सोमवार, १७ नोव्हेंबर, २०२५

संत चोखोबा महाराज समाधी स्थळाचा विकास करा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांचे मंत्री संजय शिरसाठ यांना निवेदन



संत चोखोबा महाराज समाधी स्थळाचा विकास करा  

महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांचे मंत्री संजय शिरसाठ यांना निवेदन

जनसंघर्ष न्यूज 

       नाशिक (प्रतिनिधी) -  आज दिनांक 15/11/2025 शनिवार रोजी महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण मंत्री नामदार संजयजी शिरसाठ नाशिक दौऱ्यावर आले असता *संत चोखोबा मंदिर पंच कमिटी त्र्यंबकेश्वर चे मुख्य मार्गदर्शक तथा भिमटोला सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे व पंच कमिटीचे अध्यक्ष शैलेंद्र गांगुर्डे* यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन वरील विषयाचे निवेदन देण्यात आले.

     निवेदनाचा आशय असा आहे की त्र्यंबकेश्वर येथे सिटी सर्व्हे नं. 632 यांसी एकूण क्षेत्र 1710 चौ.मि.हे क्षेत्र श्री. संत चोखोबा महाराज यांचे मंदिर व समाधी स्थळ असून या ठिकाणी संत चोखोबा चे मठ असून ही वास्तू अत्यंत पुरातन व मोडकळीस आली असून अत्यंत जीर्ण झालेले आहे..

     या ठिकाणी 18 जानेवारी 1927 रोजी परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिल्याने हे ठिकाण मागासवर्गीयांचे श्रद्धास्थान आहे या जागेचा विकास हा जनतेच्या सोयीच्या दृष्टीने व समाजपयोगी होणे अत्यंत गरजेचे आहे..

     निवेदनावर प्रतिक्रिया देताना माननीय मंत्री महोदयांनी समाज कल्याण अधिकाऱ्यांना जागेची पाहणी करून त्वरित अहवाल मागितला आहे..

      याप्रसंगी संत चोखोबा मंदिर पंच कमिटी त्र्यंबकेश्वर चे मुख्य मार्गदर्शक तथा भिमटोला सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे,पंच कमिटीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शैलेंद्रजी गांगुर्डे, शिवसेनेचे नेते अजय दादा बोरस्ते, भीमश्री विजयराज पगारे, यशवंत (टिल्लूभाई) साळवे, शिवसेना नेते भिवानंद आप्पा काळे, रिपाई नेते रामबाबा पठारे, चंद्रशेखर बाहळकर, सचिन गांगुर्डे, दिलीपजी पगारे, प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..!

लेबल:

शनिवार, १५ नोव्हेंबर, २०२५

सोशल मीडियावर आदिवासी समाजाच्या भावना दुखावणाऱ्या राणी कुमावत व प्रेम कुमावत त्यांच्यावर कारवाई करा... - आदिवासी संघटनेने निवेदन

 

सोशल मीडियावर आदिवासी समाजाच्या भावना दुखावणाऱ्या राणी कुमावत व प्रेम कुमावत त्यांच्यावर कारवाई करा... - आदिवासी संघटनेने निवेदन 

जनसंघर्ष न्यूज 

 एरंडोल - येथील भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य तर्फे सोशल मीडियावर राणी कुमावत व प्रेम कुमावत या दोघ भाऊ व बहिणी यांनी अश्लील भाषेत आदिवासी नावाने समाजाला शिवीगाळ करुन सोशल मीडियावर पोस्ट केल्या बद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन पोलिस अधीक्षक जळगाव यांना पोलिस निरीक्षक एरंडोल यांच्या माध्यमातून देण्यात आले.

      निवेदनात नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला या शब्दाचा व शासकीय पोलिस यंत्रणा यांना चॅलेंज करत नाशिक येथील राणी कुमावत व प्रेम कुमावत या भाऊ बहीण यांनी आदिवासी समाजाला शाब्दिक अश्लील भाषा वापरत व्हिडिओ काढून पोस्ट करत कोणत्याही एका व्यक्तीला न बोलता समस्त आदिवासी समाजाला अपमानित करीत अपशब्द वापरुन आक्षेपार्ह शब्द वापरले असल्याचे म्हटले आहे असून सदर व्हिडिओ धारक हा इतर समाज असून त्याला सोशल मीडियावर ट्रोल करत असणाऱ्या व्यक्ती विरोधात कुमावत यांनी गुन्हा दाखल करावा असे म्हटले आहे.शेवटी आदिवासी समाजाला खालच्या दर्ज्याची वागणूक देत आदिवासी समाजाची इज्जत,औकात काढल्याने सदर वक्तव्य हीन दर्जाचे असून संविधानाच्या कलमा नुसार अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा आदिवासी संघटना जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

       निवेदनावर महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख दिपक अहिरे , तालुकाध्यक्ष भैय्या मोरे,सोशल मीडिया जिल्हा प्रमुख सागर वाघ,युवा तालुकाध्यक्ष निहाल सोनवणे,एरंडोल शहर कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण जावळे,मधुकर सोनवणे दिपक मोरे वासुदेव भिल यांच्या सह्या आहेत.

लेबल:

बुधवार, १२ नोव्हेंबर, २०२५

15 हजाराच्या लाचेसाठी मुख्याध्यापकासह शिक्षकाने विकली लाज ; धुळे एसीबीने शिक्षण क्षेत्रातील लाचखोरीचा केला पर्दाफाश

 

15 हजाराच्या लाचेसाठी मुख्याध्यापकासह शिक्षकाने विकली लाज 

धुळे एसीबीने शिक्षण क्षेत्रातील लाचखोरीचा केला पर्दाफाश 

जनसंघर्ष न्यूज 

धुळे - जनता शिक्षण प्रसारक संस्था ,बेटावद ता. शिंदखेडा जि. धुळे संचलित महात्मा गांधी विद्यालय मांजरोद ता. शिरपूर येथे तक्रारदार उपशिक्षक या पदावर कार्यरत असून त्यांची 2023 पासून एक वर्षाकरिता वार्षिक वेतन वाढ स्थगित करण्यात आली होती तसेच त्यांना सेवेत बारा वर्षे पूर्ण होऊन देखील वरिष्ठ वेतनश्रेणी  लागू केले नसल्याने तक्रारदार यांनी यांनी शाळेचे मुख्याध्यापक कैलास सखाराम पाटील वय 52 यांची भेट घेऊन त्यांचा स्थापित केलेली वेतन वाढ व वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करणे बाबत विनंती केली असता मुख्याध्यापक कैलास पाटील यांनी तक्रारदारी यांच्या स्थगित केलेली वेतन वाढ व वरिष्ठ वेतन सगळ्यांना लागू करण्यासाठी उपशिक्षक गोपाळ पाटील यांच्याकडे 15000 रुपये द्यावे लागतील त्याशिवाय तुमचे काम होणार नाही असे सांगितल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालय येथे दूरध्वनी द्वारे माहिती दिली असता सदर माहितीवरून धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शिरपूर येथे जाऊन तक्रारदार यांची तक्रार नोंदवून घेतली. 

        वरील तक्रारीवरून दि. 6 नोव्हेंबर 2025 रोजी पडताळणी केली असता लाचखोर मुख्याध्यापक कैलास सखाराम पाटील यांनी तक्रारदार यांना त्यांच्या कामाबाबत उपशिक्षक गोपाल रघुनाथ पाटील वय 47 यांना भेटण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी आरोपी नंबर 2 गोपाल रघुनाथ पाटील यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष 15000 रुपये लाचेची मागणी करून लाज स्वीकारण्याचे मान्य केले असता त्यानंतर दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापडा रचून महात्मा गांधी विद्यालय मांजरोद ता. शिरपूर येथे कार्यरत असलेले उपशिक्षक गोपाल रघुनाथ पाटील वय 47 यांना तक्रारदार यांच्याकडून 15000 रुपये लाचेची रक्कम स्वतः स्विकारत असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

        सदर कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपअधीक्षक ला.प्र.वि. धुळे त्यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, पोहेकाॅ. राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, पोकॉ. मकरंद पाटील , प्रवीण पाटील ,प्रशांत बागुल, सागर शिर्के ,रितेश चौधरी,मपोकॉ. रेश्मा परदेशी, पोहेकॉ. सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी यशस्वी केली.

      लाचलुचप प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईने शिक्षण क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ज्या शाळेत पालक आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी शाळेत पाठवतात ज्या शाळेला महापुरुषाचे नाव आहे. अशा या महात्मा गांधी विद्यालय मांजरोद येथे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगल्या धडे शिकविण्याचे सोडून स्वतः मुख्याध्यापक शेणखत असल्याने पालकांमध्ये संतापाची लाट तयार झाले आहे.

लेबल: , , , ,

मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५

धुळे जिल्ह्यात थंडीचा पारा 8 अंशावर जिल्ह्यातील सकाळच्या शाळा एक तास उशिरा भरवा - युवा सेनेची मागणी

 

धुळे जिल्ह्यात थंडीचा पारा 8 अंशावर जिल्ह्यातील सकाळच्या शाळा एक तास उशिरा भरवा - युवा सेनेची मागणी 

जनसंघर्ष न्यूज

धुळे - शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरल्याने थंडीचा पारा आठ अंशावर गेला असून याचा परिणाम संपूर्ण जिल्ह्यातील सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर होत असून त्यांना शाळेत वेळेवर पोहोचण्यासाठी हाल सोसावे लागत आहेत यासाठी विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन सकाळच्या सत्रात भरणाऱ्या शाळांचे वर्ग एक तास उशिराने भरावेत अशी मागणीचे निवेदन युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश मराठे यांनी प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहे. 

        प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात जास्त थंडी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये धुळ्याचा समावेश आहे. रात्री ९ नंतर रस्ते निर्मनुष्य होतात. सकाळी देखील थंडीचे प्रमाण जास्त असते. थंडीतहीप्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना सकाळी ६ वाजेला उठून शाळेची तयारी करावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहे. दरवर्षी जानेवारी नंतर थंडीची चाहुल लागते. परंतु यंदा नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यातच तापमानाचे प्रमाण कमी झाल्याने थंडीच्या प्रमाणातजास्त वाढ झाली आहे. यामुळे भर दुपारी सुद्धा थंडी वाजत आहे. तर सकाळी ७.१५ ला शाळेतील विद्यार्थी शाळेत जाणार कसे? वातावरण बदलामुळे भर थंडीत विद्यार्थ्यांना सकाळी शाळेत जावे लागते यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होवू शकतो. पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या हिताकरीता शालेय वेळापत्रकात बदल करण्यात यावा. सकाळच्या सत्रातील सर्व वर्ग मराठी, इंग्रजी, महानगरपालिकेच्या शाळा तसेच सर्व माध्यमातील शाळांचे वेळापत्रक बदलणे गरजेचे आहे. जिल्ह्याच्या तापमानाचा पारा ८ ते १२ अंश सेल्सियस असे पर्यंत सकाळच्या सत्रात भरणारे सर्व वर्ग उशीराने भरविण्याच्या तात्काळ सुचना सर्व शासकिय व खाजगी शैक्षणिक संस्थांना शिक्षणाधिकाऱ्यांनी द्यावेत अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख योगेश मराठे, महानगरप्रमुख अमित खंडेलवाल, उपमहानगरप्रमुख चेतन धामेचा, प्रतिक शिंदे, अनिल ठाकुर, उपमहानगरप्रमुख राहूल ठाकुर, शुभम पाटील, राकेश चव्हाण, कल्पेश चौधरी, दिगंबर कासार, दिनेश चव्हाण, नितीन धनगर, देवेंद्र गायकवाड, केतन शेलार, सुमित चौधरी, राम चोपडेकर, नितीन मराठे, आकाश पाटील, प्रविण मराठे, राहुल मोरे, आदित्य वानखेडे, सागर पाटील यांनी केली आहे.

लेबल: , ,