होत असतात. तरीही याकडे दुर्लक्ष केले जात असून स्थानिक पुढारींनी देखील पाठ फिरवलेली दिसून येत असल्याचे चित्र आहे. त्या रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात असून वाहतूकदारांना जीव घेण्या खड्ड्यांचा सामना करत प्रवास करावा लागत आहे महापालिका प्रशासन व स्थानिक पुढारी तेथे  एखाद्याचा अपघात होऊन जीव जाण्याची वाट बघत आहे का ?

         महानगरपालिकेतील पाणी प्रशासनच्या अधिकाऱ्यांनी वेळीच येथे वैयक्तिक लक्ष घालून सर्व पाईपलाईन दुरुस्ती करून व पाणी गळतीमुळे झालेल्या रस्त्याची दुरावस्था ठीक करून या खड्ड्याच्या साम्राज्यातून जनतेला मुक्त करावे अन्यथा राजीनामा द्यावा अशी स्थानिक नागरिकाकडून मागणी होत आहे.

लेबल:

शुक्रवार, २० जून, २०२५

आखाडे जि प शाळेत महिरे वाचनालया तर्फे शिक्षकांना भारतीय संविधानाचे वाटप


आखाडे जि प शाळेत महिरे वाचनालया तर्फे  शिक्षकांना भारतीय संविधानाचे वाटप

जनसंघर्ष न्यूज 

       धुळे :- तालुक्यातील आखाडे येथील  जिल्हा परिषद शाळेत नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याच्या निमित्ताने बौद्धवासी शांताई महिरे सार्वजनिक वाचनालयातर्फे  भारतीय संविधानाच्या प्रति देऊन नवीन शैक्षणिक वर्षाचे स्वागत करण्यात आले .                                              यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.  वाचनालयअध्यक्ष डॉ राहुलकुमार महिरे यांनी विद्यार्थ्यांना संविधानाबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना व गावातील  व्यक्तींना भारतीय संविधान पुस्तकाचे वाटप  करण्यात आले.                            , जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजय जिरे, कैलास दाभाडे, शैला वळवी मॅडम,शिवराम वळवी, भोसले सर, हेतू शेख, पोलीस पाटील योगेश ठाकरे, माजी सरपंच रावसाहेब ठाकरे, सेवानिवृत्त शिक्षक शिवाजी ठाकरे, पंढरीनाथ ठाकरे माहदा सालकर, खुडाणे येथील सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रमोद महाजन, यांना संविधान पुस्तकांचे  वाटप करण्यात आले.                      , मुख्याध्यापक संजय जिरे यांनी शांताई महिरे वाचनालयांच्या उपक्रमाचे कौतुक करून अभिनंदन केले. उपस्थितांचे कैलास दाभाडे सरांनी आभार मानले

लेबल:

जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा

 

जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा

जनसंघर्ष न्यूज 

           धुळे:- श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,धुळे येथे दिनांक 21 जून म्हणजेच जागतिक योग दिनाचे औचित्य साधून विद्यालयाच्या प्राचार्य सौ.अपर्णा विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या इयत्ता 5 वी ते 12 वी वर्गातील विद्यार्थींनीनी विविध योगासने सादर करून खर्या अर्थाने योग दिन साजरा केला त्यांना त्यासाठी विद्यालयाच्या योग शिक्षिका सौ. मनिषा कमलेश पाटील यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले विविध ययोगासनांनी विद्यार्थींनीनी सर्वांना प्रभावित केले त्यावेळी प्राचार्य सौ.अपर्णा पाटील यांनी योगा ही भारताची जगाला देण  असून मानसिक व शारिरीक सुधृडतेसाठी नियमित योगासने केली पाहीजेत विद्यार्थींनीनी अभ्यासात एकाग्रता येण्यासाठी नियमित प्राणायम वा तत्सम योगासने करून आपल्या  अध्ययन प्रगतीचा आलेख उंचवावा त्याकरीता योगशिक्षिका सौ.मनिषा पाटील मदतीला आहेतच तसेच आयुष मंत्रालय भारत सरकारने 2025 च्या योग दिनाची एक देश एक आरोग्य ही  थीम जाहीर केली आहे योगामूळे आपल्या  शरीराला उर्जेचा स्त्रोत उपलब्ध होत असतो मन,तन,प्रसन्न राहते   या शब्दात मनोगत व्यक्त केले   विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती. एस.व्ही.अडकमोल, पर्यवेक्षक श्री. प्रदीप एन. देवरे तथा सर्व शिक्षक ,शिक्षिका तथा शिक्षकेतर बंधू भगिनींची उपस्थिती व सहकार्य लाभले.


लेबल: , ,

लाचखोर मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात



 लाचखोर मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात 

२ हजाराची लाच घेऊन लाज विकणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यांच्या अवैध संपत्तीची चौकशी करण्याची मागणी

जनसंघर्ष न्यूज 

     धुळे :- तालुक्यातील सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन अंतर्गत जामफळ पाया व बुडीत क्षेत्रासाठी संपादित करण्यात आलेल्या , तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे असलेली मौजे सोंडले ता.जि.धुळे शेत जमीनीच्या मोबदल्यात तक्रारदार यांना नोकरी मिळावी यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या दाखल्याची आवश्यकता असल्याने त्यांनी उपजिल्हाधिकारी ( पुनर्वसन ) , धुळे यांच्याकडे दि.२८ फेब्रुवारी २०२५ रोजी अर्ज केला होता. सदरचा अर्ज चौकशी कामे तहसीलदार , शिंदखेडा त्यांच्याकडे पाठविण्यात आलेला होता. त्यांनी सदरचा अर्ज पुढील चौकशी कामे छोटू पाटील, मंडळ अधिकारी , भाग तामथरे यांच्याकडे दिला असता. त्यानंतर तक्रारदार यांनी मंडळ अधिकारी छोटू पाटील यांची वेळोवेळी भेट देऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे अर्जाच्या चौकशी कामे आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून देखील मंडळ अधिकारी छोटू पाटील यांनी तक्रारदार यांच्या अर्जाचा चौकशी अहवाल तहसीलदार शिंदखेडा यांच्याकडे पाठविला नाही. त्यानंतर तक्रारदार यांनी १८ जून २०२५ रोजी मंडळ अधिकारी छोटू पाटील यांची चिंतामणी येथील मंडळ अधिकारी कार्यालयात भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांच्या अर्जाचा चौकशी अहवाल तहसीलदार शिंदखेडा यांच्याकडे पाठवण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ३ हजार रुपये लाचेची मागणी केली असता तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांच्याशी संपर्क करून कार्यालयात तक्रार दिली होती. 

         लाचलुचपत  प्रतिबंधक विभागाने सदर तक्रारीची १९ जून २०२५ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता मंडळ अधिकारी छोटू पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या प्रकल्पग्रस्ताचा दाखला मिळणे बाबतच्या अर्जाचा चौकशी अहवाल तहसीलदार शिंदखेडा यांच्याकडे पाठवण्यासाठी तडजोडीअंती २ हजार रुपये लाचेची मागणी करून लाज स्वीकारण्याचे मान्य केले होते. 

          त्यानंतर २० जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चिमठाणे येथील मंडळ अधिकारी कार्यालयात सापळा रचून मंडळ अधिकारी छोटू पाटील यांना तक्रारदार यांच्याकडून २ हजार रुपये लाच घेताना पकडून त्यांच्याविरुद्ध शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

          सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंध धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी तसेच राजन कदम मुकेश अहिरे संतोष पावरा प्रवीण मोरे रामदास बारेला प्रशांत बागुल मकरंद पाटील प्रवीण पाटील सुधीर मोरे यांनी नाशिकला असता प्रतिबंध विभाग नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे- वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

लाज घेणाऱ्या मंडळ अधिकारी छोटू पाटील यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी तक्रारदाराची मागणी 

प्रकल्पग्रस्तांना व पिढी त्यांना दाखले देण्यासाठी वारंवार फेऱ्या मारायला लावून शेवटी पैशांची मागणी करून नेहमी मानसिक त्रास देणाऱ्या मंडळ अधिकारी छोटू पाटील याने अनेकांना मानसिक त्रास देऊन लाचेच्या स्वरूपात पैसे उकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून अवैध संपत्ती जमा केलेली असून त्याच्या अवैद्य संपत्तीची कसून चौकशी व्हावी अशी मागणी तक्रारदार यांच्याकडून करण्यात आली आहे.

लेबल: , ,

अचल बंबचा सावकारी परवाना रद्द करून चौकशी करा- जयेश दुसाणे

 

अवैद्य सावकारी प्रकरणातील राजेंद्र बंबच्या मुलाला सावकारी परवाना मिळतोच कसा

अचल बंबचा सावकारी परवाना त्वरित रद्द करून चौकशी करा- जयेश दुसाणे

जनसंघर्ष न्यूज 

          धुळे :-  अवैध सावकारी प्रकरणातील मुख्य संशयीत आरोपी राजेंद्र बंब यांचा मुलगा अचल बंब यास डीडीआर यांनी दिलेल्या सावकारी परवाना तत्काळ रद्द करीत चौकशी करावी, अशी मागणी अवैध सावकारी प्रकरणातील मुळे फिर्यादी जयेश दुसाणे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

           शहरातील साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात ही पत्रपरिषद झाली. दुसाणे यांनी सांगितले की, राजेंद्र बंद यांच्या अवैध सावकारीप्रकरणाचा तत्कालिन पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील यांनी योग्य तो तपास केला. मात्र त्यांची बदली झाल्यानंतर कुठलीही ठोस कार्यवाही झाली नाही. उलट या गुन्ह्यात जमा असलेल्या मालमत्तांची मोठी टक्केवारी देवून परस्पर खरेदी-विक्री झाल्याचा आरोपही दुसाणे यांनी केला. तसेच अवैध सावकारी प्रकरणातील मुख्य संशयीत आरोपी असलेल्या राजेंद्र बंब यांच्या मुलाला डीडीआर यांनी सावकारीचे लायसन्स दिले. ते रद्द करून याप्रकाराची चौकशी करावी, अशी मागणीही यावेळी दुसाणे यांनी केली. सरकारी वकील, तपासाधिकारी सहकार्य करीत नसल्याचा आरोपीही त्यांनी केला.

लेबल:

गुरुवार, १९ जून, २०२५

ठाकरे बंधूंनी एकत्रित यावे, शिवसेना व मनसे वतीने वर्धापनदिनी एकवीरा देवीला घातले साकडे

 

ठाकरे बंधूंनी एकत्रित यावे, शिवसेना व मनसे वतीने वर्धापनदिनी एकवीरा देवीला घातले साकडे 

जनसंघर्ष न्यूज 

धुळे :- शिवसेना पक्षाचा ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त आज शिवसेना   उबाठा वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते 

         आज सकाळी शिवसेना मोगलाई विभागा वतीने कुष्ठरोग आश्रम येथे फळ वाटपाचा कार्यक्रम शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला त्यानंतर शिवसेना आझाद नगर विभागा वतीने पांझरा पोळ  येथील गोशाळेत गुरांना चारा वाटप करण्यात आले.

           दुपारी ठीक बारा वाजता खानदेश कुलस्वामिनी तसेच ठाकरे कुटुंबाची कुलदैवत आई एकविरा देवीच्या मंदिरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना वतीने सामूहिक आरतीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना व मनसे पदाधिकाऱ्यांच्या वतीने शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे या दोघा भावांनी एकत्र यावे याकरिता आई एकविरा देवीला साकडे घालत सामूहिक आरतीचे आयोजन केले याप्रसंगी उपस्थित भाविकांना 59 किलो लाडूचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसैनिक व मन सैनिकांनी दोघे भावांनी एकत्र द्यावे याकरता जोरदार घोषणाबाजी केली. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगरप्रमुख धीरज पाटील , भरत मोरे, संदीप सूर्यवंशी,निंबा मराठे, पंकज गोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगराध्यक्ष बंटी बाबा सोनवणे, अजित राजपूत, सौ प्राची ताई कुलकर्णी, संतोष मिस्त्री शिवसेनेचे  सौ.संगीता जोशी, जयश्री चौधरी, सुभाष जगताप, मुन्ना पठाण, कपील लिंगायत,  शिवाजी शिरसाळे , महादू गवळी, सुनील चौधरी, पिनु सूर्यवंशी,संदीप चौधरी, पंकज भारस्कर, दिनेश पाटील ,अजय चौधरी ,सागर निकम,सागर साळवे, विष्णू जावडेकर,  डॉ.अनील पाटील, अनील शिरसाट,डॉ.सोमनाथ चोरी,सचीन रुणवाल, सुरज भावसार, दिपक वाघ, निलेश चौधरी, स्वप्नील सोनवणे , गोकुळ बडगुजर 

           मनसेचे सुभाष  मोरे , मयूर  सोनार, दिनेश कोळी, चेतन तुपे, हेमंत सोंजे, सुमित पाटील, प्रणव वाघ , भूषण वाडेकर, चारुदत्त वाघ , वेदांत बोरसे ,शिरीष भाऊ लष्कर, स्वराज लष्कर , शरद लष्कर , अविनाश पवार , करण लष्कर , बबलू लष्कर , धीरज उसळकर , भैय्या लष्कर , अविनाश उसळकर शिवसेनेचे वैभव पाटील, जयेश फुलपगारे ,शुभम फुलपगारे,आशुतोष कोळी, जितेंद्र बैसाने,शामक दादाभाई,दिपक बच्छाव,उज्वला दादाभाई,निलेश गुरव,विजय गुरुबा,विठ्ठल मराठे,दिग्विजय शिंदे,दादू भाऊ पाटील आदी उपस्थित होते. शिवसैनिक व मनसैनिक या कार्यक्रमाला एकत्र आल्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण घोषणाबाजी करत निर्माण झाले होते.


                         जनसंघर्ष न्यूज 

                  मुख्य संपादक :- दिनेश राज निकुंभ 

लेबल:

दलित वस्त्यांमधील नित्कृष्ट दर्जाच्या कामांची व दलित वस्ती निधीची चौकशी करा - वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे यांची मागणी

दलित वस्त्यांमधील नित्कृष्ट दर्जाच्या कामांची व दलित वस्ती निधीची चौकशी करा 

 वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे यांची मागणी 

जनसंघर्ष न्यूज 

           शिंदखेडा :-  येथील दलित वस्तीत गेल्या अनेक वर्षापासून बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, सिद्धार्थ नगर, कुंभार टेक व इतर ठिकाणी कामे झालीत पण ती  कामे निकृष्ट दर्जाची झालीत आत्ताच बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी रस्त्याचे फेवर ब्लॉक लावून कामे केलीत परंतु कामे होताच तिथल्या फेवर ब्लॉक निघण्यास सुरुवात झालेली आहे व झालेल्या कामाच्या ठिकाणी गटारीवर जाळी आत्तापर्यंत बसविण्यात आलेली नाही. ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे.

         तसेच वारंवार निवेदन देवून सुद्धा अधिकारी लोकं चौकशीला येतात पण त्यावर कामे मात्र करत नाहीत व सांतवन करण्यासाठी येतात आश्वासने लावून जातात दलित वस्तीत अतिशय नित्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर व कंत्राटी यांच्यावर कुठल्याही प्रकारे कार्यवाही होत नसल्याने अधिकारी देखील या नित्कृष्ट कामाच्या भ्रष्टाचारात सामील आहे का असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. 

          मागील वर्षी देखील दि.१२/०२/२०२४ रोजी विविध समस्यांसाठी वंचितांच्या पदाधिकाऱ्यांनी अमरण उपोषण केले असता अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना लेखी स्वरूपात समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यावर आत्तापर्यंत कुठलेही निराकरण झाले नाही व ते कामे केली नाहीत तरी राहुल पाटोळे यांनी तहसीलदार यांना निवेदनाच्या माध्यमातून जाहीरपणे इशारा दिला आहे कि, जर का आमची कामे लावकर मार्गी काढण्यात आले नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून धुळे जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे.


       राहुल पाटोळे यांनी  तहसीलदार यांना पुढिल समस्यांचा पाढा वाचून दाखवत लवकरात लवकर सोडवण्याची खालील प्रमुख मागण्या केल्या यामध्ये :-

१) २१ कोटी पाणी योजने अंतर्गत शिंदखेडा शहर वासियांना नळ कनेक्शन देण्यात आले आहेत परंतु त्या योजनेचे उद्घाटन व काम झालेल्याचे उद्घाटन समारोह मोठ्या उत्साहात केला परंतु बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, सिद्धार्थ नगर, कुंभार टेक व इतर ठिकाणी अजूनही नळाला पाणी येत नाही व पाण्यापासून घरीब जनता वंचित आहे , 

२) सिद्धार्थ नगर येथील किरण न्हानभाऊ पाटोळे यांच्या घरापासून ते PWD च्या वॉल कंपाऊड पर्यंत रोडावर सांडपाणी  दररोज वाहत असते. व जेष्ठ, लहान मुले व महिला वर्ग खूपदा या रोडा वरून पडून गेलेले आहेत व  त्यांना मोठा प्रकारे इजा देखील झालेले आहेत हात तुटणे, पाय तुटणे अशा गंभीर स्वरूपाचे इजा झाल्या आहेत यावर लवकर उपाययोजना काढून ते कामे मार्गी लावावे , 

३)  सिद्धार्थ नगर ते ग्रामीण रुग्णालय शिंदखेडा व बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भवन मंगल कार्यालय या ठिकाणावर हा रस्ता शहरातील दर्शनी रस्ता असून या ठिकाणी  गटारीमध्ये मोठ्या प्रमाणात घान-कचरा जमा व तुंबला आहे हा कचरा लवकरात लवकर काढण्यात यावा व गटारीची हाईट व ढापे टाकण्यात यावे , 

४)  सिद्धार्थ नगर येथील हिम्मत मंगळे यांच्या घराजवळील स्टेट लाईट हा खराब अवस्थेत झालेला आहे व तेथील गटार ही रोडाच्या खाली असल्यामुळे खालून गटारीच्या बाजूने माहिती हि घसरत आहे व मोठे अनर्थ होण्याचे संकट या पावसाळ्यात दिसून येत आहे तरी हे काम लवकर मार्गी लावण्यात यावे ,  

५)  आंबेडकर नगर येथील रहिवासी रविंद्र रामदास पाटोळे यांच्या घराजवळील निंबाचे मोठे झाड आहे व ते झाड मोठे असल्यामुळे व इलेक्ट्रिक तार त्या झाडापासून खाली घेलेले आहेत व पावसाळा असल्यामुळे अनर्थ होण्याची मोठी दाट शक्यता आहे. ते निंबाचे झाड कापण्यात यावे अश्या मागण्यांचे निवेदन वंचित चे जिल्हा उपाध्यक्ष राहुल रविंद्र पाटोळे यांनी दिले आहे.

            यावेळी वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे, चंद्रकांत पाटोळे, नानू भाऊ पाटोळे, विनोद पाटोळे, रोहित पाटोळे, मनोहर पाटोळे, रावसाहेब पाटोळे, सतीश पाटोळे, कैलास निकुंबे, रवींद्र ठाकरे, लक्ष्मण पाटोळे, सिद्धार्थ कुवर , अशोक पाटोळे,  हिम्मत मंगळे, अजय पानपाटील, अनिल पाटोळे, संजय कुवर, चेतन पाटोळे, लक्ष्मण दादाभाऊ पाटोळे, न्हानू पाटील ,अजय बैसाने, राकेश राजेंद्र पाटोळे, संजय पाटील, लक्ष्मण बोरसे, छगन पाटोळे इत्यादी स्थानिक नागरिक उपस्थित होते.

लेबल: , , , ,