शनिवार, ३१ मे, २०२५

खोली क्रमांक 102 मधील एक कोटी 84 लाख च्या घबाड प्रकरणी देवेंद्र फडणवीस गप्प का ? शिवसेना नेते खासदार संजय राऊत

 

खोली क्रमांक 102 मधील एक कोटी 84 लाख च्या घबाड प्रकरणी देवेंद्र फडणवीस गप्प का ? 

               शिवसेना नेते खासदार संजय राऊत

जन संघर्ष न्यूज 


          धुळे - माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी धुळ्यातील गुलमोहर रेस्ट हाऊस येथील खोली क्रमांक 102 मधील 1 कोटी 84 लाख 84 हजार चे घबाड उघडकीस आणून दिले याचे पडसाद राज्यासह देशात सध्या धुळ्यातील खोली क्रमांक 102 प्रकरण  प्रचंड गाजत आहे. एखादा रहस्यमय सिनेमा निघावा इतकं हे प्रकरण गंभीर आहे असं शिवसेना उबाठा नेते खासदार संजय राऊत धुळ्यात पत्रकार परिषदेत म्हणाले. आगामी निवडणुकांबाबत शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या मेळाव्यासाठी खासदार संजय राऊत हे शनिवार दिनांक 31 मे रोजी धुळ्यात आले होते. मेळाव्यापूर्वी त्यांनी गुलमोहर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर आपली स्पष्ट भूमिका मांडली. यात प्रामुख्याने धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मधील कॅश कांड प्रकरणावरच त्यांनी जास्त भाष्य केलं. नुकताच गुन्हा दाखल झाल्यानंतर जेलीत गेलेले कामराज निकम यांच्या प्रकरणावर देखील खासदार राऊत यांनी पोलिसांनी सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले. पालकमंत्र्यांसाठी आव्हान ठरलेले कामराज निकम यांना सत्तेचा गैरवापर करून गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात आली. हीच तत्परता पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी खोली क्रमांक 102 प्रकरणाबाबत का दाखविली नाही. गुन्हा दाखल करण्यासाठी याबाबत तब्बल नऊ दिवस का लागले. विधिमंडळाची अत्यंत महत्त्वाची असलेल्या अंदाज समितीला नजराना सादर करावा लागतो. या समितीचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार खोतकर अगोदर आमच्या पक्षात होते. ते तिकडे का गेले. कारण त्यांना ईडीची मोठी भीती होती. मुळातच भ्रष्टाचाराची पार्श्वभूमी असल्याने ते भ्रष्टांच्या गटात गेले. खोली क्रमांक 102 बाबत मुख्यमंत्र्यांनी नेमलेली एसआयटी आहे कुठे. आता गुन्हा दाखल झाला आहे तर एसआयटी हवी कशाला असा प्रश्नही खासदार राऊत यांनी उपस्थित केला. या प्रकरणात माजी आमदार अनिल गोटे हे मुख्य साक्षीदार आहेत. त्यामुळे खोली क्रमांक 102 प्रकरण दडपण्याचे कितीही प्रयत्न झाले तरी ते आम्ही होऊ देणार नाहीत. आम्ही लढतोय आणि लढत राहू यास बरोबर कामराज निकम प्रकरण देखील आम्ही सोडवू. खोटे गुन्हे दाखल करून आमचं मनोबल खच्चीकरण कुणीही करू शकत नाही. अशा अनेक प्रयत्नांमुळे आम्ही अगदी कणखर झालो आहोत. त्यामुळे लढणे आमची सवय आहे असंही खासदार राऊत म्हणाले. पत्रकार परिषदेला माजी आमदार अशोक धात्रक, माजी आमदार अनिल गोटे, अद्वय हिरे, शुभांगी पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

शुक्रवार, ३० मे, २०२५

ग्रीन धुळे वृक्ष टीमचा 1 जून रोजी सीडबॉल निर्मिती आणि वृक्षारोपण महायज्ञ उपक्रम


                 निसर्गाची हाक, धुळेकरांची साथ! 

ग्रीन धुळे वृक्ष टीम घेऊन येत आहे सीडबॉल निर्मिती आणि वृक्षारोपण महायज्ञ!

                धुळे - शहरातील निसर्गप्रेमींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि प्रेरणादायी बातमी! ग्रीन धुळे वृक्ष टीम येत्या रविवार, ०१ जून २०२५ रोजी एका भव्य सीडबॉल निर्मिती आणि वृक्षारोपण महायज्ञाचे आयोजन करत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून धुळे शहरातील नागरिकांना केवळ वृक्षारोपणात सहभागी होण्याची संधी मिळणार नाही, तर माती आणि बियांचा योग्य वापर करून प्रभावी सीडबॉल कसे तयार करायचे याचे विशेष प्रशिक्षण तज्ञांकडून प्राप्त होणार आहे.

हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम निसर्गरम्य चांडक फार्म, धुळे येथे सकाळी ८:३० ते दुपारी १२:०० या वेळेत आयोजित केला जाईल. ग्रीन धुळे वृक्ष टीमचा मुख्य उद्देश आपल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहराला अधिक हिरवेगार, सुंदर आणि पर्यावरणास अनुकूल बनवणे आहे. या उदात्त कार्यात प्रत्येक धुळेकर नागरिकाचा सक्रिय आणि उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे.

ग्रीन धुळे वृक्ष टीमच्या एका जबाबदार सदस्याने या उपक्रमाच्या व्यापक दृष्टिकोनाबद्दल माहिती देताना सांगितले, "आम्ही या उपक्रमाला केवळ एक औपचारिक वृक्षारोपण मोहीम म्हणून पाहत नाही. आमचा प्रयत्न आहे की, शहरातील प्रत्येक नागरिकाला निसर्गाच्या जवळ आणावे, त्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगावे आणि स्वतःच्या हाताने निसर्गासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची संधी द्यावी. सीडबॉल बनवण्याची कला शिकून आणि त्याचे रोपण करून प्रत्येकजण या चळवळीचा सक्रिय भाग बनू शकतो."

या विशेष कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना सीडबॉल बनवण्याची सोपी आणि वैज्ञानिक पद्धत शिकवली जाईल. कोणत्या प्रकारची माती वापरावी, बियांची निवड कशी करावी आणि सीडबॉलला योग्य आकार कसा द्यावा, याबद्दल तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यामुळे उपस्थितांना केवळ तात्कालिक वृक्षारोपणात मदत होणार नाही, तर भविष्यात ते स्वतः देखील सीडबॉल तयार करून वृक्षारोपण करू शकतील.

ग्रीन धुळे वृक्ष टीमने शहरातील सर्व सामाजिक संस्था, युवा गट, शालेय विद्यार्थी आणि जागरूक नागरिकांना या पर्यावरणपूरक महायज्ञात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आत्मीय आवाहन केले आहे. टीमचा दृढ विश्वास आहे की, जेव्हा शहरातील नागरिक एकजूट होऊन पर्यावरणासाठी कार्य करतील, तेव्हा धुळे शहर निश्चितच एक आदर्श आणि हरित शहर म्हणून नावारूपाला येईल. कार्यक्रमाच्या दरम्यान सहभागी नागरिकांसाठी स्वादिष्ट आणि पौष्टिक अल्पोपाहाराची व्यवस्था देखील करण्यात आली आहे, ज्यामुळे या उपक्रमात सहभागी होण्याचा अनुभव अधिक उत्साहवर्धक आणि आनंददायी होईल.

तर चला, धुळेकरांनो! रविवार, ०१ जून २०२५ रोजी चांडक फार्म येथे एकत्र येऊया आणि सीडबॉल बनवून आपल्या शहराच्या भविष्यासाठी हिरवीगार स्वप्ने साकार करूया. तुमच्या एका लहानशा प्रयत्नातून धुळ्याच्या पर्यावरणात एक मोठा आणि सकारात्मक बदल घडू शकतो!

स्थळासाठी QR कोड: (येथे उच्च रिझोल्यूशनचा आणि सहज स्कॅन करता येईल असा QR कोड समाविष्ट करावा)

जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा! या महत्त्वपूर्ण संदेशाला आपल्या सर्व मित्र-मंडळी, कुटुंबीय आणि ओळखीच्या लोकांपर्यंत पोहोचवा. आपल्या व्हॉट्सॲप ग्रुप्स आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्वरित शेअर करा! चला, एक हिरवे आणि सुंदर धुळे निर्माण करूया!

#ग्रीनधुळे #वृक्षटीम #सीडबॉलड्राईव्ह #वृक्षारोपण #पर्यावरण #धुळे #ChandakFarm #GreenDhuleVrukshTeam

गुरुवार, २९ मे, २०२५

शिवसेना नेते खा.संजय राऊत 31मे रोजी धुळे जिल्हा दौऱ्यावर


         शिवसेना नेते खा.संजय राऊत 31मे रोजी धुळे जिल्हा दौऱ्यावर 

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निमित्त पदाधिकारी व शिवसैनिकांशी साधणार संवाद 


धुळे - आगामी काळात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल फुंकले जाणार असुन यात धुळे महानगरपालिका सह धुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा जाहीर कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता असुन, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा शिवसेना उबाठा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी व शिवसैनिकांशी ते उद्या शनिवार दि.31 मे रोजी हॉटेल ऋतुराज रेल्वे स्टेशन समोर धुळे येथे सायंकाळी साडेपाच वाजता संवाद साधणार आहेत, या शिवसंवादात शिवसेना उपनेते धुळे जिल्हा संपर्कप्रमुख मा.आ.अशोक धात्रक, उपनेते अद्वय हिरे, उपनेत्या शुभांगी पाटील, मा.आ. अनिल गोटे, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, माजी जिल्हाप्रमुख भूपेंद्र लहामगे ,मा.महापौर भगवान करणकाळ, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी , प्रशांत भदाणे , विजय वाघ, तेजस गोटे नगरसेविका ज्योत्सना पाटील, मा.महानगर प्रमुख प्रफुल्ल पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, साय.5.00 वा गुलमोहर विश्रामगृह संतोषी माता चौक येथे ते मिडिया व पत्रकार बांधवांशी संवाद साधणार आहेत.

सदर शिवसंवाद कार्यक्रमास शिवसेना,युवा सेना, महिला आघाडी, वाहतूक सेना, शिक्षक, आरोग्य, ग्राहक संरक्षण, विधी न्याय सेना ,कामगार सेना यांचें जिल्हा व महानगर प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, उपस्थितीचे अवाहन महानगर प्रमुख धीरज पाटील, उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील,युवा सेनेचे हरिष माळी,कुणाल कानकाटे, मनोज जाधव,सिध्दार्थ करंकाळ, महिला आघाडी संगीता जोशी,जयश्री वानखेडे, तारका विवरेकर, अरुणा मोरे , सुनिता शिरसाट, ज्योती चौधरी विधी सेनेचे एड. जगदीश माळी, वाहतूक सेनेचे भूषण पाटील, आरोग्य सेना शुभम मतकर, शिक्षक सेनेचे जे पी बडगुजर, अनिल चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख, विधानसभा संघटक ललित माळी, शहर संघटक संदीप सूर्यवंशी, गुलाब माळी  ,नितीन शिरसाठ,  रवींद्र काकड, मोहनसिंग तणवाणी , सुनील पाटील, राजु ढवळे ,निंबा मराठे, विनोद जगताप, आनंद जावडेकर, सुभाष मराठे, एड. राजू गुजर, मा. उपनगराध्यक्ष दिलीप साळुंखे, जवाहर पाटील, अण्णा फुलपगारे , दिलीप चित्ते, डॉ. अनिल पाटील, आबा भडागे, रामदास कानकाटे, विजय छल्लाणी, बाबुभाई पटेल, शेखर वाघ, महादू गवळी, कपिल लिंगायत , शिवाजी शिरसाळे, मुन्ना पठाण ,विकास शिंगाडे,  सुनील चौधरी, कैलास मराठे ,काळू गावडे ,राजू देवरे, हिमांशू परदेशी, दिनेश पाटील, मनोज शिंदे,  संदीप चौधरी, सागर निकम ,पिनू सूर्यवंशी, मनोज वाले, चंद्रकांत हजारे, सलीम लंबू, डॉ .सोमनाथ चौधरी, निलेश कांजरेकर ,अजय चौधरी इस्तीयाक अंसारी , नितीन जडे सोनार ,नंदू उचाळे ,दीपक मोरे ,प्रवीण पाटील, रोहित धाकड, विष्णू जावडेकर , अनिल चौधरी, चिलू आवळकंठे, एड. भूषण पाटील, भोला गोसावी , दीपक जाधव, सचिन रुंणवाल, पिंटू ठाकूर, किरण भुरे, अनिल शिरसाट, अक्षय पाटील, अमोल ठाकूर , संजय पिंगळे, बाळू शेंडगे, राजेंद्र शिंत्रे सर, विजय जवराज, मनीष थोरात, वामन मोहिते आदींनी उपस्थितीच्या आव्हान केले आहे. 

लेबल: , , ,

शासकीय विश्रामगृह कोट्यावधींचे घबाड प्रकरणी प्रशासनाचा हलगर्जीपणा ; शिवसेना आक्रमक

 

शासकीय विश्रामगृह कोट्यावधींचे घबाड प्रकरणी प्रशासनाचा हलगर्जीपणा, शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

तपास नाशिक ए.सी.बी आयुक्तां कडे वर्ग करण्याची मागणी 


          धुळे -  नुतन  जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात येऊन, शासकीय विश्रामगृह गुलमोहर येथील दि. 21मे रोजी धुळ्यात गुलमोहर रेस्ट हाऊस  येथील रुम नं. 102 मध्ये 1,84,84,000 रु. चे घबाड सापडले. माजी आ.अनिल गोटे यांना गुप्त माहिती मिळाली होती. विधानमंडळाची अंदाज समितीचा दौरा सुरु होता.  समिती अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील हे या रेस्ट हाऊसमध्ये दि. 15 मे पासून राहत  होते. पांझरा या  सुटमध्ये मुक्कामी होते व रुम नं. 102 ही रुम ते जिल्ह्यातील अधिकार्‍यांकडून खंडणी वसुली कामासाठी वापरत होते. दि. 21 मे पर्यंत त्यांनी 5 कोटी  रु. च्या वर खंडणी जमा केली. ते वापरत असलेल्या2-3 मोबाईलच्या माध्यमातून भ्रष्ट अधिकार्‍यांच्या नित्कृष्ट, अनागोंदी, बोगस किंवा झालेल्या कामाच्या गैरप्रकारांवर पांघरुण घालण्यासाठी  महानगरपालिका सा.बां. विभाग, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय अशा जवळपास सर्व  शासकीय कार्यालयातील अधिकार्‍यांना फोन करुन खंडणी मागत होते व अधिकारी निमुटपणे आणून देत होत.

 यापैकी अनेक फोन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आरडीसी च्या कॅबीनमधून देखील केले आहेत. हे अतिशय गंभीर व धक्कादायक आहे. किशोर पाटील हे 15-20 वर्षांपासून अंदाज  समितीचे स्वीय सहाय्यक राहिले आहेत. त्यांना एवढ्या वर्षांचा खंडणी गोळा करण्याचा अनुभव आणि अधिकारी देखील पैसे देऊन भ्रष्ट व निकृष्ट कामे करतात. हापायंडा पडला आहे.

 दि. 21 मे रोजी मा.आ.अनिल गोटे व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांसह सायं. 6 वा. रुम नं. 102 ला घेराव टाकला. किशोर पाटील त्या रुमला  स्वत:चे कुलूप लावून फरार झाले  होते.

 त्यामुळे या रुममध्ये कोट्यावधी रु. आहेत. याबाबत शंकाच नव्हती. म्हणून श्री.गोंटे यांनी  जिल्हा पोलीस अधिक्षकांना फोन लावला व या रुमची झडती  घेवून कारवाई करण्यासंबधी मागणी केली. बर्‍याच प्रयत्नांनंतर रात्री 11 वाजेनंतर उपअधिक्षक श्री.काळे, तहसिलदार व इतर अधिकारी त्या ठिकाणी आले. रुम नं. 102 चे कुलूप तोडण्यात आले. यावेळी नरेंद्र परदेशी यांना त्याठिकाणी  मध्ये पंच म्हणून आत घेण्यात आले होते.

 पोलीस अधिकारी सोबत नरेंद्र परदेशी आत गेले तेव्हा रुम मध्ये काही 7-8 प्रवासी बॅगा आढळल्या. त्या रिकाम्या होत्या.   1-2 बॅगामध्ये 1-2 कपडे होते. सर्व रुम, बाथरुम चेक केले. तेथे काही नव्हते. मात्र रुमच्या एका कोपर्‍यात एक तपकिरी रंगाचे कपाट होते. श्री.काळे यांनी ते उघडले. त्या कपाटात मात्र 15-16 बॅगा, पिशव्या (काही कापडी, काही प्लास्टीक) आढळून आल्या. त्या उघडून पाहिल्या असता त्या नोटांनी भरलेल्या होत्या. विमलची बॅग तर पूर्ण 500 रु. च्या नोटांनी भरलेली होती.

  त्या सर्व नोटांची मशीन द्वारे मोजणी करण्यात आली. बॅगा 15-16 असल्या तरी काही बॅगा एकत्र केल्याने एकूण 12 बॅगांमध्ये रक्कम टाकून ते पोलीसांनी जप्त केले सिल लावले. सर्वपंचांच्या सह्या घेतल्या. या संपूर्ण कार्यवाहीचे कुलूप तोडल्यापासून ते बॅगा पोलीसांनी रुम मधून घेवून जात असल्यापर्यंत सरकारी कॅमेराने व्हीडीओ शुटींग करण्यात आले.

  सदर कार्यवाही रात्रभर व सकाळी5 वाजेपर्यंत चालली. शेकडो शिवसैनिक, नागरिक, पत्रकारांसमोर हे सर्व घडत होते.

  विधीमंडळ समितीच्या अंदाज समितीमार्फत किशोर पाटील हा प्यादा... सर्व सरकारी कार्यालयातील प्रमुख अधिकार्‍यांकडून पैसे अंदाज समितीला पुरविण्यासाठीच खंडणी स्वरुपात गोळा करीत होता हे सिध्द  गोष्ट होय. महत्वाचे म्हणजे आम्ही रुम नं. 102 ला घेराव घालण्यापूर्वी 2-3 तास अगोदर किशोर पाटीलला सुगावा  लागल्याने तो त्यापेक्षा दुप्पट रक्कम घेवून पसार झाला.

 धुळे जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालतो. कामे न करताच बिले उपटली जातात, किंवा इस्टीमेटच्या  20% देखील काम न करता  नित्कृष्ट बोगस कायदेशीर कामे केली जातात. महापालिकेमध्ये हा भ्रष्टाचार प्रचंड मोठ्या प्रमाणात चालतो. ज्या विमलच्या पिशवीत 90 लाख रु. आढळले ती पिशवी महापालिकेची होती. तोवर सांकेतिक भाषेत एम-90 असे लिहिले हेाते. ही चर्चा खुलेआम महापालिका आवारात ऐकायला मिळते.

  महापालिकेतील  बोगस कामाविरुध्द श्री.अनिल गोेटे यांनी असंख्य  भ्रष्टाचाराची प्रकरणे घेवून याचिका दाखल केली आहे. कारण अनिल गोटे व नरेंद्र परदेशी यांनी किमान 30 अतिशय गंभीर प्रकरणे पुराव्यासह  तक्रार दाखन करनही दखल घेण्यात आली नाही. त्याची पुरेपुर किंमत 90 लक्ष रु. घेवून अंदाज समितीने या निमित्ताने वसुल केली आहे. भ्रष्टाचार असा दडपला जातो याचे हे उत्तम उदाहरण  होय.

  धुळे रेस्ट हाऊसमध्ये 1.84 कोटी रु. अंदाज समितीच्या स्वीय सहाय्यकाने विविध शासकीय अधिकार्‍यांमार्फत उकळले ही बातमी रात्रभर न्यूज चॅनलवर सुरु होती. राज्यात खळबळ माजली. अनेक प्रश्‍न उपस्थित होवून लागले मा.मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी एसआयटी स्थापन करु असे म्हटले. मा.अनिल गोटे यांनी प्रशासन, सरकारवर अनेक आरोप कले. परंतु उत्तरे मिळत  नव्हती. किमान अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हादाखल व्हावा अशी मागणी  होत असतांना सरकारने किशोर पाटलांना निलंबित केले. मात्र गुन्हादाखल केला नाही. ही रक्कम कोणा-कोणाकडून जमा केली ? कोणाला देण्यासाठी जमा केली  ? एवढी रक्कम कोणाला देण्याची कारण काय ? किशोर पाटलांना ही रक्कम कोणी गोळा करायला सांगितली ? त्याबरहुकूम किशोर पाटलांनी ती रक्कम गोळा करण्याची धुळे आरडीसी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, गुलमोहर  रेस्ट हाऊस येवून कोणाकोणाला फोन लावले ? त्याने त्यासाठी किती व कोणते मोबाईल फोन व टेलिफोन वापरले त्यांचे नंबर काय ? दि. 15 मे पासून किशोर पाटील धुळ्यात होता. तेथपासून ते दि. 21 मे पर्यंत किशोर पाटील यांच्या व त्याने लावलेले फोन, मोबाईलचे सीडीआर पोलीसांनी मागविले का ? गुलमोहर रेस्ट हाऊस व जिल्हाधिकारी कार्यालय येथील दि. 15 मे ते 21 मे पर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले का  ? या काळातील किशोर पाटलांचे मोबाईल लोकेशनचा डाटा तपासला  का  ? ज्याप्रमाणे पोलीस  एखाद्या अज्ञान व्यक्तीचा पार जंगलात खून झाल असेल, ओळख पटत नसेल मृतदेहाचा... तर मृतदेहाच्या  कापडावरुन माग काढला  जातो. त्याप्रमाणे या घटनेत जप्त केलेल्या  पिशव्या व काही 7-8 रिकाम्या  बॅगा, त्यातील कपडे इ. माध्यमातून पोलीसांनी तपास केला काय? जेवढ्या पिशव्या तेवढेच ते देणारे असतील हे स्पष्ट असतांना पिशवी, बॅगा हे चौकशी कामी महत्वाचा पुरावा आहे, त्या दृष्टीने तपास झाला काय ?

  सदर समितीचे सदस्य, शासकीय विश्रामगृहात न थांबता धुळ्याच्या अतिशय महागडड्यज्ञा अशा टॉप लाईन हॉटेल जी स्थानिक आमदाराच्या मालकीची आहे. तेथेच थांबण्याचे कारण काय? तेथे राहण्याचा, खाण्यापिण्याचा खर्च कोणी व का केला ? हॉटेल कोणी बुक केले ? पैसे कोणी दिले? हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले काय ?

  ज्या नोटा जप्त केल्या., त्यामध्ये 100 व 500 रु. चे काही कोरे करकरीत बँकोचे कोणत्या खात्यातून काढल्या किंवा प्रेेस  कट नोटांच्या क्रमांकाची सिरीयल तपासून कोणत्या बँकेतून काढण्यात आल्या, ते खाते कुणाचे ? हे तपासले का ?

  अशा प्रकारे पैसे गोळा करुन लाच देणारे अधिकारी हे त्या त्या खात्यातील नामचीन होते. त्याची उघड चर्चा होत असते, ती चर्चा पोलीसांपर्यंत जात  नाही का ? किंवा हे सर्व प्रश्‍न किशोर पाटलांची लाय डिटेक्टर टेस्ट केली तर उत्तरे सापडतील ? हे का होत नाही ?

   या घटनेमुळे जनतेच्या मनावर विपरीत परिणाम व शासनाबद्दल घृणा, अविश्‍वास  निर्माण होणे लोकशाहीला घातक आहे. राज्याचे विधीमंडळाचे पावित्र्य त्यामुळे धोक्यात आले आहे. विधीमंडळाचे सर्वोच्च कर्ता  धमर्ता जर अशा लांछनास्पद घटनेकडे दुर्लक्ष करीत असतील तर त्यांचीही अशा खंडण्या गोळ्या करण्यासाठी मुकसंमती आहे असा संदेश जाईल.

    एकीकडे मा.मुख्यमंत्री एसआयटी स्थापन करण्याची घोषणा करतात, दुध का दुध पानी का पाणी करु अशी शेरेबाजी करतात. विधानसभेचे अध्यक्ष श्री.नार्वेकर गुन्हा दाखल करण्यासाठी आदेश देतात. विधानपरिषदेचे सभापती श्री.राम शिंदे देखील गुन्हा दाखल करा म्हणून सुचना करतात. त्या गोश्टीला 4 दिवस उलटूनही गुन्हा  दाखल होत नाही, तर आम्ही समजायचे काय ? की तू मारण्यासारखे कर, आम्ही रडल्यासारखे करतो. असे शासन व प्रशासनाने ठरवले आहे.

      विधीमंडळाची खूप बदनामी होत आहे. वरील प्रश्‍नाची उत्तरे आ वासुन उभी आहेत. राज्याच्या सर्वोच्च सभागृहाची बदनामी म्हणजे देशात महाराष्ट्र हा क्रूर चेष्टांचा विषय होईल ? विधीमंउळाच्या संसदीय परंपरेला व पवित्रतेला लागलेला कलंक पुसून टाकण्यासाठी वरील प्रश्‍नांची उकल झाली पाहिजे. मुठभर लोकांनी केलेल्या  पापामुळे विधीमंडळाच्या गौरवशाली लौकीक लयास जाता  कामा नये. महाराष्ट्राची मान या घटनेमुळे शरमेने झुकली आहे. पुन्हा ताठ मानेने हा महाराष्ट्र उभा राहायचा असेल तर.. हे प्रकरण नाशिक एसीबी, आयुक्तांकडे सोपवावे , अशा मागण्यांचे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल  सोनवणे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील,  भरत मोरे ,प्रशांत भदाणे, निंबा नाना मराठे,आनंद जावडेकर, कपिल लिंगायत, अनिल चौधरी, सिद्धार्थ अहिरे, केतन भामरे, दीपक वाघ, अनिल शिरसाट,तेजस सपकाळ आदींनी दिले.

लेबल: , , ,

सहावर्षीय अलिनासाठी आमदार अनुपभय्या अग्रवाल ठरले `देवदूत’ !

 



सहावर्षीय अलिनासाठी आमदार अनुपभय्या अग्रवाल ठरले `देवदूत’ !

`एबी फाउंडेशन’च्या वैद्यकीय सेवाभावी उपक्रमातून केली मदत;

दोन महिन्यांपासून होणाऱ्या किडनीच्या असहाय वेदनांतून मुक्तता



              धुळे : - दोन ते अडीच महिन्यांपूर्वी अवघ्या सहा वर्षांच्या बालिकेला किडनीच्या इन्फेक्शनचा त्रास सुरू झाला. यातून लेकीचे होणारे हाल पालकांचे काळीज कुरतडत होते. या त्रासातून लेकीची सुटका व्हावी म्हणून पालकांच्या तिच्यावर उपचारांसाठी आज या रुग्णालयात तर उद्या त्या रुग्णालयात अशा खेपा सुरू झाल्या. विविध रुग्णालयांच्या पायऱ्या झिजवल्या. तिच्यावर शस्रक्रियेसह उपचारांसाठी सुमारे लाखभर रुपये खर्च येणार होता. मात्र, इतकी मोठी रक्कम उभारणे शक्य नव्हते. शासनाच्या वैद्यकीय योजनांचा लाभ घ्यावा म्हटले, तर कागदपत्रांची पूर्तता नव्हती. यामुळे बालिकेला वेळेवर उपचार मिळू शकत नसल्याने तिला होणारा त्रास दिवसेंदिवस वाढतच गेला. यामुळे हतबल झालेल्या पालकांपुढे आता काय करायचे आणि कुठे जायचे, असा मोठा प्रश्न आ वासून उभा राहिला होता.

धुळे शहरातील नंदी रोडवरील शिवाजीनगरमधील पॉवरलूम मजूर आतिक मोहंमद शरीफ अन्सारी यांच्या सहावर्षीय अलिना या बालिकेची ही कहाणी. अखेर धुळे शहराचे कार्यसम्राट आमदार, धर्मयोद्धा अनुप अग्रवाल यांनी तसेच ते आश्रयदाते असलेल्या एबी फाउंडेशनने अलिनाला वैद्यकीय उपचारांसाठी मदतीचा हात दिला आणि तब्बल दोन महिन्यांपासून होत असलेल्या ससेहोलपटीतून तिची अवघ्या चार दिवसांत सुटका करत तिला जीवदान दिले. आमदार अनुपभय्यांच्या या सामाजिक बांधिलकीमुळे गहिवरलेल्या आतिक अन्सारी आणि अलिना अन्सारी या बापलेकीच्या चेहऱ्यावरील भाव त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत होते.

 

उपचारांत का आल्या अडचणी?

अलिनाला दोन ते अडीच महिन्यांपासून किडनी इन्फेक्शनचा मोठा त्रास सुरू झाला. अलिनाचे वडील आतिक अन्सारी यांनी तिच्यावर योग्य ते उपचार व्हावेत म्हणून विविध रुग्णालयांच्या पायऱ्या झिजवायला सुरवात केली. खासगी रुग्णालयांत त्यासाठी सुमारे एक लाखांचा खर्च सांगण्यात आला. मात्र, तेवढी मोठी रक्कम कशी उभी करणार, असा प्रश्न अन्सारी यांच्यापुढे होता. त्यामुळे त्यांनी शासनाच्या विविध वैद्यकीय योजनांच्या माध्यमातून उपचारांसाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, त्यासाठी आवश्यक कुठलीच कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था अन्सारी कुटुंबीयांची झाली. 


एबी फाउंडेशनची मिळाली माहिती

आतिक अन्सारी यांना धुळे शहराचे कार्यसम्राट आमदार अनुप अग्रवाल यांनी एबी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू केलेल्या वैद्यकीय सेवाभावी उपक्रमाची माहिती मिळाली. त्यांनी शहरातील जुन्या महापालिकेजवळील एबी फाउंडेशनचे कार्यालय गाठले. तेथे आमदार अग्रवाल व फाउंडेशनचे समन्वयक कमलेश देवरे यांची भेट घेत अलिनावर ओढवलेला प्रसंग आणि त्यासाठी विविध रुग्णालयांत कशी ससेहोलपट झाली, याची आपबिती सांगितली. एवढा प्रचंड त्रास होत असताना अलिनाला कुठल्याच रुग्णालयात दाखल करून का घेण्यात आले नाही, याची समन्वयकांनी माहिती घेतली असता त्यांना धक्काच बसला. अलिनाच्या पालकांनी शिधापत्रिकेमध्ये अलिनाच्या नावाचा समावेशच केलेला नव्हता. तसेच त्यांच्याकडे अलिनावर उपचारांसाठी आवश्यक आयुष्यमान भारत हेल्थ कार्डही नव्हते. तिच्या आधार कार्डच्या ई केवायसीची पूर्तताही केलेली नव्हती. त्यामुळे अलिनाला शासनाच्या कुठल्याच वैद्यकीय सेवा योजनेचा लाभ मिळू शकला नाही. 


फाउंडेशनने केली कागदपत्रांची पूर्तता

आमदार अनुपभय्यांनी सर्वप्रथम फाउंडेशनच्या समन्वयकांना आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची तातडीने पूर्तता करण्याची सूचना केली. त्यानुसार समन्वयक देवरे व त्यांचे सहकारी निलेश चौधरी यांनी अवघ्या तीन ते चार दिवसांतच सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. यामध्ये अलिनाचे शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करणे, आधार कार्डची ई-केवायसी करणे, तसेच आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड केले. 

सेवा हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया, उपचार

कागदपत्रांची पूर्तता करेपर्यंत अलिनाला प्रचंड त्रास होत होता. त्यामुळे सुरवातीला हा त्रास कमी करण्यासाठी काही इंजेक्शन व औषधे देण्यात आली. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर अलिनाला शहरातील सेवा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉ. राजेश अग्रवाल व त्यांच्या टीमने अलिनावर तातडीने उपचार सुरू केले. तसेच तिच्यावर यशस्वी शस्रक्रियाही करण्यात आली. तब्बल दोन महिने होणाऱ्या त्रासामुळे अलिनाचे खूप हाल होत होते. ते उघड्या डोळ्यांनी पाहताना अलिनाच्या पालकांचे मन खूप खचत होते. मात्र, आमदार अग्रवाल यांच्यामुळे अलिनावर तातडीने उपचार करणे शक्य झाल्याने तिच्या पालकांनी आमदार अग्रवाल व एबी फाउंडेशनचे शतशः आभार मानले. तुमचे उपकार शब्दांतून फेडणे शक्य नसले तरी तुम्ही आमच्यासाठी देवदूत म्हणूनच धावून आलात. तुमच्यामुळेच आज लेकीला नव्याने जीवन प्राप्त झाल्याची भावनाही आतिक अन्सारी यांनी व्यक्त केली. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी आमदार अनुप अग्रवाल यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली.


अशी झाली `एबी फाउंडेशन’ची स्थापना

भाजपचे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष तसेच धर्मयोद्धा म्हणून काम करताना पूर्वीपासूनच आमदार अनुप अग्रवाल यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवत विविध शासकीय योजनांसह वैयक्कित दातृत्वातून शहरातील गोरगरीब, वंचितांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या गरजा पूर्तीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. यातूनच गेल्या विधानसभा निवडणुकीत शहरवासीयांनी विधानभवनात धुळे शहराचे प्रतिधित्व करण्याचा बहुमान अनुपभय्यांना दिला. आमदार म्हणून राजकीय कारकीर्दीत एक पाऊल पुढे टाकतानाच आमदार अनुपभय्यांनी धुळे शहरासह जिल्हाभरातील सर्वसामान्य, गरीब, वंचित घटकांतील गरजूंना आरोग्याच्या प्रश्नावर कुठलीच अडचण येऊ नये, कोणताही रुग्ण पैशांअभावी उपचारांपासून वंचित राहू नये, हा विचार सत्यात उतरविण्यासाठी एबी फाउंडेशनची स्थापना केली.

रुग्णांसाठी एबी फाउंडेशन बनले `देवदूत’

कुठलाही राजकीय अजेंडा, जात-पात, धर्म या सर्वांच्या पलीकडे जाऊन गेल्या सहा महिन्यांपासून फाउंडेशनचे रुग्णसेवेचे कार्य रात्रंदिवस अविरत सुरू आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यांत दुर्धर आजारांशी लढा देणाऱ्या हजारो रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यात यश आले. यात कॅन्सर, हृदयरोगासह विविध आजारांनी पीडित ३५० ते ४०० रुग्णांवर धुळे शहरातील विविध खासगी रुग्णालयांसह मुंबईतील टाटा, नायर, वाडिया, केईएम, जसलोक, हिंदुजा आदी नामांकित रुग्णालयांत उपचारांसह शस्रक्रिया करून त्यांना जीवनदान मिळवून देण्यात फाउंडेशनला यश आले. अनेक रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीसह शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेसह विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यातही फाउंडेशन अग्रेसर आहे. यामुळे रुग्णांसाठी एबी फाउंडेशन जणू देवदूतच बनले आहे. 



रुग्ण, नातेवाइकांनी संपर्क साधावा

धुळे महानगरासह परिसरातील दुर्धर आजारांचा सामना करणाऱ्या ज्याही रुग्णांना धुळे शहरासह मुंबईतील मोठ्या रुग्णालयांत वैद्यकीय उपचारांची, शस्रक्रियेची गरज असेल त्यांनी शहरातील जुन्या महापालिकेमागील एबी फाउंडेशनच्या कार्यालयात संपर्क साधावा. तेथे नावनोंदणी करून सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी. जेणेकरून रुग्णांवर अत्यावश्यक ते उपचार वेळेत करता येतील, असे आवाहनही आमदार अनुप अग्रवाल व एबी फाउंडेशनचे समन्वयक कमलेश देवरे यांनी केले.

               अलीनाचे वडील अतिक मोहम्मद अन्सारी           

माझ्या सहावर्षीय अलिनाला दोन महिने किडनीच्या इन्फेक्शनमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला. पैशांअभावी तसेच वैद्यकीय मदतीसाठी आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी तिच्यावर उपचार करण्यात अनंत अडचणी आल्या. मात्र, आमदार अनुपभय्यांनी मदतीचा हात पुढे करत अलिनाला तातडीने उपचार मिळवून दिले. एबी फाउंडेशनने तातडीने सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. यामुळेच आज माझ्या लेकीला जीवदान मिळाले आहे. आमदार अनुपभय्या आणि त्यांच्या एबी फाउंडेशनचे स्थान कायम आमच्या हृदयात राहील.





लेबल: , , , ,

शांतता कमिटीच्या बैठकीला गुन्हेगारांच येत असतील तर गुन्हेगारी संपणार कधी? हरिश्चंद्र लोंढे यांचा निवेदनातून एसपींना सवाल

               धुळे- शहरातील सुज्ञ नागरिकांनी जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत धिवरे यांना दि.२६ मे २०२५ रोजी निवेदन दिले. धुळेकर नागरिकांना शांततेचे जीवन जगण्याची अपेक्षा आहे. परंतु धुळे जिल्हा अनेक बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रात कुप्रसिद्ध होत आहे. त्यामुळे युपीचा बिहार, महाराष्ट्राचा बीड प्रमाणे धुळे जिल्ह्यात गुन्हेगारीकरण झपाट्याने वाढत असून, त्यामुळे गुंडांचे मनोबल वाढत आहे, शुल्लक कारणांवरून प्राणघातक हल्ले करणे, दहशत बसवण्यासाठी व्हिडिओ चित्रकरण करून ते प्रसारित करणे, व वरून अन्यायग्रस्त पीडितांचे विरुद्ध दरोडे व खंडणीचे गुन्हे दाखल करणे, असे प्रकार चालत आहेत. तसेच यातील बरेच गुंड गुन्हेगार हे पोलिसांमध्ये शांतता कमिटीच्या बैठकींना उपस्थित असतात. गुंड गुन्हेगारांचे शांतता कमिटीच्या निमित्ताने उठबस असल्याचे फोटो सोशल माध्यमांवर व्हायरल होत असतात. त्यामुळे सर्वसामान्य जनतेत भीतीचे वातावरण आहे. गुन्हेगारांचे मनोबल दिवसागणिक वाढतच आहे. गुंड व गुन्हेगारांमध्ये अवैध धंदेवाल्यांचे प्रमाण जास्त आहे. 

            सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी गुन्हेगारी गुंडगिरी थांबविणे व पीडीतांवरील खोटे गंभीर गुन्हे तपासात बी समरी करणे, व पीडीत अन्यायग्रस्तांना अटक करू नये, अशाच व्यावसायिक स्पर्धेतून दहशत वाजवण्यासाठी दिनांक २३ मे २०२५ रोजी ज्येष्ठ पत्रकार व व्यावसायिक श्री. मिलींद अवचित बैसाणे हे दलित आहेत, त्यांनी येथे व्यवसाय करू नये म्हणून सामूहिक रित्या कट रचून पाच ते सात गाव गुंडांनी एकट्याला हेरून बेदम मारहाण केली. दहशत वाजवण्यासाठी व्हिडिओ चित्रकरण करून प्रसारित केले. वरून मिलिंद बैसाणे यांच्यावर दरोडे सारखा खोटा गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी. व खोटा गुन्हा दाखल काढून टाकावा. अशा आशयाचे निवेदन धुळे शहरातील सुज्ञ नागरिकांच्या वतीने संविधान संरक्षण समितीचे प्रमुख श्री. हरिश्चंद्रअण्णा लोंढे, यांच्या हस्ते धुळे जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत धिवरे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी युवा विधीज्ञ अँड. संतोष जाधव, जितेंद्र पिंपळे, धनंजय गाळणकर, बबन वानखेडे, श्रीकृष्ण बेडसे, दीपकुमार साळवे, रामकृष्ण शिंदे, छोटूलाल मोरे आदी उपस्थित होते.

लेबल: , , ,

बुधवार, २८ मे, २०२५

बारीपाडा येथील पर्यावरण अभ्यास केंद्रात अभाविप चे "चला निसर्गाच्या सानिध्यात" उन्हाळी शिबीर संपन्न. पद्मश्री श्री चैत्राम पवार यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन


 

            साक्री -  पर्यावरण अभ्यास केंद्र बारीपाडा ता. साक्री येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व विकासार्थ विद्यार्थी धुळे विभाग आयोजित दिनांक 20, 21 व 22 मे या दरम्यान चला निसर्गाच्या सानिध्यात उन्हाळी सुट्टी शिबीर उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन पद्मश्री श्री चैत्राम पवार, अभाविप देवगिरी प्रदेश सहमंत्री वरुणराज नन्नवरे, अभाविप धुळे जिल्हा प्रमुख प्रा. डॉ. हेमंत जोशी, शिबिर प्रमूख चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

         उद्घाटन प्रसंगी पद्मश्री श्री चैत्राम पवार यांनी म्हणाले की, कास म्हणजे नक्की काय तर शुद्ध व सात्विक आहार मिळणे म्हणजे विकास आहे. आज विद्यार्थी व्यसनाधिनतेकडे जात आहे. हे रोखण्यासाठी अभाविप अशा शिबिराचे आयोजन नेहमी करत असते. वरुणराज नन्नवरे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवी मांडणी करत असताना गेली 76 वर्षापासून अभाविप शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असल्याचे सांगितले. या शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी जंगलभ्रमंती, वादविवाद स्पर्धा, भाषण सत्र, चर्चा सत्र, ग्रामीण खेळ, जनजाती जीवन अनुभव असे विविध सत्रात सहभागी होऊन नैसर्गिक वातावरण व स्वतःच्या ज्ञानामध्ये भर घालण्याचे काम केले.

             अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व आजचा शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी या विषयावर प्रा डॉ. हेमंत जोशी यांनी विद्यार्थ्यांना चर्चा केली. ऑपरेशन सिंदूर या विषयावर प्रा. बाजीराव पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर सोशल मीडिया योग्य की अयोग्य या विषयावर वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली. ग्रामीण खेळ व जनजाती जीवन अनुभव या बारीपाडा गावामध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवला. या शिबिराचे समारोप अभाविप नंदूरबार जिल्हा विद्यार्थी विस्तारक व धुळे जिल्हा संपर्क मंगेश ढगे यांनी केले. 

     या शिबिराच्या यशस्वीतेसाठी चंद्रकांत पाटील, चेतन पाटील, हर्षल सरक, दीपक सरक, रमेश सरक, हर्षल शिरसाठ यांनी मेहनत घेतले.

लेबल: , , ,

भाजपा जैन प्रकोष्ठकडून महानगरपालिका निवडणुकीची जय्यत तयारी सुरू ____________________________. “जैन समाज हा भाजपचा पारंपरिक मतदार” — राजेश पांडे

 

अधिक वाचा »

लेबल: , , , ,

विकासकामांच्या नावाखाली देवपुरात खड्ड्यांचे साम्राज्य! दौलत नगरमध्येही भुयारी गटारीनंतर रस्त्यांची दुर्दशा कायम ; प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष? -शिवसेना आक्रमक !

                 

           धुळे: - धुळे शहरात विकासकामांच्या नावाखाली नागरिकांचे हाल सुरूच असल्याचे दिसत आहे. देवपूर भागातील भूमिगत गटार योजनेनंतर रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था ताजी असतानाच, आता दौलत नगरमधील नागरिकांकडूनही याच प्रकारच्या तक्रारी येत आहेत. भुयारी गटारीचे काम पूर्ण होऊनही दौलत नगरमधील रस्ते दुरुस्त न केल्याने तेथील नागरिकांनाही प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शिवसेना विधानसभा संघटक ललित गंगाधर माळी यांनी या दोन्ही भागांतील रस्त्यांच्या दुर्दशेवर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले आहे.

देवपूरमध्ये नकाने रोडवरील रिया पेट्रोल पंपाजवळील महाकाय खड्ड्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेची पोलखोल केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून या भागातील रस्त्यांची अवस्था बिकट असून, पावसामुळे ते अधिक धोकादायक बनले आहेत. अनेक अपघात झाले असून, नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.

आता दौलत नगरमधील नागरिकांनीही रस्त्यांच्या दुर्दशेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भुयारी गटारीचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावर काळी माती पसरली आहे. त्यामुळे रस्ते निसरडे झाले असून, चालणेही कठीण झाले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना याचा मोठा फटका बसत आहे. देवपूरप्रमाणेच दौलत नगरमध्येही प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

ललित गंगाधर माळी यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, विकासकामांच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च झाले, मात्र रस्त्यांची गुणवत्ता आणि कामाची पद्धत यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भूमिगत गटारीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत आणि मोठे खड्डे तयार झाले आहेत. या कामावर देखरेख करणाऱ्या संबंधित यंत्रणांचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

निवडणुका जवळ आल्यावर विकासकामांचे मोठे दावे केले जातात, परंतु देवपूर आणि दौलत नगरमधील रस्त्यांची ही दयनीय अवस्था प्रशासनाच्या दाव्यांची पोलखोल करत आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजेकडे आणि त्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे हे गंभीर आणि अक्षम्य आहे, अशी भावना दोन्ही भागांतील नागरिक उघडपणे व्यक्त करत आहेत.

ललित गंगाधर माळी यांनी प्रशासनाला तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे आणि नागरिकांना दिलासा देण्याचे आवाहन केले आहे. जर प्रशासनाने यावर ठोस पाऊल उचलले नाही, तर शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

आता देवपूर आणि दौलत नगरमधील नागरिक अधिक जागरूक झाले आहेत. ते आपल्या समस्यांवर आवाज उठवण्यासाठी एकत्र येत आहेत. येत्या निवडणुकीत विकासकामांच्या नावाखाली केवळ आश्वासने देणाऱ्या आणि नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना योग्य धडा शिकवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

प्रशासनासाठी ही एक मोठी संधी आहे की त्यांनी तातडीने दोन्ही भागांतील रस्त्यांची दुरुस्ती करून नागरिकांचा विश्वास परत मिळवावा. अन्यथा, विकासकामांच्या नावाखाली झालेले हे खड्ड्यांचे साम्राज्य त्यांच्यासाठी निवडणुकीत अडचणीचे ठरू शकते. देवपूर आणि दौलत नगरमधील नागरिक आता केवळ आश्वासनांवर नव्हे, तर ठोस कृतीवर विश्वास ठेवणार आहेत असे शिवसेनेचे ललित माळी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

लेबल: , , ,

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत बसपाला चांगले यश मिळेल,प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न


स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत बसपाला चांगले यश मिळेल,प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न


  नंदुरबार - यावेळी आगामी येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये बहुजन समाज पक्ष संपूर्ण ताकदनिशी निवडणूक लढवावी व  निवडणुकीत बहुजन समाज पक्ष चांगल्या प्रकारे यश कसे मिळेवेल असे बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिलजी डोंगरे साहेब यांनी मार्गदर्शन केले . स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व संघटन मजबूतीच्या पार्श्वभूमीवर आज नंदुरबार येथे बहुजन समाज पक्षाची संघटनात्मक बैठक शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली. या बैठकीला बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी डोंगरे साहेब, विदर्भ झोन  इन्चार्ज मा.ईजि उयके साहेब , मालेगाव  नंदुरबार झोन इन्चार्ज मा . रमेशजी निकम , जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ब्राह्मणे, जिल्हा प्रभारी जितेंद्र तायडे, जिल्हा प्रभारी मनोजभाऊ वसईकर पक्षाचे प्रमुख पदाधिकारी  उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनिलजी डोंगरे साहेब यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद ,महानगरपालिका नगरपालिका निवडणुकीत बहुजन समाज पार्टी मोठ्या ताकदीनिशी उभी राहणार आहे. बहुजनांचे नेतृत्व अनेक वेळा पक्षाने केले आहे. बहुजनांना न्याय मिळावा बहुजनांचे कल्याण व्हाव यासाठी बहन कु. मायावतीजी यांच्या नेतृत्वात पदाधिकारी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.  काही मनुवादी व्यवस्थेमुळे समाज विखुरला गेला आहे परंतु आम्ही महाराष्ट्रभर प्रत्येक ठिकाणी जाऊन तळागाळातील लोकांशी चर्चा करून त्यांचे संघटन करून एकत्र करण्याचे काम करीत आहोत. येणाऱ्या दिवसात मोठ्या प्रमाणात संघटन निर्माण करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना सामोरे जाणार आहोत व या निवडणुकीत चांगल्या प्रकारे यश संपादन करू असे प्रदेशाधक्ष सुनील डोंगरे यांनी सांगितले. 
यावेळी बैठकीत मालेगाव जिल्हाध्यक्ष  सुनील पवार. जि.उपाध्यक्ष सुनिल जावरे. महीला जिल्हाध्यक्ष प्रमिलाताई जाधव.महीला महासचिव  मा .विश्वास पवार .महीला उपाध्यक्ष चंद्रकांला मोरे. महासचिव सना जावेद शहा   जि सचिव राजेंद्र महाले.  जि सचिव मा. ललित पानपाटिल. सालीया पठाण. जि कार्यकारी सदस्य मा देविदास अल्हाटकर. विधानसभा मा .उपाध्यक्ष सुभाष महीरे.  रुपाताई घंमडे.  महासचिव मा.अविनाश वाघ गौतम शिरसाठ.  प्रा. श्रीकांत जी पवार    विधानसभा कोषाध्यक्ष मा योगेश बच्छाव नंदुरबार शहर  सचिव मा.शहर कोषाध्यक्ष प्रमोद अहीरे अजय वाघ  आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्यातील ग्रामीण भागातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने सुरू करा

 


 धुळे जिल्हा शिक्षक भारती संघटनेची मागणी 


     धुळे - राज्यातील ग्रामीण भागातील अकरावीचे प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्याची मागणी नुकतीच धुळे जिल्हा शिक्षक भारती संघटनेने केली आहे त्याबाबत सदर मागण्यांचे निवेदन

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

 उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना धुळे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मनीष पवार यांच्या मार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे सदर निवेदनात अकरावी प्रवेशाची प्रक्रिया राज्यातील महापालिका कार्यक्षेत्रात गेल्या काही वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. या वर्षापासून आपल्या सरकारने ही प्रक्रिया ग्रामीण भागातही ऑनलाईन राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे होणाऱ्या त्रासामुळे, येणाऱ्या अनेक अडचणीमुळे, वाढीव खर्चामुळे ग्रामीण भागातील पालक, वि‌द्यार्थी आणि शिक्षकात प्रचंड असंतोष आहे. याबाबत पुढील खुलासा करीत आहोत.

                 ग्रामीण भागातील विशेषतः आदिवासी व डोंगराळ भागातील वि‌द्यार्थ्यांकडे किंवा त्यांच्या पालकांकडे स्वतःचे अँड्रॉइड मोबाईलसुद्धा नाहीत.राज्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नेटवर्क सुविधा उपलब्ध नाही. विद्याथी किंवा पालकांकडून तसेच शैक्षणिक संस्थांकडूनही अशा पद्धतीने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्याची कुठलीही मागणी केली नाही.

             ग्रामीण भागात अकरावीतील विद्याथ्यांसाठी उपलब्ध असणाऱ्या जागांपेक्षा वि‌द्यार्थ्यांची संख्या कमी आहे . ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सहाय्य करण्याच्या हेतूच्या नावाने तेथील सायबर कॅफे व इतरांकडून अवास्तव रक्कम मागत वि‌द्यार्थी व पालकांची लूट मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे.

                ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रियेच्या पद्धतीने जाण वि‌द्यार्थी, पालक व त्या भागात काम करणाऱ्या शिक्षकांना अ‌द्याप पर्यंत पुरेशा प्रमाणात झालेले नाही. उन्हाळ्याच्या सुट्टी तही शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात सुट्टी न घेता महाविद्यालयात केवळ ह्या एकाच कामासाठी पूर्ण वेळ देऊनही त्यातून काही निष्पन्न होत नाही. ऑनलाईन प्रक्रियेसाठी अकारण खर्च करावा लागत आहे.

           ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अकरावीचे वर्ग सुरु होण्यास उशीर होतो व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते.

 प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी शासनाच्या वेबसाईटच्या तांत्रिक बिघाडामुळे ही प्रक्रिया खोळंबलेली असल्याने पालक व शिक्षकांच्या मनात प्रचंड संताप व चीड निर्माण झालेली आहे.

              सदर वरील बाबी लक्षात घेऊन मोबाईल व नेटवर्क अभावामुळे तसेच पालक विद्यार्थी शिक्षण संस्था यांची कुठलीही मागणी नसल्याने वि‌द्यार्थी व पालक यांची ससेहोलपट टाळण्यासाठी ही ऑनलाईन पद्धतीने प्रवेश देण्याचा प्रक्रिया तत्काळ थाबवून पूर्वीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने प्रवेश देण्याची मुभा संबंधित संस्थांना देण्यात यावी अशी मागणी

राज्य संघटक सचिव अशपाक खाटीक, विभागीय अध्यक्ष विनोद रोकडे ,ज्युनियर कॉलेज अध्यक्ष प्रा पंकज पाटील, जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील,कार्याध्यक्ष खेमचंद पाकळे,

जिल्हा उपाध्यक्ष शैलेश धात्रक, धुळे तालुका अध्यक्ष किरण मासुळे ,दामोदर पाटील, राजेश शिरुडे, मुश्ताक शेेेख व समस्त पदाधिकारी सदस्यांनी 

केली आहे.

लेबल: