सोमवार, २६ जानेवारी, २०२६

धुळे टेक्स्टाईल मिलमध्ये गणतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात संपन्न

 

धुळे टेक्स्टाईल मिलमध्ये गणतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात संपन्न

जनसंघर्ष न्यूज 

धुळे :- शहरातील राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या टेक्स्टाईल मिलमध्ये भारतीय गणतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ज्येष्ठ कामगार नेते रामकृष्ण बगदे यांच्या हस्ते ठीक सकाळी साडेआठ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय मिल मजदूर संघटनेचे जनरल सेक्रेटरी श्री. मच्छिंद्रभाऊ येरडावकर, संघटनेचे प्रतिनिधी किशोर वाघ, भटू कोळेकर, अशोक टकले, संभाजी चौगुले, राधेश्याम घाटोळे, गणेश सुपनर, अशोक विसपुते आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन धुळे टेक्स्टाईल मिलचे व्यवस्थापन व सुरक्षा विभाग यांच्या वतीने करण्यात आले होते. ध्वजारोहणानंतर श्री.रामकृष्ण बगदे यांनी आपल्या मनोगतातून गणतंत्र दिनाचे महत्त्व उपस्थितांना विशद केले. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी अल्पोपहार व चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी टेक्स्टाईल मिलच्या सुरक्षा विभागाचे जमादार श्री. अनिल बगदे यांच्यासह मोहन औटे, प्रदीप शेवतकर, अरुण औटे, अशोक पाटील, मधुकर रासकर, मधुकर पाटील, अशोक झिंबल, धनंजय गाळणकर, दिलीप पाटील, प्रभाकर पाटील, अशोक साळुंखे, सुनील सोनटक्के, शंतनू कुलकर्णी, दीपक थोरात, विजय जाधव, सुरज सोनटक्के, महेश शेवतकर, सुनील औटे, राजेश गायकवाड आदींनी बहुमोल योगदान दिले.

लेबल: , ,

शुक्रवार, २३ जानेवारी, २०२६

धुळे तालुका पोलीसांचा गुटखा तस्करांना दणका

 

धुळे तालुका पोलीसांचा गुटखा तस्करांना दणका 

वोल्वो लक्झरीच्या आड गुटखा तस्करीचा गुन्हा उघड ; 8 लाख 18 हजार 85 रूपयांच्या गुटखा सह वोल्वो लक्झरी जप्त 

जनसंघर्ष न्यूज 

         धुळे - पोलीस निरीक्षक श्री.धनंजय पाटील यांना दिनांक-20/01/2026 रोजी त्यांच्या विश्वसनिय गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, इंदौर येथून श्यामोली परिवहन कंपनीची वोल्वो लक्झरी क्रमांक-MP-41-ZJ-7444 हिचेत पुणे कडेस महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत पान मसालाची वाहतुक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यावरुन प्रकरणाचे गांभीर्य लक्षांत घेवून मा. पोलीस अधीक्षक, धुळे श्री. श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे, श्री. संजय बांबळे उप-विभागीय पोलीस अधिकारी यांना घटनेची माहिती देवुन त्यांच्या मार्गदर्शनपर सुचनेप्रमाणे अधिनस्त असलेले अधिकारी व अंमलदारांना सुचना देवून पोलीस निरीक्षक श्री. धनंजय पाटील, मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक-03 वर आर्वी पोलीस दुरक्षेत्र समोरच नाकाबंदी करुन सापळा लावला व दिनांक-21/01/2026 रोजीचे 02.00 वाजेच्या सुमारास श्यामोली परिवहन कंपनीची वोल्वो लक्झरी क्रमांक-MP-41-ZJ-7444 इंदौर कडून मालेगांव कडेस येतांना दिसली तसेच मिळालेल्या बातमीतील वाहनाची देखील खात्री झाल्याने नमुद लक्झरीला थांबण्याचा इशारा करुन थांबविली व पंचासमक्ष लक्झरीच्या डिक्कीची तपासणी व झडती घेतली असता त्यात वाहनांतील प्रवाश्यांच्या बॅगच्या शेजारीच पांढ-या गोण्या दिसुन आल्याने बातमीची खात्री झाल्याने नमुद गोण्या उघडुन तपासणी केली असता त्यात राजश्री पान मसाला, रजनीगंधा पानमसाला व RMD PAN MASALA सोबत सुगंधीत तंबाकूचा साठा असा एकुण एकुण-818085/-रुपये किंमतीचा प्रतिबंधीत पान मसालाचा साठा मिळून आला असुन या प्रकरणी [1] श्यामोली परिवहन कंपनीचा मॅनेजर अरुप सरकार रा.इंदौर [2] शर्मा ट्रॅव्हल्स, कंपनीचा मालक कमल शर्मा रा.इंदौरे [3] पुणे येथील प्रविण नावाचा व्यक्ती [4] वोल्वो लक्झरी क्रमांक-MP-41-ZJ-7444 चा ड्रायव्हर सचिन दिनेश बाडोले वय-31 व्यवसाय-ड्रायव्हर रा.D365 आवास नगर देवास [मध्यप्रदेश] व [5] बिरजूदास रतनदास बैरागी वय-48 रा. इंदौर [मध्यप्रदेश] [6] बसचा कंडक्टर प्रदीपकुमार लक्ष्मीनारायण सुर्यवंशी रा.इंदौर यांचे विरुध्द पोलीस हवलदार चेतन कंखरे यांचे तक्रारीवरुन धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली असुन आरोपी नामे [4] वोल्वो लक्झरी क्रमांक-MP-41-ZJ-7444 चा ड्रायव्हर सचिन दिनेश रा.देवास [मध्यप्रदेश] [5] बिरजूदास रतनदास बैरागी रा.इंदौर [मध्यप्रदेश] [6] बसचा कंडक्टर प्रदीपकुमार लक्ष्मीनारायण सुर्यवंशी रा.इंदौर यांना अटक करण्यात आली असुन नमुद गुन्हयाचा पुढील तपास पोउनि छाया पाटील करीत आहेत. गुटखा तस्करांनी आता नव्याने पॉश वोल्वो ट्रॅव्हल्सचा आडमार्गाने गुटखा तस्करी करत असल्याचे अधोरेखीत झाले असुन अशा प्रकरांना आळा घालण्यासाठी पोलीसांनी कंबर कसली आहे. या प्रकरणांत 818085/-रुपये किंमतीचा प्रतिबंधीत पान मसाला व 1,50,00,000/-रुपयाची वोल्वो लक्झरी बस जप्त करण्यात आली आहे.

   सदर छापा कारवाईत पोलीस निरीक्षक, श्री. धनंजय पाटील यांचे पर्यवेक्षणात मपोउनि छाया पाटील, पोहवा-गणेश शांताराम काळे, पोहवा- कुणाल पानपाटील, पोहवा-चेतन कंखरे, पोहवा- सुमित ठाकुर, पोकॉ- विशाल पाटील, पोकॉ सुरेंद्र खांडेकर, पोकॉ निलेश पाटील, पोकों- प्रमोद पाटील, पोकॉ- योगेश पाटील यांनी सहभाग घेवून अथक परिश्रम घेतले आहेत.

लेबल: ,

गुरुवार, १५ जानेवारी, २०२६

16 जानेवारी धुळे मनपाची खुलजा सिम सिम कोण कोण होणार नगरसेवक ?

 


16 जानेवारी धुळे मनपाची " खुलजा सिम सिम " कोण कोण होणार नगरसेवक ?

जनसंघर्ष न्यूज 

धुळे :- धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली असून उद्या दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी प्रक्रिया सकाळी १० वाजे पासून सुरु होणार आहे.

मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांना नेमूण दिलेल्या प्रभागानुसार सहा कक्षात एकाच वेळी मतमोजणी प्रक्रिया सुरु होणार आहे. यात प्रथम टपाली मतपत्रीकांची गणना केली जाणार आहे. तनंतर प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात सुमारे १० ते १४ मतगणनेच्या फेरी होणार आहेत. यात प्रथम प्रभाग क्रमांक १,५,८,३,१४,१७ तद्नंतर प्रभाग क्रमांक २,६,१२,९,१५,१८ व नंतर ४,७,१३,१०,१६,१९ या प्रमाणे ३ टप्प्यात प्रभागनिहाय मतगणना करण्याचे नियोजन आहे. सदर गोदामातील मर्यादीत जागा लक्षात घेता उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना प्रभागनिहाय निश्चीत केलेल्या टप्पयानुसार मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार आहे. प्रथम टप्यातील प्रभाग क्रमांकाची मतगणना पूर्ण झाल्यावर दुसऱ्या टप्प्यातील प्रभागांच्या उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना मतमोजणी कक्षात प्रवेश देण्यात येईल. यासाठी मतमोजणी कक्षालगत असलेल्या शेडमध्ये उर्वरीत उमेदवार व मतमोजणी प्रतिनिधींसाठी प्रतिक्षा कक्षाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रभाग निहाय टप्पा पूर्ण झाल्यावर ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना देण्यात येणार आहे.

मतमोजणी प्रकियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्या कार्यकक्षेत मतगणना कर्मचारी पथक नियुक्त केलेले आहे. त्यांच्या नियंत्रणात मतगणना होणार आहे. सदर संपूर्ण प्रक्रियेप्रसंगी मुख्य निवडणूक निरीक्षक श्री ओमकार पवार व निवडणूक निरीक्षक श्री देवदत्त केकान तसेच आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्री नितीन कापडणीस उपस्थित राहणार आहे.

मतमोजणी कक्षात फक्त अधिकृत ओळखपत्रधारकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. उमेदवार व त्यांच्या मतमोजणी प्रतिनिधींना फक्त बाहेरील प्रवेशव्दारापर्यंत वाहनाने सोडण्यास परवानगी आहे. मतमोजणी केंद्राच्या आत मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर सक्त बंदी राहील. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना कोणत्याही परिस्थितीत मोबाईल / इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरण्यास परवानगी नसेल. पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार कक्ष असून पत्रकार कक्षात मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तु बाळगू शकतात. सर्व उमेदवार व प्रतिनिधी यांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे व मतमोजणी प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.


लेबल: , ,

सोमवार, १२ जानेवारी, २०२६

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेची गुन्हेगारांवर करडी नजर ; गावठी कट्टा सह आरोपी जेरबंद

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेची गुन्हेगारांवर करडी नजर 

 विशेष मोहिम दरम्यान देशी गावठी कट्टा बाळगणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखा, धुळे ने घेतले ताब्यात

जनसंघर्ष न्यूज 

      धुळे :- मा. पोलीस अधीक्षक धुळे श्री. श्रीकांत धिवरे यांनी धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने विशेष मोहिम राबवुन अवैध धंदयांसह अवैध शस्त्रांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

      त्याअनुषंगाने दि.10/01/2026 रोजी पोलीस निरीक्षक, श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांना प्राप्त गोपनिय माहितीचे आधारे धुळे शहरातील वरखेडी रोडवरील डंपींग ग्राऊंड जवळ इसम अरबाज महम्मंद शरीफ अन्सारी, वय-22 वर्ष, रा.मौलावी गंज, धुळे यास विना परवाना देशी गावठी कट्टा (पिस्टल) दहशत माजविण्याच्या उद्देशाने देशी गावठी कट्टा (पिस्टल) कब्जात बाळगतांना अग्निशस्त्रसह ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचे ताब्यात मिळुन आलेल्या मुद्देमाल आढळून आला आहे यामध्ये एक देशी गावठी कट्टा (पिस्टल) मॅग्झीन व स्ट्रायकर पिनसह असा एकूण 40 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

     अशाप्रकारे आरोपी अरबाज महम्मंद शरीफ अन्सारी, वय-22 वर्ष, रा. मौलावी गंज, धुळे याचे कब्जातुन 40,000/- रु.किं.चा देशी गावठी कट्टा हस्तगत करुन, आझादनगर पोलीस ठाणे येथे भारतीय शस्त्र अधिनियम सन 1959 चे कलम 3/25 सह मपोकाक. 37 (1) (3)/135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

       आरोपी अरबाज महम्मंद शरीफ अन्सारी, वय-22 वर्ष, रा. मौलावी गंज, धुळे याच्या विरुध्द यापुर्वी देखील आझादनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं.149/2024 भादंवि क. 143, 144, 147, 188, 186, 336 सह मपोकाक.37 (1) (3)/135 गुन्हे दाखल आहेत.

        सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, धुळे श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सपोनि. श्रीकृष्ण पारधी, सपोनि. नामदेव सहारे, पोलीस अंमलदार शशिकांत देवरे, मुकेश वाघ, धर्मेंद्र मोहिते, सुशिल शेंडे व आशिषकुमार वानखेडे यांनी केली आहे.

लेबल: ,

धुळ्याच्या विकासाची धमक फक्त भारतीय जनता पक्षाकडेच :- आमदार अमरीश भाई पटेल



धुळ्याच्या विकासाची धमक फक्त भारतीय जनता पक्षाकडेच :- आमदार अमरीश भाई पटेल 

प्रभाग ११ मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

जनसंघर्ष न्यूज 

धुळे, ता. १२ :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रात, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्यातील सरकारच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत भारतीय जनता पक्ष नियोजनपूर्वक धुळे शहराचा विकास साधत आहे. यात केंद्र, राज्य आणि महापालिकेत भाजपची सत्ता असणे हा खूप महत्त्वाचा घटक ठरला आहे. आताही महापालिकेत भाजपची सत्ता आली नाही, तर धुळे शहराची विकासात पुन्हा पिछेहाट होईल. ते टाळण्यासाठी धुळे शहरवासीयांनी महापालिकेसारख्या महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची सत्ता पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या हाती सोपवावी, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमदार अमरिशभाई पटेल यांनी केले.

धुळे महापालिका निवडणुकीतील भाजपचे प्रभाग ११ मधील उमेदवार रोहित चांदोडे, मायादेवी परदेशी, कल्पना महाले आणि चेतन गवळी यांच्या प्रचारार्थ जमनालाल बजाज रोडवर रविवारी रात्री कमळ विजय संकल्प सभा झाली, तीत आमदार पटेल बोलत होते. यावेळी आमदार अनुपभय्या अग्रवाल, नंदलाल ऋणवाल, चेतन मंडोरे, सागर कोडगीर, पप्पू डापसे, सत्यजित शिसोदे, तुषार भागवत, राजेश गिंदोडिया तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार पटेल भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांवर प्रकाशझोत टाकताना म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यासह देशात भक्कम पायाभूत सुविधांची निर्मिती होत आहे. दोन्ही सत्ताकेंद्रांच्या सहकार्याने धुळे महापालिकेतही भाजपची सत्ता असताना शहराचा गंभीर झालेला पाणीप्रश्न सोडविला गेला. अमृत योजनेंतर्गत भूमिगत गटाराचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून, आता दुसरा टप्पा सुरू होत आहे. पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुपभय्या अग्रवाल यांच्या नेतृत्वात शहरात पायाभूत सुविधांची निर्मिती करताना रस्ते, व्यापारी संकुलांची कामे मार्गी लागत आहेत. यातून असंख्य बेरोजगार तरुणांसह महिलांनाही हक्काचा रोजगार उपलब्ध होणार आहे. यातून शहराच्या उद्यमशीलतेत वाढ होऊन आर्थिक प्रगतीला हातभार लागणार आहे. रावेर एमआयडीसीसारखा प्रकल्प मंजूर होण्यासाठी आमदार अग्रवाल सातत्याने प्रयत्नशील आहेत. यापूर्वी विरोधकांनी काय विकास केला आणि भाजपच्या नेतृत्वात गेल्या सहा-सात वर्षांत काय विकास झाला, याची तुलना करून शहरातील मतदारांनी आता सकारात्मक दृष्ट्या विचार करून मतदान करण्याची गरज आहे. त्यासाठी येत्या १५ जानेवारीला भाजपच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतदान करून त्यांना विजयी करण्याचे आवाहनही आमदार पटेल यांनी केले.

विरोधकांकडे फक्त आरोप करण्याची वृत्ती

आमदार अग्रवाल म्हणाले, की विरोधकांकडे विकासाचे कुठलेच मुद्दे नसल्याने ते माझ्यासह भारतीय जनता पक्षावर आता विविध आरोप करू लागले आहेत. विरोधकांकडे सत्ता असताना त्यांनी ठळकपणे सांगता येईल, अशा एका तरी कामाचा दाखला द्यावा. आम्ही गेल्या पाच वर्षांत महापालिकेतील सत्तेच्या माध्यमातून शहराचा गंभीर पाणीप्रश्न सोडविला. भूमिगत गटारांचे काम मार्गी लावले. १८ डीपी रस्त्यांचे काम पूर्ण केले. शहरातील कॉलनी-कॉलनीतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले. मी आमदार झाल्यापासून एक वर्षात तब्बल १५० ते २०० कोटींचा निधी आणण्यात यशस्वी झालो असून, त्याद्वारे शहरात पाचकंदील मार्केटचे नूतनीकरण, दसेरा मैदानालगत व्यापारी संकुल, नवरंग जलकुंभाजवळ नवीन मॉल व भाजी मंडई, संत सावता माळी मार्केटचे नूतनीकरण करून असंख्य युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. याशिवाय टॉवर गार्डन, पांझरा नदीकाठी भारतरत्न गार्डन, एकवीरा मंदिरासमोर ५१ शक्तिपीठ, पांझरा रिव्हर फ्रंट प्रकल्प, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, वीर सावरकरांचे स्मारक आदी कामांतून शहराच्या सौंदर्यीकरणाला चालना दिली आहे. शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी केंद्रासह राज्यात भाजपची सत्ता असल्याने पुढील पाच वर्षांतही भरघोस निधी आणण्याची ताकद फक्त भाजपकडे असून, त्यासाठी पुन्हा एकदा भाजपकडे महापालिकेची सत्ता सोपवावी, १५ जानेवारीला जास्तीत जास्त मतदान करून भाजपच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन आमदार अग्रवाल यांनी केले.

लेबल:

रविवार, ११ जानेवारी, २०२६

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तालुका पोलिसांचा अवैद्य दारू तस्करांना दणका ; आरोपींकडून 30 लाख 17 हजार रुपयाचा मुद्दामाल जप्त



 निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तालुका पोलिसांचा अवैद्य दारू तस्करांना दणका ;

 आरोपींकडून 30 लाख 17 हजार रुपयाचा मुद्दामाल जप्त

जनसंघर्ष न्यूज 

      धुळे :- दि.१० जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक श्री. धनंजय पाटील यांना गुप्त बातमीदारा कडुन बातमी मिळाली होती की, पारोळा कडून धुळे कडे जाणारे रोडावर मुकटी ता.जि. धुळे गावाचे शिवारातुन ट्रक क्रमांक MH १८ BH ८८९१ याचेतुन रॉकेट नावाची देशी दारुची चोरटी वाहतुक करण्यात येणार आहे. सदरची माहिती त्यांनी मा. पोलीस अधीक्षक धुळे यांना कळवून तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे, उप विभागीय पोलीस अधिकारी, धुळे ग्रामिण विभाग श्री. संजय बंबाले यांचे मार्गदर्शन घेवून त्याअनुशंगाने पोनि श्री. धनंजय पाटील यांनी पोसई प्रशांत राठोड, पोहेको २८३ योगेश पाटील, पोहेकों ६४९ कुणाल पानपाटील, पोहेकों १५४५ सोमनाथ कांबळे, पोहेको १३४० सुमित ठाकुर, पोहेको १३०६ चेतन कंखरे, पोहेकॉ ११४७ मुकेश पवार, पोकों ८५० विशाल पाटील, पोकॉ५ ३७ प्रमोद पाटील पोकों १७५४ रविंद्र सोनवणे, असई रविंद्र राजपुत यांचे पथक तयार करुन बातमीची खात्री करुन कारवाई करण्याचे आदेशीत केल्याने नमुद पथकाने दि.१०.०१.२०२६ रोती मध्यरात्री ०१.०० वा. ते ०२.३६ वा पावेतों सदर वाहनाचा शोध घेवून सदर ट्रक मुकटी गावाचे शिवाराज हॉटेल एकता चे आवारात येवुन मध्यरात्री अंधारात चालकाने सदर ट्रक उभा करुन त्यातुन बॉक्स पीकअप वाहात उतरवित असतांना दिसल्याने त्याचा संशय आल्याने नमुद पथकाने सदर ठिकाणी छापा टाकुन १) राकेश छगनलाल जैन वय ३५ रा. प्लॉट नं. १२१, शांतीनगर, अभय कॉलेज, जवळ, धुळे, २) दिपक अशोक शिंदे वय ३५ रा. नथ्थुवाबा नगर, मोहाडी उपनगर, धुळे, ३) सुदाम भुरा गोसावी वय ४२ रा. भाटपुरा ता. शिरपुर जि. धुळेअशांना त्यांचे ताब्यातील वाहनांसह पकडुन पंचांसमोर पंचनामाकरुन झडती घेतली असता त्यात खालील प्रमाणे वर्णणाचा व किंमतीचा मुददेमाल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला आहे.

     सदर कारवाईत ३ लाख ४ हजार रुपये किंमतीचा ट्रक क्रमांक MH १८ ८८९१ याचेत रॉकेट देशी दारुचे ७६ बॉक्स, प्रत्येक बॉक्स मध्ये १०० बॉटल, प्रत्येक बॉटलची किंमत ४० रुपये, बेंच क्रमांक ४०२ (एका बॉक्सची किंमत ४ हजार रुपये) , १ लाख ९२ हजार रुपये किंमतीची पीकअप वाहन क्रमांक MH ०४ JU ८७२२ मध्ये रॉकेट देशी दारुचे ४८ बॉक्स, प्रत्येक बॉक्स मध्ये १०० बॉटल, प्रत्येक बॉटलची किंमत ४० रुपये, बेंच क्रमांक ४०२ (एका बॉक्सची किंमत ४ हजार रुपये , १५ लाख रुपये किंमतीची ट्रक क्रमांक MH १८ ८८९१ जु वा कि अं. जु वा कि अं., ५ लाख रुपये किंमतीची पीकअप वाहन क्रमांक MH ०४ JU ८७२२ जु वा कि अं. ,५ लाख रुपये किंमतीची स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH ०४ ED ९३३४ जु वा कि अं. व ४ मोबाईल असा एकूण  ३० लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल व वाहने जप्त करण्यात आली असुन सदर प्रकरणी धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई), (अ), ८३, १०८, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

      आगामी महानगर पालीकेचे निवडणुकीचे पार्श्वभुमीवर धुळे तालुका पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी, श्री. धनंजय पाटील, पोसई प्रशांत राठोड, व पोलीस अंमलदार यांचे पथकने वरील प्रमाणे देशी दारुचा मोठ्या प्रमाणावर मिळुन आलेला साठा चोरटी वाहतुक करतांना उघडकीस आणुन कायदेशीर कारवाई केल्याने वरिष्ठांकडुन धुळे तालुका पोलीस स्टेशन येथील अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.

लेबल: , ,

प्रभाग क्र.९ मध्ये भाजपाचे उमेदवारांचा प्रचार आघाडीवर ; उमेदवार पूनम शिरसाठ, प्रदीप बैरागी, लताबाई सोनार संजय जाधवांना जनतेची पसंती

 

प्रभाग क्र.९ मध्ये भाजपाचे उमेदवारांचा प्रचार आघाडीवर 

  उमेदवार पूनम शिरसाठ, प्रदीप बैरागी, लताबाई सोनार संजय जाधवांना जनतेची पसंती

भारतीय जनता पक्षाच्या बेटी बचाव, बेटी पढाओ च्या प्रदेश संयोजीका सौ. अल्पा अनुप अग्रवाल यांचा सक्रिय सहभाग

जनसंघर्ष न्यूज 

        धुळे - शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू असून प्रभाग क्र.९ मध्ये भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार आघाडीवर असून प्रभागात भाजपाचा बोलबाला दिसत असल्याने विरोधकांची झोप उडाली आहे. जनतेच्या सहभागाने होणाऱ्याशक्ती प्रदर्शनामुळे विरोधकांना धडकी भरली आहे.

         प्रभाग क्र.९ च्या उमेदवारांच्या प्रचारार्थ निघालेल्या रॅलींमध्ये भारतीय जनता पक्षाच्या बेटी बचाव, बेटी पढावच्या प्रदेशसंयोजीका सौ. अल्पा अनुप अग्रवाल यांनी सक्रिय सहभाग नोंदविल्याने भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. भाजपाने प्रभाग क्र.९ मध्ये पूनम जितेंद्र शिरसाठ, प्रदीप पुरणदास बैरागी, सौ.लताबाई यशवंत पोतदार (सोनार), संजय सुधाकर जाधव यांना उमेदवारी दिली आहे. चारही सक्षम उमेदवारांची बलस्थाने आहेत. भारतीय जनता पक्षाने या प्रभागात केलेल्या विकासकामांच्या बळावरउमेदवार जनतेसमोर जात आहे. त्यांच्या प्रचार रॅलींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

        धुळे शहराच्या मिल परिसरातील नारायण मास्तर चाळीतून निघालेल्या प्रचार रॅलीनेसंपूर्ण प्रभाग दणाणून सोडला. या भव्य रॅलीला सौ. अल्पा अनुप अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. रॅलीमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता, प्रभाग ९ मध्ये कमळ फुलणार हे स्पष्ट संकेतरॅलीला मिळणाऱ्या प्रतिसादातून दिसत आहे. सुशासन, पारदर्शक कारभार आणि सर्वांगीण विकासाचा विश्वास भाजपाचे उमेदवार जनतेला देत आहेत. आज निघालेल्या रॅलीला नागरिकांकडून मिळालेल्या प्रतिसादाने चारही उमेदवार भारावले आहेत. प्रभाग क्र.९ मधील जनतेच्या साथीने उमेदवार विजयाची नौका पार करतील असा विश्वास भाजपा कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.

लेबल:

सोमवार, ५ जानेवारी, २०२६

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)‌ पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला अधिकृत जाहीर पाठिंबा

 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)‌ पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला अधिकृत जाहीर पाठिंबा

जनसंघर्ष न्यूज 

मुंबई :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) ने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला अधिकृत जाहीर पाठिंबा दिला आहे. हा निर्णय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपकभाऊ निकाळजे यांच्या आदेशानुसार घेण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी दिली.

       भारतीय लोकशाही अधिक मजबूत करणे, सामाजिक न्याय, समता, बंधुता व संविधानिक मूल्यांचे संरक्षण करणे या समान उद्दिष्टांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) यांची विचारधारा सुसंगत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित सामाजिक परिवर्तनाची लढाई अधिक प्रभावीपणे लढण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा शशिकांत शिंदे साहेब.  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रवक्ते माननीय विकास लवांडे.रिपाई चे सचिव माननीय अशोक ससाने. माननीय अरुण भिंगारदिवे. माननीय तानाजी मिसळे. मुंबई प्रदेशचे उपाध्यक्ष समीर लागझरे. उपाध्यक्ष माननीय दिलीप कदम. अरुण भालेराव. माननीय प्रवीण पवार. माननीय चंद्रशेखर सपकाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होती

लेबल: ,

सीमेवरील जवानाकडून धुळे मनपा निवडणूकच्या पार्श्वभूमीवर १६ नंबर प्रभागातील लढ्यास आर्थिक बळ; जोगती रवीभाऊंना आर्मी जवाना कडून ११,१११ रूपयांचा आर्थिक पाठिंबा

 

सीमेवरील जवानाकडून धुळे मनपा निवडणूकच्या पार्श्वभूमीवर १६ नंबर प्रभागातील लढ्यास आर्थिक बळ

जोगती रवीभाऊंना आर्मी जवाना कडून ११,१११ रूपयांचा आर्थिक पाठिंबा

जनसंघर्ष न्यूज 

       देशाच्या सीमेवर देशसेवेची जबाबदारी पार पाडणाऱ्या सैन्यदलातील जवानाने लोकशाहीच्या बळकटीसाठी पुढाकार घेतल्याचे उदाहरण प्रभाग क्रमांक १६ मध्ये पाहायला मिळाले. सैन्य दलात कार्यरत असलेले भूषण अशोकराव पाटील यांनी आपल्या प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या पार्वती परशुराम जोगी (रवीभाऊ) यांना ११,१११ रुपये आर्थिक मदत देत आपली सामाजिक बांधिलकी जपली. भूषण पाटील यांनी सांगितले की, जनतेकडून जमा होणाऱ्या कराच्या पैशातून भारत सरकार आम्हाला मानधन देते. त्या पगारातून, आपल्या परिस्थितीनुसार आणि परिवाराच्या वतीने, ही मदत देण्यात आली आहे. रवीभाऊ हे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले उमेदवार असून त्यांनी प्रभागातील प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी सामान्य माणसाने पुढे येणे गरजेचे असून, आपल्या प्रभागातील सक्षम नागरिकांनी रवीभाऊंना मदतीचा हात द्यावा, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे. “आपल्या मधूनच आपला नगरसेवक निवडून आणूया,” असे सांगत त्यांनी प्रभागातील मतदारांना जागरूक राहण्याचे आवाहन केले.

       देशसेवेतील जवानाने दाखविलेल्या या योगदानामुळे प्रभागात सकारात्मक चर्चा सुरू असून, लोकशाही प्रक्रियेत सामान्य नागरिकांच्या सहभागाला नवे बळ मिळाले आहे.

लेबल: , ,

जानेफळ येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा गौरव

 

जानेफळ येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा गौरव

समाजसेविका ॲड.माधुरी देवानंद पवार यांचा तर्फे पत्रकारांच्या लेखणीचा सन्मान 

जनसंघर्ष न्यूज 

मेहकर प्रतिनिधी - दिपक देशमुख 

     लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची जबाबदारी प्रामाणिकपणे पेलणाऱ्या पत्रकारांच्या लेखणीचा गौरव करणारा एक भव्य, प्रेरणादायी आणि सत्यनिष्ठ पत्रकारांचा गौरव कार्यक्रम

       मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनी पत्रकार दिनानिमित्त जानेफळ येथे ६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आला आहे. सप्तशृंगी महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुख्य शाखा-जानेफळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी 'पत्रकार सन्मान सोहळा' मोठ्या उत्साहात पार पडणार आहे .

        निर्भीड, निष्पक्ष आणि जनहितवादी पत्रकारितेला बळ देण्याच्या उद्देशाने गेल्या अनेक वर्षांपासून सप्तशृंगी महिला अर्बनच्या माध्यमातून हा स्तुत्य उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. त्यामुळे मेहकर-लोणार तालुक्यातील पत्रकार बांधवांमध्ये या कार्यक्रमाबाबत विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. यंदाच्या पत्रकार सन्मान सोहळ्यास राजकीय,सामाजिक आणि सार्वजनिक जीवनातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष लक्ष्मण घुमरे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम उमाळकर, मेहकर विधानसभा नेते ॲड. अनंता वानखेडे, माजी नगराध्यक्ष कासम गवळी, तसेच माजी सभापती नंदू बोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

        मेहकर व लोणार शहरासह तालुक्यातील सर्व माध्यमांतील पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ॲड. कु. माधुरीताई देवानंद पवार, अध्यक्षा, सप्तशृंगी महिला अर्बन,देवानंद त्र्यंबक पवार, समन्वयक, मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघ तथा संस्थापक अध्यक्ष, सप्तशृंगी महिला अर्बन यांनी केले आहे.तर विष्णु पुंडलीक वाकळे, पत्रकार व संस्थापक उपाध्यक्ष सप्तशृंगी महिला अर्बन आणि विष्णु आखरे पाटील, पत्रकार हे या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.

लेबल: ,

भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची जाहीर सभा संपन्न ; १०१ श्रीफळ वाढवून एकवीरामातेला साकडे

 

भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची जाहीर सभा संपन्न ; १०१ श्रीफळ वाढवून एकवीरामातेला साकडे

पुढच्या पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपच्याच पाठीशी रहा ; धुळे शहर विकसित,स्मार्ट शहर बनवू 

जनसंघर्ष न्यूज 

धुळे, ता. ४ :- येथील महापालिकेची येत्या १५ जानेवारीला होऊ घातलेली निवडणूक ही केवळ १९ प्रभागांतील नगरसेवक निवडून देण्यासाठी नाही, तर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात २०१४ पासून होत असलेल्या सर्वांगीण विकासाचा रथ अखंड पुढे नेण्यासाठी आहे. आपल्या पुढच्या पिढ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आहे. यामुळे सर्व धुळेकरांनी आताच सावध होत आपल्या पुढच्या पिढ्यांचे भविष्य चुकीच्या विचारांच्या, चुकीच्या प्रवृत्तींच्या हातात देण्याऐवजी सब का साथ, सब का विकास या विचाराने वाटचाल करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या हाती सोपवावी. पक्षाच्या सर्व ५९ उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे, अशी साद भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांनी आज धुळेकरांना घातली.

१०१ श्रीफळ वाढवून एकवीरामातेला साकडे

शहरातील कान्हदेश कुलस्वामिनी आदिशक्ती श्री एकवीरादेवी मातेच्या मंदिरात १०१ श्रीफळ वाढवून, मातेचे आशीर्वाद घेतल्यानंतर व सर्व उमेदवारांच्या विजयाचे साकडे घालत मंदिरासमोरील प्रांगणात भाजपच्या सर्व ५९ उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत संबोधित करताना प्रदेशाध्यक्ष चव्हाण बोलत होते. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल, भाजपचे संघटन महामंत्री विजय चौधरी, विभागीय संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे, आमदार अनुपभय्या अग्रवाल, आमदार राम भदाणे, माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार कुणाल पाटील, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्यासह भाजपचे सर्व जिल्हा सरचिटणीस, सर्व मंडळाध्यक्ष यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. भाजपचे निवडणूक रिंगणातील सर्व ५९ उमेदवारांसह त्यांचे समर्थक व महिला-पुरुषांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

विकसित , स्मार्ट धुळे बनवू : चव्हाण

प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले, की या शहराला भगवी झालर लाभली आहे. ती टिकवून ठेवण्यासाठी महापालिकेच्या निवडणुकीत येत्या १५ जानेवारीला समस्त धुळेकर नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहत पक्षाच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतदान करत विजयी करायचे आहे. २०१४ पासून राज्यासह देशभरातील नागरिक भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी ठामपणे उभे राहत आहेत. २०१४ पासून केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार व राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार ज्या ताकदीने काम करत आहे. त्यानुसार धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, विकसित, स्मार्ट आणि स्वच्छ धुळे बनविण्यासाठी आपण सर्व शहरवासीयांनी महापालिकेतही भाजपची सत्ता आणायची आहे. पक्षाचे आणि उमेदवारांचे कमळ चिन्ह घराघरात पोहोचविण्यासाठी व जनतेची साथ मिळविण्यासाठी उमेदवारांसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहनही श्री. चव्हाण यांनी केले.

विकासाचे व्हीजन तयार : रवींद्र चव्हाण

श्री. चव्हाण म्हणाले, की केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने शहरातील विकासाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत, ज्या समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. भाजपने महापालिकेत २०१८ पासून सुरू केलेली विकासाची गंगा सातत्याने पुढे वाहती ठेवण्यासाठी आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी राहावे. शहरात पावसाळ्यात पावसाचे पाणी साचून घरांमध्ये शिरणारे पाणी व त्यातून होणारे नुकसान थांबविण्यासाठी ५१३ कोटींची स्टॉर्म वॉटर योजना प्रत्यक्षात साकारण्यासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करू. याशिवाय धुळे शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जीर्ण झालेली तापी योजनेची जलवाहिनी बदलण्यासाठी २२३ कोटी रुपयांचा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करण्यासाठीही आम्ही कटिबद्ध राहू. जनसुविधेच्या प्रत्येक कामाला गती देण्यासाठी भाजपशिवाय पर्याय नाही. त्यासाठी तुमची आमची-भाजपा सर्वांची हा नारा घरोघरी पोहोचवा. पक्षाच्या संघटनात्मक ताकदीतून आपण महापालिकेच्या निवडणुकीत ५५ पेक्षा जास्त जागांवर विजय निश्चित साकारू, असा विश्वासही श्री. चव्हाण यांनी व्यक्त केला. 

तत्पूर्वी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल, शहराचे आमदार अनुपभय्या अग्रवाल, माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी भारतीय जनता पक्षाचे आगामी पाच वर्षांतील विकासाचे व्हीजन मांडत त्या मुद्द्यांवर भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक रिंगणातील सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

विक्रमी रक्तदानाप्रमाणे आता विक्रमी मतदान करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पक्ष स्तरावर सेवाभावी वृत्तीने राबविलेल्या रक्तदानाच्या उपक्रमात महाराष्ट्रातून धुळे शहरातील आबालवृद्ध नागरिकांनी विक्रमी रक्तदान करत राज्यात पहिला क्रमांक पटकावला होता. त्यासाठी समस्त धुळेकरांचे आभार मानतो. ज्या विश्वासाने धुळेकरांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याप्रती प्रेम दाखवत आपले रक्त दिले, त्याच विश्वासातून आता महापालिकेच्या निवडणुकीतही विक्रमी मतांचे दान भाजपला देत पक्षाच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे. तुम्ही भाजपप्रती दाखविलेल्या या विश्वासाला पक्षाचे वरिष्ठ व स्थानिक नेते कधीही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाहीही श्री. चव्हाण यांनी दिली. 

जाहीरनाम्याचे प्रकाशन अन् अनेकांचा भाजप प्रवेश

          सभेच्या प्रारंभी विविध पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत प्रतिष्ठित व्यक्तींनी आज मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते राजेंद्र पाटील, वंदे मातरम प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा उद्योजक सुमित बोरसे, सामाजिक कार्यकर्ते कपूरचंद बाविस्कर, साक्रीच्या प्रतिभा सूर्यवंशी, छगन सूर्यवंशी, कासारे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तम देसले यांच्यासह त्यांचे समर्थक व कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यानंतर महापालिका निवडणुकीसाठी पुढील पाच वर्षांच्या विकासाचे व्हीजन मांडणाऱ्या जाहीरनाम्याचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

वर्धमान कॉटेक्स जिनिंग बद्दल खोट्या तक्रारी करणाऱ्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्या - कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 

वर्धमान कॉटेक्स जिनिंग बद्दल खोट्या तक्रारी करणाऱ्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्या 

- कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जनसंघर्ष न्यूज 

प्रतिनिधी - सिद्धार्थ मोरे

धुळे :- शिंदखेडा तालुक्यातील परसामळ व कुमरेज येथील शेतकरी व ग्रामस्थ यांनी आज दिनांक 5 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने करत वर्धमान कटिक्स जिनिंग हि 2018 पासून सुरळीत सुरु असून तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी कापूस विक्रीसाठी आणत असतात.

      जिनिंग स्थापनेपासून कोणताही त्रास किंवा प्रदूषण आम्हा ग्रामस्त व शेतकऱ्यांना झालेला नाही. परंतु मागील काही वर्षापासून पासून परिसरातील काही लोक जिनिंग बद्दल खोट्या तक्रारी करत असून त्यांचा जिनिंग शी काही एक सबंध नसताना सुध्दा विनाकारण त्रास देण्यासाठी वरीष्ठ स्तरावर तक्रारी करत आहेत असा आरोप करत वर्धमान कॉटक्स जिनिंग हा विषय शेतकऱ्यांचा कापूस पिक हे नगदी पीक असल्याने हा विषय जिव्हाळ्याचे असल्याने जिनिंग विरुद्ध देण्यात येत असलेल्या तक्रारीत काही एक तथ्य नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट होवून ही जिनिंग संचालकांना मानसिक त्रास देण्याच्या उद्देश हे एकमेव कारण असल्याचा परसामळ- कुमरेज गट ग्रामपंचायतीने 16 डिसेंबर 2025 ला ग्रामसभेत ठराव पारित करण्यात आला आहे. 

     तरी शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांच्या हित लक्षात घेता योग्य तो निर्णय घेण्यात यावा अशा मागणीचे निवेदन निवास जिल्हाधिकाऱ्याने देण्यात आला आहे. 

       यावेळी परसामळ, कुनरेज, भडणे, शिंदखेडा, दसवेल, भाबुळदे, चिमठाणे, वरुड, घुसणे , चौगाव, सोनरोल, रामपूर, हातनुर, साकुर, दराने, रोहाणे, पाला, वरपाडे, विरदेल, धमाने, निरगुडी, आरावे, देवी , सतारे, भामरे, विखरण, मेथी, विठाई, गोराणे, दबाशी, भारपुरा, तावखेडा, सुखवद, माळीच, कलमाळी इत्यादी गावातील कपाशी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

लेबल: ,

रविवार, ४ जानेवारी, २०२६

प्रभाग ९ मध्ये भाजप उमेदवारांची विराट प्रचार रॅली , युवकांसह हजारो महिलांचा उस्फूर्त सहभाग



प्रभाग ९ मध्ये भाजप उमेदवारांची विराट प्रचार रॅली , युवकांसह हजारो महिलांचा उस्फूर्त सहभाग

जनसंघर्ष न्यूज

       धुळे :-  महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी तर्फे प्रभाग क्रमांक ९ मधून उमेदवारी करीत असलेल्या चारही उमेदवारांनी रविवारी एकत्रित पहिलीच भव्य विराट प्रचार रॅली काढून मतदारांचे लक्ष वेधून घेतले. प्रभाग ९ मधील भाजपा उमेदवार संजय सुधाकर जाधव, पुनम जितेंद्र शिरसाठ , प्रदीप पुरणदास बैरागी आणि लताबाई सोनार ( पोतदार ) या चारही उमेदवारांच्या या प्रचार रॅलीत युवकांसह हजारोंच्या संख्येने महिला आणि नागरिक सहभागी झाले होते. यात महिलांची संख्या सर्वाधिक होती. या विराट प्रचार रॅलीने संपूर्ण प्रभागातील जनतेचे लक्ष वेधून घेतलं असून विरोधकांना धडकी भरली आहे. पहिल्याच प्रचार रॅलीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर आलेल्या गर्दीमुळे भाजपाने प्रभाग ९ मध्ये प्रचाराच्या सुरुवातीलाच जोरदार मुसंडी मारली आहे. यामुळे उमेदवारांसह समर्थकांचा आत्मविश्वास जबरदस्त वाढला आहे.

लेबल: ,

शनिवार, ३ जानेवारी, २०२६

एम आय एम चे २२ उमेदवारांपैकी एक गद्दार निघाला तरी २१ उमेदवार निवडून येणारचं - इर्शादभाई

 

एम आय एम चे २२ उमेदवारांपैकी एक गद्दार निघाला तरी २१ उमेदवार निवडून येणारचं - इर्शादभाई जहागीरदार 

आमची लढाई भाजपा विरोधात ; विकास आणि भ्रष्टाचार या दोन मुद्द्यांवर आम्ही जनतेसमोर 

जनसंघर्ष न्यूज 

प्रतिनिधी - सिद्धार्थ मोरे 

       धुळे :- महानगरपालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाने २२ उमेदवार दिले होते यापैकी निवडणूकीत शेवटच्या दिवशी एमआयएम चे माजी जिल्हाध्यक्ष नासिर पठाण यांनी माघार घेत पत्रकार परिषद घेऊन इर्शाद भाई जहांगीरदार यांच्यावर पैसे घेऊन तिकीट विकल्याचा आरोप केल्यानंतर आज दिनांक ३ जानेवारी रोजी इर्शाद जहांगीरदार यांनी चाळीसगाव रोड येथील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन नासिर पठाण यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. मी पैसे घेऊन तिकीट दिले असेल तर सिद्ध करून दाखवा मी आजच राजकारण सोडेल असे इर्शाद भाईंनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

         यावेळी महानगरपालिकेच्या निवडणुकीत एमआयएम पक्षाची चाप लावणार. महापालिकेत आम्ही किंगमेकर राहू, धुळ्याची जनता आमच्यासाठी किंग आहे. या निवडणुकीत एमआयएमचे सर्वच्या सर्व २१ उमेदवार निवडून येतील असा दावा एमआयएमचे नेते इर्शादभाई जहागिरदार यांनी केला आहे.

       धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील एमआयएम पक्ष कार्यालयात इर्शादभाईंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा दावा केला आहे. इर्शादभाई म्हणाले की, आमची लढाई ही सामाजिक न्यायासाठीची आहे. विकास आणि भ्रष्टाचार या दोन मुद्द्यांवर एमआयएम पक्ष महापालिका निवडणुकीत जनतेसमोर जात राजकीय इतिहासाला कलाटणी देणारी ठरणारी आहे. आम्ही धुळे महानगरपालिकेत किंग मेकरच्या भुमीकेत असणार आहोत, धुळेकर जनता आमच्यासाठी किंग आहे. भाजपाने महापालिकेच्या सत्ता काळात प्रचंड भ्रष्टाचार केला. त्यांची मनमानी होती. धुळेकरांसाठी, धुळ्यातील जनतेची आर्थिक लुट थांबविण्यासाठी आमचे नगरसेवक महापालिकेत धुळेकर जनतेची बाजू भक्कमपणे मांडतील. ही निवडणुक भाजपा विरोधात आहे. महापालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही तर सत्तेसाठी भाजपा सोबत जाणार का ? अशी विचारणा केली असता इर्शादभाई म्हणाले की, भाजपासोबत जाणे कधीही शक्य नाही. त्यांना सत्ता स्थापणेसाठी मदत होईल अशी भुमिका एमआयएम कधीही घेणार नाही. महापालिका निवडणुकीत आम्ही २२ जागांवर उमेदवार दिले होते. त्यापैकी एकाने माघार घेतली आहे. आम्ही सर्व २१ जागा जिंकणारच मनपा निवडणुकीत एमआयएमचा स्ट्राईक रेट ९० टक्के राहील असेही इर्शादभाई म्हणाले. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष नासीर पठाण यांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना इर्शादभाई जहागिरदार म्हणाले की, नासिर पठाण हे आता जिल्हाध्यक्ष नाहीत ते माजी जिल्हाध्यक्ष आहेत. मी कोणतीही मनमानी तिकीट वाटपात केलेली नव्हती. नासिर पठाण यांच्या म्हणण्यानुसारच उमेदवारांना तिकीट वाटप करण्यात आली. त्यांच्या मतानुसारच पॅनल तयार करण्यात आले होते. परंतु त्यांनी पक्षाला फसविले. नासिर पठाण हे गद्दार आहेत असा प्रहार इर्शादभाईनी केला. मी तिकीटासाठी पैसे घेतल्याचे सिध्द केल्यास राजकारण सोडेल असा पलटवार विरोधकांवर इर्शादभाईंनी केला. 

       महापालिका निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्या एमआयएम उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष ओवेसी, माजी खासदार इम्तीयाज जलील, माजीद हुसेन येणार असल्याचे देखील इर्शादभाई यांनी सांगितले. 

       यापत्रकार परिषदेत माजी उपनगराध्यक्ष तथा एमआयएमचे प्रभाग क्र.४ चे उमेदवार ईस्माईल पठाण यांनी सांगितले की, नासिर पठाण हा गद्दारी  करेल त्याला तिकीट देवू नका असे मी, इर्शादभाईंना सांगितले होते. परंतु इर्शादभाई हे पटकन विश्वास ठेवणारे नेते असल्याने त्यांनी नासिर पठाण यांच्यावर विश्वास ठेवला पण  माझे शब्द खरे ठरले. नासीर पठाणनने गद्वारी केली. या पत्रकार परिषदेला एमआयएमचे उमेदवार देखील उपस्थित होते.

लेबल: ,

अकलाड येथील जि.प. शाळेत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बालिका दिन उत्साहात

 

अकलाड येथील जि.प. शाळेत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बालिका दिन उत्साहात

जनसंघर्ष न्यूज 

       धुळे :- तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा, अकलाड येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शाळेत विविध शैक्षणिक व प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर मनोगत व भाषणे सादर केली.

          स्त्री शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाची माहिती विद्यार्थ्यांनी आपल्या शब्दांत मांडली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर रायते, तसेच संगिता वाघ, अजयकुमार बच्छाव, दिनेश राजभोज, राजेंद्र सोनवणे व योगिता पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगून बालिका शिक्षणाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेषतः मुलींमध्ये शिक्षणाविषयी जागृती निर्माण झाली. बालिका सशक्तीकरणाचा संदेश देत हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

लेबल: ,

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रचारासाठी उद्या धुळ्यात




भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रचारासाठी उद्या धुळ्यात  

धुळे मनपा निवडणुकीतील पक्षाच्या ५९ उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ

जनसंघर्ष न्यूज 

धुळे, ता. ३ :-  येथील महापालिका निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचे ६३ पैकी चार उमेदवार बिनविरोध विजयी झाले. यानंतर आता निवडणूक रिंगणातील पक्षाच्या ५९ उमेदवारांच्या प्रचाराचे रणशिंग रविवारी (ता. ४) दुपारी दोनला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत फुंकले जाणार आहे.

येथील महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ७४ पैकी ६३ जागांवर उमेदवार दिले आहेत. यापैकी माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत चार उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. आता निवडणूक रिंगणात पक्षाचे ५९ उमेदवार आहेत. या उमेदवारांच्या सामूहिक प्रचाराचा श्रीगणेशा करण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची रविवारी दुपारी दोनला जाहीर सभा होत आहे. प्रारंभी खान्देश कुलस्वामिनी आदिशक्ती श्री एकवीरामातेच्या मंदिरात प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते व सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत १०१ नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ होईल. यानंतर श्री एकवीरामाता मंदिरासमोरील पांझरा नदीकाठच्या रस्त्यावर श्री. चव्हाण यांची दुपारी दोनला जाहीर सभा होईल. सभेत भाजपच्या विकासाचा अजेंडा जनतेसमोर मांडला जाईल. यावेळी पक्षाचे विभागीय संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे, राज्याचे पणन व राजशिष्टाचार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम भदाणे, माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार कुणाल पाटील, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाणे यांच्यासह पक्षाचे सर्व उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित असतील. सभेला धुळेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ओमप्रकाश खंडेलवाल, शशी मोगलाईकर, पवन जाजू, सुनील कपिल, महानगर जिल्हा उपाध्यक्ष श्याम पाटील यांनी केले.

लेबल: ,

महानगरपालिका निवडणुकीचा भाजपा नवा पायांडा ; निष्ठावंतांना डावलून नामचीन गुंडांना उमेदवारी

 

महानगरपालिका निवडणुकीचा भाजपा नवा पायांडा ; निष्ठावंतांना डावलून नामचीन गुंडांना उमेदवारी - मा.आमदार अनिल गोटे

विरोधकांना कुणी प्रत्यक्ष भेटून, फोन करून, त्यांच्या घरी जाऊन आणि नामचीन गुंड पाठवून, निवडणुकीतून माघार घेण्यासाठी दबाव तंत्र.

तीन मुले असलेल्या महिलेच्या उमेदवारीवर हरकत घेऊनही, अधिकाऱ्यांनी त्या महिलेचा उमेदवारी अर्ज स्वीकारला ; कायदे जणू यांच्या कार्यालयात मंजूर झाले का?

आता बंड केलाच आहे तर तुमच्या बंडातील ताकदीची पक्षाला ओळख तरी करून द्या!

शिवसेना नेते माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांचे तरुणांना आवाहन

जनसंघर्ष न्यूज 

प्रतिनिधी - सिध्दार्थ मोरे 

धुळे :- नुकतीच माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपा विरोधात मोठा खुलासा केला आहे.यामध्ये महाराष्ट्रभर सर्वच महानगरपालिकांमध्ये जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र भाजपामध्ये नव्या गुंड, बदमाश, बलात्कारी लोकांना घेऊन, भाजपाने महाराष्ट्रातील राजकारण पाकिस्तान, बांगलादेश पेक्षाही खालचे स्तराला नेले असून त्यांच्याच पक्षातील महिला, कधीकाळी मंत्री राहिलेल्या नेत्यांच्या कानाखाली जाळ काढत आहेत. तर, निष्ठावंत कार्यकर्ते ढसाढसा रडत आहेत. नव्याने आयात केलेल्या सर्व गुंड बदमाशांना भाजपाने पायघड्या घालून उमेदवारी दिली. पक्षासाठी रात्रंदिवस कष्ट उपसणाऱ्या आणि कठीण परिस्थितीत पक्षासोबत राहिलेल्या, सर्व एकनिष्ठ उमेदवारांना डावलण्यात आले. त्यांना विश्वासात सुद्धा घेतले नाही. अशा धक्कादायक घटना सर्वत्र घडल्या आहेत. कधी नव्हे एवढी गुंडगिरी महापालिका निवडणुकीत दिसून येत आहे. आश्चर्य असे की, सरकार मान्य गुंडगिरी व सरकार पुरस्कृत गुंडगिरी ही पहिल्यांदाच पाहायला मिळाली.

        दुसरीकडे प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजपाच्या उमेदवार श्रीमती योगिता संजय कुटे यांना ३ मुले असून मुलांचे जन्म तारखेचे दाखले तसेच तीन मुलांसह एकत्र छायाचित्र इत्यादी सर्व पुरावे देऊन सुद्धा, हरकत घेणाऱ्या श्रीमती प्राचीताई कुलकर्णी यांची हरक फेटाळून लावली व श्रीमती योगिता कुटे अर्ज मान्य करण्यात आला. अधिकारी सुद्धा १० टक्के फितूर झाले असून, सर्वात दुदैवाची बाब अशी की, भाजपा पक्षाने राज्यातील प्रशासकीय यंत्रणाही भ्रष्ट व लाचार करून टाकली आहे. अधिकाऱ्यांचे अशा पद्धतीने वागणे सर्वतः बेकायदेशीर नियमबाह्य व गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य आहे धुळेकर नागरिक बंधू-भगिनींना माझी विनंती आहे की, धुळे शहरातील गुंडगिरी २०१९ पर्यंत आपण सर्वांनी मिळून मोडन काढली होती. पण २०१९ ला भाजपाने माझा पराभव करण्याकरिता, फारुख शहाला निवडून आणून, जातीय वादाला खतपाणी घातले. तसेच महानगरपालिकेच्या २०१८ च्या निवडणुकीत शहरातील ३२ गुंडांना एकाच वेळेला प्रवेश देऊन सिद्ध करून दिले की, आमच्याकडे कार्यकर्त्यांना किंमत नाही तर, गुंड बदमाशांना किंमत आहे. त्यावेळेला महाराष्ट्रात भाजपाच्या अशा वर्तणुकीविरुद्ध मी एकट्याने बंडखोरी करून, मुदत संपण्यापूर्वीच आमदारकीचा राजीनामा दिला.

       आश्चर्य असे की, ज्या निष्ठावंतांसाठी पक्षाच्या नेतृत्वाविरुद्ध भांडण विकत घेतले. तेच भाजपाला सर्वात आधी शरण गेले. त्यांनी माझ्याशी केलेल्या दगलबाजीची शिक्षा भाजपानेच त्यांना दिली असून, आता त्यांच्यापैकी एकालाही उमेदवारी दिली नाही. लाचारांनो, केवळ झाडझुड करणे, सतरंज्या नसल्याने खुर्चा उचलणणष, नेते आले की, गर्दी करणष, टाळ्या वाजवणे, 'की', म्हटले की 'जय' म्हणणे एवढ्या पुरताच तयांचा पक्षाला उपयोग राहीला आहे.

      भाजपा हा निष्ठावंतांचा नाही तर, संधीसाधूंचा पक्ष आहे. गुंड, बदमाश, बलात्कारी, नंबर दोनचे धंदे करणारे, काळाबाजार करणारे, सट्टा, मटका यांना प्रतिष्व आहे. भाजपाने सिद्ध करून दिले आहे.

       मला कळालेल्या माहितीनुसार भाजपाचे काही बंडखोर उभे राहिलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितले आहे की, 'चुकीच्या निर्णयाविरुद्ध बंड करून उठणाऱ्यालाच मर्द म्हणतात. बंडखोरीस फार मोठे धाडस लागते. सर्व बंडखोरांना माझे आवाहन आहे की, बंडखोरी केली आहे, त्यावर कायम रहा ! आणि पक्षाला दाखवून द्या की, खरंच तुमची ताकद आहे! ज्यामुळे भविष्यात तरी तुमची दखल घेतील,असे आवाहन भाजपाचे माजी आमदार व शिवसेना नेते अनिल अण्णा गोटे, शुभांगी ताई पाटील, भगवान बापूजी करनकाळ, अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील यांनी केले आहे.

मेहकर येथे शिवसेना कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

 

मेहकर येथे शिवसेना कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

जनसंघर्ष न्यूज 

बुलढाणा प्रतिनिधी - दिपक देशमुख 

मेहकर – लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या जनसंवाद कार्यालय, मेहकर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सकाळी ठीक ११ वाजता अभिवादन कार्यक्रम उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या सामाजिक क्रांतीच्या कार्याला उपस्थित मान्यवरांनी विनम्र अभिवादन केले. सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षण, समाजसुधारणा आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिक्षण हेच सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचा संदेश त्यांनी समाजाला दिला असून त्यांचे विचार आजच्या पिढीसाठी दिशादर्शक असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, आज महिलांना मिळणारे शिक्षण व सन्मान हे त्यांच्या संघर्षाचे फलित आहे. त्यांच्या विचारांवर चालत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण व समानतेचा प्रकाश पोहोचवणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल.

या कार्यक्रमास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगराध्यक्ष किशोर गारोळे, नगरसेवक निसार अन्सारी, व्यापारी संदीप गारोळे, युवा सेना तालुका अधिकारी ॲड. आकाश घोडे, गजानन पालवे, गोपाल गायकवाड, राजू आव्हाळे, भागवत बोरकर, गणेश गावंडे, राजू गवई, राम कष्ठे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम शांततेत, शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर करून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

लेबल: ,