शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२६

शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने.

शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने


जनसंघर्ष न्युज 

     धुळे -   गुणवत्तापूर्ण शिक्षण हा या देशातील प्रत्येक मुलाचा अधिकार आहे. उशिरा का असेना कांही उणिवांसह शिक्षण हक्काचा कायदा आपल्या देशात झाला. पण अलीकडे राज्य आणि केंद्र शासनाने नवीन शैक्षणिक धोरणाचा आधार घेत नवनवे शासन निर्णय करून या देशातील दलित, आदिवासी, भटके विमुक्त, बहुजन कष्टकरी शेतकरी, अल्पसंख्याक समूहातील मुलामुलींचा शिक्षणाचा हक्कच काढून घेत आहे. आज महाराष्ट्रातील साडे तीन हजार सरकारी शाळा बंद पडल्या आहेत. पंधरा हजारहून अधिक सरकारी शाळा बंद पाडल्या जाणार आहेत. ज्या प्राथमिक शिक्षणावर उच्च शिक्षणाचा डोलारा उभा आहे त्याचे सक्षमिकारण करण्याऐवजी त्याचे कंगालीकरण केले जात आहे. सर्व सरकारी प्राथमिक शाळा, अनुदानित माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये बंद करून शिक्षण व्यवस्थेचे खाजगीकरण करणारी धोरणे आखली जात आहेत. या शाळांच्या मधून शिक्षण घेणाऱ्या दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, बहुजन कष्टकरी शेतकरी आणि अल्पसंख्यांक समूहातील मुलामुलीना शिक्षणातून हद्दपार केले जात आहे. मुलींच्या शिक्षणाची वाट तर कायमची बंद होणार आहे.
आज महाराष्ट्रात ६४८८४ सरकारी शाळा आहेत. त्यातील १७८ शाळांना स्वतःची इमारत नाही. ४०१ शाळांत पिण्याच्या पाण्याची सोय नाही. ५२२३ शाळांत मुलासाठी तर ३०९५ शाळांत मुलींसाठी स्वछतागृह नाही. १०१९३ शाळांना खेळाचे मैदान नाही.४६८४ शाळांत वीज कनेक्शन नाही. महापालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागातील सरकारी शाळांच्या ही विदारक अवस्था आहे. म्हणूनच सरकारी शाळांचे कंगालीकरण थांबवून सार्वजनिक शिक्षणवेवस्थेचे मजबूतीकरण करण्यासाठी शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंचच्या नेतृत्वाखाली ५ ऑक्टोबर २०२६ पासून महत्वाच्या पाच मागण्या घेऊन आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येत आहे.या आंदोलनापुर्वी शासनापर्यंत आमचे म्हणणे पोहचावे यासाठी सदर निवेदन देण्यात येत आहे.
मागण्या -: 
(१) २० पटसंख्येपेक्षा कमी पटसंख्या असल्याचे कारण सांगून शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय तातडीने मागे घेतला पाहिजे. गाव, तांडा, वाडी, वस्ती तिथे शाळा हेच धोरण कायम ठेवले पाहिजे. विद्यार्थी असला तरी ती शाळा चालू ठेवली पाहिजे. प्रत्येक वर्गाला स्वतंत्र्य शिक्षक दिला पाहिजे.(२) गुणवत्तापूर्ण शिक्षणावर गंभीर परिणाम करणारा १५ मार्च २०२४ रोजी घेतलेला संचमान्यतेचा शासन निर्णय तातडीने मागे घेतला पाहिजे. शाळा व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक मिळाला पाहिजे.(३) नवीन शैक्षणिक धोरणामुळे उच्च शिक्षणाचे खाजगीकरण, आणि बाजारीकरण वेगाने होणार आहे. १००० विद्यार्थी संख्येच्या अटीमुळे खेड्यापाड्यातील छोट्या शहरातील महाविद्यालये बंद होणार आहेत. दलित, आदिवासी, ग्रामीण, बहुजन-कष्टकरी, भटके विमुक्त, अल्पसंख्यांक समूहातील मुलामुलींना उच्च व महाविद्यालयीन शिक्षणातून हद्दपार केले जाणार आहे.त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरण रद्द केले पाहिजे.(४) शिक्षणातील विषमता नष्ट करायची असेल तर केजी टू पीजी सर्वाना मोफत, गुणवत्तापूर्ण आणि समान शिक्षण मिळाले पाहिजे.(५) शिक्षणावर होणारा खर्च हा नाममात्र असून तो वाढवत वाढवत राष्ट्रीय उत्पन्नाच्या दहा टक्केपर्यंत नेला पाहिजे(६) शालेय कामाच्या कालावधीत शिक्षकांचे मोबाईल बंद ठेवण्यात यावे त्यामुळे अध्यापन करणे सुलभ होईल. (७) मराठी शाळांना अनुदान देण्यात यावे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येऊन निवेदन देण्यात आले .यावेळी  सिद्धार्थ जगदेव,संजय पवार ,प्रवीण कुमार लाडे,भूपेश वाघ,युसुफ पापा सर ,विनोद रोकडे ,चंद्रकांत सत्तेसा,व्ही टी.गवळे, आप्पासाहेब तायडे,अशपाक खाटिक,मुकेश वाघ, मुकेश निकम, सुरेश सोनवणे, हर्षदा पाटील ,नीलिमा भामरे ,गुलाबराव वाघ, ईश्वर बैसाणे, शमसुल हसन, विशाल जाधव, मोहसीन शेख ,हेमंत भडक , शरद वेंदे, अमीन कुरेशी, नंदिनी पाटील, अशोक सोनवणे,  अब्दुल रऊफ सर, विलास महाले, नितीन पाटील, स्मिता सराट, ॲड.अरुण ढिवरे, अत्ताउरहमान , रियाज अहमद, खतीब सर, नवल ठाकरे, गौस रझा, श्वेता गवळे, देविदास जगताप, मधुकर निकुंभे , प्रविण गवळे, महेंद्र फुलपगारे,प्रशांत फुलपगारे,प्रकाश पाटील,केतन निकम, नानाभाऊ महाले , धनंजय जगताप, प्रसिका जगदेव, हर्ष मोरे.सिद्धांत बागुल, उपस्थित होते.

लेबल: ,

शुक्रवार, १० जुलै, २०२६

१०० टक्के शाळा बंद ठेवून शिक्षकांचा विराट मोर्चा ; प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

१०० टक्के शाळा बंद ठेवून शिक्षकांचा विराट मोर्चा ; प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

जनसंघर्ष न्यूज 

महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ९ जुलै रोजी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी शाळा बंद सामूहिक रजा आंदोलनाला धुळे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.जिल्हा परिषद खासगी प्राथमिक व महानगरपालिका शाळांतील शिक्षकांनी शंभर टक्के शाळा बंद ठेवून सामूहिक रजा घेत आंदोलनात सहभाग नोंदविला.यानंतर कर्मचारी कल्याण भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट आक्रोश मोर्चा  काढण्यात आला.शिक्षक संघटनाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा .अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल , असा इशारा देण्यात आला. निवेदनात टीईटी परीक्षा सी रद्द करणे, १५ मार्च २०२४ चा संचमान्यता शासन निर्णय रद्द अथवा सुधारित करणे. बीएलओची कामे शिक्षकांऐवजी इतर शासकीय कर्मचाऱ्यांकडे सोपिवणे, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करणे तसेच टीईटी संदर्भांत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणे आदी प्रमुख मागण्यांचा समावेश होता.या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक , खासगी प्राथमिक व महानगरपालिका शिक्षक संघटनांनी सहभाग घेतला. क्यूमाईन क्लब येथे धरणे आंदोलनानंतर मोर्चा काढण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश धात्रक, सरचिटणीस चंद्रकांत सत्तेसा, कार्याध्यक्ष रविंद्र पाटील, शिवानंद बैसाणे, बाळासाहेब बोरसे,शरद सूर्यवंशी,विजय खैरनार, संजय पोतदार,भूपेश वाघ, राजेंद्र नांद्रे, संजय शिंदे, विनोद पाटील, प्रवीण भदाणे, रवींद्र बोरसे,बापू पारधी, मुरलीधर शिंदे, नवीनचंद्र भदाणे, राजेंद्र भामरे, मिलिंद वसावे, जगदीश बडगुजर, ज्ञानेश्वर पवार, विजय ढोबळे, शरद पवार, विजयकुमार देसले, कमलाकर बच्छाव, रुपेश जैन, ज्ञानेश्वर कक्कर, गमन पाटील, माझे मिर्झा,गोकुळ सोनार,मनोज निकम ,छोटू राजपूत,संदीप पवार, शामकांत अहिरराव,पंडित पाटील, विश्वनाथ सोमवंशी ,प्रभाकर मेटेकर,सुरेंद्र पिंगळे ,शरद पाटील,ऋषिकेश कापडे,गिरीश बागुल ,संदीप मराठे,संदीप नेरे,अनिल तोरवणे,ईश्वर ठाकरे, तुकाराम बहिरम , गजानन जाधव , दत्तात्रय पाटील,नितीन सासके , अशोक बडगुजर,संतोष जाधव,अविनाश काकुळदे ,भूषण सूर्यवंशी, ज्ञानेश्वर बाविस्कर,विलास पाटील, राकेश केदार,धर्मसिंग पावरा,विशाल परदेशी ,रविंद्र पवार ,भास्कर परदेशी,वंदना सावंत,तृप्ती राजपूतकर,ज्योती वराडे, रेखमा पाटील,रुपाली सोनवणे , ज्योत्स्ना सनेर , छाया परदेशी ,पल्लवी मांडोळे, दीपाली पवार,प्रतिमा वाघ,दीपा मोरे,चेतना परदेशी ,यांच्यासह विविध संघटनाचे पदाधिकारी व शेकडो शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेबल: , ,

सोमवार, ६ जुलै, २०२६

मुख्याध्यापक व शिक्षक संघटनांचा इशारा : 9 जुलै रोजी राज्यव्यापी शाळाबंद आंदोलन

 



मुख्याध्यापक व शिक्षक संघटनांचा इशारा : 9 जुलै रोजी राज्यव्यापी शाळाबंद आंदोलन

जनसंघर्ष न्यूज 

धुळे | प्रतिनिधी
      राज्यातील कार्यरत शिक्षकांवरील वाढत्या प्रशासकीय भार, पदोन्नती प्रक्रियेतील अडथळे, TET अनिवार्यता तसेच शिक्षकांना देण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामांच्या विरोधात महाराष्ट्रातील विविध शिक्षक संघटनांनी 9 जुलै 2026 रोजी राज्यव्यापी शाळाबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.

      निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने राज्यातील शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. पदोन्नती प्रक्रियेत निर्माण झालेल्या अडचणी दूर करून पात्र शिक्षकांना न्याय देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
तसेच सेवाज्येष्ठ शिक्षकांसाठी TET परीक्षेची सक्ती रद्द करावी, उत्तर प्रदेश व तेलंगणा राज्यांच्या धर्तीवर सवलती लागू कराव्यात, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पदोन्नतीसंदर्भातील प्रश्न तातडीने निकाली काढावेत, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.
निवेदनात शाळा व विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा आणणारे संवर्गनाश धोरण रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षकांकडून निवडणूक व इतर अशैक्षणिक कामे करून घेतली जात असल्याने अध्यापन कार्यावर परिणाम होत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.
        
       शासनाने शिक्षकांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास 9 जुलै रोजी महाराष्ट्रभर शाळाबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिक्षक संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे. आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

       धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष योगेश धामक, सचिव चंद्रकांत साटोरा यांच्यासह विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांसह हे निवेदन सादर करण्यात आले.

लेबल: , ,

सोमवार, ११ मे, २०२६

जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या जिजाऊ कन्यांनी राखली यशाची परंपरा कायम.

जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या जिजाऊ कन्यांनी राखली यशाची परंपरा कायम.

जनसंघर्ष न्यूज 

धुळे:- फेब्रुवारी -मार्च 2026 मध्ये संपन्न झालेल्या विभागीय मंडळाच्या उच्च माध्यमिक व माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांचा निकाल नुकताच अनुक्रमे दिनांक 02 व 08 मे 2026 रोजी घोषित झाला त्यात 
श्री.शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थींनीनी यशाची परंपरा कायम राखत विद्यालयाच्या नावलौकीकात भर टाकली माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल  92.50% लागला असून त्यात कु.खुशी कैलास माळी 10 वी हीने 86.20 % गुण प्राप्त करुन प्रथम क्रमांक पटकावला तर 10वी क ची कु.गायत्री विलास शिरसाठ हिने
 86 % गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कु.देवयानी सुरेश पाटील हिने 85.60 %गुण प्राप्त करुन तृतीय क्रमांक पटकावला तसेच उच्च माध्यमिक विभागातून कु.प्रतिक्षा नाना कापुरे 71%गुणांसह प्रथम कु.अमृता आनंदा गवळी 68.33%द्वितीय तर तृतीय क्रमांक कु.सनोबर अजिम शेख हिने 68% गुणासह पटकावला 
यशस्वीतांचे संस्थेचे चेअरमन धुळे ग्रामीणचे जलदुत मा.आमदार कुणालबाबा पाटील संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.एस.टी.पाटील, तथा सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या .
यशस्वीतांचे विद्यालयाच्या प्राचार्य सौ.अपर्णा विजय पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून सन्मानित केले प्रसंगी उपमुख्याध्यापिका श्रीमती एस.व्ही.अडकमोल, जेष्ठ शिक्षक ,श्री. मनोहर मगर,मुकेश येवलेकर,संजय देवरे   संदीप परदेशी, चंद्रकांत ई.पाटील, रमेश यादव, उमेश भदाणे, सचिन रवंदळे,  मनोज पी.पाटील, लक्ष्मण के.गवळी,चंद्रकांत टी पाटील, अभिजीत पाटील, लक्ष्मीकांत ठाकरे, तथा सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

लेबल: ,

बुधवार, ६ मे, २०२६

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा जयहिंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात केला जाहीर सत्कार

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा जयहिंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात केला जाहीर सत्कार

जनसंघर्ष न्यूज 

धुळे प्रतिनिधी - सिध्दार्थ मोरे 

      धुळे :- जयहिंद शैक्षणिक ट्रस्ट संचलित जयहिंद हायस्कूल सलग्न कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा उत्कृष्ट निकाल लागल्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी विज्ञान, वाणिज्य व कला शाखेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे चेअरमन श्री. निलेश पाटील होते. प्रमुख उपस्थितीत शालेय समिती सदस्य डॉक्टर नितीन काकडे, श्री. भूषण सावंत, सदस्या श्रीमती भारतीताई भामरे, प्राचार्य श्री. डी. व्ही. निकम, उपप्राचार्या श्रीमती करंदीकर, पर्यवेक्षक श्री. बिपिन सोनवणे, प्रवीण बोरसे व संजय देवरे ,प्रा एस एस चौधरी सर आदी उपस्थित होते.यावेळी विज्ञान शाखेत संयुक्त प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या कु. गीतांजली ठाकरे व कु. निरीक्षा टोणेपे, प्रथमेश अहिरराव, आदित्य भावसार, तसेच इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. वाणिज्य शाखेतील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या कु. गरिमा छाजेड, द्वितीय वेदांत भट्टड, तृतीय कृष्णा बागड,व कला शाखेतील प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या कु. अनम पिंजारी, द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या रेणुका चौधरी, तृतीय क्रमांक यमन खान यांचाही गौरव करण्यात आला.
संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. “कठोर परिश्रम, शिस्त व सातत्य यांच्या जोरावरच हे यश मिळते,” असे मार्गदर्शनही यावेळी करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षकांनी केले. या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत आणखी भर पडली असून सर्वत्र विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

लेबल: , ,

शनिवार, ३ जानेवारी, २०२६

अकलाड येथील जि.प. शाळेत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बालिका दिन उत्साहात

 

अकलाड येथील जि.प. शाळेत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बालिका दिन उत्साहात

जनसंघर्ष न्यूज 

       धुळे :- तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा, अकलाड येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शाळेत विविध शैक्षणिक व प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर मनोगत व भाषणे सादर केली.

          स्त्री शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाची माहिती विद्यार्थ्यांनी आपल्या शब्दांत मांडली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर रायते, तसेच संगिता वाघ, अजयकुमार बच्छाव, दिनेश राजभोज, राजेंद्र सोनवणे व योगिता पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगून बालिका शिक्षणाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेषतः मुलींमध्ये शिक्षणाविषयी जागृती निर्माण झाली. बालिका सशक्तीकरणाचा संदेश देत हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

लेबल: ,

शुक्रवार, १२ डिसेंबर, २०२५

ज्येष्ठ नेते मा.शरद पवार यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

 

ज्येष्ठ नेते मा.शरद पवार यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

जनसंघर्ष न्यूज 

बुलढाणा प्रतिनिधी -दिपक देशमुख 

          मेहकर - आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांच्या ८५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून डोणगाव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते याच्या कडुन डोणगाव येथील जिल्हा परिषद कन्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.आज संपुर्ण महाराष्ट्रात साजरा होत आहे दरवर्षी प्रमाणे डोणगाव  शहरातील ग्रामस्थांनी शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला आहे दरवर्षी प्रमाणे गावातील काही मंडळी प्राथमिक शाळेत जाऊन  तिथल्या विद्यार्थ्यासोबत विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूचे भेट देऊन वाढदिवस साजरा करुन दीर्घायुष्याची प्रार्थना केली विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात उपयोगात आणून त्यांच्या गरजा पूर्ण केल्या तर विद्यार्थ्यांची शालेय गोडी वाढून त्यांच्या गरजा पूर्ण होऊ शकतात अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व गावातील ग्रामस्थांनी युवा पिढीने मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला आहे . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पंकज पळसकर युवा जिल्हाध्यक्ष गोपाल आखाडे श्याम पांडव आशिष भंडारे सतीश बाजार नामदेव पांडव शाळेचे मुख्याध्यापिका कुसुम गवई गोपाल लांबाडे अंजली ठोंबरे अर्चना सूर्यवंशी व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते

लेबल: , , , , , ,

बुधवार, १२ नोव्हेंबर, २०२५

15 हजाराच्या लाचेसाठी मुख्याध्यापकासह शिक्षकाने विकली लाज ; धुळे एसीबीने शिक्षण क्षेत्रातील लाचखोरीचा केला पर्दाफाश

 

15 हजाराच्या लाचेसाठी मुख्याध्यापकासह शिक्षकाने विकली लाज 

धुळे एसीबीने शिक्षण क्षेत्रातील लाचखोरीचा केला पर्दाफाश 

जनसंघर्ष न्यूज 

धुळे - जनता शिक्षण प्रसारक संस्था ,बेटावद ता. शिंदखेडा जि. धुळे संचलित महात्मा गांधी विद्यालय मांजरोद ता. शिरपूर येथे तक्रारदार उपशिक्षक या पदावर कार्यरत असून त्यांची 2023 पासून एक वर्षाकरिता वार्षिक वेतन वाढ स्थगित करण्यात आली होती तसेच त्यांना सेवेत बारा वर्षे पूर्ण होऊन देखील वरिष्ठ वेतनश्रेणी  लागू केले नसल्याने तक्रारदार यांनी यांनी शाळेचे मुख्याध्यापक कैलास सखाराम पाटील वय 52 यांची भेट घेऊन त्यांचा स्थापित केलेली वेतन वाढ व वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करणे बाबत विनंती केली असता मुख्याध्यापक कैलास पाटील यांनी तक्रारदारी यांच्या स्थगित केलेली वेतन वाढ व वरिष्ठ वेतन सगळ्यांना लागू करण्यासाठी उपशिक्षक गोपाळ पाटील यांच्याकडे 15000 रुपये द्यावे लागतील त्याशिवाय तुमचे काम होणार नाही असे सांगितल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालय येथे दूरध्वनी द्वारे माहिती दिली असता सदर माहितीवरून धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शिरपूर येथे जाऊन तक्रारदार यांची तक्रार नोंदवून घेतली. 

        वरील तक्रारीवरून दि. 6 नोव्हेंबर 2025 रोजी पडताळणी केली असता लाचखोर मुख्याध्यापक कैलास सखाराम पाटील यांनी तक्रारदार यांना त्यांच्या कामाबाबत उपशिक्षक गोपाल रघुनाथ पाटील वय 47 यांना भेटण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी आरोपी नंबर 2 गोपाल रघुनाथ पाटील यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष 15000 रुपये लाचेची मागणी करून लाज स्वीकारण्याचे मान्य केले असता त्यानंतर दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापडा रचून महात्मा गांधी विद्यालय मांजरोद ता. शिरपूर येथे कार्यरत असलेले उपशिक्षक गोपाल रघुनाथ पाटील वय 47 यांना तक्रारदार यांच्याकडून 15000 रुपये लाचेची रक्कम स्वतः स्विकारत असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

        सदर कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपअधीक्षक ला.प्र.वि. धुळे त्यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, पोहेकाॅ. राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, पोकॉ. मकरंद पाटील , प्रवीण पाटील ,प्रशांत बागुल, सागर शिर्के ,रितेश चौधरी,मपोकॉ. रेश्मा परदेशी, पोहेकॉ. सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी यशस्वी केली.

      लाचलुचप प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईने शिक्षण क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ज्या शाळेत पालक आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी शाळेत पाठवतात ज्या शाळेला महापुरुषाचे नाव आहे. अशा या महात्मा गांधी विद्यालय मांजरोद येथे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगल्या धडे शिकविण्याचे सोडून स्वतः मुख्याध्यापक शेणखत असल्याने पालकांमध्ये संतापाची लाट तयार झाले आहे.

लेबल: , , , ,

मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५

धुळे जिल्ह्यात थंडीचा पारा 8 अंशावर जिल्ह्यातील सकाळच्या शाळा एक तास उशिरा भरवा - युवा सेनेची मागणी

 

धुळे जिल्ह्यात थंडीचा पारा 8 अंशावर जिल्ह्यातील सकाळच्या शाळा एक तास उशिरा भरवा - युवा सेनेची मागणी 

जनसंघर्ष न्यूज

धुळे - शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरल्याने थंडीचा पारा आठ अंशावर गेला असून याचा परिणाम संपूर्ण जिल्ह्यातील सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर होत असून त्यांना शाळेत वेळेवर पोहोचण्यासाठी हाल सोसावे लागत आहेत यासाठी विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन सकाळच्या सत्रात भरणाऱ्या शाळांचे वर्ग एक तास उशिराने भरावेत अशी मागणीचे निवेदन युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश मराठे यांनी प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहे. 

        प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात जास्त थंडी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये धुळ्याचा समावेश आहे. रात्री ९ नंतर रस्ते निर्मनुष्य होतात. सकाळी देखील थंडीचे प्रमाण जास्त असते. थंडीतहीप्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना सकाळी ६ वाजेला उठून शाळेची तयारी करावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहे. दरवर्षी जानेवारी नंतर थंडीची चाहुल लागते. परंतु यंदा नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यातच तापमानाचे प्रमाण कमी झाल्याने थंडीच्या प्रमाणातजास्त वाढ झाली आहे. यामुळे भर दुपारी सुद्धा थंडी वाजत आहे. तर सकाळी ७.१५ ला शाळेतील विद्यार्थी शाळेत जाणार कसे? वातावरण बदलामुळे भर थंडीत विद्यार्थ्यांना सकाळी शाळेत जावे लागते यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होवू शकतो. पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या हिताकरीता शालेय वेळापत्रकात बदल करण्यात यावा. सकाळच्या सत्रातील सर्व वर्ग मराठी, इंग्रजी, महानगरपालिकेच्या शाळा तसेच सर्व माध्यमातील शाळांचे वेळापत्रक बदलणे गरजेचे आहे. जिल्ह्याच्या तापमानाचा पारा ८ ते १२ अंश सेल्सियस असे पर्यंत सकाळच्या सत्रात भरणारे सर्व वर्ग उशीराने भरविण्याच्या तात्काळ सुचना सर्व शासकिय व खाजगी शैक्षणिक संस्थांना शिक्षणाधिकाऱ्यांनी द्यावेत अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख योगेश मराठे, महानगरप्रमुख अमित खंडेलवाल, उपमहानगरप्रमुख चेतन धामेचा, प्रतिक शिंदे, अनिल ठाकुर, उपमहानगरप्रमुख राहूल ठाकुर, शुभम पाटील, राकेश चव्हाण, कल्पेश चौधरी, दिगंबर कासार, दिनेश चव्हाण, नितीन धनगर, देवेंद्र गायकवाड, केतन शेलार, सुमित चौधरी, राम चोपडेकर, नितीन मराठे, आकाश पाटील, प्रविण मराठे, राहुल मोरे, आदित्य वानखेडे, सागर पाटील यांनी केली आहे.

लेबल: , ,

रविवार, ५ ऑक्टोबर, २०२५

आधार प्रकल्पातील वृद्धांसोबत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न


आधार  प्रकल्पातील वृद्धांसोबत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

जनसंघर्ष न्यूज 

धुळे :- समता शिक्षण संस्था, पुणे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्पाअंतर्गत "आधार प्रकल्पा"तर्फे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम बुधवार, दि. १ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता विश्वासनगर, कुंडाणे येथे घेण्यात आला.

समता शिक्षण संस्था, पुणेचे सचिव व  डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प, धुळे  प्रकल्पाचे संचालक डॉ. जालिंदर अडसुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रकल्प  समन्वयक प्रा. रचना अडसुळे यांच्या नियोजनात हा उपक्रम राबविण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्रीमती. सुनिता पाटील (कार्यक्रम अधिकारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प, धुळे) यांनी केले.  कार्यक्रमाप्रसंगी लाभलेले प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून  मा. श्री. संजय सैंदाणे (सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण धुळे) यांनी "वृद्धांसाठी असणाऱ्या विविध शासकीय योजना" या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी श्री. सैंदाणे यांनी आदिवासी वृद्धांच्या जीवनशैली विषय चर्चा करून त्यांचे प्रश्न समजून घेतले. पुढे त्यांनी समाजकल्याण खात्यातील जेष्ठ नागरिकांच्या योजनाचा लाभ पुरेपूर देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले. 

यावेळी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्रमोद भुंबे, कुंडाणे गावचे पोलीस पाटील श्री. दयानंद गावित, बार्टी धुळे जिल्हा समन्वयक श्री. निवृती शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे नियोजन गणेश उफाडे यांनी केले. याप्रसंगी अक्षय भुसारे ह्याने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर आम्रपाली वाघ हिने उपस्थितांचे आभार मानले.  या कार्यक्रमाला समाजकार्य महाविद्यालयातील क्षेत्रकार्य विद्यार्थी कोमल शिंदे, अनिल बागुल, दीप्ती चिकाटे, तसेच  महेश खैरनार यांचे सहकार्य लाभले.

लेबल: , ,

शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क सरसकट माफ करावे- अभाविप

 

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क सरसकट माफ करावे- अभाविप

जनसंघर्ष न्यूज 

       धुळे :- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धुळे शाखेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यां मार्फत मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क सरसकट माफ करावे, यासह आठ मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

        राज्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने घरे, शाळा, महाविद्यालये, शेती आणि जीवनावश्यक वस्तूंचा नाश झाला आहे.

        या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत अभाविपच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले असून, त्यामध्ये पुढील महत्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.

1. पूरग्रस्त शाळा-महाविद्यालयांचे नुकसान भरून काढण्यात यावे. विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तके विनामूल्य द्यावीत.

2. अतिवृष्टीग्रस्त क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क संपूर्ण माफ करण्यात यावे.

3. परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांसाठी फेर परीक्षा घेण्यात याव्यात.

4. पूरग्रस्त भागांतील स्पर्धा परीक्षा फॉर्म शुल्क माफ करून सरसकट फॉर्म भरण्याची सुविधा द्यावी.

5. "कमवा व शिका" योजनेचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा.

6. नष्ट झालेली शैक्षणिक कागदपत्रे विनाशुल्क पुन्हा उपलब्ध करून द्यावीत.

7. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून योग्य आर्थिक मदत देण्यात यावी.

8. पूरग्रस्त भागांमध्ये आरोग्य सुविधा, स्वच्छता मोहीम आणि औषधोपचार त्वरीत उपलब्ध करून द्यावेत. 

         विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच पुरग्रस्त कुटुंबांना योग्य आर्थिक मदत व्हावी यासाठी शासनाने मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने मदत करत दिलासा देण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी अभाविप धुळे शहर मंत्री मयुरी जाधव यांनी केली आहे.

          यावेळी धुळे जिल्हा संयोजक लहानु कोळेकर,  सहमंत्री कृष्णा वाघ, हर्षल शिरसाठ, जयेश पाटील उपस्थित होते.

लेबल: ,

गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५

नवरात्र निमित्त कॉन्व्हेंट स्ट्रीट मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने शालेय विद्यार्थिनींना बूट वाटप

 


 नवरात्र निमित्त कॉन्व्हेंट स्ट्रीट मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने शालेय विद्यार्थिनींना बूट वाटप

जनसंघर्ष न्यूज 

पुणे प्रतिनिधी - शंकर जोग

       नवरात्र महोत्सव निमित्त पुणे कॅम्प येथील कॉन्व्हेंट स्ट्रीट मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने कॅम्प एज्युकेशन सोसायटी कन्या विभाग या शाळेतील गरजू विद्यार्थिनींच्या  गरजा लक्षात घेत शाळेचे बूट वाटप करण्यात आले.

 यावेळी आयोजक कॉन्व्हेंट स्ट्रीट मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विशाल मोरे यांनी माध्यमांशी सांगितले की कॉन्व्हेंट स्ट्रीट मंडळ नेहमी सामाजिक बांधिलकी जपत गोरगरिबांना मदत करण्याचे काम करत असते व यापुढे देखील करत राहणार. 

       यावेळी विनायक राठोड, सुरज ठोकळ, प्रदीप शिंदे, राजू शेट्टी, तसेच शाळेतील शिक्षिका मीना साळुंखे, व सपकाळे मॅडम उपस्थित होते, दरवर्षी विविध ठिकाणी ट्रस्टच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे प्रयत्न केले जात आहे अशी माहिती कॉन्व्हेंट स्ट्रीट मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विशाल मोरे यांनी सांगितले


लेबल: ,

गुरुवार, १८ सप्टेंबर, २०२५

कासोदा येथील भारती माध्यमिक विद्यालयाचे कुस्तीपटूंचे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

 कासोदा येथील भारती माध्यमिक विद्यालयाचे कुस्तीपटूंचे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

   जनसंघर्ष न्यूज 

         एरंडोल (प्रतिनिधी ) :- जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय,   तसेच पंचायत समिती एरंडोल यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल येथील गुरु हनुमान कुस्तीगीर संस्था तसेच छत्रपती क्रीडा मंडळ एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमानाने दि.१७/९/२०२५ रोजी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत कासोदा येथील भारती माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थीचे कुस्ती स्पर्धेत  पूर्वेश गजानन खैरनार  फ्रीस्टाइल ४५ वजन किलो वय १४ वर्ष गटात व प्रथमेश समाधान खैरनार ५१ किलो वजन वय १७ वर्ष गटात तसेच ग्रीको वजन  ४५किलो  वय १७ वर्ष वयोगटात सत्यजित प्रविण बाविस्कर या तीन कुस्तीपटूची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्ध साठी निवड करण्यात आली आहे.

           यावेळी एरंडोल तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत उपस्थित मान्यवर तालुका क्रिडा समन्वय श्री.प्रा.मनोजभाऊ पाटील, श्री.एस.एच.पाटील सर, वस्ताद भानुदास आरखे, भारती माध्यमिक विद्यालयाचे क्रिडा शिक्षक श्री. भैय्या मराठे सर, तसेच शिवनेरी व्यायाम शाळेचे वस्ताद श्री. हनुमानभाऊ पाटील, प्रवीण बाविस्कर,शुभम पैलवान, मुख्तार पैलवान,सोनू पैलवान,शाकीर पैलवान, समाधान पैलवान,  एरंडोल तालुक्यातील कुस्तीपटू उपस्थित होते.

        या विजयी कुस्तीपटूंचे शाळेचे चेअरमन, मुख्याध्यापक, शिक्षक व पालक तसेच ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन केले पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

लेबल: , ,

सोमवार, ८ सप्टेंबर, २०२५

शिंदखेडा तालुक्यातील मौजे विखुर्ले गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेचे आदर्श शिक्षक राहुल पाटील सर यांच्या निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

 

शिंदखेडा तालुक्यातील मौजे विखुर्ले गावातील जिल्हा परिषद मराठी  शाळेचे आदर्श शिक्षक राहुल पाटील सर यांच्या निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

जनसंघर्ष न्यूज 

जिल्हा परिषद मराठी शाळा विखुर्ले येथे गेल्या सहा ते सात वर्षांपासून शाळेत कार्यरत असलेले उपशिक्षक राहुल पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, क्रिडा, स्पर्धा, संस्कृती प्रत्येक महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी, स्वातंत्र्य दिवस, प्रजासत्ताक दिवस, संविधान दिवस, मराठी, इंग्रजी, हिंदी, गणित, बुध्दीमत्ता कौशल्य असे अनेक विषयांवर शिक्षणाची कास धरून विद्यार्थी बालमित्र घडवले. आदर्श शिक्षक राहुल पाटील सर यांची बदली झाल्याबद्दल ग्रामपंचायत विखुर्ले सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या कडुन निरोप समारंभ व सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विखुर्ले गावातील माजी सरपंच गुलाबराव संभाजी पाटील आणि ग्रामपंचायत विखुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निरोप समारंभ कार्यक्रम गावातील समस्त ग्रामस्थ, युवक, माता पालक,  शेकडोच्या संख्येने उपस्थित होते. निरोप समारंभ च्या कार्यक्रमानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून  पंचायत समिती शिंदखेडा माजी सभापती जिजाबराव पाटील, पोलीस पाटील संघाचे धुळे जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील, विखरण गावाचे सरपंच, महेंद्र पवार,कामपुर गावाचे सरपंच विष्णू पाटील, जोगशेलू गावाचे सरपंच नितिनदादा देसले,  रहिमपुरे गावाचे सरपंच अरुण जी पाटील, जोगशेलु गावाचे उपसरपंच किरण दादा आणि ज्यांच्या कडून शाळेसाठी पेंट खरेदी करून शाळा रंगीबेरंगी केली असे कृष्णा पेंट चे संचालक पंकज गिरासे, शुभम हार्डवेअर चे मालक देवेंद्र भाऊ गिरासे, विखुर्ले गावाचे सरपंच जन्याबाई भिल, उपसरपंच जगन्नाथ बापु केदार, सोनशेलु गावाचे माजी उपसरपंच राहुल गिरासे, विखुर्ले गावाचे माजी सरपंच जगदिश तिरमले (पिंटूशेठ), महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालय विखुर्ले च्या मुख्याध्यापिका रेखा पाडवी मॅडम व विलास पाटील सर व सर्व शिक्षक विखुर्ले गावाच्या ग्रामसेविका रोहीणी पवार, तलाठी, स्नेहल पाटील, जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र चौधरी सर यांची कार्यक्रमासाठी उपस्थिती लाभली. 

           विखुर्ले गावचे माजी सरपंच श्री गुलाबराव पाटील यांनी शाळेतील शिक्षकांनी मागील सहा वर्षात केलेल्या धडाडीच्या कामांचा पाढाच वाचला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जिजाबराव पाटील यांनी अशी शाळा आणि असे शिक्षक मी माझ्या 40 वर्षांच्या राजकीय कालखंडात पहिल्यांदा बघितले, असे प्रतिपादन केले. आलेल्या पाहुण्यांनी शाळेचे बदलेले रूप पाहून गौरवोद्गार काढले. शाळेचे मुख्याध्यापक श्री रविंद्र चौधरी सर आणि श्री राहुल पाटील सर यांनी मिळून शाळे च्या गुणवत्तेत आणि भौतिकतेत जे बदल केले त्याबद्दल गावकऱ्यांनी जाहीर आभार मानले. चौधरी सर शाळेचे सरसेनापती होते म्हणून माझ्या सारखा मावळा इथे काम करू शकला असे प्रतिपादन श्री राहुल पाटील सर यांनी त्यांच्या भाषण केले.  त्यांनी आपल्या भाषणात समस्त ग्रामपंचायत टीम, गावकऱ्यांचे व पालकांचे मनापासून आभार मानत असताना विखुर्लेकरांची आठवण कायम मनात राहील, असे भावनिक शब्दोद्गार काढले. रामनगर शाळेचे मुख्याध्यापक श्री ईश्वर वाघ सर व सहशिक्षक प्रवीण पाटील सर यांनी चौधरी सर्व पाटील सर यांचा सत्कार केला त्याचबरोबर देगाव शाळेचे मुख्याध्यापक तथा शिंदखेडा चे केंद्रप्रमुख श्री शिंदे सर आणि सहशिक्षक श्री राकेश बागुल सर यांनी शाळेच्या दोन्ही शिक्षकांचा सत्कार करून पुढील वाटचालीस  शुभेच्छा दिल्या.

          श्री राहुल पाटील सर यांच्या बदलीमुळे शाळेचेच नव्हे तर संपुर्ण विखुर्ले गावचे वातावरण सुन्न झाले होते. गावकरी, मुले, मातापालक तहानभूक विसरून कार्यक्रम स्थळी रडत होते. सर्वांनी साश्रु नयनांनी राहुल पाटील सरांना निरोप दिला.

लेबल:

बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५

शिक्षणाच्या जोरावर गरिबीवर मात करून मोराणे गावातील गणेश उफाडे सेट परीक्षा उत्तीर्ण



शिक्षणाच्या जोरावर गरिबीवर मात करून मोराणे गावातील गणेश उफाडे सेट परीक्षा उत्तीर्ण

 डॉ. जालिंदर अडसुळे यांच्या प्रेरणेनेच सेट परीक्षा उत्तीर्ण :- गणेश उफाडे 

जनसंघर्ष न्यूज 

       धुळे: मोराणे गावातील उफाडे परिवारातील होतकरू व शिक्षणाची आवड असलेले  गावाचे सुपुत्र गणेश सुनिल उफाडे यांनी शिक्षणाच्या जोरावर गरिबीवर मात करून युजीसी मान्यताप्राप्त महाराष्ट्र शासन प्राधिकृत, पुणे विद्यापीठ आयोजित व्याख्याता पदासाठी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट ) समाजकार्य विषयात उत्तीर्ण झाले. सध्या ते समता शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प धुळे येथे ‘कार्यकम अधिकारी’ या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या कामासोबतच शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी मिळवलेले हे यश संस्थेसाठी अभिमानास्पद आहे. गेल्या वर्षी त्यांना साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल 'शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप' मिळाली होती, ज्यामुळे त्यांनी संस्थेचे संस्थापक प्रा. विलास वाघ यांच्या चरित्रावर लेखन करण्यास सुरुवात केली. आता सेट परीक्षेत मिळालेल्या यशामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रवासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.

       डॉ. जालिंदर अडसुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतलेल्या गणेश उफाडे यांनी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (सेट) मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना आता महाविद्यालयात सहायक प्राध्यापक (Assistant Professor) पदासाठीची पात्रता मिळाली आहे. या यशाचे संपूर्ण श्रेय गणेश उफाडे यांनी आपले मार्गदर्शक डॉ. जालिंदर अडसुळे यांना दिले आहे.

       या यशाबद्दल बोलताना गणेश उफाडे यांनी सांगितले की, "डॉ. जालिंदर अडसुळे यांनी वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळेच मी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो. त्यांच्या अभ्यास नियोजनामुळे आणि सोप्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे ही वाटचाल खूप सोपी झाली."

       गणेश उफाडे यांच्या या यशाबद्दल समता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा प्रा. उषाताई  वाघ, सचिव डॉ. जालिंदर अडसुळे व संस्थेचे कार्यकारी मंडळी,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे येथील प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर  ग्रामीण व शहरी विकास प्रकल्पाचे समन्वयक प्रा. रचना अडसुळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुनिता पाटील आणि समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

लेबल: , , , ,

मंगळवार, २६ ऑगस्ट, २०२५

बागल महाविद्यालयात पर्यावरण पूरक गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा संपन्न

 

बागल महाविद्यालयात पर्यावरण पूरक गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा संपन्न

 जनसंघर्ष न्यूज 

दोंडाईचा:- भारतीय सण, उत्सव व परंपरेला पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने ही महत्व आहे. यामाध्यमातून पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करणे हा ही संदेश दिला जातो. या हेतूने प्रेरित होऊन दिनांक 25 ऑगस्ट रोजी श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या श्रीमती पा बा बागल कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात पर्यावरण पूरक गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली वरील कार्यशाळेत महाविद्यालयातील 60 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला होता. सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात शाडूच्या मातीपासून पर्यावरण पूरक अशा गणेशमूर्ती तयार केल्या. सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर पी एस लोहार यांनी कार्यशाळेचा उद्देश विषद केला व मुलांना मार्गदर्शक पर्यावरण पूरक गणेशोत्सवाची सध्याच्या काळातील गरज यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नमूद केले की आपण बालवाडीत असताना एक मातीचा कच्चा गोळा असतो आपले शिक्षक त्यावर संस्कार करतात म्हणूनच आपण जानकर व जबाबदार व्यक्ती म्हणून विकसित होतो त्याचप्रमाणे  आजच्या दिवशी तुम्हाला शाडू मातीतून आपल्याला कलागुणांचा वापर करुन गणपती बाप्पा सकारावयाचा आहे. विद्यार्थ्यांनी सकारात्मक राहून आपल्यातला कलाकार जागृत करावा व विलक्षण अनुभूती जपावा असे आव्हान करुन शुभेच्छा दिल्यात.  विद्यार्थ्यांना शाडूच्या माती पासून गणपतीच्या मुर्त्या बनवण्यासाठी श्री आनंद हरी तोरवणे यांनी प्रशिक्षण दिले तर लेफ्टनंट श्री विश्वासराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. परीक्षणानंतर कार्यशाळेत तयार केलेल्या तीन उत्कृष्ट गणरायांच्या मूर्ती बनविणाऱ्या कलाकार विदयार्थ्याना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस रोख रक्कम देऊन प्राचार्य प्रा. डॉ. पी एस लोहार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

लेबल: ,

रविवार, २४ ऑगस्ट, २०२५

आदर्श पत्रकार जयश्री बी सोनवणे "लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित"

 

आदर्श पत्रकार जयश्री बी सोनवणे "लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित"

सांगली येथे खा. विशाल पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत केला गौरव

जनसंघर्ष न्यूज 

धुळे :- साहित्य कला पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर नावलौकिक करणाऱ्या उत्कृष्ट व आदर्श पत्रकार तथा वृत्त निवेदिका जयश्री बी सोनवणे यांना नुकताच सांगली येथे दिनांक २३/०८/२०२५ रोजी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मेडल देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार डॉ विशाल पाटील, सांगलीचे माजी महापौर डॉ. नितीन सावगावे यांच्या हस्ते व आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.

     जयश्री सोनवणे यांचं सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवून एक विद्रोही बाणा, रोखठोकपणा उभ्या महाराष्ट्राला दाखवणारं महिला संघटन कौशल्य म्हणून उदयाला आलेलं महिलांचे कुशल नेतृत्व तथा दैनिक माझा मराठवाडा वृत्तपत्राच्या त्या निवासी संपादिका रिपब्लिकन आवाज न्यूजच्या उपसंपादिका तथा ज्ञानपंख 24 न्यूज या चॅनलच्या वृत्त निवेदिका आहेत. महिलांचे कुशल नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आज पाहिलं जातं. त्या एक पत्रकार तर आहेतच त्यासोबतच त्या एक उत्तम कवयित्री देखील आहे. जिथे कुठे महिलांवर अन्याय अत्याचार होतो. त्या ठिकाणी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्या हजर असतात. अनेक संस्थांना भेट देऊन गोरगरिबांना मदत मिळवून देणे, सद्य परिस्थितीवर शाळा, कॉलेज या ठिकाणी जाऊन मुलींना परिस्थितीशी दोन हात कसे करायचे यावर मार्गदर्शन करणे. अनेक हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांची फसवणूक होते. त्या ठिकाणी जाऊन त्यांची फसवणूक न होऊ देणे. त्याचबरोबर त्यांचे जे काही हॉस्पिटलचे बिल असते ते जास्तीचे आकारण्यात येते ते कमी करून देणे म्हणजेच अन्यायाविरुद्ध त्यांची लढत आहे. पुणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात एक स्त्री म्हणून आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर पत्रकारिता सामाजिक कार्य महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे विषय घेऊन लढणाऱ्या एक लढाऊ व्यक्तिमत्व. याचं कार्याची दखल घेऊन त्यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार हा जाहीर करून त्यांना तो प्रदान करण्यात आला. 

      या घेण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शिका स्वाती कोकरे, समाज प्रभोधनकार, व्याख्याते, प्रसिध्द सांगली, उद्घाटक डॉ. गुरु बगली श्रीरना ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सांगली स्वागताध्यक्ष विष्णू माने राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, कार्यक्रमाचे पाहुणे इद्रीस नायकवडी विधानपरिषद, सावंत माजी विधानसभा, विशेष उपस्थिती सुजय नाना शिंदे सभापती मार्केट कमिटी सांगली, संगीता खोत माजी महापौर सांगली, संदीप सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक, कराड, निवेदक प्रा. घनश्याम चौगुले महात्मा विद्यामंदिर हाय. व ज्यु, कॉलेज, उमदी. निमंत्रक अशोक श्रीपती गोरड, अध्यक्ष, ए.डी. फाऊंडेशन. महादेव महानूर कार्याध्यक्ष, आमदार विक्रम आमदार जत, प्रमुख फाऊंडेशन, समनडी, संयोजन समिती दिलीप वाघमोडे, शरद माने, दादासो गोरड, शेंडगे सागर म्हारनूर आदी मान्यवर, कार्यक्रमाचे आयोजक, सर्व पुरस्कारार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     पुरस्कार्थी जयश्री वी सोनवणे यांनी यांनी प्रसार प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की हा सन्मान माझा नसून समाजाचा माझ्यावर असणाऱ्या विश्वासाचा आहे. या पुरस्काराने मला आणखीन नवीन जबाबदाऱ्या दिल्या आहेत असं मला वाटतं आणि आणखी कार्य करण्याची प्रेरणा या पुरस्काराने मला मिळाली आहे. हा सन्मान शक्य झाला तो मार्गदर्शक, सहकारी आणि शुभेच्छुक यांच्या प्रेम व विश्वासामुळे. आपल्या सर्वांच्या आशिर्वादाशिवाय हे शक्य नव्हते.

     त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतेअशा व्यक्त प्रकारच्या भावना सुद्धा त्याने केल्या पुरस्कार्थी जयश्री बी सोनवणे यांच्यावर अभिनंदनाचा होत आहे.

लेबल: ,

बुधवार, २० ऑगस्ट, २०२५

अ. भा. मराठी नाट्य परिषदेतर्फे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सवांतर्गत २४ रोजी धुळ्यात प्राथमिक फेरी

 

अ. भा. मराठी नाट्य परिषदेतर्फे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सवांतर्गत २४ रोजी धुळ्यात प्राथमिक फेरी 

नियामक मंडळ सदस्य चंद्रशेखर पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती 

जनसंघर्ष न्यूज 

धुळे - प्रतिनिधी 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सव घेण्यात येत आहे. याअंतर्गत धुळे शहरातील राजर्षी शाहू महाराज नाट्य मंदिरात दिनांक २४ ऑगस्ट रोजी एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी घेण्यात येणार आहे अशी माहिती अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य तथा स्पर्धा केंद्र प्रमुख चंद्रशेखर पाटील यांनी गुरुवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत दिली. 

धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रपरिषदेत चंद्रशेखर पाटील यांनी सांगितले की, अ.भा. नाटय परिषद दादर, मुंबई मध्यवर्ती संस्थेतर्फे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या नेतृत्वाखाली शहरांसह संपूर्ण महाराष्ट्रात २२ केंद्रात भव्य एकांकिका स्पधेचे आयोजन केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात २५ केंद्रात भव्य एकांकिका स्पर्धा घेतली जाणार आहे. या एकांकिका स्पर्धेची  प्राथमिक फेरी धुळे शहरात येत्या २४ ऑगस्ट, रविवार रोजी होणार आहे. या एकांकिका स्पर्धेसाठी धुळे शहरातून ९ नाट्य संस्थांनी आपला सहभाग नोंदविला असून शहरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिरात या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. धुळे केंद्रावर होणाऱ्या स्पर्धेत आकाश वाघ यांचा एम के शिंदे महाविद्यालय कुसुंबा तालुका जिल्हा धुळे या संघातर्फे 'रात्र वैऱ्याची हाय', सुभाष शिंदे यांच्या रंगदेवता नाट्यसंस्था संघातर्फे 'प्रोफेश्वर पाहिजे', राज वाघ यांच्या क्रांती कृषी बहुउद्देशीय संस्था धुळे संघातर्फे 'सावळा', शशिकांत भगवान नागरे यांच्या हेल्पी फाउंडेशन लळिंग, धुळे संघातर्फे 'कुछ तो लोग कहेंगे', आदेश सावंत यांच्या मॅड स्टुडिओ धुळे संघातर्फे 'कलंदर', राहुल चौधरी यांच्या अजंता आर्ट्स सर्कल संघातर्फे 'बिल', सचिन बागुल यांच्या राज क्रिएशन संघातर्फे 'घरघर', हर्षल राजेश परदेशी यांच्या शासकीय विद्यानिकेतन धुळे संघातर्फे 'वासुदेव आला रे', मंदार तोरणे कर यांच्या हिरे मेडिकल कॉलेज संघातर्फे 'खेळ कुणाला नशिबाचा कळला' या एकांकिका सादर केल्या जाणार आहेत. राज्यातील रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली सातारा, सोलापूर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजी नगर, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, ठाणे, नवी मुंबई, मुंबई या केंद्रांवरही २३ व २४ऑगस्ट रोजी प्राथमिक फेरी होणार आहे. स्पर्धेची अंतिम फेरी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल, मनमाला टँक रोड, माटुंगा, माहीम, मुंबई येथे दिनांक १५, १६, १७ आणि १८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत संपन्न होईल. स्पर्धेसाठी भरघोस रोख रकमेची पारितोषिके कलावंत व तंत्रज्ञांना दिली जाणार आहेत. अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. हे शिबिर नाट्य क्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री घेणार असून अंतिम फेरीतील सादरीकरणाचा दर्जा यामुळे सर्वोत्तम असणार आहे असेही पाटील यांनी सांगितले. धुळे येथील प्राथमिक फेरीचे संयोजन नाट्य परिषदेचे धुळे शाखाप्रमुख सुनील नेरकर, समन्वयक हर्षल परदेशी, लोकेश चौधरी, शशिकांत नागरे यांच्यातर्फे केले जात असल्याचीही माहिती चंद्रशेखर पाटील यांनी दिली.

लेबल: , ,

मंगळवार, १९ ऑगस्ट, २०२५

राज्यस्तरीय ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत अमान काझी या विद्यार्थ्यांचे यश

 

राज्यस्तरीय ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत अमान काझी या विद्यार्थ्यांचे यश

गोल्ड व सिल्वर मेडल जिंकून खान्देश विभागाचे नाव गाजवले....

जनसंघर्ष न्यूज 

नुकत्याच भुसावळ येथे राज्यस्तरीय ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा झाल्या यात संपूर्ण महाराष्ट्रातून 350 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत अमान अबरार काझी या 14 वर्षाच्या मुलाने 25 किलो गट मध्ये गोल्ड व सिल्वर मेडल जिंकून धुळे जिल्हा खानदेश विभागात मानाचा तुरा रोवला आहे. अमान काजी यांच सर्वत्र तोंड भरून कौतुकही केल जात आहे..

आपल्या मुलानं अभिमानाने मान उंचावल्याने गुडडू काझी यांचा देखील भावनिक मन भरून आल आहे.

  खान्देश युथ फाउंडेशन तर्फे  महाराष्ट्र शालेय शिक्षणमंत्री ना.दादाजी भुसे  यांचा हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी हाजी अ.रऊफ पठाण महाराष्ट्र शासन अल्पसंख्यांक कल्याण समिती अशासकीय सदस्य धुळे जिल्हा व माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य  उपस्थित होते. खान्देश युथ फाउंडेशन तर्फे यां सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांचा सत्कार ही करण्यात आला...

लेबल:

बुधवार, १३ ऑगस्ट, २०२५

डोनेशनप्रकरणी संस्था चालकांवर चौकशी करून गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत धन्यवाद आंदोलन सुरूच ठेवणार

 


डोनेशनप्रकरणी संस्था चालकांवर चौकशी करून गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत धन्यवाद आंदोलन सुरूच ठेवणार 

रिपब्लिकन सेनेचे समाधान बैसाणे यांचा इशारा 

जन संघर्ष न्यूज

धुळे :-  शहरातील जयहिंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय प्रवेशासाठी डोनेशनची मागणी करत असल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेचे करत जेल रोड येथे 3 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दरम्यान संबंधित शाळेची चौकशी करून गुन्हे दाखल करावे व संस्थेची मान्यता रद्द करावी, अशी आमची मागणी असल्याचे जिल्हाध्यक्ष समाधान बैसाणे यांनी आज पत्रपरिषदेत सांगितले.

धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात ही पत्रपरिषद झाली. यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष बैसाणे यांनी सांगितले की,   जयहिंद व हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात साहिल राज जाधव या मागासवर्गीय विद्यार्थ्याकडून पाचवीत प्रवेशासाठी शाळेचे चेअरमन, मुख्याध्यापक व व कर्मचार्‍यांकडून 20 हजार रुपयांची मागणी करण्यात आली.  डोनेशन अभावी प्रवेश नाकारण्यात आला. या संदर्भात शिक्षणाधिकार्‍यांकडे दाद मागितल्यानंतर त्यांनी शाळेला आदेशपत्र दिले तरी शाळा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. शाळेकडून डोनेशन मागितल्याचा व्हिडिओ पुरावा देखील आपल्याकडे असल्याचे बैसाणे यांनी सांगितले. संस्थेविरोधात अनेक निवेदने व स्मरणपत्रे देवुनही कारवाई झाली नाही. त्यामुळे आठ दिवसांत संस्थेची चौकशी व कार्यवाही न झाल्यास तिव्र आंदोलन छेडले जाईल. प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे देखील ठोठवु, असा इशाराही यावेळी बैसाणे यांनी दिला.


लेबल: , ,