सोमवार, २९ डिसेंबर, २०२५

आरपीआय आठवले गटाचे पंचायत समिती समोर आमरण उपोषण सांडपाणी सोडणाऱ्या ग्रामसेवक कारवाई करा -आरपीआय ची मागणी

 


बुद्ध विहारासाठी दिलेल्या जागेत सोडलेल्या सांडपाणी मुळे झालेले घाणीचे साम्राज्य 

आरपीआय आठवले गटाचे पंचायत समिती समोर आमरण उपोषण

 सांडपाणी सोडणाऱ्या ग्रामसेवक कारवाई करा -आरपीआय ची मागणी

जनसंघर्ष न्यूज 

शिरपूर प्रतिनिधी 

शिरपूर :- तालुक्यातील मौजे करवंद गावातील बौद्ध वस्तीला 2004 मध्ये ग्रामपंचायतने गौतम बुद्ध सेवा मंडळ संचालित नालंदा बुद्ध विहारासाठी 14700 चौरस फूट ( 175 × 84 ) नमुना नं.8 दिलेली असून त्या जागेवर जाणून-बुजून मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जात आहे, या सांडपाण्यामुळे बौद्ध वस्तीत व बुद्ध विहाराच्या जागेवर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे त्या घाणीच्या साम्राज्यामुळे स्थानिक नागरिकांना आजाराला सामोरे जावे लागत असून बौद्ध विहाराच्या जागेची जाणून बुजून अहवेलना केली जात असून ग्रामपंचायत कडून बुद्धविहाराच्या जागेचा अपमान केला जात आहे.

       तरी बुद्धविहाराची संपूर्ण जागा व बौद्ध वस्ती स्वच्छ करून द्यावी असे अनेक वेळा सांगून देखील ग्रामसेवक व गट विकास अधिकारी पंचायत समिती हे दुर्लक्ष करत असून स्वच्छता करत नसल्याने आरपीआय आठवले गट आक्रमक झाला असून जोपर्यंत बुद्ध विहाराची जागा व बौद्ध वस्तीत स्वच्छता करून ग्रामसेवकावर कारवाई होत नाही तोपर्यंत आज दिनांक 29 डिसेंबर पासून पंचायत समिती समोर आमरण उपोषणाला बसले आहेत.

       यावेळी आरपीआय आठवले गटाचे एकनाथ रामदास वाघ, विनोद छगन करंकाळ, नर्मदा ताई रघु भील, नरेश गवळे इत्यादी उपोषणकर्ते आमरण उपोषणास बसले आहेत.

लेबल: , ,

रविवार, २८ डिसेंबर, २०२५

राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) तर्फे धुळ्यात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न

 

राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) तर्फे धुळ्यात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न

जनसंघर्ष न्यूज 

धुळे शहर प्रतिनिधी - सिद्धार्थ मोरे

धुळे :- महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) कडून उमेदवारांची चाचणी व मुलाखतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.धुळे शहरातील जेलरोड परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या .

या वेळी माजी मंत्री अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुलाखती पार पडल्या .या प्रसंगी धुळे शहराचे माजी आमदार फारुक शाह,कैलास चौधरी, जोसेफ मलबारी,आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.मनपा निवडणुकीत इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने संघटनात्मक  मजबुती, प्रभागातील कामगिरी , जनसंपर्क व पक्षनिष्ठा या निकषांवर उमेदवारांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली.यावेळी बोलताना माजी मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले की , राष्ट्रवादी काँग्रेस( अजित पवार गट) हा महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असून भाजपकडे युतीचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे.मात्र अद्याप भाजपकडून कोणताही ठोस प्रतिसाद  मिळालेला नसल्याने आणि पक्षाकडे इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक असल्याने उमेदवारांची चाचणी प्रकिया सुरू करण्यात आली आहे.ते पुढे म्हणाले की, महायुतीचा धर्म पाळणे ही आमची पहिली भूमिका राहील.मात्र , युती न झाल्यास किंवा मैत्रीपूर्ण लढत लढण्याची वेळ आली तर त्यासाठीही राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) पूर्णपणे सज्ज आहे.आम्हाला सन्मानजनक जागा मिळाल्यास महायुती म्हणून एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा आमचा प्रयत्न राहील.अशी स्पष्ट भूमिका त्यांनी यावेळी मांडली.या मुलाखतीच्या माध्यमातून पक्ष शहरातील प्रत्येक प्रभागातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेत असून आगामी निवडणुकीसाठी मजबूत आणि लोकाभिमुख उमेदवार देण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया महत्वाची ठरणार आहे.

लेबल:

शनिवार, २७ डिसेंबर, २०२५

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलीस ॲक्शन मोडवर

 

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलीस ॲक्शन मोडवर 

जनसंघर्ष न्यूज 

धुळे :- आगामी धुळे महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि. 25 डिसेंबर 2000 25 रोजी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखा धुळे व धुळे शहरातील आझाद नगर देवपूर पश्चिम देवपूर मोहाडी उपनगर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने विविध ठिकाणी का अवैद्य धंद्यांवर छापे मारून कारवाई केली. 

        सदर कारवाईत एकूण 11 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्रोव्हीबिशन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून एकूण चाळीस हजार 40,450 रूपये किमतीचा एकूण सहाशे बावीस लिटर गावठी हातभट्टी दारू, रसायन, वॉश , ड्रम व गावठी दारू बनविण्याचे साहित्य हस्तगत करून गावठी दारू जागीच नष्ट करण्यात आले आहे. 

          त्याचप्रमाणे देवपूर व पश्चिम देवपूर पोलीस ठाणे हद्दीत 5 ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापे टाकून 5 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्या कडून एकूण पाच हजार शंभर रुपये किमतीचे रोग रक्कम व जुगाराची साधने जप्त करून महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लेबल: ,

मेहकर येथील शेकडो युवकांचा आमदार सिद्धार्थ खरात यांच्या उपस्थितीत उबाठा शिवसेनेत जाहीर प्रवेश

 

मेहकर येथील शेकडो युवकांचा आमदार सिद्धार्थ खरात यांच्या उपस्थितीत उबाठा शिवसेनेत जाहीर प्रवेश

जनसंघर्ष न्यूज 

बुलढाणा प्रतिनिधी - दिपक देशमुख 

       मेहकर :- चिंचोली बोरे येथील युवकांचा हा प्रवेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यालयावर झाला यापुर्वी अनेक शहरी व ग्रामीण भागातील नागरिक यांचा समावेश या पक्षात झाला कुठे तरी नवयुवक यांच्या भावना दुखावल्या असतील किंवा त्याना विचारत न घेतल्याने सर्व युवक यांनी गावाचा विकास आणि कुठे तरी आपण काही तरी करु शकतो यासाठी नवनिर्वाचित आमदार सिध्दार्थ खरात हे एक जाणकार व्यक्ती महत्व आहे आणि यापूर्वी कामाचा अनुभव त्यांना चांगला होता चांगले काम व नागरिक यांच्या सहवासात असल्यामुळे त्यांनी या मेहकर च्या व लोणारच्या नवयुवक व नागरिक यांच्यावर एक निष्ठेने प्रेम केल्याने नागरिकांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले त्यामुळे आमदार कमी व मित्रता त्यांच्या अंगी असल्याने त्यांच्या कार्यालयामध्ये कोणीही गेल्यास विचारणा होते आणि त्या कामाची चौकशी स्वतः आमदार सिद्धार्थ खरात हे करत असतात त्यामुळे नागरिक त्यांच्या या कामाकडे बघून एक विश्वास आणि निष्ठा बाळगून आपल्याला यांच्याकडून समाधान मिळते त्यामुळे अनेक ग्रामीण भागातील नवयुवक हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करताना दिसतील यावेळी चिंचोली बोरी येथील नवयुवक मेकर लोणार चे आमदार सिद्धार्थ खरात नवनिर्वाचित नगराध्यक्ष किशोर गारोळे उपजिल्हाप्रमुख आशिष राहटे तालुकाप्रमुख निंबाजी पांडव आकाश घोडे संजय वडतकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत चिंचोली बोरे येथील पवन राजगुरू निखिल बोरे शिवम गावंडे शंतनू राजगुरू गजानन बोरे युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला आहे

लेबल: ,

मंगळवार, २३ डिसेंबर, २०२५

शिंदखेडा वार्ड क्र.९ मधून भाजपाचे दीपक देसले विजयी.

 

शिंदखेडा वार्ड क्र.९ मधून भाजपाचे दीपक देसले विजयी

जनसंघर्ष न्यूज 

प्रतिनिधी - सिद्धार्थ मोरे 

शिंदखेडा :- नगरपंचायत निवडणुकीत वार्ड क्रमांक ९ मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दिपक सुधाकर देसले हे १६० मतांनी विजयी झाले असून त्यांनी विरोधकांना घाम फोडला आहे. त्यांच्या विजयानंतर देसले यांच्या समर्थकांकडून संपर्क कार्यालयाबाहेर फटाक्यांच्या आतीष बाजीने व गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला. या जल्लोषात देसले कुटुंबीयांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

       यावेळी दिपक सुधाकर देसले त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, जनतेने माझ्यावर ठेवलेला विश्वास व दिलेल्या संधीच नक्कीच सोनं करून वार्डातील अनेक वर्षापासून रखडलेले कामे मार्गी लावून मोठ्या प्रमाणावर विकास कामांना गती दिली जाईल व वार्डाचा विकास हेच माझं ध्येय असेल असे बोलून वार्ड क्रमांक नऊ मधील समस्त मतदारांचे आभार मानले.

लेबल: ,

सोमवार, २२ डिसेंबर, २०२५

शिंदखेडा वार्ड क्रमांक तीन मधून काँग्रेसच्या कमलबाई रवींद्र पाटोळे विजयी

 

शिंदखेडा वार्ड क्रमांक तीन मधून काँग्रेसच्या कमलबाई रवींद्र पाटोळे विजयी

जनसंघर्ष न्यूज 

शिंदखेडा - नगरपंचायत निवडणुकीत वार्ड क्रमांक ३ मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला उमेदवार कमलबाई रवींद्र पाटोळे यांनी ७८५ मते मिळवून ३९५ च्या मताधिक्याने विजय मिळविला आहे. गेल्या अनेक वर्षापासून शिंदखेडा शहरात कमलाबाई रवींद्र पाटोळे व त्यांचे चिरंजीव सामाजिक कामात अग्रेसर होते. समाजातील केलेल्या सामाजिक कामांच्या मोबदल्यात मतदारांनी कमलाबाई पाटोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भरघोस मतांनी विजयी केले आहे. 

         यावेळी विजयानंतर मंगलाबाई पाटोळे यांचे चिरंजीव राहुल पाटोळे आणि कार्यकत्यांनी कमलबाई पाटोळे यांची विजयी मिरवणूक काढून मोठा जल्लोष साजरा करताना दिसून आले . यावेळी सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटोळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले कि,विजयाचे संपूर्ण श्रेय विशेषतः महिलांचे व कार्यकर्त्यांचे असून त्यांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवू व गेल्या अनेक वर्षांपासून वार्ड क्रमांक ३ मध्ये दलित वस्तीत जास्तीत जास्त विकासाची कामे करून. रोजगार देखील उपलब्ध करून देऊ त्याचबरोबर सामाजिक कामांना नेहमी प्राधान्य दिले देऊ असा आश्वासन दिले.

लेबल: , ,

मेहकर मध्ये मशाल पेटली किशोर गारोळे नगराध्यक्ष पदी विजयी

 

मेहकर मध्ये मशाल पेटली किशोर गारोळे नगराध्यक्ष पदी विजयी 

नवयुवक व मतदार राजाचे मानले आभार ; मा. आमदार सिध्दार्थ खरात यांच्या नेतृत्वाचा विजय

जनसंघर्ष न्यूज 

बुलढाणा प्रतिनिधी - दिपक देशमुख 

मेहकर - मेहकर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा बालेकिल्ला आहे आणि हे मतदार राजा यांनी दाखवून दिले असून नगरपरिषद निवडणुकीसाठी झालेल्या मतमोजणी त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तथा शिवसेना शहर प्रमुख किशोर भास्कर गारोळे हे बाराशे १२३७ मताने विजय झाले असून मेकर नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकला आहे 26 नगरसेवकापैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ६ तर काँग्रेस ११ व शिंदे गटाला ९ जागा मिळाल्या आहेत आज झालेल्या मतमोजणी नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे किशोर भास्कर भारुड यांना १०२३९ तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष कासम पिरू गवळी ९००२ मते मिळाली किशोर गारोळे यांनी कासम पिरू गवळी यांचा १२३७ मतानी पराभव खरंच विजय नोंदविला नगराध्यक्ष पदासाठी इतर उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे शिवसेना शिंदे गट अजय अरविंद उमाळकर ८१६० शेख मुखीम शेख जलाल कुरेशी ८९ कुमारी सारिका शिवाजी गवई १५९ माने कुणाल प्रल्हाद ७४ भाजपचे सारंग माळेकर ४३७ 

मते मिळाली आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे सहा नगसेवक निवडुन आले आमदार सिध्दार्थ खरात यांनी ठाकरे गटाचे किशोर गारोळे 

यांच्या साठी केलेली चक्रव्यूरचना यशस्वी ठरली मेहकर च्या जनतेने आमदार खरात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत गारोळे याना मतदार राजा यांनी भरभरून प्रतिसाद देऊन मतदान केल्याचे निकालावरुन स्पष्ट झाले आहे

लेबल: ,

शुक्रवार, १२ डिसेंबर, २०२५

सरवड येथील जातीय अत्याचार करणारे आणि सामाजिक बहिष्कार टाकणा-या समाजकंटकावर त्वरित कारवाई करा सत्यशोधक विद्यार्थी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 

सरवड येथील जातीय अत्याचार करणारे आणि सामाजिक बहिष्कार टाकणा-या समाजकंटकावर त्वरित कारवाई करा

सत्यशोधक विद्यार्थी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

जनसंघर्ष न्यूज 

    धुळे - शहरापासून १०-११ किमी अंतरावर असलेल्या सरवड गावात गेल्या काही दिवसांपासून जातीय अत्याचाराच्या घटना घडत आहे.घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासन निव्वळ गुन्हे दाखल करण्याचा सोपस्कार पार पाडत असल्याने गुन्हेगारांवरील पोलिसांचा धाक दिसून येत नाही.परणामी एकाच गावात दुस-यांदा जातीय अत्याचाराची घटना घडते.एवढेच नाही तर जातीयवादी मानसिकता सामाजिक बहिष्कारापर्यंत जावून पोहचली आहे. दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी बदनामीच्या आरोपावरून दिव्यांग गौतम गवळे यास जातीय शिवीगाळ करून अमानुष मारहाण केली गेली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.घरातील बाबासाहेबांच्या फोटो कडे हात दाखवत शिवीगाळही केली. अनिल कैलास पाटील, गायत्री अनिल पाटील, विकास कैलास पाटील, राधा विकास पाटील, मनोहर प्रकाश पाटील ही आरोपींची नावे असून. गौतम सोबतच त्याची म्हाताऱ्या आई, आजारी वडील आणि त्याच्या बहिणीला देखील त्यांनी मारहाण केली.वरील घटनेच्या बाबतीत सहा दिवस झाल्यानंतर देखील एकाही आरोपीला अटक झालेली नाही. आरोपी गावात मोकाट फिरत आहेत. पोलिस कोणतेच ठोस पाऊल उचलत नाही. आरोपी प्रस्थापित नेत्यांकडून पोलिसांवर दबाव आणत आहेत असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.यापूर्वी २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सरवड गावात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नावाच्या फलकाजवळ  फटाके फोडण्याच्या वादावरून दोन गटात खूप मोठा वाद झाला होता. त्यानंतर दोन्ही पक्षांनी बैठका घेऊन समझोता केला. परंतु नंतर समोरच्या पक्षाने गावात त्यांची वेगळी बैठक बोलावली व त्या बैठकीत असे ठरवले कि यांना (दलित समाजाच्या लोकांना) दुकानावर येऊ द्यायचं नाही, यांना चक्कीवर दळण दळून द्यायचं नाही, दूध देणे बंद करायचं, यांच्या लोकांना कुठे कामाला लावायचं नाही इत्यादी. याला काही लोकांनी नकार दिला. पण त्यांनी दोन महिलांना  चक्कीवरून परतून दिले. एक जण दूध आणायला गेला असता त्याला दूध दिले नाही, काही महिला  शेतात कामाला गेल्या असता त्यांनाही कामावरून  परतावून लावले. यासंदर्भात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे शिष्टमंडळाने सोनगीर पोलिस स्टेशनला भेट दिली असता संबंधित अधिका-यांकडून सांगण्यात आले की,सदर गुन्हा उपविभागीय पोलीस अधिकारी साक्री यांच्या स्तरावरील असून आम्ही काहीही करू शकत नाही.असे उत्तर एकप्रकारची पळवाटच म्हटली पाहिजे.यावरून पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचे स्पष्ट होते.

अशापद्धतीने सरवड गावात जातीय अत्याचाराच्या घटना वारंवार घडत असतांना पोलीस प्रशासन मात्र गुन्हेगारांवर कारवाई करीत नसल्याने भविष्यात मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.पर्यायाने तालुक्यातील सामाजिक सलोखा बिघडण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.

    तरी सरवड ता.जि.धुळे येथील जातीय अत्याचार करणारे आणि सामाजिक  बहिष्कार टाकणा-या प्रवृत्तींच्या विरोधात तीव्र स्वरूपाची कारवाई करण्यात यावी.तसेच दिव्यांग  गौतम गवळे यास अमानुष मारहाण करणारे अनिल कैलास पाटील, गायत्री अनिल पाटील, विकास कैलास पाटील, राधा विकास पाटील, मनोहर प्रकाश पाटील या आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अश्या मागणीचे निवेदन धुळे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे    

           यावेळी सत्यशोधक विद्यार्थी संघटना,महाराष्ट्र चे सिद्धांत बागुल , केतन निकम,हर्ष मोरे,धम्मदीप मोरे,निलीमा भामरे ,धनंजय जगताप,सिद्धार्थ बैसाणे  ,दिनेश बैसाणे, श्वेता गवळे,मयुरी जाधव ,विश्वजित वाघ,हरीश वाघ , धनराज झाल्टे ,शरद वेंदे , संदीप बोरसे,सचिन बागुल,अतुल बैसाणे , मनोज नगराळे ,राकेश अहिरे आदि उपस्थित होते.

लेबल: ,

ज्येष्ठ नेते मा.शरद पवार यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

 

ज्येष्ठ नेते मा.शरद पवार यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

जनसंघर्ष न्यूज 

बुलढाणा प्रतिनिधी -दिपक देशमुख 

          मेहकर - आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांच्या ८५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून डोणगाव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते याच्या कडुन डोणगाव येथील जिल्हा परिषद कन्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.आज संपुर्ण महाराष्ट्रात साजरा होत आहे दरवर्षी प्रमाणे डोणगाव  शहरातील ग्रामस्थांनी शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला आहे दरवर्षी प्रमाणे गावातील काही मंडळी प्राथमिक शाळेत जाऊन  तिथल्या विद्यार्थ्यासोबत विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूचे भेट देऊन वाढदिवस साजरा करुन दीर्घायुष्याची प्रार्थना केली विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात उपयोगात आणून त्यांच्या गरजा पूर्ण केल्या तर विद्यार्थ्यांची शालेय गोडी वाढून त्यांच्या गरजा पूर्ण होऊ शकतात अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व गावातील ग्रामस्थांनी युवा पिढीने मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला आहे . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पंकज पळसकर युवा जिल्हाध्यक्ष गोपाल आखाडे श्याम पांडव आशिष भंडारे सतीश बाजार नामदेव पांडव शाळेचे मुख्याध्यापिका कुसुम गवई गोपाल लांबाडे अंजली ठोंबरे अर्चना सूर्यवंशी व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते

लेबल: , , , , , ,

गुरुवार, ११ डिसेंबर, २०२५

बोगस गैर आदिवासी लोकांना प्रमाणपत्र टोकन देऊ नका - राष्ट्रवादी (श.प.गट ) आदिवासी सेलचे जात पडताळणी सहाय्यक आयुक्त यांना निवेदन

 

बोगस गैर आदिवासी लोकांना प्रमाणपत्र टोकन देऊ नका -

 राष्ट्रवादी  (श.प.गट ) आदिवासी सेलचे जात पडताळणी सहाय्यक आयुक्त यांना  निवेदन

जनसंघर्ष न्यूज 

    राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. लवकरच महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुका देखील जाहीर होतील अशी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आदिवासी जात पडताळणी समिती, धुळे यांच्या वतीने गैरआदिवासी उमेदवारांना टोकन देण्यात येते व खऱ्या आदिवासींवर अन्याय होत आहेत.

    तरी सदर बाब लक्षात घेऊन गैर आदिवासींना टोकन देण्यात येऊ नये,  व आदिवासींवर अन्याय होणार नाही,  याची जात पडताळणी समिती धुळे, यांनी दक्षता घ्यावी असे निवेदन देण्यात आले आहे.

     यावेळी मा.आयुक्त आदिवासी जात पडताळणी समिती देवपूर धुळे  यांना निवेदन देताना राष्ट्रवादी आदिवासी सेल ( श. प. गट )चे अध्यक्ष कुणाल ( बंटी दादा ) वाघ, गोविंदा भाऊ आहिरे , प्रविण मोरे, अक्षय सोनवणे, विनायक मोरे, यश मालचे, दिपक माळी, लखन पवार, सागर वाघ, शुभम ठाकरे, गोविंदा माळी, प्रकाश ठाकरे, अनिल अहिरे, विकी वाघ, किसन सोनवणे सह राष्ट्रवादी आदिवासी सेल ( श. प. गट )चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

लेबल: , , ,

महसूल नायब तहसीलदाराचा पापाचा घडा भरला ; २ लाख ५० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

 


महसूल नायब तहसीलदाराचा पापाचा घडा भरला 

२ लाख ५० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात 

जनसंघर्ष न्यूज

     नाशिक - जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात महसूल विभागात कार्यरत असलेले लोकसेवक महसूल नायब तहसीलदार संजय भिकाजी धनगर वय ५१ वर्षे यांना नाशिक विभाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २ लाख ५० हजार रुपये लाज घेताना रंगेहात पकडल्याने नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

        सदर प्रकरणातील तक्रारदार यांनी त्यांचा मुलगा व सुनेच्या नावे मौजे दोडी खुर्द ता. सिन्नर, जि. नाशिक येथील ग.नं. ४९९, क्षेत्र ३ हे ६० आर शेत जमिन खरेदी केली होती. सदर खरेदी खतावरुन तलाठी दोडी खुर्द यांनी घेतलेल्या फेरफार नोंद क. ३३४५ हि रद्द होण्याकरीता दिलेल्या तक्रारीचा निकाल तक्रारदार यांच्या मुलाच्या व सुनेच्या बाजुने लावुन देवुन, त्यांचेकडे सुनावणीकामी असलेली फेरफार नोंद क. ३३४५ ही मंजुर करुन देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे लोकसेवक महसूल नायब तहसीलदार यांनी दि. ०६ डिसेंबर २०२५ रोजी तक्रारदार यांच्याकडे १०,००,०००/- रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती २,५०,०००/- रुपये लाचेची रक्कम रिकारण्याचे मान्य केले होते. 

        तक्रारदार यांनी सदर घटनेबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या कार्यालयाला भेट देऊन तक्रार केली असता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक श्री. रूपाली खांडवी यांनी पथकाच्या मदतीने दि. ०९ डिसेंबर २०२५ रोजी सापळा रचून कारवाईचे आयोजन केले असता आरोपी लोकसेवक यांनी सोपान हॉस्पीटल समोर रोडाच्याकडेला नाशिक येथे लाचेची रक्कम २,५०,०००/- रुपये तक्रारदार यांचेकडून पंचासमक्ष स्विकारल्यानंतर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

      सदर कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली खांडवी, ला.प्र.वि. नाशिक सह सापळा पथकातील पो. हवा/संदिप वणवे, पोकों/प्रमोद पाळदे पोहवा/शरद हॅबाडे, पोहवा/युवराज खांडवी यांनी केली.

       लाचलुचपत विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवका बद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक येथे संपर्क करावा.

लेबल: , , , ,

शेतकऱ्यांच्या शेती साहित्याची चोरी; मेहकर तालुक्यात खळबळ, हिवाळी अधिवेशनावर आंदोलनाचा इशारा

 

शेतकऱ्यांच्या शेती साहित्याची चोरी; मेहकर तालुक्यात खळबळ,

 हिवाळी अधिवेशनावर आंदोलनाचा इशारा

जनसंघर्ष न्यूज

बुलढाणा प्रतिनिधी -दिपक देशमुख 

      मेहकर :-  डिसेंबर गेल्या काही दिवसांपासून मेहकर तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाचे साहित्य, अवजारे आणि जनावरे चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, यामुळे शेतकरी वर्गात मोठी भीती आणि असंतोष पसरला आहे. या प्रकरणांना स्थानिक पोलीस गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप होत असून, पोलिसांनी तात्काळ कठोर पावले उचलली नाहीत, तर आगामी हिवाळी अधिवेशनावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अॅड. रामेश्वर स. पळसकर यांनी दिला आहे.

चोरीच्या घटनांचा सपाटा

प्रत्येक वर्षी चोरीच्या घटना घडतात, परंतु यावर्षी चोरट्यांनी कहर केला आहे. गेल्या काही दिवसांत मेहकर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातून स्प्रिंकलर, पाईप, मोटार, केबल आणि इतर शेती उपयोगी साहित्य मोठ्या प्रमाणावर चोरीला गेले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

शेतकरी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवण्यासाठी गेल्यानंतर, त्यांचा रिपोर्ट 'एन.सी.' (NC) म्हणून नोंदवून त्यांना थातूर-मातूर उत्तरे दिली जात आहेत, असा अर्जदाराचा आक्षेप आहे. यामुळे या सर्व प्रकरणांना मेहकर तालुक्यातील कोणतेच ठाणेदार गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पोलिसांच्या या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास उडाला असून, त्यांनी या चोरट्यांना पकडण्यासाठी बुलढाणा पोलीस अधीक्षक यांच्याकडे पथक नेमण्याची मागणी केली आहे.

आंदोलनाचा इशारा

डोंणगाव येथील अॅड. रामेश्वर स. पळसकर यांनी बुलढाणा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनाद्वारे ही गंभीर परिस्थिती मांडली आहे. जर पोलीस प्रशासनाने या चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करावी असा इशारा देण्यात आला आहे

लेबल: , , , ,