शुक्रवार, २४ एप्रिल, २०२६

आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध; 'भीम आर्मी' संघटनेचे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने, राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध; 'भीम आर्मी' संघटनेचे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने, राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा


जनसंघर्ष न्यूज 

राज्य शासनाने अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात आता तीव्र असंतोष निर्माण होऊ लागला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ आज 'भीम आर्मी' या संघटनेच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली आणि प्रशासनाला मागण्यांचे अधिकृत निवेदन देण्यात आले.

शासनाचा हा उपवर्गीकरणाचा निर्णय सामाजिक न्याय, समता आणि संविधानाच्या मूलभूत तत्त्वांना हरताळ फासणारा असून, यामुळे समाजात कृत्रिम फूट पडण्याची भीती या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, आरक्षण वर्गीकरणासंदर्भात नेमलेल्या न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल अद्याप सार्वजनिक का केला नाही, असा सवालही आंदोलकांनी उपस्थित केला आहे. पारदर्शकतेचा अभाव असलेला हा निर्णय तात्काळ रद्द करावा आणि बदर समितीचा अहवाल जनतेसमोर ठेवावा, अशी प्रमुख मागणी भीम आर्मीने केली आहे. शासनाने या मागण्यांची गंभीर दखल न घेतल्यास, संपूर्ण महाराष्ट्रभर मोर्चे, रास्ता रोको आणि मंत्रालय घेराव यांसारखी तीव्र आंदोलने छेडण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

लेबल: , , , ,

रविवार, २४ ऑगस्ट, २०२५

आदर्श पत्रकार जयश्री बी सोनवणे "लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित"

 

आदर्श पत्रकार जयश्री बी सोनवणे "लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित"

सांगली येथे खा. विशाल पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत केला गौरव

जनसंघर्ष न्यूज 

धुळे :- साहित्य कला पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर नावलौकिक करणाऱ्या उत्कृष्ट व आदर्श पत्रकार तथा वृत्त निवेदिका जयश्री बी सोनवणे यांना नुकताच सांगली येथे दिनांक २३/०८/२०२५ रोजी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मेडल देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार डॉ विशाल पाटील, सांगलीचे माजी महापौर डॉ. नितीन सावगावे यांच्या हस्ते व आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.

     जयश्री सोनवणे यांचं सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवून एक विद्रोही बाणा, रोखठोकपणा उभ्या महाराष्ट्राला दाखवणारं महिला संघटन कौशल्य म्हणून उदयाला आलेलं महिलांचे कुशल नेतृत्व तथा दैनिक माझा मराठवाडा वृत्तपत्राच्या त्या निवासी संपादिका रिपब्लिकन आवाज न्यूजच्या उपसंपादिका तथा ज्ञानपंख 24 न्यूज या चॅनलच्या वृत्त निवेदिका आहेत. महिलांचे कुशल नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आज पाहिलं जातं. त्या एक पत्रकार तर आहेतच त्यासोबतच त्या एक उत्तम कवयित्री देखील आहे. जिथे कुठे महिलांवर अन्याय अत्याचार होतो. त्या ठिकाणी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्या हजर असतात. अनेक संस्थांना भेट देऊन गोरगरिबांना मदत मिळवून देणे, सद्य परिस्थितीवर शाळा, कॉलेज या ठिकाणी जाऊन मुलींना परिस्थितीशी दोन हात कसे करायचे यावर मार्गदर्शन करणे. अनेक हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांची फसवणूक होते. त्या ठिकाणी जाऊन त्यांची फसवणूक न होऊ देणे. त्याचबरोबर त्यांचे जे काही हॉस्पिटलचे बिल असते ते जास्तीचे आकारण्यात येते ते कमी करून देणे म्हणजेच अन्यायाविरुद्ध त्यांची लढत आहे. पुणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात एक स्त्री म्हणून आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर पत्रकारिता सामाजिक कार्य महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे विषय घेऊन लढणाऱ्या एक लढाऊ व्यक्तिमत्व. याचं कार्याची दखल घेऊन त्यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार हा जाहीर करून त्यांना तो प्रदान करण्यात आला. 

      या घेण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शिका स्वाती कोकरे, समाज प्रभोधनकार, व्याख्याते, प्रसिध्द सांगली, उद्घाटक डॉ. गुरु बगली श्रीरना ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सांगली स्वागताध्यक्ष विष्णू माने राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, कार्यक्रमाचे पाहुणे इद्रीस नायकवडी विधानपरिषद, सावंत माजी विधानसभा, विशेष उपस्थिती सुजय नाना शिंदे सभापती मार्केट कमिटी सांगली, संगीता खोत माजी महापौर सांगली, संदीप सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक, कराड, निवेदक प्रा. घनश्याम चौगुले महात्मा विद्यामंदिर हाय. व ज्यु, कॉलेज, उमदी. निमंत्रक अशोक श्रीपती गोरड, अध्यक्ष, ए.डी. फाऊंडेशन. महादेव महानूर कार्याध्यक्ष, आमदार विक्रम आमदार जत, प्रमुख फाऊंडेशन, समनडी, संयोजन समिती दिलीप वाघमोडे, शरद माने, दादासो गोरड, शेंडगे सागर म्हारनूर आदी मान्यवर, कार्यक्रमाचे आयोजक, सर्व पुरस्कारार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     पुरस्कार्थी जयश्री वी सोनवणे यांनी यांनी प्रसार प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की हा सन्मान माझा नसून समाजाचा माझ्यावर असणाऱ्या विश्वासाचा आहे. या पुरस्काराने मला आणखीन नवीन जबाबदाऱ्या दिल्या आहेत असं मला वाटतं आणि आणखी कार्य करण्याची प्रेरणा या पुरस्काराने मला मिळाली आहे. हा सन्मान शक्य झाला तो मार्गदर्शक, सहकारी आणि शुभेच्छुक यांच्या प्रेम व विश्वासामुळे. आपल्या सर्वांच्या आशिर्वादाशिवाय हे शक्य नव्हते.

     त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतेअशा व्यक्त प्रकारच्या भावना सुद्धा त्याने केल्या पुरस्कार्थी जयश्री बी सोनवणे यांच्यावर अभिनंदनाचा होत आहे.

लेबल: ,

रविवार, ३ ऑगस्ट, २०२५

राहुलकुमार महिरे यांना महाराष्ट्र शासनाचा ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर

 

राहुलकुमार महिरे यांना महाराष्ट्र शासनाचा ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर   

     "ग्रंथालय चळवळीतील योगदानाबद्दल होणार सत्कार"   

जनसंघर्ष न्यूज 

    निजामपूर- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणारा सन्मानाचा आणि प्रतिष्ठेचा असणारा डॉक्टर एस. आर. रंगनाथन (उत्कृष्ट कार्यकर्ता) ग्रंथमित्र पुरस्कार आखाडे ता साक्री जिल्हा धुळे येथील बौध्दवासी शांताई महीरे सार्वजनिक वाचवण्याचे अध्यक्ष अँड: राहुलकुमार महिरे यांना जाहीर करण्यात आला आहे.          

         शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र,पुस्तक व रोख २५,०००/- असे पुरस्कार चे स्वरूप असून नाशिक विभागातून राहुलकुमार महिरे यांची निवड करण्यात आली आहे.                                 वाचन चळवळ वृध्दिंगत  करण्यासाठी व महाराष्ट्रभर चळवळीच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, जीवनमान उंचावण्यासाठी तळागाळापर्यंत वाचून चळवळ पोहोचण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचे योगदान यासाठी ग्रंथालयाचा गुणात्मक विकास व्हावा व ग्रंथालयाकडून राज्यातील जनतेला अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शासनाकडून दरवर्षी पुरस्काराचे आयोजन केले जाते. 

       उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाने पुरस्कार दिले जातात. ग्रंथालय चळवळीतील योगदानाबद्दल कार्यकर्ता व ग्रंथ मित्र पुरस्कार दिला जातो तर, ग्रंथालयातील ग्रंथपाल म्हणून कर्तव्य सेवा बजावत असताना विविध माध्यमातून समाज उपयोगी ज्ञानदानाचे व ज्ञान उपयोगाचे कार्य करणाऱ्यांना ग्रंथालय सेवक पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असते. 

राहुलकुमार महिरे  यांनी २००६ मध्ये आपल्या मातोश्रींच्या नावाने आखाडे येथील लहानशा गावात मोफत वाचनालयांची स्थापना केली. त्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना वाचनाची आवड निर्माण करून, विविध वृत्तपत्र, मासिक, साप्ताहिक, पाक्षिक, कथा, कादंबऱ्या, ललित साहित्य अशी विविध प्रकारचे पुस्तक उपलब्ध वाचनालयात उपलब्ध करून दिली.वाचनालयाच्या माध्यमातून  ज्ञानदानाचे काम करीत असताना विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम देखील त्यांनी राबविले, वाचन चळवळ फक्त आपल्या गावापुरते मर्यादित न ठेवता नाशिक विभागात जवळपास ३०० पेक्षा जास्त गाव, वस्ती,पाडा,शहर, इत्यादी ठिकाणी नवीन वाचनालय स्थापन करण्यासाठी त्यांचे मोलाचं योगदान आहे. तसेच स्थापन केलेल्या वाचनालयांना मान्यता मिळण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन व सहकार्य केलेले आहे. 


ग्रंथालय संघटनेत काम करीत असताना त्यांनी धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह, नाशिक विभाग ग्रंथालय संघाचे सहकार्यवाह, नाशिक विभाग ग्रंथालय संघाचे संचालक, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी राज्य विभाग व जिल्हा स्तरावर गेल्या अनेक वर्षापासून ते पार पडत आहे व कार्यरत आहेत. गाव तिथे ग्रंथालय व्हावे म्हणून ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना ते नेहमी मार्गदर्शन करीत असतात व जास्तीत जास्त गावात  मोफत सार्वजनिक वाचनालय स्थापन करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. 

 वाचन चळवळ वृद्धिंगत कशी होईल, वाचनाची आवड विद्यार्थ्यांमध्ये कशी निर्माण होईल यासाठी विविध वृत्तपत्रातून  निरंतर लेखन कार्य सुरू असते, सार्वजनिक वाचनालयाचे आद्य प्रवर्तक महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे नावाने देखील त्यांनी पुस्तक प्रकाशित केलेले आहे.

  त्याच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना नाशिक विभागातून ग्रंथ मित्र हा सन्मानाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, नाशिक विभाग सहायक ग्रंथालय संचालक सचिन झोपुळे, बीड ग्रंथालय अधिकारी संजय मस्के, जालना ग्रंथालय अधिकारी चंद्रशेखर ठाकुर, औरंगाबाद ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे, धुळे ग्रंथालय अधिकारी जगदीश पाटील,नंदुरबार ग्रंथालय अधिकारी धरमसिंग वळवी, रायगड ग्रंथालय अधिकारी अजित पवार, धुळे कार्यालय तांत्रिक सहाय्यक आ. झो खंडीकर, मुख्य लिपीक संजय ठाकरे, वरीष्ठ लिपीक एम आर पाटील या अधिकार्यांचेही पुरस्कारासाठी मार्गदर्शन  लाभले. त्यांना मिळालेल्या पुरस्काराचे सर्व स्तरातून कौतुक होत असून महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ गजानन कोटेवार वर्धा,राज्य ग्रंथालय संघाचे माजी कार्याध्यक्ष डॉ दत्ता परदेशी कुसुंबा,राज्य ग्रंथालय संघाचे माजी प्रमुख कार्यवाहक अनिल सोनवणे जैताणे,नाशिक विभाग प्रमुख कार्यवाह प्रविण पाटील नंदुरबार, ग्रंथमित्र आर. ओ, पाटील नरडाणा, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अविनाश भदाणे गोंदुर, उपाध्यक्ष महेंद्र जाधव जैताणे, प्रमुख कार्यवाह रोहिदास हाके उडाणे, सहकार्यवाह परमेश्वर महाले वर्षी,जिल्हा कार्यकारीतील  संचालक पी. एम. सुर्यवंशी, ही रा चौधरी, भरत रोकडे, हंसराज शिंदे, नरेंद्र महाजन, नरेंद्र देवरे,राजकिरण राजपूत, प्रमोद महाजन,सुरेश मोरे, नानाभाऊ पाटील,ज्ञानेश्वर माळी, एच ए पाटील,राजेश तांदळे, राज देशमुख, युवराज बोरसे, स्नेही परिवारातील अतुल सूर्यवंशी शिरपूर, रवींद्र महिरे,मिलिंद महिरे, सिद्धार्थ महिरे आखाडे, विजया महिरे धुळे,कुणाल सोनवणे नंदुरबार, काशिनाथ ढोढरे, बोरद तळोदा,निरंजन महाजन दोंडाईचा, रविंद्र महिरराव शिरपूर आदींनी अभिनंदन व कौतुक केले आहे

लेबल: ,

शुक्रवार, २५ जुलै, २०२५

पक्षाच्या शिलेदारांसह धुळेकर दात्यांमुळेच महारक्तदान शिबिराचा महाविक्रम !



पक्षाच्या शिलेदारांसह धुळेकर दात्यांमुळेच महारक्तदान शिबिराचा महाविक्रम !

आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते आयोजकांचा आमदार कार्यालयात सत्कार

जनसंघर्ष न्यूज 

         धुळे, ता. २५ : राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात झालेल्या महारक्तदान शिबिरांतर्गत धुळे शहराने विक्रमी चार हजार ३१३ बॉटल रक्तसंकलन करून महाविक्रम केला. एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात रक्तसंकलनात पक्षाच्या शहरातील ३१ केंद्रांवरील आयोजकांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भूमिका जितकी मोलाची, महत्त्वाची ठरली, तितकेच उल्लेखनीय योगदान हे सर्वसामान्य धुळेकर नागरिकांचे आहे. त्यांनी आपल्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन प्रत्येक केंद्रावर सकाळपासूनच रांगा लावून रक्तदान केले. त्यामुळे आपण हा उच्चांक गाठू शकलो. यामुळे आयोजकांबरोबरच मी धुळेकर नागरिकांना शतशः नमन करून त्यांचे आभार मानतो, असे प्रतिपादन आमदार अनुप अग्रवाल यांनी केले.

येथील आमदार जनसंपर्क कार्यालयात काल (ता. २४) सायंकाळी पक्षातर्फे झालेल्या महारक्तदान शिबिरात अमूल योगदान देणाऱ्या ३१ केंद्रांवरील आयोजकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला, त्यावेळी आमदार अग्रवाल बोलत होते. यावेळी माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ज्येष्ठ नेते विजय पाच्छापूरकर, हिरामण गवळी, महादेव परदेशी, बेटी बचाव अभियानाच्या संयोजिका अल्पा अग्रवाल, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, वैशाली शिरसाट, पक्षाचे सरचिटणीस जितेंद्र शहा, यशवंत येवलेकर, नंदू  सोनार, चेतन मंडोरे, आकाश परदेशी, भिकन वराडे, वंदना भामरे, योगिता बागूल, कपिल शर्मा, दिनेश पारिख, पवन जाजू आदी व्यासपीठावर होते. 

पुढच्या वेळी आपणच आपला विक्रम मोडू

आमदार अग्रवाल म्हणाले, की महारक्तदान शिबिराचा उपक्रम यशस्वी करण्यात पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याची आणि ३१ केंद्रांवरील आयोजकांची  भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण ठरली. टीममधील प्रत्येकाने शहरात रक्तदान उपक्रमाबाबत जनजागृती करत, घरोघरी भेटी देऊन नागरिकांना रक्तदानासाठी प्रवृत्त केले, यामुळेच हा उपक्रम यशस्वी ठरला. या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. आपण एकाच दिवशी चार हजार ३१३ बॉटल रक्तसंकलन करून जो उच्चांक प्रस्थापित केला ज्यामुळे हजारो रुग्णांना जीवदान मिळणार आहे. शहरात हा विक्रम कधीच कोणी मोडू शकणार नसले, तरी आपणच पुढच्या वेळी आपला हा विक्रम मागे टाकून नवीन उच्चांक स्थापन करू. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हाडाचा कार्यकर्ता आहे. त्याने ठरवले तो कुठलीही गोष्ट यशस्वी करू शकतो याची प्रचिती दाखवून दिली आहे. न भूतो न भविष्यती अशा या उपक्रमात भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांचे कुशल नेतृत्व महत्त्वाचे ठरले. त्यांना पदाधिकारी ओमप्रकाश खंडेलवाल, शेखर कुलकर्णी, पृथ्वीराज पाटील, पवन जाजू, सुनील कपिल, राम अग्रवाल, यशवंत येवलेकर आदी नियोजन समिती सदस्यांची मोलाची साथ लाभली. या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. 

मुख्यमंत्र्यांप्रती दाखविलेले प्रेम अभूतपूर्व

डॉ. भामरे म्हणाले, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात आमदार अनुप अग्रवाल, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या मार्गदर्शनात झालेल्या रक्तदानाच्या महायज्ञात शहरातील पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हिरिरीने सहभागी होत या उपक्रम यशस्वीच करून दाखविला नाही, तर राज्यात सर्वाधिक रक्ताच्या बॉटल संकलन करून विक्रम नोंदविला. याबद्दल पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, आयोजकांचे मनापासून अभिनंदन करतो. आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रती आपण दाखविलेले प्रेम अभूतपूर्व ठरले. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीस करत आहेत. भाजप सरकारच्या कार्यकाळात गेल्या १० वर्षांत शहरात अनेक विकासकामे झाली. त्यात निधी देण्यात सिंहाचा वाटा मुख्यमंत्र्यांचा राहिला. यामुळेच धुळेकरांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत हा उपक्रम यशस्वी करून दाखविला.

आयोजकांचा सत्कार सन्मान वाढविणारा

हिरामण गवळी म्हणाले, की मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलैला झालेला महारक्तदान शिबिरांतर्गत धुळे शहराने चार हजार ३१३ बॉटल रक्तसंकलन करून केलेली कामगिरी राज्यात उच्चांकी ठरली. हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. या उपक्रमात शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जी अपार मेहनत घेतली त्यासाठी आपणा सर्वांचे शतशः आभार मानतो व अभिनंदन करतो. ही अपार मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा म्हणून आज आमदार अनुप अग्रवाल, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर व अल्पा अग्रवाल यांनी जो सत्काराचा उपक्रम घेतला तो प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान वाढविणारा आहे. 

कार्यकर्त्यांमुळेच प्रत्येक उपक्रम यशस्वी

श्री. अंपळकर म्हणाले, की लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहरात रेकॉर्डब्रेक रक्तसंकलनाचा उपक्रम झाला. यापूर्वी शहरात एकाच दिवशी चार हजारांहून अधिक बॉटल रक्तसंकलन कुणालाच जमले नाही, यापुढेही कोणाला जमणार नाही ते भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करून दाखविले. हा क्षण प्रत्येक धुळेकराचा सन्मान वाढविणारा आहे. शहरातील ३१ केंद्रांवर ज्या आयोजकांनी हा उपक्रम यशस्वी करून दाखविला त्यांचा सन्मान करण्याची कल्पना अल्पा अग्रवाल यांनी मांडली आणि आज हा सत्कार घडून येत आहे. या रक्तदानाच्या नियोजनात कल्पेश शर्मा यांचे विशेष योगदान राहिले. त्यांच्या नियोजनातूनच हा उपक्रम आपण इतक्या मोठ्या प्रमाणात यशस्वी करू शकलो, त्यामुळे त्यांचे विशेष आभार मानतो. पक्षाने राज्यस्तरावरून दिलेला प्रत्येक कार्यक्रम-उपक्रम यशस्वी करण्यात आपण नेहमीच पहिल्या १० क्रमांकांमध्ये राहिलो आहोत आणि ते फक्त कार्यकर्त्यांच्या जिवावर. महारक्तदान शिबिराचा उपक्रमही आपण सर्वांनी यशस्वी करून दाखविल्याने आपणा सर्वांचे आभार मानतो.  

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार शिलेदारांचा गौरव

शहरात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या रक्तदान शिबिराचा उपक्रम यशस्वी करण्यात सर्व ३१ केंद्रांवरील आयोजकांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यांच्यामुळेच आपण राज्यात सर्वाधिक चार हजार ३१३ बॉटल रक्तसंकलन करू शकलो. यामुळे या सर्व शिलेदारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्याची कल्पना महानगर जिल्हाध्यक्ष अंपळकर यांनी मांडली. त्यावर आमदार अग्रवाल यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून व त्यांचा वेळ निश्चित करून नक्कीच हा गौरव केला जाईल, अशी ग्वाही दिली.

लेबल: , ,

शनिवार, १२ जुलै, २०२५

जिजाऊ कन्या पल्लवी भटु पवारचा डबल धमाका मा.आमदार कुणालबाबा पाटील यांनी केले सन्मानित

 

जिजाऊ कन्या पल्लवी भटु  पवारचा डबल धमाका मा.आमदार कुणालबाबा पाटील यांनी केले सन्मानित

जनसंघर्ष न्यूज 

           धुळे:- श्री. शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, धुळे ची इयत्ता दहावी सेमी इंग्रजीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थींनी कु.पल्लवी भटु पवार हिने मागील पंधरवड्यात नाशिक येथे पार पडलेल्या राष्ट्रीय इनडोअर हॉकी स्पर्धा गाजवली तिने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करण्याचा मान मिळवला आणि आत्ता नुकतीच तिची निवड खेलो इंडिया तर्फे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल संघात स्तुत्य निवड झाली ती महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करतेय अशा प्रकारे जिजामाता कन्या विद्यालयाच्या जिजाऊ कन्येने डबल धमाका करून सर्वांना प्रभावित केले गरीब परीस्थीतीत देखील तिने अभ्यासा बरोबरच  खेळावर लक्ष केंदीत केले पाठिशी विद्यालयाच्या प्राचार्य सौ.अपर्णा विजय पाटील यांचा पाठींबा वडीलांना घातलेली समजूत खेळाडूंना नोकरीत असलेल्या संधी यासाठी संस्थेचे चेअरमन धुळे ग्रामीणचे मा.जलदुत आमदार कुणालबाबा पाटील यांनी आयोजित करत असलेल्या संस्था अंतर्गत खेळ स्पर्धा त्यातूनच या जिजाऊ कन्येची प्रतिभा चमकली त्यातच तिची जिद्द या जोरावर कु पल्लवी आज एकाचवेळी दोन वेगवेगळ्या खेळांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा गाजवतेय म्हणून संस्थेचे चेअरमन माननीय कुणालबाबा पाटील यांनी तिला सन्मानित करून विद्यालयाच्या प्राचार्य सौ.ए.व्ही.पाटील यांनी तिच्या गरजांवर लक्ष घालून तिच्या सारखीच चमकदार खेळाडू पुढे कसे आणता येतील यासाठी प्रयत्नशील रहावे त्यासाठी हवी ती मदत,सहकार्य करण्यासाठी मी स्वतः व संस्था तत्पर आहे अशा शब्दात कु पल्लवी भटु पवार हीला  आश्वासन देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तिच्या या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.एस.टी.पाटील सर्व पदाधिकारी तथा विद्यालयाच्या प्राचार्य सौ.अपर्णा विजय पाटील  उपमुख्याध्यापिका श्रीमती एस व्ही अडकमोल पर्यवेक्षक श्री प्रदीप एन देवरे व सर्व  शिक्षक, प्राध्यापक शिक्षकेतर बंधू भगिनींनी कौतुक करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

लेबल: , ,

शुक्रवार, ४ जुलै, २०२५

माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम भाऊ गायकवाड यांचा पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डींच्या हस्ते गौरव



 माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम भाऊ गायकवाड यांचा पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डींच्या हस्ते गौरव 

जनसंघर्ष न्यूज 

एरंडोल :- येथील बाजार समितीचे माजी सभापती तथा माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम भाऊ गायकवाड यांच्या सामाजिक कामाची दखल घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. 

     माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड सुमारे चाळीस वर्षांपासून शहरात विविध सार्वजनिक, धार्मिक उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करीत आहेत. शहरातील सर्व समाजांच्या कार्यक्रमात सहभाग घेऊन त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून सहकार्य केले आहे. त्यांनी दलीत वस्तीत स्वतः राहून दलितांचे प्रश्न सोडवले. त्यांच्यासुख दुःखात नेहमी सामील होतात. ते दलितांचे नेते असून नेहमी त्यांच्या उत्थानासाठी अग्रेसर असतात. त्यांच्या पाठीशी नेहमी दलीत बांधवउभे असतात. त्यांचा समाजात मनाचे स्थान आहे. त्यांच्या कार्यकाळात शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. पोलीस प्रशासनाने त्यांनी केलेल्या धार्मिक सामाजिक कार्याची दखल घेवून पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचे हस्ते त्यांना प्रमाणपत्र प्रदान करून गौरव केला. यावेळी चाळीसगाव विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांचेसह कर्मचारी उपस्थित होते.

लेबल:

गुरुवार, २९ मे, २०२५

सहावर्षीय अलिनासाठी आमदार अनुपभय्या अग्रवाल ठरले `देवदूत’ !

 



सहावर्षीय अलिनासाठी आमदार अनुपभय्या अग्रवाल ठरले `देवदूत’ !

`एबी फाउंडेशन’च्या वैद्यकीय सेवाभावी उपक्रमातून केली मदत;

दोन महिन्यांपासून होणाऱ्या किडनीच्या असहाय वेदनांतून मुक्तता



              धुळे : - दोन ते अडीच महिन्यांपूर्वी अवघ्या सहा वर्षांच्या बालिकेला किडनीच्या इन्फेक्शनचा त्रास सुरू झाला. यातून लेकीचे होणारे हाल पालकांचे काळीज कुरतडत होते. या त्रासातून लेकीची सुटका व्हावी म्हणून पालकांच्या तिच्यावर उपचारांसाठी आज या रुग्णालयात तर उद्या त्या रुग्णालयात अशा खेपा सुरू झाल्या. विविध रुग्णालयांच्या पायऱ्या झिजवल्या. तिच्यावर शस्रक्रियेसह उपचारांसाठी सुमारे लाखभर रुपये खर्च येणार होता. मात्र, इतकी मोठी रक्कम उभारणे शक्य नव्हते. शासनाच्या वैद्यकीय योजनांचा लाभ घ्यावा म्हटले, तर कागदपत्रांची पूर्तता नव्हती. यामुळे बालिकेला वेळेवर उपचार मिळू शकत नसल्याने तिला होणारा त्रास दिवसेंदिवस वाढतच गेला. यामुळे हतबल झालेल्या पालकांपुढे आता काय करायचे आणि कुठे जायचे, असा मोठा प्रश्न आ वासून उभा राहिला होता.

धुळे शहरातील नंदी रोडवरील शिवाजीनगरमधील पॉवरलूम मजूर आतिक मोहंमद शरीफ अन्सारी यांच्या सहावर्षीय अलिना या बालिकेची ही कहाणी. अखेर धुळे शहराचे कार्यसम्राट आमदार, धर्मयोद्धा अनुप अग्रवाल यांनी तसेच ते आश्रयदाते असलेल्या एबी फाउंडेशनने अलिनाला वैद्यकीय उपचारांसाठी मदतीचा हात दिला आणि तब्बल दोन महिन्यांपासून होत असलेल्या ससेहोलपटीतून तिची अवघ्या चार दिवसांत सुटका करत तिला जीवदान दिले. आमदार अनुपभय्यांच्या या सामाजिक बांधिलकीमुळे गहिवरलेल्या आतिक अन्सारी आणि अलिना अन्सारी या बापलेकीच्या चेहऱ्यावरील भाव त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत होते.

 

उपचारांत का आल्या अडचणी?

अलिनाला दोन ते अडीच महिन्यांपासून किडनी इन्फेक्शनचा मोठा त्रास सुरू झाला. अलिनाचे वडील आतिक अन्सारी यांनी तिच्यावर योग्य ते उपचार व्हावेत म्हणून विविध रुग्णालयांच्या पायऱ्या झिजवायला सुरवात केली. खासगी रुग्णालयांत त्यासाठी सुमारे एक लाखांचा खर्च सांगण्यात आला. मात्र, तेवढी मोठी रक्कम कशी उभी करणार, असा प्रश्न अन्सारी यांच्यापुढे होता. त्यामुळे त्यांनी शासनाच्या विविध वैद्यकीय योजनांच्या माध्यमातून उपचारांसाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, त्यासाठी आवश्यक कुठलीच कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था अन्सारी कुटुंबीयांची झाली. 


एबी फाउंडेशनची मिळाली माहिती

आतिक अन्सारी यांना धुळे शहराचे कार्यसम्राट आमदार अनुप अग्रवाल यांनी एबी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू केलेल्या वैद्यकीय सेवाभावी उपक्रमाची माहिती मिळाली. त्यांनी शहरातील जुन्या महापालिकेजवळील एबी फाउंडेशनचे कार्यालय गाठले. तेथे आमदार अग्रवाल व फाउंडेशनचे समन्वयक कमलेश देवरे यांची भेट घेत अलिनावर ओढवलेला प्रसंग आणि त्यासाठी विविध रुग्णालयांत कशी ससेहोलपट झाली, याची आपबिती सांगितली. एवढा प्रचंड त्रास होत असताना अलिनाला कुठल्याच रुग्णालयात दाखल करून का घेण्यात आले नाही, याची समन्वयकांनी माहिती घेतली असता त्यांना धक्काच बसला. अलिनाच्या पालकांनी शिधापत्रिकेमध्ये अलिनाच्या नावाचा समावेशच केलेला नव्हता. तसेच त्यांच्याकडे अलिनावर उपचारांसाठी आवश्यक आयुष्यमान भारत हेल्थ कार्डही नव्हते. तिच्या आधार कार्डच्या ई केवायसीची पूर्तताही केलेली नव्हती. त्यामुळे अलिनाला शासनाच्या कुठल्याच वैद्यकीय सेवा योजनेचा लाभ मिळू शकला नाही. 


फाउंडेशनने केली कागदपत्रांची पूर्तता

आमदार अनुपभय्यांनी सर्वप्रथम फाउंडेशनच्या समन्वयकांना आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची तातडीने पूर्तता करण्याची सूचना केली. त्यानुसार समन्वयक देवरे व त्यांचे सहकारी निलेश चौधरी यांनी अवघ्या तीन ते चार दिवसांतच सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. यामध्ये अलिनाचे शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करणे, आधार कार्डची ई-केवायसी करणे, तसेच आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड केले. 

सेवा हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया, उपचार

कागदपत्रांची पूर्तता करेपर्यंत अलिनाला प्रचंड त्रास होत होता. त्यामुळे सुरवातीला हा त्रास कमी करण्यासाठी काही इंजेक्शन व औषधे देण्यात आली. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर अलिनाला शहरातील सेवा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉ. राजेश अग्रवाल व त्यांच्या टीमने अलिनावर तातडीने उपचार सुरू केले. तसेच तिच्यावर यशस्वी शस्रक्रियाही करण्यात आली. तब्बल दोन महिने होणाऱ्या त्रासामुळे अलिनाचे खूप हाल होत होते. ते उघड्या डोळ्यांनी पाहताना अलिनाच्या पालकांचे मन खूप खचत होते. मात्र, आमदार अग्रवाल यांच्यामुळे अलिनावर तातडीने उपचार करणे शक्य झाल्याने तिच्या पालकांनी आमदार अग्रवाल व एबी फाउंडेशनचे शतशः आभार मानले. तुमचे उपकार शब्दांतून फेडणे शक्य नसले तरी तुम्ही आमच्यासाठी देवदूत म्हणूनच धावून आलात. तुमच्यामुळेच आज लेकीला नव्याने जीवन प्राप्त झाल्याची भावनाही आतिक अन्सारी यांनी व्यक्त केली. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी आमदार अनुप अग्रवाल यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली.


अशी झाली `एबी फाउंडेशन’ची स्थापना

भाजपचे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष तसेच धर्मयोद्धा म्हणून काम करताना पूर्वीपासूनच आमदार अनुप अग्रवाल यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवत विविध शासकीय योजनांसह वैयक्कित दातृत्वातून शहरातील गोरगरीब, वंचितांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या गरजा पूर्तीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. यातूनच गेल्या विधानसभा निवडणुकीत शहरवासीयांनी विधानभवनात धुळे शहराचे प्रतिधित्व करण्याचा बहुमान अनुपभय्यांना दिला. आमदार म्हणून राजकीय कारकीर्दीत एक पाऊल पुढे टाकतानाच आमदार अनुपभय्यांनी धुळे शहरासह जिल्हाभरातील सर्वसामान्य, गरीब, वंचित घटकांतील गरजूंना आरोग्याच्या प्रश्नावर कुठलीच अडचण येऊ नये, कोणताही रुग्ण पैशांअभावी उपचारांपासून वंचित राहू नये, हा विचार सत्यात उतरविण्यासाठी एबी फाउंडेशनची स्थापना केली.

रुग्णांसाठी एबी फाउंडेशन बनले `देवदूत’

कुठलाही राजकीय अजेंडा, जात-पात, धर्म या सर्वांच्या पलीकडे जाऊन गेल्या सहा महिन्यांपासून फाउंडेशनचे रुग्णसेवेचे कार्य रात्रंदिवस अविरत सुरू आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यांत दुर्धर आजारांशी लढा देणाऱ्या हजारो रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यात यश आले. यात कॅन्सर, हृदयरोगासह विविध आजारांनी पीडित ३५० ते ४०० रुग्णांवर धुळे शहरातील विविध खासगी रुग्णालयांसह मुंबईतील टाटा, नायर, वाडिया, केईएम, जसलोक, हिंदुजा आदी नामांकित रुग्णालयांत उपचारांसह शस्रक्रिया करून त्यांना जीवनदान मिळवून देण्यात फाउंडेशनला यश आले. अनेक रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीसह शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेसह विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यातही फाउंडेशन अग्रेसर आहे. यामुळे रुग्णांसाठी एबी फाउंडेशन जणू देवदूतच बनले आहे. 



रुग्ण, नातेवाइकांनी संपर्क साधावा

धुळे महानगरासह परिसरातील दुर्धर आजारांचा सामना करणाऱ्या ज्याही रुग्णांना धुळे शहरासह मुंबईतील मोठ्या रुग्णालयांत वैद्यकीय उपचारांची, शस्रक्रियेची गरज असेल त्यांनी शहरातील जुन्या महापालिकेमागील एबी फाउंडेशनच्या कार्यालयात संपर्क साधावा. तेथे नावनोंदणी करून सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी. जेणेकरून रुग्णांवर अत्यावश्यक ते उपचार वेळेत करता येतील, असे आवाहनही आमदार अनुप अग्रवाल व एबी फाउंडेशनचे समन्वयक कमलेश देवरे यांनी केले.

               अलीनाचे वडील अतिक मोहम्मद अन्सारी           

माझ्या सहावर्षीय अलिनाला दोन महिने किडनीच्या इन्फेक्शनमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला. पैशांअभावी तसेच वैद्यकीय मदतीसाठी आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी तिच्यावर उपचार करण्यात अनंत अडचणी आल्या. मात्र, आमदार अनुपभय्यांनी मदतीचा हात पुढे करत अलिनाला तातडीने उपचार मिळवून दिले. एबी फाउंडेशनने तातडीने सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. यामुळेच आज माझ्या लेकीला जीवदान मिळाले आहे. आमदार अनुपभय्या आणि त्यांच्या एबी फाउंडेशनचे स्थान कायम आमच्या हृदयात राहील.





लेबल: , , , ,

बुधवार, २८ मे, २०२५

भाजपा जैन प्रकोष्ठकडून महानगरपालिका निवडणुकीची जय्यत तयारी सुरू ____________________________. “जैन समाज हा भाजपचा पारंपरिक मतदार” — राजेश पांडे

 

अधिक वाचा »

लेबल: , , , ,

गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०२२

हिंदी मराठी पत्रकार संघातर्फे नवरात्रीनिमित्त राबविण्यात येणाऱ्या मातृशक्ती सन्मान सोहळ्यात पोलीस दलातील नारीशक्तींचा सन्मान

 

मलकापूर प्रतिनिधी

  मातृशक्तीच्या उपासनेचे पर्व म्हणजेच नवरात्रोत्सव संपूर्ण भारतभर साजरा केला जात आहे.या पर्वामध्ये नारीशक्तीचे पूजन करून उपासना करण्यात येते. भारतीय संस्कृतीच्या उदय कालापासूनच मातृ शक्तीचे किती अगाध व मोठे स्थान आपल्याला लाभलेले आहे हे या उत्सवा मधून प्रतीत होत असते. म्हणूनच हिंदी मराठी पत्रकार संघ मलकापूर नेहमी सामाजिक कार्याला केंद्रबिंदू मानून त्यानुसार कार्यरत आहे. 

  त्याचाच एक भाग म्हणून नवरात्रोत्सवानिमित्त या मातृशक्तींचे, नारीशक्तींचे सन्मान रुपी पूजन व्हावे म्हणून विविध क्षेत्रात आपले कार्यरुपी योगदान देणाऱ्या नारीशक्तींचा सन्मान गत सप्ताहभरात सुरू असून आज दि. 1/10/2022 रोजी जनतेच्या रक्षणासाठी म्हणजेच "सदरक्षणाय खलनिग्रहणाय" या ब्रीद वाक्याच्या पदपथावर कार्यरत असणाऱ्या म्हणजेच पोलीस दलामध्ये सेवा देणाऱ्या नारीशक्तींचा हिंदी मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा धनश्रीताई काटीकर यांच्याकडून मलकापूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणाऱ्या पीएसआय स्मिता म्हसाय मॅडम व पोलीस कॉ.श्रीमती वाढेमॅडम यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देत सन्मान रुपी सत्कार करण्यात आला. 

  यावेळी हिंदी मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा धनश्रीताई काटीकर,  विदर्भ सचिव सतिष दांडगे,जिल्हाध्यक्ष गौरव खरे,  महासचिव करण सिंग,  तालुका संपर्क प्रमुख धर्मेशसिंह राजपूत,शहर संघटक योगेश सोनवणे, प्रा.प्रकाश थाटे,प्रमोद हिवराळे आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते.

लेबल: , , , ,